👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
पुन्हा एकदा:
कुणाचे ऐकणे नाही कुणाशी बोलणे नाही
अशा वैराण दिवसांची उदासी संपणे नाही
असे हे काय होते की दुवे तुटतात कायमचे
सहज मग बोलणे नाही उगाचच भेटणे नाही
तुझ्या प्रेमामधे आहेच किमया दोन विश्वांची
तुझ्या किमयेत पण माझे वचन सामावणे नाही
मनाची पानगळ संपेल तर बदलेल ही शोभा
करावे काय मन ठरवून बसले पलटणे नाही
तसेही कोणते मुक्काम आपण घेतले होते...
नको रस्ताच तो जेथे निरंतर चालणे नाही
- अनंत ढवळे
"अन्न"
मी गोमांस खातो; ते कोवळं,लुसलुशीत असेल तर.
~याज्ञवल्क्य ('शतपथ ब्राह्मणा'तून उद्घृत)
मला वाटत असे : अन्न,काम,मृत्यू
हे तीन धागे आहेत
सर्व मनुष्यजातीला बांधणारे.
आता समजतं आहे : अन्न कारणीभूत होतं
अनंत दुफळ्या, संशय, तिरस्कार, द्वेष, क्रूरता यांना.
प्रत्येक माणसाला संशय वाटतो
दुसरा काय खातो याविषयी :
ख्रिश्चनांना वाटतो संशय ज्यू लोकांविषयी,
ज्यू लोकांना ख्रिश्चनांविषयी, मुस्लिमांविषयी,
मुस्लिमांना हिंदूंविषयी.
हिंदूंना मुस्लिमांविषयी, ख्रिश्चनांविषयी,
उच्चवर्णीयांना मध्यमवर्णीयांविषयी,
मध्यमवर्णीयांना तळाच्या लोकांविषयी,
तळाच्या जातींना अधिक तळाच्या जमातींविषयी.
पुराणं सांगतात : अन्न : परमोब्रह्मः!
एका कवीने लिहिलं 'स्तन्यसूक्त' ;
अखेरीस म्हणतो : स्तन्याकार ब्रह्म.
खरंच, ब्रह्म आहे स्तन्य
मनुष्याचं आणि गाईचं, म्हशीचंही.
ब्रह्म आहे ज्वारी, बाजरी, तांदूळ, भेंडी, गवार;
ब्रह्म आहे कलिंगड, फणस, आंबा;
अंडं आहे ब्रह्म; म्हणून म्हणातात 'ब्रह्मांड'.
सुरमई, रावस, मांदेली, बांगडा, बोंबील
हेही आहे ब्रह्म; आणि मांस
बोकडाचं, डुकराचं, बैलाचं-भाजलेलं ला शिजवलेलं.
बुद्ध म्हणाला : पाचही इंद्रियं आहेत अग्नी;
पाहा, सर्व वस्तू जळताहेत, चराचर जळतं आहे.
विश्वाच्या मुळाशी आहे पोटातली आग-जठराग्नी.
दूध आहे अग्नी, फळं आहेत अग्नी,
हिरवी पालवी आहे अग्नी,
हरभरा, शेंगदाणे, अक्रोड आहेत अग्नी,
कच्चं वा शिजवलेलं मांस आहे अग्नी,
तसंच कुजके आंबे, कुजकी मासळी, कुजकं मांस.
(बुद्धाचं एक मला फार आवडलं
निर्वाण त्याने आपलंसं केलं
गरीब लोहाराने वाढलेलं ' सूकर-मद्दव' खाऊन.)
अदिलची फ्रेंच बायको व्हेरोनीक
कुलाब्याच्या मार्केटात जाते; कसायाला म्हणते
'यू गीऽव्ह मी बूऽफालोऽ!'
खरंच, बीफ म्हणून म्हशीचं मांस विकणं
म्हणजे चक्क फसवणूक आहे.
क्राॅफर्ड मार्केटच्या कसाईखान्यात भिंतीआड
म्हशींची-रेड्यांची मोठमोठी शिंगं डोकावून पाहताना
याज्ञवल्क्याला घृणा वाटली असती,
वेदकाळातल्या वासरांच्या लुसलुशीत मांसाची
आठवण येऊन. कदाचित तत्त्वज्ञानी स्थितप्रज्ञतेने
तो म्हणाला असता :
'कलियुगाच्या अंताला हेच आढळणार,
खा मुकाट्यानं.'
काल रात्री याज्ञवल्क्य माझ्या स्वप्नात आला;
म्हणाला : 'मुला, तुला इतरांचं अन्न नाही आवडलं,
तर ढोसायची सक्ती नाही.
पण एवढा-एवढासा तुकडा घे,
चर्चमधल्या वा मंदिरातल्या वा मशिदिपासच्या
'वेफर'सारखा, किंवा प्रसादासारखा, किंवा कुरबानीसारखा.
एक तुकडा घे बैलाच्या मांसाचा,
एक डुकराच्या मांसाचा, एक भाकरीचा,
ओंजळभर पंचामृत, ओंजळभर वाईन.
घे, घे, खा, घुटका घे. मग होतील सारे तुझे भाईबंद.
मनुष्यांच्या बंधुभावाची खरीखुरी ग्वाही.'
मी जागा झालो, न्याहरीला जाताना
चिंतन केलं त्या थोर ऋषीच्या शब्दांवर,
टेबलावर ' हाफ-फ्राय' येईपर्यंत.
~विलास सारंग
1942-2015
चित्त कुठे थार्यावर माझे..
वाऱ्यावर आहे घर माझे.!
तुला त्रास देईल नेहमी
सलगी माझी.. अंतर माझे.!
मूळ मसुदा मीच तरी पण
तू म्हणजे भाषांतर माझे.!
ओठांनीच लिहू दे आता
नाव तुझ्या ओठावर माझे.!
गळ टाकुनी बसले आहे
जहाज त्याचे.. बंदर माझे.!
वरवर भक्ती कशी करावी
ओठ बोलती हर हर माझे.!
एक शक्यता सरून गेली
आता सगळे जर तर माझे.!
ममता...
सोडेचनाय ही साली हसीन उदासी मला
सगळं ट्राय मारलं
मास्टरबेशनपासून मेडिटेशनपर्यंत
स्टॉक केलं उत्तररात्री
एफबीवरच्या
अनोळखी बिअर्डसमला
मानलेल्या बॉयफ्रेंडला
दिली दीर्घ फ्रेंच किस...
स्वप्नात!
क्रशचा फोन आला तर
दाखवून दिली अवकात
किशोरीला
पस्तीस वेळा गायला लावलं
म्हारो प्रणाम
केट मेलुआ विचारत राहिली मध्येमध्ये
व्हेअर डज द ओशियन गो…
रोझ वाईन बाजूला ठेऊन
ब्लॅक कॉफी बनवताना
मेथीची भाजी निवडली
एकेक पान वेगळं करत
केस रंगवून घेतले
महोगनी
जंक मेल मारले डिलीट
जिममध्ये घेतला
एक्स्ट्रा डोस एंडॉर्फिनचा
मन लावून टॉयलेट साफ केलं
आंधळ्या बासरीवाल्याच्या हातात
पाचशेची पत्ती टेकवली
फलाटावरच्या
तरी
सोडेचनाय ही साली हसीन उदासी मला
नको नको म्हणत
आठवून पाहिले
मनकर्णिकावरच्या हॅंडसम म्हाताऱ्या
नागाचे नशीले डोळे
रुदाल्यांच्या रडण्याचा
व्हीडिओ शोधला
सिरोहीला भेटलेल्या
मिळेल ती एसटी, काळीपिवळी, रेल आणि प्लेन पकडले
केला आडवातिडवा प्रवास
तरी नाहीच देऊ शकले तिला चकवा
वाट्टेल तसं फालतू खरडलं
कविता म्हणलं त्याला
तरी,
सोडेचनाय ही साली हसीन उदासी मला
- शर्मिष्ठा भोसले
चित्त कुठे थार्यावर माझे..
वाऱ्यावर आहे घर माझे.!
तुला त्रास देईल नेहमी
सलगी माझी.. अंतर माझे.!
मूळ मसुदा मीच तरी पण
तू म्हणजे भाषांतर माझे.!
ओठांनीच लिहू दे आता
नाव तुझ्या ओठावर माझे.!
गळ टाकुनी बसले आहे
जहाज त्याचे.. बंदर माझे.!
वरवर भक्ती कशी करावी
ओठ बोलती हर हर माझे.!
एक शक्यता सरून गेली
आता सगळे जर तर माझे.!
ममता...
आज गौरी देशपांडेचा जन्मदिन !
गौरी देशपांडे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची नात व थोर विदुषी इरावती कर्वे व प्रा. दिनकर कर्वे यांची कन्या. प्रसिद्ध इंग्रजी लेखिका जाई निंबकर व शास्त्रज्ञ आनंद कर्वे यांची भगिनी.
पुण्यात अहिल्यादेवी शाळा व फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण. फर्ग्युसन महाविद्यालयात काही काळ इंग्रजीची प्राध्यापिका म्हणून अध्यापन. पुणे विद्यापीठात रिसर्च असिस्टंट. इंग्रजी वृत्तपत्रातून स्तंभलेखिका म्हणून कार्यरत. इंग्रजीतून कवितालेखन व वैचारिक लेखन, अरेबियन नाईटसचा मराठीत अनुवाद.
मराठी साहित्याचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी सतीश आळेकर यांच्या गाजलेल्या 'महानिर्वाण' या ब्लॅक कॉमेडी नाटकाचा अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी 'The Dread Departure' हा अनुवाद त्यांनी केला होता. शंकरराव खरात यांचे 'तराळ अंतराळ' हे आत्मचरित्र त्यांनी इंग्रजीत अनुवादित केले. तसेच सुनीतीबाई देशपांडे यांच्या 'आहे मनोहर तरी' या आत्मकथनाचे 'Pine for What is Not' हे अप्रतिम इंग्रजी भाषांतर केले. सत्यकथा या नियतकालिकातून मराठी लेखनास त्यांनी प्रारंभ केला होता.
ग्रंथसंपदा : एकेक पान गळावया (कादंबरीका), कारावासातून पत्रे (कादंबरीका), मध्य लटपटीत (कादंबरीका), निरगाठी (कादंबरीका), 'चंद्रिके ग, सारिके ग ' (कादंबरीका), तेरुओ आणि काही दूरपर्यंत (कादंबरीका), दुस्तर हा घाट (कादंबरीका), थांग (कादंबरीका), मुक्काम (कादंबरी), आहे हे असं आहे (कथासंग्रह), विंचुर्णीचे धडे (ललितलेख संग्रह), गोफ (कादंबरी), उत्खनन (कादंबरी)
गौरी देशपांडे गेली तेव्हा कुणीतरी जिवाभावाची, आपल्याशी एक घनदाट नातं असणारी आपली सखी अचानक आयुष्यातून उठून जावी तसं वाटलं होतं .
अत्यंत बुद्धिमान व शुद्ध तार्किक बुद्धिवादी विचारसरणीचा घरातूनच वारसा लाभलेली, उभं आयुष्य बंडखोरपणे जगलेली व ते जगणं निर्भिड पारदर्शीपणे मांडणारी ही लेखिका. विशेषतः स्त्री-पुरुष संबंधातील तिच्या मनमोकळ्या विवेचनामुळे बऱ्याच नीतिमार्तंडांना धक्के बसलेले आहेत.
प्रसिद्ध रशियन लेखक डोस्टोव्हस्कीला एकदा कुणीतरी म्हटलं होतं की तुम्ही आत्मचरित्र लिहा. तेव्हा तो चकित होऊन उत्तरला होता की, 'मी आजपर्यंत दुसरं काय लिहित आलो आहे ?'
अत्यंत मुलखावेगळं जगणाऱ्या, विवादास्पद वादळी व्यक्तिमत्वाच्या, कुठलाही इझम नाकारणाऱ्या व माणूस म्हणून जगणाऱ्या या बंडखोर स्त्रीच्या नऊ मराठी पुस्तकांच्या समृद्ध पसाऱ्यावर पाय रोवून मेघना पेठे , कविता महाजन यांच्या बंडखोर कविता , कादंबऱ्या जन्माला आल्या.
इंग्रजीची सरमिसळ न करता नितळ लख्ख मराठीत लिहिलेली तिची सारी पुस्तके. सरळधोपट वहिवाटीची चाकोरी जगणाऱ्यांपुढे तिनं अनेक सवाल खडे केले. मानवी संबंधाचा पोत पुन्हा तपासायला भाग पाडले, स्त्री-पुरुष बंधातील उत्कटता, चांदणं व घनगर्द अरण्येही तिनं रोखठोकपणे उलगडली. परंपरांच्या, चालीरुढींच्या ढोंगी पट्ट्या ओरबाडून काढून नितळ नग्न सत्य परखडपणे समोर मांडलं. आयुष्यातील प्रत्येक घटना उघड्या डोळ्यांनी तपासून पाहायला तिनं शिकवलं; पण तरीही ती विचारकर्कश किंवा कडवट झाली नाही. प्राणिमात्र, सारी माणसं, सूर्य-चंद्र, तारेवारे या साऱ्यावरील आसक्तीचा प्रेमाचा झरा तिच्यात अखंड झुळझुळत होता. पुढील पिढीतील अनेक लेखक-लेखिकांच्या लेखणीला तिनं बळ दिलं आणि त्यापेक्षाही महत्वाचं असं की, आमच्यासारख्या अतिसामान्यांच्या जगण्याला तिनं अर्थ दिला, एकटेपणाला सोबत दिली. चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळू पाहणाऱ्यांना धीर व मैत्रीचा हात दिला.
तिच्या पुस्तकांच्या आसऱ्यामुळे ताठमानेनं जगणं सोपं होऊन गेलं !
लीना पांढरे
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago