मी मराठी कविता समुह.....

Description
🙏मी मराठी कविता संग्रह🙏

"मराठी आणि हिंदी ,कविता, लेख"
👇कविता पाठवान्या साठी लिंक व मोबाईल नंबर

@khpatil
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

1 month ago

नागासाकी का स्टैंड बॉय....

यह 1945 में 09 अगस्त को जापान के नागासाकी पर परमाणु बमबारी के बाद ली गई एक ऐतिहासिक तस्वीर है। इस तस्वीर में लगभग 10 साल का एक लड़का अपने मृत भाई को पीठ पर बांधे हुए एक श्मशान के बाहर खड़ा है, और अंतिम संस्कार का इंतजार कर रहा है। एक सैनिक ने उससे कहा "अपने मृत भाई को नीचे रख दो। तुम्हें बोझ लगेगा।" तो बच्चे ने कहा "यह बोझ नहीं है, मेरा भाई है..!"
सिपाही समझ गया और चुप हो गया।

तब से यह तस्वीर जापान में एकता का प्रतीक बन गई है।

भाई बोझ नहीं होते है है... गिर जाए तो उठा लो, थक जाए तो सहारा दो, गलती हो जाए तो माफ कर दो, क्योंकि भाई भाई है, बोझ नहीं है।

कभी दुनिया उसे छोड़ भी दे, तो उसे अपनी पीठ पर उठा लो। .उसकी मदद करो..।

जो अपने खून का नहीं - वह किसी का नहीं...

थोड़े से धन संपत्ति के लिए अपनो से रिश्ता तोड़ने वालो नंगे आये थे दुनिया में नंगे ही चले जाओगे।

बात कड़वी है पर सच्ची है...✍️🙏

1 month, 1 week ago

निवडणूकीचे वारे

निवडणूकीचे वारे
जोरात लागलेत वाहू
एकमेकांना विरोधक
पाण्यात लागले पाहू...

जो तो आपल्या कर्तृत्वाचा
वाचू लागलेत पाढा
शहाणपणाचा आव आणून
पाजू लागलाय काढा...

खोदून वारकाचा उकंडा
काढू लागलेत केस
विकासावर बोलू जाता
येतोय तोंडाला फेस...

भाषणात शब्दाचा मारा
गद्दार आणिक खोकी
धर्माच्या नावाखाली
भडकवू लागलेत डोकी...

काल परवाचे मित्र
आज खुशाल झाडती फैरी
खुर्चीच्या लालसेपोटी
जणू झालेत हाड वैरी...

घराघरात पडली फुट
वर करुन येती बाह्या
प्रत्येकाचा वेगळा झेंडा
कुणी उरले ना समजाया...

सुटता निवडणूकीचे वारे
कसे बदलतात रंग
सामान्य मतदार राजा
बघूनच राहतोय दंग...

© खंदारे सुर्यभान गुणाजी
नांदेड- 9673804554

1 month, 2 weeks ago

पावसाळी कवी
डोलणारं शेत शिवार
यावर रचना करतात
अनू सुगीच्या दिवसांत
आनंदाने गाणी गातात

पोळलेलं काळीज
करपलेल्या पिकांच्या दिवसांत
पावसाळ्यात उगवणारे
कवी गायक कुठं गायब होतात ?

ज्यांची शेती नाही.
ते शेतकऱ्यांना सहा हजार
अनुदान मिळाले बाता करतात
खतांच्या दरात हिसकावून घेतले
यावर त्यांच्या दातखिळी बसतात

खादीचे कडक कपडे घालणारे
पंचमहाली राहतात
पण विणकर अन् कापूस उत्पादक
नेहमीच नागडे राहतात
#राजू_वाघमारे
सांगली
३०/१०/२०२२.

4 months, 1 week ago

आम्हीच आमच्या देशाचे
रक्षक आणि आम्हीच
आमच्या देशाचे भक्षक

वेळ पडली तर एखाद्यासाठी
स्वतः जीव पणं देणारे
आणि वेळ पडली तर
एखाद्याचा जीव पण घेणारे

आम्हीच आई बहिणीच
रक्षण करणारे
आम्हीच आम्हीच आई बहिणीची
अब्रू लुटणारे

आम्हीच वासनेचे पुजारी
अणि व्यसनच्या पायी
जिंदगी बर्बाद करणारे भिकारी

✍? विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143

4 months, 1 week ago

दार नसलेलं घर

शाळेच्या खिडक्यांनी लांबवर पाहिलं,
किल्ल्यांमधलं घर असं काही असावं,
आणि दाराचा भाग दूर उडालेला,
कधीच न पुसलेलं, कधीच न खुललेलं.

वाऱ्याच्या अंगी वासला एकपण,
सुसाट ध्वनीला कान देऊन,
तिथेच खुलता आयुष्याच्या कथा,
जेथे दार नसते, तेथेच स्वप्नं फुलतात.

आंगणाच्या पायथ्याशी होणारी हसरेचं,
अधून-मधून पावसाच्या धारांतूनही,
जणू त्यातल्या भिंतींची गुपितं खुलतात,
जिथे हरवलेला वसंत वेगवेगळा असतो.

दुरावलेले रंग उधळलेले पाय,
पुन्हा पाहण्याचा प्रयत्न होत नाही,
हे घर, हे स्वप्न, हे फक्त आकाश,
तिथे दार नाही, पण स्वप्नंचं घर आहे.

दुरदर्शनाच्या स्क्रीनवर धुसर छाया,
कधीच डोळ्यांसमोर धुक्याने फडफडली,
आणि त्या घरातली गोड सरळ प्रकाशात,
स्वप्नाच नवे दार उघडतं,

प्रतिक्षा गजानन मांडवकर
(स्वप्न डोळ्यातले)
यवतमाळ

4 months, 2 weeks ago

तू अन् मी सोबत असताना
तीसर कोणी नको मला
आपल्या घट्ट बाहुपाशात
हवा सुध्दा नकोय मला

घट्ट मिठीत तुझ्या आल्यावर
देह माझा अलगद सुखावला
क्षणात विचार मनात आला
हवे ते सारे देशील ना मला

तिरक्या नजरेचे कटाक्ष तुझ्या
विलक्षण मोहित करतात मला
मधाळ गुलाबी ओठ तुझे
चुंबनास प्रेरित करतात मला
सागरीता

7 months, 1 week ago

पक गई हैं आदतें बातों से सर होंगी नहीं
कोई हंगामा करो ऐसे गुज़र होगी नहीं

इन ठिठुरती उँगलियों को इस लपट पर सेंक लो
धूप अब घर की किसी दीवार पर होगी नहीं

बूँद टपकी थी मगर वो बूँदो—बारिश और है
ऐसी बारिश की कभी उनको ख़बर होगी नहीं

आज मेरा साथ दो वैसे मुझे मालूम है
पत्थरों में चीख़ हर्गिज़ कारगर होगी नहीं

आपके टुकड़ों के टुकड़े कर दिये जायेंगे पर
आपकी ताज़ीम में कोई कसर होगी नहीं

सिर्फ़ शायर देखता है क़हक़हों की अस्लियत
हर किसी के पास तो ऐसी नज़र होगी नहीं

8 months ago

तुझं माझं प्रेम या
आभाळा एवढं मोठं
रोज नव्याने चालायचं
भांडण आपलं खोट 1

कधी तुला मी खडूस म्हणायचो
तर कधी मंदबुद्धी
पण खरंच माझी राणी
तू आहेस साधी 2

तू काय कमी नव्हती
खोटं खोटं रुसायची
मी तुला मानवाव म्हणून
गाल फुगून बसायची 3

तू रुसल्यावर मी लाडान
तुझे गोरे गाल खेचायचो
तुझं माझ्या डोळ्यातील प्रेम
मी नजरेने वेचायचो ||4|
cp

8 months ago

★★तमा★★

तमा ना वाटावी हारण्याची
फक्त जिद्द हवी जगण्याची ,

षटकाराची खेळता खेळी
का पळावे धाव घेण्याशी ,

येतील सुखे जातील दुःखे
का गरज मृगजळी धावण्याची ,

उन्ह लोपते अन् अटळ सावली
का लावशी घोर काळजाशी ,

ठेव किताब खुले आयुष्याचे
काय गरज पाने चाळायाची ,

अपंग असती अवयव आपुले
मन बांधील नसते देहाशी ,

दुनिया चमचमती मायाजाळ
नको पडूस तू या मोहाशी ,

दिल्या घेतल्याची दुनिया सारी
ठेव अपुले आपल्या गाठीशी ,

भिऊ नकोस जीवन जगण्याला
धरू नकोस कुणाला वेठीशी ,

राख इमान सुरेख मातीशी
वदे सुरेखा, कर्म अपुले रे आपुल्या पाठीशी .

कवयित्री - सुरेखा बेंद्रे ,
संभाजी नगर .

8 months, 3 weeks ago

कविता

कविता माझी अशी मुक्तपणे विहरावी
स्वच्छंदपणे फुलताना सुगंधा परि दरवळवी...!!

कविता माझी दर्पणा परि असावी
शास्वत नाते जपताना डोळ्यातूनी व्यक्त व्हावी...!!

कवितेत माझ्या नसावा शब्दांचा खेळ
त्या पल्याडही व्हावा भावार्थाचा मेळ ...!!

कविता माझी व्हावी सुखदुःखाचे गाणे
मंजुळ सुरांचे व्हावे अविट तराणे .....!!

कवितेने माझ्या जपावे नाते माणुसकीचे
शब्दा शब्दात असावे भाव आपुलकीचे ...!!

कविता म्हणजे नसावी ओळ अलंकारांची
कवितेने जपावी ढृड ओढ नात्याची ....!!

✒️✒️

सुभाष उमरकर सामनगांव नाशिक
९०२२६२२८५६

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago