👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
#MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिकारी गट अ व ब परीक्षेची तयारी कशी कराल?#
MPSC सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सहायक आयुक्त समाजकल्याण व तत्सम गट- अ संवर्ग 41 पदे, समाजकल्याण अधिकारी गट-ब साठी 22 पदे, व गृहप्रमुख, गट ब या संवर्गातील 18 पदांसाठी भरती केली जात आहे. या पदांसाठी अनुक्रमे 5836, 35361 व 796 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याचप्रमाणे इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ संवर्ग 26 पदे व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्ग 31 पदे भरती होणार असून त्यासाठी अनुक्रमे 2864 व 11241 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही विभागातील परीक्षांसाठी चाळणी परीक्षा होणार असून त्यांचा नवीन अभ्यासक्रम आयोगाने घोषित केला आहे, त्यानुसार यामधील गट ब पदांसाठी चाळणी परीक्षा 19 मे 2024 रोजी होणार आहे.
परीक्षेत 100 प्रश्न 200 गुण व मुलाखत 50 गुणांसाठी असणार आहे. परीक्षेसाठी 1 तास वेळ असून 60 मिनिटात 100 प्रश्न सोडविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे, कारण परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/4 नकारात्मक गुण पद्धती लागू आहे.
सध्या अंतिम निवडीसाठी विद्यार्थ्यांनी गुण लेखी परीक्षेत अधिक गुण संपादन करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
समाजकल्याण परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप
समाजकल्याण गट ब व इतर मागास बहुजन अधिकारी गट ब पदाचा अभ्यासक्रम समान असून त्यात पुढील घटक समाविष्ट आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता या घटकावर किती प्रश्न असतील याचा अंदाज बांधता येतो.
1.समाजकल्याण अध्ययन - 40 ते 45 प्रश्न
2.बुद्धिमापन प्रश्न - 10 ते 15 प्रश्न
3.चालू घडामोडी - 5 ते 10 प्रश्न
4.विज्ञान व अभियांत्रिकी - 10 ते 15 प्रश्न
5.कला शाखेतील घटक इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था - 10 ते 15 प्रश्न
6.वाणिज्य व अर्थव्यवस्था - 8 ते 10 प्रश्न
7. मराठी - 10 ते 15 प्रश्न
विद्यार्थ्यांना आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या गट अ व ब पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील परीक्षांमध्ये परीक्षेत विचारलेले समाजकल्याण अध्ययन घटकावरील व इतर घटकांचे प्रश्न अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार नेमका काय अभ्यास करायचा हे लक्षात येईल.
MPSC समाजकल्याण संदर्भ पुस्तके
1.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका व इतर परिक्षातील समाजकल्याण विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते - या पुस्तकात mpsc परीक्षेच्या समाजकल्याण प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणासह देण्यात आले असल्याने अभ्यासाची रणनीती व अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांवर भर द्यावा हे लक्षात येण्यासाठी पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
2.विज्ञान व अभियांत्रिकी घटक के सागर सुधारित 37 वी आवृत्ती
3.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे
समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी
बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे/ अनिल अंकलगी
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ (कला शाखा घटकासाठी)
वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - स्टेट बोर्ड 11 वी व 12 वी पाठ्यपुस्तक
8.चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक
मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
समाजकल्याण प्रशासन - डी आर सचदेव / नितीन कोतापल्ले
(कृपया सदर माहिती MPSC समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)
MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या सहा संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते
समाजकल्याण विभाग
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago