shivchhatrapati001

Description
उभाच राहीन मी सांगेन गाथा तुमच्या पराक्रमाची
आठवण सदा करुन देईन मराठयांच्या इतिहासाची ?

@shivchhatrapati001
#shivchhatrapati001
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago

6 months ago
Finally, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ***?***

Finally, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ?

"माझा मराठाची बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके | ऐसीं अक्षरें रसिकें | मेळवीण ||"
• ज्ञानेश्वरी, अध्याय 6 वा •

जो गितार्थाचा सार आहे, जिथून गीतारूप वेलीला अंकुर फुटतो, असा जो सहावा अध्याय जो फार बुद्धीचातुर्याने जाणावयाचा आहे, तो सहज समजावा यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात : माझा बोल शुद्ध प्राकृत खरा, पण, तो पैजेने अमृतालाही जिंकेल, अशी रसभरीत अक्षरयोजना या मराठीतून मी करेन..
या बोलांच्या मृदुपणापुढे नादब्रह्मही फिके पडेल.. या रसाळ बोलाच्या आशेने जणू कानालाच जिव्हा फुटतील.. असे या बोलीचे किती कौतुक करावे.. ??‍♂️

7 months, 1 week ago

आज रात्री 12 नंतर टेलिग्राम बंद होणार आहे सर्वांनी आपल्या wp ग्रुपला जॉईन करून घ्या ...??

8 months, 3 weeks ago
तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख,

तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख,
पाहीन श्रीमुख आवडीने!

आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा! *
?!!राम कृष्ण हरी!! ?
?!!जय हरी विठ्ठल!!?***

@shivchhatrapati001

10 months, 1 week ago

✍️
#३१_मे...✍️
#राजमाता_अहिल्याराणी_होळकर यांची जयंती...
स्वराज्यनिष्ठ, कर्तुत्ववान राज्यकर्त्या, समाजसुधारक, प्रतिभावंत, लोकाभिमुख रणरागीणी...

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.

महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.

विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.

११ डिसेंबर १७६७ रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. अहिल्याबाईंनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याचलोकांनी याचा विरोध देखील केला. परंतु हळू-हळू त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहता प्रजा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली.

इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यावर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले.

राजमाता अहिल्याराणी होळकर (३१ मे १७२५) यांच्या जयंती निमित्त... त्यांच्या समाज उध्दारक कार्य, प्रेरणादाई सक्षम विचारांना व दैदिप्यमान कार्याला...? मानाचा क्रांतिकारी मुजरा...?**

#अहिल्यादेवी_होळकर
#जयंतीनिमित्त_विनम्र_अभिवादन

#shivchhatrapati001

11 months, 1 week ago

सकाळपासून ( फ्लोरा फाउंटनच्या) हुतात्मा चौक परिसरात तणावाचे वातावरण होते.
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता.
मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती.
सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता.
याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-दीडशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघणार, असा अंदाज होता.

पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून उत्तुंग घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे गोळा होऊ लागला.
हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच.
कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली गेली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्याचा निरोप होता.
जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते.
त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडायला सुरुवात झाली. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात येऊ लागला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आले.

मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घाला असे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०७ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.
त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

हा इतिहास तुम्हला माहिती असणे हे महत्वाचे ???

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago