MPSC LOVE V'S successful story

Description
मनातील भावना पानावरती उतरविणे एक कला आहे 💯🤞😊
♥️मनातील भावना ♥️
🙂जीवनातील काहीतरी 🙂
🥰Fellings बद्दल थोडेसे🥰
😀अन् थोडेफार मजेशीर ही😀
🙃आणि बरच
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 5 days, 6 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

12 months ago

आयोगाच्या मागच्या प्रश्नांचा अभ्यास हा सर्वात जास्त महत्वाचा आहे ....त्यातील बारकावे शोधून काढा ...प्रश्नांचा अभ्यास करणं , म्हणजे विश्लेषणाची पुस्तके वाचणं नव्हे ....तुम्ही स्वतः प्रश्न व्यवस्थित पाहून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा ...त्यातील प्रत्येक पर्यायाचा बारीक विचार करा .…प्रश्नांच योग्य उत्तर माहीत आहे म्हणजे समाधान मानू नका ....बाकीचे चुकीचे पर्याय हे उद्याचे नवीन प्रश्न असू शकतात ...त्यानुसार handle करा....लॉजिक समजून घ्या ...फक्त पुस्तकं वाचून एका विशिष्ट मर्यादेपलीकडे मार्क्स वाढत नाहीत ...त्यासाठी analysis त्या दर्जाचं असावं लागतं ...topic wise प्रश्न वाचून मग theory वाचायला घ्या ...खूप फायदा होईल ...
Join telegram channel
?****https://t.me/+7f5rFfFJArRkZjVl

12 months ago

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका छोट्याश्या अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम
प्रामाणिक मदत हा हेतु

Join telegram channel ?
https://t.me/+7f5rFfFJArRkZjVl

Telegram

MPSC Mains by bhushan

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका छोट्याश्या अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम प्रामाणिक मदत हा हेतु @भूषण (कक्ष अधिकारी)

12 months ago

एक शेतकरी मुलगी ,स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणारी मुलगी

खूप  सोपं असतं  ना सगळ्या जगाला सांगण की  आम्ही एका परिक्षेची तयारी करतोय , पण त्या गोष्टी साठी किती कष्ट करावे लागतात आमचा बाप आणि आई दोघेही शेतीमध्ये राबराबतात , कष्ट करतात कधीकधी आम्हला शेतात काम कराव लागतं , मुलींना घरच काम करायला लागतं शहरा सारखा इथे गॅस नसतो चुलीवर आम्हा मुलींना स्वयंपाक करावा लागतो . तरी अभ्यास असल्यामुळे आई जास्त काम पण सागंत नाही मला माहीती आहे मुलींनो तुम्ही खूप टेन्शन घेत असाल की माझा बाप ,आई  शेतात राबतात ,जीवाच राण करतात ,कधीकधी वाटतं असेल आमच्याच वाटेला आलं असेल का? हे सगळं

पण थोडे अजून कष्ट घ्या , दाखवून द्या तुमच्यामध्ये पण ती आग आहे माहिती आहे दिवस चांगले चालले नाही म्हणून काय तुम्ही शांत बसून राहणार  तुमच्या मनाला एकदा विचारा की तुम्ही करू शकता का ? मेहनत करण्याची तयारी आहे का ? जर आतून हो असेल  तर पूर्ण जोमाने अभ्यास सुरू करा आणि result चा विचार नका करू मेहनत करत रहा यश  भेटलच‌‌ .तुमचे कष्ट  प्रामाणिक असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल , फक्त टेन्शन घेऊ नका, वेळ वाया घालवू नका .

धन्यवाद ??

लेखन - अश्विनी दत्ता  पठाडे

12 months ago

**प्रेम - एक प्रकाशमय बोध...
-------------------------------------------
असं म्हणतात की संत व्हेलेंटाईन यांनी अंध असलेल्या 'ज्यूलिया' वर प्रेम केलं...तिची दृष्टी परत येण्यासाठी व्हेलेंटाईन रोज ईश्वराला प्रार्थना करायचे...त्यांच्या प्रेमात एवढं सामर्थ्य होतं, एवढं पावित्र्य होतं की एक दिवस तिची दृष्टी वापस आली...पण दुर्दैवानं तेंव्हाच त्यांना फासावर जावं लागलं...फासावर जाताना व्हेलेंटाईनने ज्यूलियाला एक पत्र लिहिलं...त्या पत्रात शेवटी लिहिलं होतं  "Your Valentine"...आणि ते आनंदानं फासावर गेले...ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं आणि ज्या दिवशी त्यांना फाशी झाली तो दिवस होता 14 फेब्रुवारी...

प्रेम करण्यापूर्वी प्रेम समजावं लागतं...जिच्यावर प्रेम आहे तिला आपल्याला दृष्टी देता आली पाहिजे, प्रकाश देता आला पाहिजे, ज्यामुळे तिचं आयुष्य सुंदर होईल, प्रकाशमय होईल... व्हेलेंटाईनला ज्यूलियाचा मोह नव्हता पण तिच्याबद्दल हृदयात अपार प्रेम होतं...प्रेम आणि मोह यात खूप फरक आहे...ती व्यक्ती माझ्याच आयुष्यात असावी हा मोह आहे...आणि ती व्यक्ती नेहमी सुखात असावी, तिच्या आयुष्यात दुःख असू नये...ही विशुद्ध भावना म्हणजे प्रेम...आणि हाच वेलेंटाईनचा संदेश आहे...खऱ्या प्रेमात मोह नसतो, स्वार्थ नसतो, प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही...प्रेम दिव्य अमृत आहे आणि मोह म्हणजे विष...प्रेम एक सुंदर अनुभूती आहे...ती अनुभूती जगण्यात आनंद आहे...प्रेम हृदयात असण्यात आनंद आहे...मोहात तर दुःख आहे...कारण मोहात अपेक्षा असते...प्रेम निरपेक्ष असतं...प्रेम जसं आकाशातून उतरतं पण पृथ्वीवर त्याची मुळं असत नाहीत...मोहाची मुळं पृथ्वीवर आहेत...प्रेमात आसक्ती नसते...प्रेम निर्मोही असतं...प्रेम एकमेकांच्या गळ्यात फास घालत नाही उलट प्रेम फासाचे दोर कापतं, मुक्त करतं...प्रेम जीवनात मुक्ती आणतं...प्रेम "मुक्ती" आहे...म्हणूनच बुद्धांनी या प्रेमाला ध्यानाचा अंतिम परिणाम म्हटले आहे...महावीराने त्याला कैवल्याचे स्वरूप म्हटलं आहे...

प्रेमच तर एकमात्र गोष्ट आहे या पृथ्वीतलावर ज्यामध्ये साक्षात ईश्वराची झलक आहे...जर प्रेम या भावनेशिवाय विधात्यानं ही सृष्टी निर्माण केली असती तर ही सारी सुंदर सृष्टी कुरूप आणि मरूभूमी ठरली असती...प्रेमाचं खरं स्वरूप खूप वेगळं आहे...ज्या व्यक्तीबद्दल आपल्या हृदयात प्रेम आहे त्या व्यक्तीबद्दल एकच शुभ विचार आपल्या मनात असतो...तो म्हणजे त्या व्यक्तीचं "कल्याण"...तिला त्या उंचीवर कसं नेता येईल ज्या उंचीवर तिचं कल्याण असेल, तिला आकाश कसं देता येईल जिथं ती मुक्त असेल...प्रेम मुक्ती आहे...प्रेम जीवनात मुक्ती आणतं...प्रेमात खूप धैर्य असतं, सहनशिलता असते, त्याग असतो,  प्रेमात खूप आर्तता असते...प्रेम प्राकृतिक असत नाही...शारीरिक गोष्टी प्राकृतिक असतात...प्रेम शारीरिक असत नाही...

प्रेम आपल्या मनाला त्या उंचीवर नेतं ज्या उंचीवर ते अगदी निर्मळ आणि पवित्र होतं...जिथं आपलं मन आपल्या भल्यापेक्षा ज्या व्यक्तीबद्दल आपल्या हृदयात प्रेम आहे त्या व्यक्तीचं भलं कसं होईल याचा विचार अधिक करतं...अशा मनात मोह नसतो, शारीरिक भोगाची लालसा नसते, चिखल नसतो...कारण प्रेम चिखल नाही तर त्या चिखलातलं कमळ आहे...कमळाला पंकज म्हटलं जातं...पंक म्हणजे चिखल...चिखलातून जे जन्मतं त्याचं नाव कमळ...किती अद्भुत रूपांतरण होतं...घाणीनं बरबटलेला चिखल कुठं आणि त्यातून निर्माण झालेलं प्रेमळ, लोभस, निर्वीकार,कमळ कुठं ? एक डाग सुद्धा असत नाही कमळावर चिखलाचा...त्याचं उमलणं, त्याचं सौंदर्य, त्याची निरागसता, त्याचा अनोखा रंग, सगळच विस्मयकारक...कमळाच्या फुलात काही खुबी आहेत, जादू आहे...जे कोणत्याच फुलात नाही... कमळ चिखलाचा त्याग करतं...मोहाचा त्याग करतं...आसक्तीचा त्याग करतं...आणि चिखलातून उभं राहतं आणि एवढं शुद्ध, एवढं निर्लेप, एवढं निर्वीकार...चमत्कार आहे कमळ...कमळ रहस्य आहे...कमळ या सृष्टीवरचं अद्भुत रूपांतरणाचं प्रतिक आहे...या पृथ्वीवर कमळापेक्षा कोमल काय आहे ? ज्यांनी प्रेमात वासना पाहिली, शरीर पाहिलं, त्यानं चिखल पाहिला...आणि ज्यांनी प्रेमात भावना पाहिली, भक्ती पाहिली त्यानं कमळ पाहिलं...ज्यांनी प्रेमात त्याग पाहिला, मुक्ती पाहिली त्यानं कमळ पाहिलं...मनाचं शुद्ध होणं आणि मी चं शून्य होणं म्हणजे प्रेममय होणं...बोधवान व्हा आणि चिखलापासून कमळापर्यंतचा प्रवास करा...निर्मोही...निर्मळ...आणि निरपेक्ष...
--------------------------------------------**

2 years, 4 months ago

*?*?????????

वेळ सोडून ह्या जगात कोणीच
अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ चांगलीअसेल तर,

सगळे आपले असतात आणि वेळ खराबअसेल तर,
आपलेपण परके होतात...

वेळच आपल्या व परक्यांची
ओळख करून देते…

*???? शुभ सकाळ ????***

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 5 days, 6 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago