👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month, 4 weeks ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 10 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 months, 2 weeks ago
*✅ पुरस्कार 2024?*
?आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024:- मायकेल हाफ मॅन कैरोस
?2024 च्या बुकर पारितोषिक विजेत्या:-सामंता हार्वे :- ब्रिटिश लेखिका ऑर्बिटलं या कादंबरी साठी
?साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेते 2024;-हॉंग कॉंग (दक्षिण कोरिया)**
30 April 2023 रोजी एमपीएससी ग्रुप c ची पूर्व परीक्षा झाली...मुख्य परीक्षा 17 dec 2023 ला झाली जुलै 2024 मद्ये कौशल्य चाचणी झाली ...आणि अजून हि गुणवत्ता मेरिट लिस्ट लागली नाही ..जवळपास 15000 हजार मुळे यात अडकून पडले आहे..खर तर ही शोकांतिका आहे..मुलांची अजून किती सहनशीलता बगणार असेल ही व्यवस्था ....तरुण गे देश्याचे भविष्य असतात..आज तरुण च अंधारात आहे.याला जबाबदार कोण हा प्रश्न नेहमी सतावत असतो..जर इथल्या प्रत्येक संस्थेने आपले काम वेळेवर आणि पारदर्शक पने पूर्ण केले असते तर आज ही वेळ आली नसते... एमपीएससी घटनात्मक संस्था आहे तरुणाचा त्यावर विश्वास आहे ...पणं ही प्रक्रिया पूर्ण जीव घेनी झाली आहे कुठ तरी हे बदलायला हवं..2024 हे वर्ष एमपीएससी ची फक्त एक पूर्व परीक्षा होते.याला कारण कोण,तरुण मुलाच्या हातातून वाऱ्या सारखे वर्ष निघून गेले...इथून पुढे mpsc अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण विचार करून यात येणे उचित राहील..प्रामाणिक पने अभ्यास करुन ही 2 वर्ष होवून जातात आणि निकाल लागत नाही..ही खरच लाजिरवाणी गोष्ट आहे..MAT मद्ये प्रकरण असून फक्त तारखा वर तारखा मिळत आहे ही एक शोकांतिका आहे...MAT आणि MPSC यांनी काही तरी तोडगा काढून हे प्रकरण निकालात काढायला हवं होत आता पर्यंत पणं अस झाल नाही...तरुणाच भविष्य अंधारात आहे हेच म्हणावं लागेल.....✍✍BY SANTOSH
*?महाराष्ट्रात महिलाराज?*
? महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव- सुजाता सौनिक
? राज्याच्या पोलिस दलांच्या प्रमुख पहिल्या महिला 'डीजीपी' - रश्मी शुक्ला
? पहिल्यांदाच राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर- शोमिता बिश्वास
? मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव - अश्विनी भिडे
? राज्याच्या कायदाच्या मुख्य अधिकारी - सुवर्णा केवळे
? राज्याच्या प्रिंसिपल अकाउंट जनरल - जया भगत
? सीमाशुल्क विभागाचे नेतृत्व - प्राची स्वरूप
? मुंबईचे ड्रीम प्रोजेक्ट असणारे मेट्रो ३ चे नेतृत्व - अश्विनी भिडे (मुंबई मेट्रोच्या एमडी)
? महाराष्ट्र हेल्थ यूनिवर्सिटीच्या कुलपती - लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर
? महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे (MSSU) संस्थापक कुलगुरू -डॉ. अपूर्वा पालकर**
आयुष्य...... खरंतर आयुष्य वाटत तितकं सोपं नसतं. आपण जसजसे लहाना पासून मोठे होत जातो तसं तसं आपल्याला आयुष्याची गुपित समजायला लागतत. एखादा व्यक्ती जन्माने खूप श्रीमंत असतो एखादा व्यक्ती खूप गरीब असतो. श्रीमंती फक्त पैशाचीच नसते. तर निसर्गाने तुम्हाला दिलेली बुद्धिमत्ता, तुमच्यामध्ये असलेले काही कौशल्य गुण हे सर्व तुमच्या श्रीमंतीतच येतात. अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. कधीकधी खूप कष्ट करू नये यश मिळत नाही. अपयश आणि निराशा पदरात पडतात तेव्हा स्वतःला समजावणे खूप अवघड जाते. जेव्हा जेव्हा अपयश येते तेंव्हा स्वतः सोबत प्रामाणिक राहणे खूप गरजेचे असते. मानवाला निसर्गाने मन दिले आहे आणि बऱ्याच वेळा माणूस भावनिक होवून आपल्या जवळ असणाऱ्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा विचार न करता दुसरीकडेच भटकत राहतो. कोणीतरी आयुष्यात आले आणि तुमचा विश्वासघात केला तेव्हा स्वतःला सावरणे खूप अवघड असते. बुद्धिजीवी व्यक्ती स्वतःकडून चुकी होईल असं कधी वागत नसतो. परंतु मानवी मन हे खूप चंचल असते. त्यावेळी कोणत्यातरी एखाद्या व्यक्तीकडून विश्वासघात केला जातो आणि त्यात विश्वासाला तडा जातो तेव्हा माणूस निशब्द होतो. आणि स्वतःलाच दोष द्यायला लागतो. पण खरंतर प्रत्येक व्यक्तीची नीतिमत्ता वेगळी असते आपण प्रामाणिक असून ही जर आपल्या सोबत विश्वासघात झाला असेल तर आपण स्वतःला त्रास का करून घ्यावा. हा प्रश्न एकदा मनाला विचारायचं असतो.. आपल्याकडे असणारी बुद्धिमत्ता आणि कौशल्य याच गोष्टीचा आपण विचार करून आपल्या आयुष्यात आलेले संकट , कोणी केलेला विश्वासघात, जवळच्या व्यक्तीकडून झालेली फसवणूक या सर्व गोष्टीतून बाहेर येऊन स्वतःच्या स्वप्नाचा विचार करायचा असतो.. जवळ पैसे असले म्हणजे माणूस श्रीमंत असतो असं नसतं. तुमच्या जवळ असणारी बुद्धिमत्ता कौशल्य हे हेही तुमची श्रीमंतीच असते. खरंतर मानवी आयुष्य खूप छोटे आहे जगण्यासाठी.. आपल्या सोबत घडलेले भूतकाळातील वाईट अनुभव ते एक वाईट अनुभवातून मिळालेली चांगली शिकवन म्हणून आयुष्यात लक्षात ठेवायची असते. आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला आयुष्य आणखी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करायचा असतो.खर आपण भूतकाळ सतत डोक्यात ठेवला आणि त्याच आठवणीत जगत राहिलो तर आपल्याला मिळालेल्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा नाश होतो. असे अनेक व्यक्ती दिसतात की आयुष्यात थोडं तरी संकट आलं की खचून जातात व्यसनाधीन होतात . एखादी व्यक्ती आयुष्यात वाईट वागली तर सर्वच व्यक्ती वाईट आहेत अशी अशी भावना मनात ठेवतात.खरंतर आपल्या सोबत कोणी वाईट वागले हे त्या व्यक्तीची कर्म म्हणून त्या व्यक्तीला माफ करून त्या सर्व गोष्टी पासून दूर होऊन. स्वतःचा आयुष्य घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला निसर्गाकडून मिळालेलो बुद्धिमत्ता, कौशल्य, चांगले गुण याचा सतत विचार मनात ठेवला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात समोर गेले पाहिजे.. कारण तुम्ही जर कोणाला फसवलं नसेल तर तुमच्या सोबत जे काही वाईट घडले असेल ते नेहमी तुमच्या चांगल्यासाठीच घडलं असेल ही भावना मनात ठेवून समोर जायचं असतं. एक प्रामाणिकपणे आयुष्य घडवण्यासाठी आणखी स्वतःला दुसरी संधी द्यायची असते आणि भूतकाळात झालेल्या चुका पुन्हा आयुष्यात होणार नाही याची काळजी घ्यायची असते. मानवी आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्याचा आनंद घेण्यासाठी प्रामाणिकपणे स्वतःला समर्पित करायचे असते....BY SANTOSH
मुलगा चांगला तेंव्हा असतो जेंव्हा तो मोठ्या पदावर असेल किंवा पैसे कमवत असेल ,आणि मुलगी सुंदर असेल तर ती चांगलीच असते हा समजाचा एक दृष्टीकोन झाला आहे...नेमके चांगले पना कश्याला म्हणावं हे अजून समजल नाही✍✍✍ BY SANTOSH
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
9 डिसेंबर 2024
? प्रश्न.1) सोने खरेदी करण्यात कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे?
उत्तर – भारत
? प्रश्न.2) कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर – ओडिसा
? प्रश्न.3) आशियाई तलवारीबाजी महासंघाच्या महासचिव पदी कोणाची निवड झाली?
उत्तर – राजीव मेहता
? प्रश्न.4) मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे?
उत्तर – नागपूर
? प्रश्न.5) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
उत्तर – मिशेल बॅचले
? प्रश्न.6) फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर – बिहारी मुखर्जी
? प्रश्न.7) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड चे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर – विजय चंडोक
? प्रश्न.8) कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला?
उत्तर – नवी दिल्ली
? प्रश्न.9) बँकॉक येथे 2024 आशियाई एस्पोर्ट्स गेम्समध्ये भारताच्या पवन कॅम्पेल्लीने ईफुटबॉलमध्ये कोणते पदक मिळवले ?
उत्तर - कांस्यपदक
♦️ पंचायत समितीला इतर राज्यातील नावे :
पश्चिम बंगाल, आसाम: अचलिक परिषद
गुजरात: तालुका परिषद
मध्य प्रदेश: जनपद परिषद
तामिळनाडू: पंचायत संघ
केरळ: ब्लॉक पंचायत
अरुणाचल प्रदेश: अंचल परिषद
कर्नाटक: मंडल पंचायत
जम्मू आणि काश्मीर: क्षेत्रीय परिषद
आंध्र प्रदेश: मंडल पंचायत
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month, 4 weeks ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 10 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 months, 2 weeks ago