👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 4 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
✍ Hello Friends . GST department sathi interview notes ahet ka?
Astil tr @Dysp77 id var send kara??
18 च्या मुलाखती संबंधी आयोग नोटिफिकेशन देईल
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या तिसऱ्या टप्प्यामध्ये दि.3 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
Last week मध्ये ज्यांच्या मुलाखती झाल्या असतील त्यांनी Transcript शेअर करायच्या असतील तर @Dysp77 या ID वर करू शकता...
✍*आरक्षण व प्रतिनिधित्व यातील फरक
सध्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला जातो आहे.
देशातील सरकार व प्रशासन यात विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व असले पाहिजे असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ शेतकरी, कामगार, उद्योग जगत, महिला इत्यादी.
भारतात शतकानुशतके पितृसत्ताक समाजव्यवस्था व वर्णजातीभेद यामुळे अनेक समाजगट मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले. निर्णयप्रक्रियेत, सत्तासंतुलनात त्यांना वाटा मिळाला नाही. हे शोषणाचे राजकारण उलथून टाकण्यासाठी आपण भारतात आरक्षण देतो.
जर प्रतिनिधीत्व पुरेसे नसेल तर आरक्षणाची तरतूद करण्यात येते. आरक्षणाने समानतेला कायद्याचे पाठबळ मिळते.
प्रतिनिधीत्वाचे उदाहरण - यूएसए
अमेरिकेत होकारार्थी क्रिया (Affairmative Action) या पद्धतीने आरक्षण दिले जाते. सर्व सरकारी व खाजगी संस्थांचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. जर आफ्रिकन वंशाचे लोक, महिला यांना पुरेसे प्रतिनिधीत्व नसेल तर ते देण्यात येते. भारताप्रमाणे सक्ती नसते, पण जर ती संस्था AA निकष पाळत नसेल तर त्यांच्यावर सरकारची वक्रदृष्टी पडते.
भारताने आरक्षण सोडून AA द्यावे का?
फायदा
अमेरिकेत अगदी खाजगी क्षेत्रातही आरक्षण असते जे भारतातील उपलब्ध नाही. भारतात सैन्यदले व न्यायालये येथेही आरक्षण नाही. AA मुळे सगळीकडे प्रतिनिधीत्व मिळेल.
तोटा
AA ने आपली आरक्षणातून समानता साधायची व्युहरचना दुर्बल होण्याचा धोका आहे. आपण अगदी केडर देताना व प्रमोशनच्यावेळी देखील आरक्षण देतो. ते कदाचित यामध्ये होणार नाही.
सारांश
सध्या चर्चेमध्ये असलेल्या मराठा आरक्षणामध्ये मराठा समाजाकडे प्रशासन व सरकारमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व आहे. पण तरी आरक्षणाची मागणी आहे.
दुसरीकडे आरक्षण असेल म्हणजे पुरेसे प्रतिनिधीत्व असतेच असे नाही. जसे अनुसूचित जमाती (ST) हा समाज घटक.
✍? भूषण देशमुख (Repost)
- मला लहानपणापासून प्रशासनाची आवड आहे
अभिरूप मुलाखत घेताना सर्वात कॉमन प्रश्न म्हणजे
Q 'प्रशासनात का यायचे आहे?'
❣ त्याचे नेहमीचे उत्तर म्हणजे प्रशासनाची आवड आहे. तीही लहानपणापासून.
जर एखादे पद हातामध्ये असेल व अनुभव असेल तर एक वेळ ठीक आहे. एरवी हे कसे शक्य आहे? प्रत्यक्ष प्रशासनात काम केल्याशिवाय आवड आहे की नाही हे कसे कळणार?
नेतृत्वाची आवड आहे, प्रशासनातील आव्हान स्वीकारायला आवडेल हे खरे तर सम्यक उत्तर ठरेल.
Q 3 स्थिती व गती
अभिरूप मुलाखतीत एका प्रश्नावर उमेदवार अडखळत बोलताना दिसले. तो विषय जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे प्रशासन गतिमान कसे करता येईल?
काहींना प्रश्न समजत नाही. काहींना तो समजतो पण ते पारंपरिक उत्तरे देतात. उदाहरणार्थ
- पारदर्शकता वाढवणे
- कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावणे
- विविध विभागांमध्ये समन्वय साधणे
- जबाबदाऱ्या (responsibility) निश्चित करणे
खरे तर यापुढे जाऊन प्रशासन गतिमान करण्यासाठी अजून चांगल्या कल्पनांची चर्चा करता येईल.
उदाहरणार्थ
- नागरिकांची सनद व सेवा हमी कायदा
- कामाचे उत्तरदायित्व (accountibility) निश्चित करणे
- तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर (चॅटबोट, सेंट्रल डॅशबोर्ड, अद्ययावत पोर्टल, सेतू, सारथी प्रगती यांचा वापर इत्यादी)
- लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न करणे (विभाग सोशल मीडियावर सक्रिय ठेवून)
✍? भूषण देशमुख (Repost)**
✍❣मुलाखतीसाठी चालू घडामोडी विषय आणि सखोल विश्लेषण
By - भूषण देशमुख सर,
Lokayan Academy Pune
? मुलाखतीची तयारी नेमकी कुठून सुरू करावी हे कळत नाही?
? आपल्या प्रोफाईलचे सगळे घटक कसे कव्हर करावे हे कळत नाही?
✅ मुलाखतीची आदर्श तयारी कशी करावी याविषयी सूचना देणाऱ्या या नोट्स मुलाखतीच्या तयारीला योग्य दिशा देतील.
या नोट्सची प्रिंट काढून, प्रत्येक पानाच्या पुढे ५ कोरी पाने जोडून आपापल्या प्रोफाइल नुसार relevant माहिती गोळा करत गेल्यास मुलाखतीची अचाट वाटणारी तयारी सुकर होईल.
*? ✍निखिल पाटील (Dy Director of Industries)
राज्यसेवा 2021 : Rank 45,
मुलाखत गुण 70*
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 4 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago