संपुर्ण मराठी व्याकरण प्रा.प्रदिप मोरे

Description
अनुभव:- द युनिक अकॅडमी पुणे 2 वर्ष
:- स्टडी सर्कल पुणे 3 वर्ष
:- पुणे विद्यापीठ CEC 2 वर्ष
:- स्वरुपवर्धिनी पुणे 2 वर्ष

प्रत्यके महिण्यात नवीन वर्ग (Batch) सुरू .
"संपूर्ण मराठी व्याकरण तोंडपाठ"
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her

4 Jahre, 2 Monate her

ONLINE संपूर्ण मराठी व्याकरण

MPSC , PSI,ASO,STI,पोलिस भरती,मेगा भरती इत्यादींसाठी उपयुक्त......

मार्गदर्शक - प्रा. प्रदीप मोरे

कालावधी - संपूर्ण घटकांची चांगली तयारी होईपर्यंत(अंदाजे ४० दिवस)

➡️ बॅच सुरू दि. १६ सप्टेंबर २०२० वेळ स. १० वा.( तीन दिवस मोफत )

? वैशिष्ट्ये -

१)सर्व घटक लेक्चरमधेच तोंडपाठ
२)घटक झाल्यावर लागलीच आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची चाचणी (१९८६ पासुन विचारलेले सर्व प्रश्न)
३) लेक्चर करून पहा बाकीची सर्व वैशिष्टये आपोआप लक्शात येतील.

?डेमो लेक्चरसाठी लिंक फाॅलो करा

https://youtu.be/3UPtpXGybJg

प्रवेशासाठी संपर्क 9545828458
शुल्क फक्त ५००/-

कुणाच्या उपयोगी येईल अस वाटलं तर शेअर करा....??

YouTube

Marati Grammar : Swarsandhi (मराठी व्याकरण : स्वरसंधी )

MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. आणि या मराठी व्याकरणामध्ये संधी हां एक महत्वाचा आणि तितकाच किचकट असा घटक आहे. स्वरसंधीचे 3 प्रकार पडतात - स्वरसंधी, व्यंजनसंधी…

4 Jahre, 3 Monate her
संपुर्ण मराठी व्याकरण प्रा.प्रदिप मोरे
4 Jahre, 7 Monate her

♻️ मराठी :- सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी

दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.

सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ +अ = आ    

  1. सूर्य + अस्त = सूर्यास्त

  2. कट + अक्ष = कटाक्ष

  3. रूप + अंतर = रुपांतर

  4. मिष्ट + अन्न = मिष्टान्न

  5. स + अभिनय = साभिनय

  6. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

  7. सह + अध्यायी = सहाध्यायी

  8. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ

  9. सह + अनुभूती = सहानुभूती

  10. मंद + अंध = मंदांध

  11. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार

? अ + आ = आ ?

  1. देव + आलय = देवालय

  2. हिम + आलय = हिमालय

  3. फल + आहार = फलाहार

  4. अनाथ + आश्रम = अनाथाश्रम

  5. गोल + आकार = गोलाकार

  6. मंत्र + आलय = मंत्रालय

  7. शिशिर + आगमन = शिशिरागमन

  8. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

  9. धन + आदेश = धनादेश

  10. जन + आदेश = जनादेश

  11. दुख: + आर्त = दुखार्त

  12. नील + आकाश = नीलाकाश

  13. कार्य + आरंभ = कार्यारंभ

? आ +आ = आ ?

  1. महिला + आश्रम = महिलाश्रम 

  2. राजा + आश्रय = राजाश्रय

  3. कला + आनंद = कलानंद

  4. विद्या + आलय = विद्यालय

  5. राजा + आज्ञा = राजाज्ञा

  6. चिंता + आतुर = चिंतातुर

? इ+ इ = ई ?

  1. मुनी + इच्छा = मुनीच्छा

  2. कवि + इच्छा = कवीच्छा

? इ+ इ = ई ?

  1. मुनी + इच्छा = मुनीच्छा

  2. कवि + इच्छा = कवीच्छा

  3. अभि + इष्ट = अभीष्ट

? इ+ ई = ई ?

  1. गिरि + ईश = गिरीश

  2. कवि + ईश्वर = कवीश्वर

  3. परि + ईक्षा = परीक्षा

? ई+ इ = ई ?

  1. गोमती + इच्छा = गोमतीच्छा

  2. रवी + इंद्र = रवींद्र

  3. मही+  इंद्र = महिंद्र

? ई+ ई = ई ?

  1. मही + ईश = महीश

  2. पार्वती + ईश = पार्वती

? उ +उ = ऊ ?

  1. गुरु + उपदेश = गुरुपदेश

  2. भानु + उदय = भानुदय

? ऊ +उ = ऊ ?

  1. भू + उद्धार = भूद्धार

  2. वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष

  3. लघू + उत्तरी = लघूत्तरी

ऋ+ ऋ = ऋ

  1. मातृ + ऋण = मातृण
4 Jahre, 7 Monate her

⭕️ समानार्थी शब्द ⭕️

बदल = फेरफार, कलाटणी 
बर्फ = हिम  
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार 
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका 
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक 
बाप = पिता, वडील, जनक 
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती 
ब्रीद = बाणा   
भरवसा = विश्वास 
भरारी = झेप, उड्डाण 
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक 
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा  
भाळ = कपाळ 
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण   
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
माणूस = मानव
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता 
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत 
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा  
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन 
मुख = तोंड, चेहरा 
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा 
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता 
युक्ती = विचार, शक्कल 
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर 
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या 
रक्त = रुधिर 
रणांगण = रणभूमी, समरांगण 
र्हास = हानी    
राग = क्रोध, संताप, चीड 
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया 
राष्ट्र = देश 
रांग = ओळ 
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा  
रेखीव = सुंदर, सुबक 
लग्न = विवाह, परिणय  
लाट = लहर 
लाज = शरम, 
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा 
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू 
वाट = मार्ग, रस्ता 
वाद्य = वाजप 
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू 
वेश = सोशाख
वेदना = यातना  
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी 
विद्या = ज्ञान 
विनंती = विनवणी 

4 Jahre, 7 Monate her

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️

1) पुढीलपैकी व्याकरणदृष्टया चुकीचा शब्द ओळखा.

1) उत्स्फूर्त 2) उन्मूलन
3) उत्तूंग 4) उत्सृष्ट

उत्तर :- 3

2) पुढीलपैकी ‘ओष्ठय’ स्वर कोणते ?

1) अ, आ 2) ए, ऐ
3) अ, इ 4) उ, ऊ

उत्तर :- 4

3) ‘पुनरावृत्ती’ हा संधी कसा सोडवला जाईल ?

1) पुन: + आवृत्ती 2) पुनर् + आवृत्ती
3) पुन: + वृत्ती 4) पुनर् + वृत्ती

उत्तर :- 1

4) पुढील विधाने लिहा.

अ) नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होते.
ब) विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही.

1) अ बरोबर, ब चूक 2) अ चूक, ब बरोबर
3) दोन्ही चूक 4) दोन्ही बरोबर

उत्तर :- 4

5) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास ........................... म्हणतात.

1) सर्वनाम 2) क्रियापद
3) विशेषण 4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 3

6) ‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे ......................... क्रियापद आहे.

1) संयुक्त 2) शक्य
3) करणरूप 4) प्रयोजक

उत्तर :- 4

7) ‘तिने सारे धान्य निवडून ठेवले.’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकाराचा आहे ?

1) सिध्द क्रियाविशेषण अव्यय 2) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
3) प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय 4) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

8) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘निशी’

1) कैवल्यवाचक 2) कालवाचक
3) साहचर्यवाचक 4) तूलनावाचक

उत्तर :- 3

9) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही.

1) कारणबोधक 2) विकल्पबोधक
3) न्यूनत्वबोधक 4) परिणाम बोधक

उत्तर :- 1

10) खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ?

1) वाग, अहा 2) अरेरे, आईगं
3) शाबास, वाहवा 4) फक्त छे, छटं

उत्तर :- 3

4 Jahre, 7 Monate her

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️

1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.

1) आम्ही भारतीय नागरिक 2) भारतीय नागरिक
3) आज भारताशी 4) प्रामाणिक आहोत

उत्तर :- 1

2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) भावे प्रयोग 2) सकर्मक कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग 4) अकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर :- 4

3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’

1) नत्र बहुव्रीही समास 2) व्दिगू समास
3) समाहार व्दंव्द – समास 4) मध्यमपदलोपी समास

उत्तर :- 1

4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?

1) पूर्णविराम 2) उद्गारवाचक चिन्ह
3) अर्धविराम 4) प्रश्नचिन्ह

उत्तर :- 2

5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?

1) मंदाक्रांता 2) वसंततिलका
3) शिखरिणी 4) पृथ्वी

उत्तर :- 4

6) या टोपीखाली दडलंय काय?

1) उभयान्वयी अव्यय 2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

1) सात 2) आठ
3) नऊ 4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’

1) साधा भविष्यकाळ 2) अपूर्ण भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ 4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

1) पुल्लिंगी 2) नपुंसकलिंगी
3) स्त्रीलिंगी 4) यापैकी नाही

उत्तर :- 3

4 Jahre, 7 Monate her

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️

1) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

1) दर्शक सर्वनाम 2) संबंधी सर्वनाम
3) आत्मवाचक सर्वनाम 4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

2) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

1) संयुक्त क्रियापद 2) प्रयोजक क्रियापद
3) अनियमित क्रियापद 4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

3) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

1) प्रयोजक 2) शक्य
3) सहाय्यक 4) अकर्तृक
उत्तर :- 2

4) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली 2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
3) नेहमी त्यांचे असेच असते 4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

1) केवलप्रयोगी 2) क्रियाविशेषण
3) शब्दयोगी अव्यय 4) नाम

उत्तर :- 3

6) क्रियापद म्हणजे........................

1) केवळ क्रियादर्शक शब्द 2) क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द
3) क्रिया संपविणारा शब्द 4) वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द

उत्तर :- 4

7) क्रियाविशेषणाचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगत जोडी ओळखा.

अ) स्थलवाचक – लांबून, समोरून, मधून
ब) कालवाचक – काही, कधीही, क्रमश:
क) संख्यावाचक – अतिशय, दोनदा, पुष्कळ
ड) रीतिवाचक – चटकन, आपोआप, भरभर

1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर 3) फक्त क बरोबर 4) फक्त ड बरोबर

उत्तर :- 2

8) खालील गटातील शब्दयोगी अव्यये नसलेला गट ओळखा.

1) घरावर, टेबलाखाली, ढगामागे 2) अथवा, किंवा, वा, अगर, की
3) च, ही, मात्र, देखील, सुध्दा 4) कडून, पेक्षा, साठी, वर

उत्तर :- 2

9) ‘तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात ?

1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय 4) कारकबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 1

10) अयोग्य पर्याय निवडा.

अ) केवलप्रयोगी अव्ययांना विभक्ती प्रत्यय नसतो.
ब) केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग असतात.

1) अ 2) ब 3) दोन्ही 4) दोन्ही नाही

उत्तर :- 2

5 Jahre her
संपुर्ण मराठी व्याकरण प्रा.प्रदिप मोरे
5 Jahre her
संपुर्ण मराठी व्याकरण प्रा.प्रदिप मोरे
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated vor 23 Stunden

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 Jahre, 6 Monate her

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 Monat, 4 Wochen her