श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

Description
शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी.

सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश

┎─────────────┒
☞ @Shrimantyogi1 ☜
┖─────────────┚
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 2 weeks ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 11 months ago

2 months, 2 weeks ago

HAPPY 76TH REPUBLIC DAY 🇮🇳

JAI HIND, VANDE MATARAM ❤️

2 months, 2 weeks ago

छावा🔥🔥🔥

चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, आणि हा चित्रपट खरोखरच भव्यदिव्य वाटतो आहॆ.अंगावर शहारे आणणारे दृश्यांनी भरलेला हा ट्रेलर पाहून थक्क व्हायला होतं.

विकी कौशिक चे कौतुक करावे तेव्हढे कमीच 👍🏻👌🏻

रश्मीका मंदाना superb 👌🏻👌🏻

अक्षय खन्ना 👌🏻👌🏻

🔥🔥🔥

जबरदस्त सिनेमेटोग्राफी!
जबरदस्त डायलॉग!
जबरदस्त ॲक्शन!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

2 months, 2 weeks ago

सर्वांनी ट्रेलर बघा ट्रेलर बघून अंगावरती काटे येतील

5 months ago
स्वतःच्या धर्माशी प्रामाणिक असाव माणसाने नाहीतर …

स्वतःच्या धर्माशी प्रामाणिक असाव माणसाने नाहीतर अधर्म वाढवणारे भरपूर असतात... ???
शिवराय असे शक्तिदाता??

अवनी_रायगडाची_लेक

5 months ago
***⛳******?***रणांगणात उभ्या असलेल्या रणमर्दाची ताकद छाताडात …

?रणांगणात उभ्या असलेल्या रणमर्दाची ताकद छाताडात असलेल्या स्वाभिमानावर असते आणि जोवर स्वाभिमान जागा आहे, तोवरच तो आपल्या लढण्याच्या धर्माला जागतो...!???

शंभूराजे ?

5 months, 1 week ago
वेरूळ लेणी , छत्रपती संभाजीनगर | …

वेरूळ लेणी , छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र ??

रावण अनुग्रह शिल्पांमध्ये रावण खाली एक गुडघा टेकून आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलवीत आहे, तर कैलास पर्वतावर शांत चित्ताने बसलेले शिव आणि भयभीत झालेली देवी पार्वती शिवाला बिलगली आहे. रावण कैलासपर्वत हलवीत असल्यामुळे घाबरून पळणारे शिवगण, डोंगरावरचे प्राणी यांची शिल्पे हा प्रसंग जिवंत करण्यामध्ये कलाकार यशस्वी झाले आहेत. यातील नाट्यमयता वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

5 months, 1 week ago

किल्ले जंजिरा हा जलदुर्ग सर्वाना माहीत आहे पण त्याचा समोर जाऊन त्याहून आत समुद्रात छत्रपतींनी एक जलदुर्ग बांधला तो म्हणजे पद्मदुर्ग तो अनेकांना आजही माहीत नाही तेव्हा खंत वाटते. जंजिरा हा अभेद्य अफाट आहेच तो समुद्राने इतका सुरक्षित आहे की, त्याला जिंकताना नाकी नऊ येतात हे मावळ्यांना उमगले होते. शिवाय जंजिरा जिकण्यासाठी अनेक युक्त्या लढवूनही जंजिरा काही हाती येत नव्हता तेव्हा महाराजांनी फार पुढची युक्ती लावून असा विचार केला की हा जो सिद्धी आहे तो जंजिरा वर राजा आहे परंतू त्याला जगण्यासाठी बाहेरच्या लोकांची मालाची आवश्यकता आहेच तो किती काळ स्वावलंबी राहील फार फार तर गडावर अन्नसाठा आहे तोपर्यंत तर मग आपण त्याचा हा सगळा व्यापारच बंद करूयात यासाठी महाराजांनी समुद्रकिनारी सामराजगड नावाच्या गडाची उभारणी केली आसपासचा किनारपट्टी वरील मुलुख आपल्या ताब्यात घेतला. सिद्धीला कळून चुकले की महाराज आपली कोंडी करत आहेत त्याने काही सैनिक पाठवून हा सामराजगड वर हल्ला केला पण स्वराज्याचे राजे छत्रपतींचे शूर मावळे सिद्धीला जमिनीवर कसले आवरतील त्यांनी गनिमाना वेळोवेळी चोख हल्ल्याने उत्तर दिले आता मात्र सिद्धी ने उलट डोकं चालवत आपण आता जमिनीवर व्यापार करू शकत नसलो तरी समुद्री मार्गाने तर करू शकतो हे ध्यानात घेऊन तो समुद्री मार्गे आपल्या गरजा आवश्यक वस्तू महाराजांचे इतर शत्रू असतील त्यांचा सैन्याशी हातमिळवणी करून तो समुद्री मार्गे आधार घेऊ लागला ही बाब शिवाजी महाराजांच्या लक्षात येताच एक दिवस महाराजांनी सागराची अधिक माहिती काढत जंजिरा च्या पुढे समुद्रात एक कासवाच्या आकाराचे बेट / खडक आहे हे ध्यानात घेतले आणि तिथे निर्माण केला पद्मदुर्ग ! मी स्वतः पद्मदुर्ग पाहिला तेव्हा मला तो दुर्गविज्ञानाचा आविष्कारच वाटला. असा हा पद्मदुर्ग बांधून सिद्धीची समुद्रातूनही व्यापार बंद करून कोंडी करण्याचा डाव छत्रपतींनी बनवला पण दुर्दैवाने पुढे महाराजांचे निधन झाले शिवाय एका सिद्धीपेक्षा ढीग खान आणि यवन स्वराज्यावर सतत स्वाऱ्या करत होते त्यामुळे छत्रपतींना जंजिराकडे फार लक्ष देता आले नाही आणि अखंड स्वराज्याचा विस्तार पाहता त्याकडे प्राधान्य देणे साहजिकच होते त्यामुळे जंजिरा हा स्वराज्यात येता येता राहिला. लेखाचा थोडक्यात उद्देश छत्रपतींनी पद्मदुर्ग बांधला त्यामागे राजांचे काय धोरण होते आणि एखादा गड जिंकण्यासाठी राजे जंजिऱ्याच्या नाकावर टिच्चून त्याही पुढे जाऊन त्या भयाण सागरात पद्मदुर्ग बांधतात हीच गोष्ट त्या सिद्धी साठी घाम फोडणारी होती.

-- आदेश म्हस्के ✒️

5 months, 1 week ago

सागरी दुर्गबांधणीत जंजिरेकर सिद्दीच्या उरावर छत्रपती शिवरायांनी “पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला” बांधला....?

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले...,
‘राजे म्हणतात.., या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल..ताकीद असे...’

सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.. दुर्गबांधणी मध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे...

किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज आणि त्या पद्मदुर्गावरील पाकळी बुरुजाची दुर्गरचना वैशिष्ट्य :

बुरुजाच्या पाकळ्यांच्या बाहेर आलेल्या भागाचा उपयोग शत्रूवर जास्तीत जास्त कोनांमधून मारा करण्यासाठी केलेला आहे कल्पकतेने बनवलेला हा बुरूज पाहाताना बनवणाऱ्यांची सौंदर्य दृष्टी दिसून येते..किल्ल्यावर लांबलचक पसरलेली तटबंदी आणि भव्य बुरूज आहे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाची गरज भागून किल्ल्यावर पाण्याचे साठे तयार होत हा दगड काढण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी छिन्नी हातोड्याचा वापर केला जातो त्याच बरोबर दगड सरळ निघावा यासाठी एक पुरातन पद्धत वापरली जाते यात जो दगड फोडायचा आहे त्यावर एका सरळ रेषेत त्रिकोणी खाचा केल्या जातात त्या खाचांमध्ये लाकडाची पाचर घट्ट बसेल अशा प्रकारे मारली जाते या लाकडावर रोज पाणी ओतले जाते यामुळे लाकूड फुगून त्याच्या जोरामुळे कातळातून दगड वेगळा होतो अनेक लेण्यांच्या ठिकाणी किल्ल्यांवर अशा प्रकारचे खाचा असलेले दगड पाहायला मिळतात...

――――――――――――
? @gadwat_official ??♥️?
.
.
मराठा_आरमार जलदुर्ग_पद्मदुर्ग
गडकिल्ले_महाराष्ट्राचे
छत्रपती_शिवाजी_महाराज
छत्रपती_संभाजी_महाराज
मराठा_साम्राज्य आरमार इतिहासकर्ते_मराठे
#dronephotography #droneoftheday
#maharashtratourism
#kokandiaries #bhatkanti
#photography #gadwat_official

5 months, 1 week ago

शिवछत्रपतींनी स्वराज्याचा विस्तार करताना भौगोलिक रचनेचे भान ठेवून स्वराज्याकरिता प्राणाची बाजी लावणाऱ्या मराठा सेनानींची मालिकाच विकसित केली. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात बलाढ्य शत्रूसमोर स्वराज्य टिकून राहिले. याचे कारण म्हणजे “सेनापती धनाजी जाधव”...??

मराठेशाहीतील उत्कृष्ट संघटक व व्यवस्थापक होता. त्याच्या संघटन व व्यवस्थापन कौशल्याची वैशिष्ट्ये यात आहे की कधी पराजय पदरी येत असताना जनतेचा त्याचेवरील विश्वास कधीच कमी झाला नाही. कधी त्यांच्याविरुद्ध त्याच्या सैनिकांनी बंडखोरी केली नाही. उलट सैन्यात तो प्रिय असल्याचेच मोगल इतिहासकारांचे मत आहे. जनता व सैनिक मोठ्या विश्वासाने त्याच्या सोबत व पाठीशी खंबीरपणे राहिली. मोगलांविरुद्ध आपणास निश्चित यश मिळेल ही त्यांनाही खात्री असावी. कारण अपयश आल्यास सर्वांचाच विनाश होता. त्याविरुद्ध खंबीरपणे लढण्याचा निर्धार धनाजी जाधव, त्याचे सैनिक, जनता व छत्रपतीनी केला होता. त्यात अखेर मराठे विजयी ठरले...

पण वरील सदगुणांबरोबरच त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही दोष होते. मुख्यतः धनाजीस युद्ध कार्याशिवाय इतर कामात रस वाटत नसे. तसे पाहिले तर सेनापती धनाजी जाधव हे त्यांच्यात एक व्यंगच होते...!
――――――――――――――
: @rambdeshmukh

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 2 weeks ago

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 11 months ago