👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
UPSC.pdf
भारत में टेलीग्राम बेन हो सकता है अपना WhatsApp channel ज्वाइन कर लीजिए... 👆👆👆
कदाचित टेलीग्रामवर भारतात बंदी येणार आशा बातम्या आहेत तरी आपले WhatsApp channel ज्वाइन करुन ठेवा..... 🙏
👇👇👇👇👇
पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.
१९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार,
त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, इ.स. १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,
१९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार;
तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाला.
पद्मभूषण,
महाराष्ट्र गौरव,
सरस्वती सन्मान,
मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान,
विष्णूदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. इ.स. १९९८ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती मिळाली होती.
Join :-- ??????
शांतता! कोर्ट चालू आहे हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आणि मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेले मराठी नाटक आहे. या नाटकाला २० डिसेंबर २०१७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली.
विजय तेंडुलकर-
विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी मुंबई येथील मुगभाट , गिरगांव येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असे. लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर या त्यांच्या कन्या होत.
कारकीर्द - नाटके
* लेखनदृष्ट्या 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता! कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला.
'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.
'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
साहित्य - एकांकिका -
* अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका; समग्र एकांकिका (भाग १ ते ३)
कादंबरी -
कादंबरी एक,
कादंबरी दोन,
मसाज.
चित्रपट पटकथा -
अर्धसत्य,
आक्रीत,
आक्रोश,
उंबरठा,
कमला,
गहराई,
घाशीराम कोतवाल,
चिमणराव,
निशांत,
प्रार्थना,
२२ जून १८९७,
मंथन,
ये है चक्कड बक्कड बूम्बे बू,
शांतता कोर्ट चालू आहे,
सामना,
* सिंहासन .
*** टॉक शो -
प्रिया तेंडुलकर टॉक शो.
** दूरचित्रवाणी मालिका -
स्वयंसिद्धा.
नाटके -
अजगर आणि गंधर्व,
अशी पाखरे येती,
एक हट्टी मुलगी,
कन्यादान,
कमला,
कावळ्यांची शाळा,
कुत्रे,
गृहस्थ,
गिधाडे,
घरटे अमुचे छान,
घाशीराम कोतवाल,
चिमणीचं घर होतं मेणाचं,
चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी,
छिन्न, झाला अनंत हनुमंत,
त्याची पाचवी,
दंबद्वीपचा मुकाबला,
देवाची माणसे,
नियतीच्या बैलाला,
पाहिजे जातीचे,
फुटपायरीचा सम्राट,
भल्याकाका,
भाऊ मुरारराव,
भेकड,
बेबी,
मधल्या भिंती,
माणूस नावाचे बेट,
मादी (हिंदी),
मित्राची गोष्ट,
मी जिंकलो मी हरलो,
विठ्ठला,
शांतता! कोर्ट चालू आहे,
श्रीमंत,
सखाराम बाईंडर,
सफर,
सरी गं सरी.
** नाट्यविषयक लेखन -
नाटक आणि मी.
बालनाट्ये -
इथे बाळे मिळतात,
चांभारचौकशीचे नाटक,
चिमणा बांधतो बंगला,
पाटलाच्या पोरीचे लगीन,
बाबा हरवले आहेत,
बॉबीची गोष्ट,
मुलांसाठी तीन नाटिका,
* राजाराणीला घाम हवा..
भाषांतरे :
आगे बढो (जीन ली लेथम याच्या Carry on, Mr. Bowditch या कादंबरीचा अनुवाद),
आधेअधुरे (मोहन राकेश),
चित्त्याच्या मागावर,
तुघलक (गिरीश कर्नाड),
देवाची माणसे (व्हिला कॅथरच्या `Death Comes for the Archbishop' कादंबरीचा मराठी अनुवाद),
भल्या दिलाचा माणूस (जॅक शॅफिरच्या 'शेन' कादंबरीचा अनुवाद), लिंकन यांचे अखेरचे दिवस (व्हॅन डोरेन मार्क),
लोभ असावा ही विनंती (जॉन मार्क पॅट्रिकच्या "हेस्टी हार्ट'चे भाषांतर),
* वासनाचक्र (टेनेसी विल्यम्सच्या "स्ट्रीटकार नेम्ड डिझायर'चे भाषांतर), पाच पाहुण्या - पाच विदेशी कथांचा अनुवाद..
ललित -
कोवळी उन्हे,
रातराणी,
फुगे साबणाचे,
रामप्रहर,
हे सर्व कोठून येते?
* संपादने -
दिवाकरांच्या नाट्यछटा,
समाजवेध.
योग्य उत्तर :-- 2) विजय तेंडुलकर
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago