Lokayan IAS Academy, Pune ?

Description
15 glorious years
Lokayan Facebook:
https://www.facebook.com/Lokayanias

Lokayan YouTube:
https://youtube.com/@lokayanoffical

Lokayan Instagram:
https://www.instagram.com/lokayanias

Connect:
8788376179/9004804366

Lokayan Book Distribution:
8928627612
We recommend to visit

Community chat: https://t.me/hamster_kombat_chat_2

Website: https://hamster.network

Twitter: x.com/hamster_kombat

YouTube: https://www.youtube.com/@HamsterKombat_Official

Bot: https://t.me/hamster_kombat_bot

Last updated 1 month, 4 weeks ago

Your easy, fun crypto trading app for buying and trading any crypto on the market.
📱 App: @Blum
🤖 Trading Bot: @BlumCryptoTradingBot
🆘 Help: @BlumSupport
💬 Chat: @BlumCrypto_Chat

Last updated 7 months, 2 weeks ago

Turn your endless taps into a financial tool.
Join @tapswap_bot


Collaboration - @taping_Guru

Last updated 2 months, 2 weeks ago

4 months, 1 week ago
***?*** भारतीय कला व संस्कृती (भूषण …

https://youtu.be/8KcOXxwK0EI

? भारतीय कला व संस्कृती (भूषण देशमुख) या पुस्तकातून

4 months, 2 weeks ago

५) UPSC CSAT: उताऱ्यावरील आकलनाची (Reading Comprehension)कशी तयारी करावी?

 कोणत्याही विषयावर तुम्ही दररोज वृत्तपत्रातील किमान एक/दोन चांगले लेख वाचत चला. तुमच्या शब्दात त्या लेखाचा संक्षिप्त सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा.
 एका आठवड्यात किमान 5 परिच्छेद सोडवा. या कृतीसाठी केवळ 15-20 मिनिटे इतकाच वेळ लागेल.
 सराव करताना नेहमी प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच प्रश्नांकडे जा.
 प्रश्नांची रचना कशी केली जाते याचे विश्लेषण करा. Assumption, Inference इ. सारख्या Keywords कडे लक्ष द्या.
 प्रश्नांमधील गोंधळात टाकणाऱ्या भाषेकडे लक्ष द्या.
 प्रश्नातील काही फसवे शब्द, टोकाची विधाने/शब्द - Only, Always, Invariably, Just, Must इत्यादी टोकाच्या शब्दांची काळजी घेतली पाहिजे.
 भाषेची निवड: इंग्रजी/हिंदी- तुम्हाला सोयीस्कर असलेल्या कोणत्याही भाषेतून उतारा वाचू शकता. जिथे अर्थबोध होत नसेल वा संभ्रम असेल त्याठिकाणी इंग्रजी उतारा प्रमाण मानावा.
 उताऱ्याचा विषय, सूर तसेच लेखकाच्या मतांशी सुसंगत रहा. उत्तर निवडताना स्वतःचे पूर्वग्रह, मते यांची ढवळाढवळ होत नाही याची काळजी घ्या.
 उताऱ्यासंदर्भात बहुतेकांचा Attempt जास्त असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न सोडवणे सक्तीचे नाही. Negative Marking चा फटका बसणार नाही यासाठी प्रमाणाबाहेर अंदाजे उत्तरे देणे टाळा.
 वेळेचे व्यवस्थापन – सराव करताना उताऱ्यांवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो ते तपासा. त्यावर आधारित संपूर्ण विभागासाठी एकूण वेळ ठरवा. सुधारणा हवी असल्यास त्यावर काम करा. या विभागासाठी 40-45 मिनिटे पुरेसे आहेत. .
 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQ) – तयारीसाठी सर्वोत्तम स्रोत (200 पेक्षा जास्तउतारे उपलब्ध)
 दरमहा किमान एक पूर्ण CSAT प्रश्नपत्रिका सोडवा.
 आकलन ही एक कला/कौशल्य आहे. हे कौशल्य केवळ सरावाने सुधारते.
 आकलन हे UPSC च्या प्रत्येक टप्प्यावर कामी येणारे कौशल्य आहे. मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक उत्तरे तसेच निबंध लिहिताना तुम्हाला आकलन कौशल्यात केलेल्या सुधारणेचा खूप उपयोग होईल.

प्रवीण अक्कावारु सर
बॅच सुरू २३ डिसेंबर

4 months, 2 weeks ago

सिमला करार - जमाखर्च
मागच्या लेखात आपण थोडक्यात सिमला करारात कशा प्रकारे वाटाघाटी झाल्या ते बघितले. भारताने कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी न घेता बोलणी यशस्वी केली. पण दुसरीकडे त्यातून अपेक्षा पूर्ण झाल्या का हेही बघावे लागेल. 

काश्मिर व सिमला करार
१९७१ च्या युद्धात काश्मिरमधील बरीचशी शस्त्रसंधी रेषा (cease fire line) शांत राहिली. ही रेषा १९४९ च्या कराची करारानुसार निश्चित करण्यात आली होती. या रेषेचे रूपांतर सिमला करारात 'प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत' (LoC) करण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही शस्त्रसंधी रेषा व आंतरराष्ट्रीय सीमा यांच्यातील मध्यबिंदू आहे. मात्र असे असेल तर भारत-पाकिस्तानातील 'संयुक्त राष्ट्र लष्करी निरीक्षक गट' (UNMOGIP) निरर्थक सिद्ध होतो. पण तो दोन्ही देशात आजही आहे. सिमला करारात ठरले की जे प्रदेश भारताने किंवा पाकिस्तानने काश्मीरमध्ये जिंकले ते त्यांच्याकडेच राहतील. भारताने कारगीलच्या प्रदेशातील अनेक महत्वाची ठाणी जिंकून घेतली होती. त्याशिवाय लेहच्या उत्तरेकडील परतापूर आणि तुरतुक प्रदेशातील मोठा भाग ताब्यात घेतला होता. तो ठेवून घेतला.

युद्धात विजय, तहात पराजय?
या युद्धात भारताला काराकोरम महामार्गाची नाकेबंदी करून चीन-पाकिस्तान संपर्कात खोडा घालता आला असता. पण भारताने ही सुवर्णसंधी गमावली. रशियाचा पूर्ण पाठिंबा असताना (तवा गरम असताना) भारताने काश्मीर प्रश्नाचा साक्षमोक्ष तेव्हाच लावायला हवा होता असा एक मतप्रवाह आहे. अशी संधी पुन्हा मिळणे कठीण आहे. भारताने विजयी असूनही फारच उदारता दाखवली. भारताने विजयाच्या जबडयातून पराजय खेचून आणला अशी तिरकस टीका झाली. 

दुसरी बाजू
दुसरीकडे हे युद्ध पूर्णपणे बांगलादेशच्या निर्मितीशी संबंधित होते. दुसरा कोणताही फायदा मी घेणार नाही असे आश्वासन श्रीमती गांधी यांनी जागतिक व्यासपीठावरून दिले होते. युद्धात भारत बाकीच्या आघाडयांवर गुंतून पडला असता तर बांगलादेश निर्मितीचे ऐतिहासिक कार्य कदाचित अपुरे राहून गेले असते. शिवाय सिमला करारात भारताने 'व्हर्सायच्या तहाची' मानसिकता ठेवली नाही. व्हर्सायच्या तहामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली होती. 

शत्रूचे खच्चीकरण
पाकिस्तान अजूनही हा पराभव खऱ्या अर्थाने स्वीकारू शकलेला नाही. पराभवासाठी बंगाल्यांचा विश्वासघात, आंतरराष्ट्रीय कटकारस्थान अशी कारणे तेथे पुढे केली जातात. या पराभवामुळे पाकिस्तानी सैन्याचे प्रस्थ कमी होण्याऐवजी वाढलेच. पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानवर केलेल्या वांशिक हत्याकांडाचा खटलाही चालला नाही. प्रभावशाली भारताला शह देण्यासाठी सैन्याचा आसरा पाकिस्तान शोधतो. 

विश्लेषण
भारताने दणदणीत लष्करी विजय मिळवला असला तरी त्याला त्याचा पुरेसा राजकीय फायदा उठवता आला नाही. सुरवातीचा काही काळ बांगलादेशाशी संबंध सुमधुर राहिले. पण मात्र त्यात दुरावा निर्माण होत गेला. 
१९७१ पासून रशियाच्या पाकिस्तान व भारत यांच्याशी असलेल्या संबंधात बदल झाला. पाकिस्तानच्या मदतीने अमेरिका व चीन जवळ आले आणि 'पाकिस्तान-चीन-अमेरिका' असा गट निर्माण झाला. यानंतर रशियाने पाकिस्तानला केला जाणारा शस्त्र पुरवठा बंद केला व भारताला शस्त्र पुरवठा सुरु ठेवला. 

व्यक्तिमत्वे
श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वामुळे विजय साकारला होता. त्यांना भारताच्या लोह महिला म्हटले गेले. १९७१ मध्ये भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सैन्यदलाचे प्रमुख सॅम माणेकशा यांनी दाखवलेली धडाडी निर्णायक ठरली. पूर्वेला विजयानंतर भारतीय सैन्याकडून लुटीच्या घटना घडल्या नाहीत त्यामागे सॅम बहादूर यांनी आणलेली शिस्त व व्यवसायिकपणा यांचा मोठा वाटा आहे. त्यांना पद्मभूषण व फिल्डमार्शल या किताबांनी सन्मानले गेले. 

भूषण देशमुख 

4 months, 2 weeks ago

१९७१: युद्ध आमुचे सुरु
मागच्या लेखात आपण कशा प्रकारे पाकिस्तानने हवाई हल्ले सुरु केल्यावर युद्धाला तोंड फुटले ते बघितले. समुद्र, आकाश, जमीन व इतिहास असा हा रणांगणाचा पट होता. भारताची लोकशाही जी एरवी अघळपघळ वाटे ती या कसोटीच्या प्रसंगी वज्रमूठ बनली. 

ऑपरेशन ट्रिडन्ट
पश्चिम पाकिस्तानने आम्ही नौदल पाठवून पूर्व पाकिस्तानला वाचवू असा पवित्रा घेतला होता. तेव्हा पाकिस्तानी नौदलाचा नक्षा उतरवणे आवश्यक होते. त्यासाठी भारतीय नौदलाने ४ व ५ डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर हल्ला चढवत त्रिशूळ उपसले. (ऑपरेशन ट्रिडन्ट) या जबरदस्त हल्ल्यात पाकिस्तानी युद्धनौका खैबर व मुहाफिझ बुडवल्या तर शहाजहान क्षतिग्रस्त झाली. लगेचच ८ व ९ डिसेंबरला 'ऑपरेशन पायथॉन' (पायथॉन म्हणजे शत्रूला वेढा घालून गुदमरून मारणारा अजगर) हाती घेण्यात आले. त्यात कराची बंदरावरील तेलाचे राखीव साठे उध्वस्त करण्यात आले. 

समुद्रावरील वर्चस्वाकडे
हे दोन्ही हल्ले पाकिस्तानी नौदलासाठी दुःस्वप्न ठरले. यात त्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली व पाकिस्तानी नौदलाने संघर्षात भाग घ्यायची शक्यता संपुष्टात आली. पूर्वेला भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाला बंगालच्या उपसागरात घेरले. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवरील विमानांनी चितगॉन्ग व कॉक्स बाझार या शहरांवर बाँबफेक केली. प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने आपली 'गझनी' पाणबुडी समुद्रात उतरवली. पण विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ ती बुडाली. भारतीय समुद्रात पाणबुडी बुडाल्याचे ते पहिले उदाहरण ठरले. 

पोलादी विजय
१९७१ च्या युद्धातील नौदलाची कामगिरी देदिप्यमान ठरली. पाकिस्तानचे जवळपास अर्धे नौदल नष्ट झाले. आजही ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. विक्रांतचे योगदान अतुलनीय ठरले. एकटया विक्रांतवरील नौसैनिकांनी २ महावीर चक्र व १२ वीर चक्र प्राप्त केली. पुढे विक्रांत निवृत्त झाल्यावर तिच्या लोखंडापासून बनलेली बजाज कंपनीने नुकतीच V२ नावाची बाईक आणली आहे. आपल्या दणकटपणामुळे तीही लोकप्रिय ठरली आहे. 

हवाई युद्ध
भारताने ४००० उड्डाणे करीत युद्धाच्या पहिल्या ४८ तासातच आकाशावर वर्चस्व प्रस्थापित केले. तीन भारतीय बॉम्बरनी जोधपूरवरून उड्डाण करीत बलुचिस्तानातील सुई गॅस प्रकल्पावर बॉम्बफेक केली. ती इतकी अचूक ठरली की तो प्रकल्प पुन्हा अर्ध्याने चालू करायला पाकिस्तानला सहा महिने लागले. ही चित्तवेधक कामगिरी बजावणारे फ्लाईंग ऑफिसर शेखौ यांनी परतल्यावर त्याच रात्री एकटयाने श्रीनगर येथे शत्रूच्या सहा विमानांना अंगावर घेतले. त्यातील दोन पाडली. या प्रयत्नात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांचा मरणोत्तर परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला. 

आकाशावर ताबा
पाकिस्तानी हवाई दल दिवसेंदिवस निस्तेज होत गेले. त्यांच्याकडे बिगर बंगाली तंत्रज्ञ नव्हते व त्यामुळे उड्डाणाला मर्यादा पडल्या. जॉर्डन, सौदी अरेबिया व लिबिया यांच्याकडून लढाऊ विमाने आणून पाकिस्तानने आपले नुकसान भरून काढायचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाई दलाने आपली पकड ढिली होऊ दिली नाही. पूर्वेला भारतीय हवाईदलाने खुद्द जनरल नियाजी यांच्या सरकारी बंगल्यावर बाँम्बफेक केली. 
पश्चिमेकडील पाकिस्तानी हवाई दल थेट पूर्वेला जाऊ शकत नव्हते. त्यांना श्रीलंकेहून जावे लागे. श्रीलंकेने आपले तळ वापरण्यासाठी व तेल भरण्यासाठी पाकिस्तानला खुले करून दिले. पण त्याचा फारसा फायदा अत्याधुनिक विमाने दिमतीला असूनही पाकिस्तानला उठवता आला नाही. 

भूमीवरील युद्ध
पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर हल्ला करायचा प्रयत्न करून बघितला, पण भारतीय सैन्य आपल्या जागेवर दटून राहिले व लवकरच उलटे हल्ले चढवू लागले. राजस्थानातील थार जिल्ह्यात लोंगेवाला येथे झालेली लढाई संस्मरणीय ठरली. भूदल व हवाई दलाने समन्वय साधत पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडवला. लोंगेवाला या ठिकाणाला रणगाड्यांची दफनभूमी म्हटले गेले. त्यावर बॉर्डर हा लोकप्रिय सिनेमाही येऊन गेला. 

भूषण देशमुख 

4 months, 2 weeks ago
***?*** भारतीय कला व संस्कृती (भूषण …

https://youtu.be/5pLKDV7N_ko

?  भारतीय कला व संस्कृती (भूषण देशमुख) या पुस्तकातून

4 months, 2 weeks ago

?The Types of Mountain

?Based on Mode of Origin

Volcanic Mountains: Formed by the eruption of magma from the Earth's crust, creating peaks like those in Hawaii and Fiji. 
Fold Mountains: Created by the collision and folding of tectonic plates, such as the Himalayas and the Andes. 
Block Mountains: Formed by faulting and the movement of large blocks of the Earth's crust, leading to raised or dropped sections, like the Sierra Nevada. 
Dome Mountains: Created by magma pushing the Earth's crust upward, forming a dome-like structure, often exposed after erosion like Black Hills (US). 
Plateau Mountains: These mountains resemble dome mountains but are formed by colliding tectonic plates pushing up the land, shaped by weathering and erosion. 

#lokayaniasacademy
#geography

4 months, 3 weeks ago

? Weekly Current Affairs
1st December to 7th December

? Gharcholas of Gujarat awarded GI tag
? 8th Tiger Reserve of Madhya Pradesh
?PRAGATI Platform
? What India's AI Safety Institute could do
? Mule.Hunter AI

4 months, 3 weeks ago
4 months, 3 weeks ago

WR-CSM-24-NameList-Engl-091224.pdf

5 months ago

दिल्ली आणि आजूबाजूच्या भागातील एयर क्वालिटी इंडेक्स AQI दरवर्षी अमानवी पातळीवर जाण्याची मुळे खाजगी विरुद्ध सार्वजनिक अशा नवउदारमतवादाने केलेल्या कृत्रिम भेदामध्ये आहेत.

नव उदारमतवादाचे अडाणी लॉजिक पहा

हरियाणा पंजाब मधील शेतकऱ्यांची शेती खाजगी मालकीची आहे. त्यात तयार झालेल्या तणाचे (Stub Burning) नक्की काय करायचे हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे. त्याचे काय करायचे हे ठरवण्याचे निर्णय स्वातंत्र्य त्यांना आहे.

शेतीतील तण मजूर लावून काढणे सर्वात श्रेयस्कर. कारण त्यातून हवेचे प्रदूषण होणार नाही आणि काढलेल्या तणाचा वापर इतर होऊ शकतो.

शेतकरी मजूर लावत नाहीत कारण त्यांना मजुरी परवडत नाही.

शेतकऱ्यांच्या या खाजगी कृतीतून होणारे दुष्परिणाम मात्र सार्वजनिक आहेत. साऱ्या अर्थव्यवस्थेला अर्धांग वायू होणे, मुलांची शाळा कॉलेजेस बुडणे, लोक आजारी पडून आजारपणाचा खर्च वाढणे…आणि बरेच काही. याचे रुपयातील मूल्य हा अडाणी नवउदारमतवादी काढणार नाही. ती दश हजारों कोटी रूपये भरेल हे नक्की.

अर्थव्यवस्था, समाज, नागरिक जर एवढी मोठी किंमत मोजत असतात तर शेतकऱ्यांच्या शेतातील तण मजूर लावून काढण्याची मजुरी अर्थव्यवस्था समाज नागरिक यांच्यातर्फे केंद्र आणि राज्य सरकार का उचलत नाही ?

अर्थव्यवस्था, समाज, नागरिक खराब AQI मुळे जी किंमत मोजतात त्या तुलनेत दोन महिने मजुरांना दिलेली मजुरी अत्यल्प असेल.

त्यातून अकुशल श्रमिकांना हंगामी का होईना दोन महिने मजुरी मिळेल. त्यांच्या हातात चार पैसै जातील.

अर्थव्यवस्थेत ऊस तोडणी पासून अनेक ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की तेथे हजारो, लाखो हंगामी मजूर काम लागतात आणि काम करतात.

देशातील अनेक वरकरणी क्लिष्ट वाटणाऱ्या अनेक आर्थिक प्रश्नांची मुळे नवउदारमतवादाने राज्यकर्त्यांच्या, धोरणकर्त्यांच्या, ओपिनियन मेकर्सच्या, मध्यमवर्गाच्या आणि सामान्य नागरिकांच्या केलेल्या बुद्धिभेदांमध्ये सापडतील. ते काही बुद्धू लोक नाहीत. चालू लोक आहेत.

आयडियलॉजिकल काउंटर नरेटिव्ह वर खूप काम करण्याची गरज आहे. तरच आकाश मोकळे होईल.

संजीव चांदोरकर (१ डिसेंबर २०२४)
#Delhi_AQI

We recommend to visit

Community chat: https://t.me/hamster_kombat_chat_2

Website: https://hamster.network

Twitter: x.com/hamster_kombat

YouTube: https://www.youtube.com/@HamsterKombat_Official

Bot: https://t.me/hamster_kombat_bot

Last updated 1 month, 4 weeks ago

Your easy, fun crypto trading app for buying and trading any crypto on the market.
📱 App: @Blum
🤖 Trading Bot: @BlumCryptoTradingBot
🆘 Help: @BlumSupport
💬 Chat: @BlumCrypto_Chat

Last updated 7 months, 2 weeks ago

Turn your endless taps into a financial tool.
Join @tapswap_bot


Collaboration - @taping_Guru

Last updated 2 months, 2 weeks ago