👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
शेवटी मला पण प्रेम होऊन गेलं
सगळं मनासारखं घडवून आलं
तू कसं काय ग,इतकं सुंदर शब्दाचं जाळं विणलं
तुझ्या शब्दरूपी फुलात मी न्हाऊन गेलो
मला पण तुझ्यावर खरं प्रेम होऊन गेलं
मला हे सुद्धा माहिती आहे ग, माझ्या परिस्थितीमुळे मला प्रेम करण्याचा हक्कचं नाही
पण काय करणार राव माझं मन मात्र ऐकायला तयार नाही!,,,✍🏻💔💘
एकमन#लेखक @Ommshelke
जीवनात अपयश येण हे खूप गरजेचे असते कारण त्यामधून जे काही शिकायला मिळते ते कुठलंच विद्यालय शिकवू शकतं नाही त्यासाठी आवश्यक असतं स्वतःलाच स्वतःच्या अनुभवाचा class लावून घेणे एकदा हे जमलं की मनाजोकत यश प्राप्त करता येत!,,,*✍🏻 एकमन#लेखक* @Ommshelke
जागवावं स्वतःमधल्या दडलेल्या सुप्त कौशल्यांना🔥
गाजवावं देशाचं नाव🇮🇳 जगातल्या सर्व दिशांना
तुझ्या मेहनतीपुढे नक्कीच झुकावं लागेल सगळ्यांना🙏🏻
स्व:कार्यातूनच उत्तर द्यायचे जे हसायचे,कमी समजायचे त्यांना💪🏻
नाही मिळत फळ ह्या जगात विष पचवताविना,कष्टावीणा✍️
तेच करून दाखवायचं ज्याची कोणी करत नसेल कल्पना🔥
येतील अनेक अडथळे मार्गात तेव्हा फक्त स्वतःला लढ म्हणा💪
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.
तिच्या मनात समाधान मावेनासं झालं होतं.. आज ह्या घरातली अन्नपूर्णा तृप्त झाली होती. तिला इतक्या कौतुकाचा घास मिळाला होता, तेही तिच्या घासाचा नियम आठवणीने पाळून...
तिला आईंचे.... सासूबाईंचे शब्द आठवले.. ह्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावर अन्नपूर्णेचा हात आहे. सगळ्यांच्या.....
खरंच... अन्नपूर्णा होण्यासाठी बाईच असायला हवं अस कुठंय... आज ज्या हातच्या घासानी ती सम्पूर्ण तृप्त झाली होती... ते हात अन्नपूर्णेचेच तर होते...
आई अगदी खरंय... आपल्या घरात तृप्तीचा घास देणाऱ्या अन्नपूर्णेचा हात सगळ्यांच्या... अगदी सगळ्यांच्या डोक्यावर आहे, ती कोणालाही काही कमी पडू देत नाहीये....!
आरती जोशी - ऋचा प्रभुणे.
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
*🔸अन्नपूर्णेचा हात...!🔸*
#कथाविश्व.
नुकतंच लग्न झालेली..नवी नवरी ती... घरात आजेसासूबाई, सासूबाई, जाऊ नणंद अश्या स्त्री राज्य असलेल्या भरल्या घरात आलेली, स्वयंपाकघरातला तिचा पहिलाच दिवस, एकाहून एक सुगरण हातांनी तृप्त झालेली त्या घरातली अन्नपूर्णा आज हिच्या हाताची चव बघणार होती.
हिच्या मनात धास्ती, पहिलं कौतुक वगैरे ठीक आहे, पण त्यांच्यासारखं नाही च जमलं तर??? फजिती ग बाई अगदी!!!! तिला येणारा थोडा फार स्वयंपाक नावाप्रमाणेच... फार येतंय असं वाटताना थोडाच जमणारा असा, आजी- आई घरी असताना शेलकं काम करणारी ती... आज ही परीक्षा अंगावर आली तिच्या....
तुम्ही थांबा ना इथे... मला सांगा... ती सासूबाईंना म्हणाली. मनातलं ओळ्खल्यासारखं त्या म्हणल्या, अगं कर... काही चुकत नाही... इकडे शेगडीला हळदकुंकू वहायचं... देवघरात अन्नपूर्णेला नमस्कार करायचा, आणि सुरुवात करायची... काही अडलं, तर आहेच मी. आम्ही कुठे आभाळातून पडलो?? करता करता येतं अगं... येईल हो!!! एक दिवस तरबेज होशील बघच... आपल्या घरात अन्नपूर्णेचा हात आहे अगदी डोक्यावर सगळ्यांच्या...
सगळ्यांच्या.... तिच्या मनात तो शब्द घोळला... आता मी पण ह्या सगळ्यात... खुशीने ती कामाला लागली, आणि हो... तुझं करून झालं ना... की एक अगदी छोटीशी पोळी करायची शेवटी, त्यावर कणभर भात, जे काही आपण तोंडी लावणं केलं असेल ते वाढायचं, आणि मागच्या अंगणात तुळशीवृंदावन आहे ... तिथून थोडं पुढे जाऊन एक फरशी ठेवलीय उंचावर तिथे हा घास ठेऊन ये... पूर्वी गाय होती, तिचा गोग्रास असायचा, आता हा आपला छोटासा घास कावळा खाऊन जातो. काही असेना... एक जीव येऊन भूक भागवून तर जातो, कोण कोणत्या रूपाने येईल कोण जाणे, आपण ठेवायचं.. सासूबाईंनी सांगितलं.
त्यादिवशी, बरं जमलं तिला... अगदी उत्तम नाही, पण चवदार झालंच. ती अगदी खुश झाली. जमेल जमेल !!! अगदी सासूबाईंसारखाच जमेल एक दिवस...
दिवस, महिने, वर्ष जात राहिली, आता ती रुळली .. संसारात सर्वार्थाने प्रगती झाली.. नोकरीच्या निमित्ताने नवरयासोबत दुसऱ्या शहरात राहायला गेली, घरातलं सगळं आता एकटीनेच करताना ही म्हणून धांदल उडत होती... लेकीची शाळा, ऑफिसच्या अडनिड्या वेळा.. पण तिथेही हा छोटुश्या घासाचा नियम मोडत नव्हती... जे काही करत असेल, त्यातलं न विसरता बाल्कनीतल्या तिच्या ठरलेल्या जागी ठेवायची.. कधी बाहेर जायचं ठरलं, तरी वाटीभर भात का होईना... लावून त्याच्या अगदी छोटया घासावर दही वाढायची.. तिच्या मनात हे पक्कं ठसलं होतं,,,, सगळ्यांना तृप्त करणारं,, प्रवासात आग्रहाने डबे भरभरून देणारं, कोणाला कधी विन्मुख न पाठवणारं तिच्या घरातलं अन्नपूर्णेचं व्रत,,, हा असा घास त्याचाच जणू काही अविभाज्य भाग होता तिच्यासाठी..
इकडेही तो घास येऊन खाऊन जाणारा होताच. नवीन ठिकाणी जम बसला, तसं तिने आधीची आवड म्हणून पुढचं शिक्षण पुन्हा चालू केलं. घरातून पूर्ण सहकार्य होतं.. आता तर दिवस पुरेनासा झाला... आणि त्यातच तो परीक्षेचा दिवस आला.. तिला अवघड वाटणारा विषय.. परत एकदा तोच ताण, तीच उत्सुकता, थोडीशी भीती.. सगळं तस्संच. सकाळी १० वाजता पेपर, सकाळी पटकन होईल असं काहीतरी न्याहारी साठी करू.. आणि आजचा एक दिवस डबाच आणू बाहेरून, एक दिवस चालतं तितकं.. घाईघाईत आवरून बाहेर पडली, लेक-नवरा अगदी ती जाईपर्यंत दारात उभे राहिले..
सावकाश ग..!! आई अच्छा !!! पेपर अगदीच छान गेला, अगदी हुश्श होऊन घरी यायला निघाली,, विचारा विचारा मध्ये एकदम तिला आठवलं,, आज बाहेरून डबा आणायचा तर ठरलं.. पण माझा कावळ्याचा घास??? तो आज राहून गेला.. इतक्या वर्षात न झालेली गोष्ट झाली आज... नेमकी आजच...
त्याच विचारात जिने चढताना तिच्याच घरातून, बंद दारा आडून सुद्धा एक खमंग वास बाहेर दरवळलेला तिला जाणवला... घरात पाऊल टाकलं, आणि खांदयावर पंचा टाकून, ओट्याशी उभ्या असलेल्या नवऱ्याला बघून आश्चर्यचकित झाली.. कसा गेला पेपर... चेहराच सांगतोय चांगला गेला ना?? बरं बोलू नंतर. जा तू पटकन हात पाय धुवून ये... बघ तर मस्त मुगाच्या डाळींची खिचडी, आणि गरमगरम कढी केलीय... पापड पण भाजतो... ये तुझ्यासाठीच थांबलोय... जेऊ आणि मग ऑफिसला पळतो.. मुद्दाम दुपारची शिफ्ट घेतलीय मी...
ती बघतच राहिली... जा जा लवकर आवरून ये.. तो म्हणाला.
ती हात पाय धुवून येईपर्यंत टेबलावर आयतं पान बघून तिला अगदी गहिवरून आलं...
बस गं... सकाळपासून लक्ष नाहीये तुझं... आता सावकाश जेव... बघ, जमलंय का ते... भरभरून वाहणाऱ्या त्या सुखाचा पहिला घास घेतानाच काहीतरी आठवून उठायला लागली... तोच तिला अडवून नवरा म्हणला... बस बस घातलंय तुझ्या घासाच्या धन्याला पण.. जेव तू..
रोज तू अन्नपूर्णा होतेस.. आज ही अन्नपूर्णा सरस्वतीचा ध्यास घेऊ पाहतेय, तिला आज अशी कशी राहू देईन मी..???
संघर्षामध्येच साथ सोडून जावे
इतकी हलकी आमची निष्ठा नाही
आपल्या माणसांची सोबत पुरेशी
यापेक्षा मोठी कोणती प्रतिष्ठा नाही.!
कोणी लिहिले काय माहीत पण छान वाटलं राव म्हणून पोस्ट केले👍🙏**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago