⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

Description
🎯🥇"Nothing Is Impossible फक्त जिद्द पाहिजे..!✌️💯
अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】
👇👇Join 👇👇
http://:t.me/ghebhararitu
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

4 days, 19 hours ago

देव सगळ्यांना काहीतरी एक स्पेशल गिफ्ट देतोच..😊😊

काहींना खूप सुंदर चेहरा, तर काहींना खूप छान दंतपंक्ती.. काहींना चेहऱ्यावर छान हास्य तर काहींना सुंदर डोळे..

इतकंच नाही तर काहींना खूप सुंदर विचार शक्ती, तर काहींना खूप काही समजून घेण्याची कला..😊

काही लोक आपल्याच कलेत मग्न असतात तर काही दुसऱ्यांना मोठे करण्यात..😊

काही जण स्वमग्न असतात तर काही जण खूप विमनस्क असतात..

चालायचं हो.. आपलीच  पाची बोटे एकसारखी कुठं असतात सांगा??

तरीही एकमेकांना एकमेकांची गरज असतेच ना??

न जाणो कधी कुठल्या गोष्टींची गरज कोणाला पडेल?

देवाने प्रत्येकाला इथं काहितरी स्पेशल दिलेच आहे.. अन त्याच बरोबर काही तरी कमी पण..

आपल्याला निवडायचं आहे आयुष्यात .

जे कमी आहे  ते इतरांकडून भरून काढायचं अन जे आपल्याकडे जास्त आहे दुसऱ्यांना भरभरून द्यायचं..😊😊

याला जीवन ऐसें नाव..😊😊

credit goes to writer

5 days, 6 hours ago
**सत्त्य आणि संघर्षाच

सत्त्य आणि संघर्षाच
एकमेव प्रतीक..
✍️ सत्त्यवाद्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला.कारण सत्त्य हे संघर्षाच प्रतीक आहे.इतिहासाच्या पानापानात सत्यवाद्याचा संघर्ष लिहल्या गेला.लिहल्या जात राहील, कारण आमचा इतिहास सत्त्य आणि संघर्षाचा आहे. सत्त्य बोलणाऱ्याचे शीर कटल्या गेले. डोळे फोडल्या गेले. पण शेवटी इतिहासाची पानं इमानदार होती. त्यांनी सत्त्यवाद्याच नावं आपल्या पानावर सोनेरी अक्षराने लिहलं. विरोधक कोणाचेही असो, छत्रपती शिवाजी महाराज वा संभाजी महाराज त्यांच्या विरोधकाना इतिहासाच्या पानावर स्थान नाही. सिहाच्या जबड्यात हात घालून,सिहाचे दात मोजणारे इमानदारी आणि सत्यनिष्ठा यांच एकमेव प्रतीक स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विन्रम अभिवादन कोटी कोटी प्रणाम...!"
🙏*🙏*🙏🌹🌹🌹
©️®️शब्दरचना -अनिल भगवान चव्हाण (ABC )
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩**

6 days, 1 hour ago

......जीवनाची परीक्षा.....
(लिखाण शेवटपर्यंत नक्की वाचा,नक्कीच काहीतरी बोध मिळेल)

जीवनात खूप कष्ट करतो तरीही परीक्षेत अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही, त्यामुळे आपल्याला कमीपणा वाटतो.जवळचे नातेवाईक,मित्र इतर आपणास कमी समजतात आणि आपल्या मनात स्वतःबद्दल द्वेष निर्माण होऊन आपण आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलू शकतो.
सर्वात अगोदर हे जाणून घ्यायला हवे की कोणीच शंभर टक्के परिपुर्ण नाही,अस असतं तर माणसाला शिक्षण घ्यायची गरजच नसती.अश्या वेळेस स्वतःला शांत ठेवण्याचा स्वतःमधील गुप्त शक्ती जागृत करण्याचा नक्की प्रयत्न करावा आणि पुढील काही गोष्टी समजून घ्याव्यात.आपल्याला हवे ते यश मिळाले नाहीतर नैराश्य येते आणि आपण जीवनात काहीच करू शकत नाही असे वाटते आपण खचून जातो,परंतु लक्षात असूद्या ह्या जगात सर्व सारखेच नसतात,सर्वच क्लासवन नाही होऊ शकत,प्रत्येकजण हा वेगळा आहे प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत हे आपण समजून का घेत नाही? विराट सारखी फलंदाजी अमिताभला करता येईल का?अमिताभ सारखा अभिनय लता मंगेशकरांनी केला असता का?सर्वांची कौशल्ये सारखे नसतात आणि असेही नाही जीवनाच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला यश मिळताच जाईल.आपण अश्या खूप बातम्या एकतो एखादी परीक्षा क्रॅक नाही झाली म्हणून कित्तेक विद्यार्थी आत्महत्या करतात पण हा पर्याय आहे का,ह्याने सर्व प्रश्न सुटणार आहेत का?अस आहे का तुम्ही एकदा ती परीक्षा क्रॅक करू शकला म्हणून परत कधीच करू शकणार नाही,एक परीक्षा तुम्ही कुचकामी आहेत,तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही हे ठोस सांगते का?
परिक्षेतले मार्क्स तुमचे आयुष्य पूर्णपणे ठरवू शकतात का?परिक्षतले मार्क्स आणि तुम्ही आयुष्यात कायकाय करू शकता ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.तुमची शाळेतली, कॉलेजची आणि इतर परिक्षा हे तुम्हाला पूर्णपणे सांगू शकतं नाही आणि समजा आज जे टॉपर आहेत ते भविष्यात कायम टॉपरच राहतील असे नाही,पुढे नोकरीत व्यसायात ते यश मिळवतील याची शास्वती आहे का.?आपण एकमेकांमध्ये स्पर्धा करतो मला एवढेच मार्क्स मिळाले ह्याला जास्त अस तस,परंतु ही खरी स्पर्धा नसून खरी स्पर्धा ही स्वतशी करावी.कालपेक्षा मी आज कसा स्वतःला आणखी सुधारू शकतो.
आपण भारतचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम ह्यांची कहाणी एकलीच असेल,त्यांना उड्डाण क्षेत्रात करिअर करायचे होते,परंतु ते अपयशी झाले आणि त्यांनी इंजनेरींग क्षेत्रात करियर केलं आणि पुढे आपल्याला राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास माहीतच आहे त्यांना अपयश आल्यावर त्यांची शक्ती कोणी जगवली तर एका साधूने समजवले तुझी निवड महान कार्यासाठी झाली असेल.कदाचित आपण प्रयत्न करूनही आपणास काही मिळत नसेल तर आपले क्षेत्र वेगळे असू शकते,आपल्याही जीवनात कधी वळण मिळू शकते सांगता येत नाही त्यामुळे निराश होण्याची गरज नाही,बदल करावा आपल्या पद्धतीत,कारण आपण जो मार्गाने अध्ययन करतो तो चुकीचा मार्ग असू शकतो म्हणून काही बदल करावा.आत्मपरीक्षण आणि ध्यान ह्यामार्गणे आपण स्वत:तली कौशल्ये जागवू शकतो आणि एका वेगळ्या प्रवासाची सुरवात करू शकतो सर्व एकाच मार्गाने जात आहेत म्हणून त्याचं मार्गाने मीपण जावे असे नाही,मार्ग छोटा असला तरीही चालेल पण स्वतः बनवलेला असावा.
आपण अभ्यास,मनोरंजन,आवड आणि परिवार ह्यांची योग्य सांगड घालून समतोल राखला पाहिजे,संयम राखल्यास सर्व गोष्टी होतात.असा नाही की एका खोलीत बसून खूप तासनतास साधना केली म्हणजे कोणी यशस्वी होत नसतो.त्यामुळे आपण आपल्या क्षमता ओळखून पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा.आपण आणखी एक चूक करू शकतो ती म्हणजे अयोग्य पुस्तकांची,क्लासेसची,शिकवणाऱ्या स्टाफची न पाहता,जाहिरातीला बळी पडून निवड करणे हे टाळून योग्यपणे निवडता आले पाहिजे कारण आजकाल अनेक ठिकाणी शिक्षणाला व्यवसायाचे वळण लागलेले आहे.आपले मित्रपरिवार चांगले असावेत त्याचापण सकारात्मक परिणाम होऊ शकतो आपल्या जीवनात.आपण नेहमी प्रेरित करण्याऱ्या,वेळोवेळी आपल्याला मदत करणाऱ्या लोकांच्या समूहात राहायला हवे.
विद्यार्थी अवस्थेत काही नकारात्मक कमी लेखणाऱ्या लोकांना तोंड द्यावे लागते.अश्या लोकांना जीवनात जेवढं टाळता येईल तेवढं भविष्यात हितकारकच.खाली खेचनाऱ्या,नकारात्मक लोकांपासून सावध रहा आणि अश्यालोकांच्या बोलण्याकडे लक्षच दयायचे नाही कारण घाणीत दगड टाकला तर घाण आपल्यावरच पडते.वेळेनुसार जग बदलत जाते.आपण काहीतरी करून दाखवले तर हेच लोक आपली वावा करतात.जेव्हा तुम्ही प्रगती करत पुढे चालाल तसे तुम्हाला खाली खेचणारे,जळणारे तयार होत जातील.जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ ते आधीच तुमच्या खाली आहेत हे लक्षात असूद्या.कसोटीच्या काळात स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा,अलिप्त राहून स्वतःला घडवावे.
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा..✍🏻😇

1 week, 4 days ago

अपेक्षा, स्वप्न🌸

खूप अपेक्षा असतात आपल्या आपल्या लाईफ कडून आपल्या करिअर बद्दल असो आपल्या रिलेशनशिप बद्दल असो सगळ्याच बाबतीत खूप अपेक्षा ठेवून जगत असतो आपण पण जेव्हा ती गोष्ट घडत नसते तेव्हा मात्र फार नैराश्य येत माहिती आहे या गोष्टी का ठरवून सांगून होत नसतात या घडायच्या असेल तर घडतात करिअरमध्ये असो की रिलेशनशिपमध्ये अपडाऊन फेस येत असतात पण आपण त्याला कोणत्या नजरेने पाहतोय कोणता दृष्टिकोन ठेवून पाहतोय हे महत्त्वाचं जसा आपण शिकलोय की खूप मेहनत करून यश मिळतं तसंच आपण हेही लक्षात ठेवायला हवं की आधीच अपेक्षा करून नंतर रडत बसण्यापेक्षा आधीच हुशार व्हा परिस्थिती सांभाळून घेण्याचं ध्येय मनात बाळगा जे काही होईल ते होईल आपण पाहून घेऊ आपण बघून घेऊ आपण त्यावर काहीतरी मार्ग काढू हे नेहमी लक्षात ठेवा पॉझिटिव्ह अॅप्रोच ठेवून सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात💯🌸
लेखन -अश्विनी पठाडे

1 week, 4 days ago

**रात्री माझं गाव विकताना पाहिलं

✍️"निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
मी माझं गाव विकताना पाहिलं

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
मी माझं गाव विकताना पाहिलं

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली

त्या वाहणा-या विषारी दारुत
आज माझं गावही वाहिलं,
मटनाच्या चुऱ्यापाई, पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहिलं.....!

आणि रात्री मी गांव माझं विकताना पाहिलं

कवी - स्वतः एक मतदार.....**

1 week, 4 days ago

प्रेम, आणि लग्न....
नक्की वाचा...
©️*®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️"एखाद्याच्या आपण प्रेमात पडलो त्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केल आणि त्याच्यासोबतच आपल लग्न व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते.. पण प्रेम ही वेगळी गोष्ट आहे आणि लग्न हा एक वेगळा विषय आहे प्रेम करायला दोघांची संमती हवी तर लग्न करायला सर्वांची संमती हवी. सर्वात महत्वाच म्हणजे आईवडील.. छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा लग्न मोडतात. एखाद्यासोबत लग्न झालं नाही म्हणून ते प्रेम टाइमपास होत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे..(अपवाद कधी कधी प्रेमाच्या नावाखाली टाइमपास होतो तो बंद झाला पाहिजे )प्रेम ही दोघांच्या मनातली एक सुंदर भावना होती. ती व्यक्त झाली, मान्यही झाली दोघांनीही एकमेकांना आपल मानलं तो जीवनातला एक सुंदर अनुभव होता.. आवडत्या व्यक्तीसोबत लग्न व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी प्रत्येकजणं प्रयत्नही करतो.. पण प्रयत्न करताना 100%यश मिळेलच याची गॅरंटी नसते..उद्या पाऊस पडेल याबद्दल आपण केवळ अंदाज सांगू शकतो. पाऊस पडण्याची 100%हमी देवू शकतं नाही..त्याप्रमाणे प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे लग्न झालं तर त्यातला आनंद वाढेल आणि नाही झालं तरी एक व्यक्ती म्हणून एक मित्र,एक जिवलग म्हणून एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करता येतं... ठरवलं तर फक्त या साऱ्या तडजोडी सुरवातलाच झाल्या पाहिजे..कोणत्याही मुलीला मी तुझ्यासोबतच लग्न करेल असं खोटं प्रॉमिस देण्यात अर्थ नाही उद्या जर ते पूर्ण करता आलं नाही तर आयुष्यभरासाठी आपण दोषी ठरू शकतो.. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही शब्द देण्यात अर्थ नसतो.कारण सगळं जरी आपल्या हातात असलं तरी परिस्थिती आपल्या हातात नसते.. मुलीवर जशी बंधन असतात तश्या काही जबाबदाऱ्या मुलावर पण असतात.. एखाद्या जबाबदार मुलाला आपल्या आईवडिलांना डावलून कोणताही निर्णय घेणं सोपं नाही.. आईवडील संमती देतं नाही म्हणून पळून जावून लग्न करणे ही पद्धत सुद्धा म्हणावी तितकी प्रभावी नाही..अश्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळते.. आईवडिलांना लोकांसमोर मान खाली घालावी लागते.. आणि आपल्यामुळे जर आईवडिलांना मान खाली घालावी लागतं असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे.. नंतर आईवडील तुम्हाला स्वीकारतील पण त्यांची जी इज्जत गेली ती परत मिळणार नाही.. म्हणून असे टोकाचे पाऊल उचलणं योग्य ठरत नाही.. जगात अश्या असंख्य love स्टोरी आहे की ज्यामध्ये प्रेम खूप आहे पण लग्न होवू शकतं नाही.. म्हणून अश्या लोकांनी प्रेम करणं सोडलेलं नाही.. परिस्थितीशी जुळवून घेत समोर आलेल्या परिस्थितीला समोर जावंच लागतं.. म्हणून असं प्रेम टाइमपास ठरत नाही.. तो एक अनुभव असतो.. जेणेकरून भविष्यात प्रेमाच्या बाबतीत आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आपल्याला घेता येते...आयुष्य हे असंच आहे मित्रांनो आपल्याला हवी ती प्रत्येकच गोष्ट आपली नसती.. आपली तीच बनते जी आपण प्राप्त करू शकलो.. ओंजळीत आपण पाणी पकडू शकतो पण ओंजळीतून खाली पडणाऱ्या पाण्याला आपण रोखू शकतं नाही.. त्यामुळे आपल तितकंच आहे जितकं आपल्या ओंजळीत आहे.. त्यामुळे आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा आणि जगणं सुंदर बनवा...!"
✍️लिखाण दि.8मे 2024
प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️लेखक संपर्क -:8806379959 *✍️टेलिग्राम ID -@ABCs1432 (टीप -कृपया हा लेख कुठेही लेखकांच नाव कट करून share करू नका..)**

2 weeks, 4 days ago
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
3 weeks ago

मी शुध्द हरपू पाहिली, चिंधड्या
चिंधड्या आयुष्याचे अवशेष आपल्या
आपण शुध्दीत कसे वेचणार, तुकडा
तुकडा सांधून

लत्करलेलं आयुष्य घ्यावं पांघरूण

या निर्मनुष्य गारठ्यात, म्हणून मी
वाचली पुस्तक, भळभळणाऱ्या
जखमांवर बांधल्या कवितेच्या ओळी
वाचली थोरामोठ्यांची चरित्रं काढली चित्र...

आयुष्याच्या गारठणाऱ्या कॅनव्हासावर
रक्तात बुडवून कुंचला, दारू प्यालो ,
भांग खाल्ली,

पण साली शुध्द हरपतच नाही...

नागराज मंजुळे 👏

3 weeks, 2 days ago

.....जीवनात इतरांना नावबोट ठेवण्यापूर्वी एकदा विचार करा...🎯

जीवनात कोणत्याही व्यक्तीचा एवढा जास्तच विरोध करू नये.वाईट वाटत भारतातील लोक भारतातील खेळाडूंनाच विरोध करतात.सर्व खेळाडू भारतीय आहेत आणि आपल्या देशासाठी खेळतात ही बाब लक्षात ठेवावी.एक व्यक्ती म्हणून आपल्याला कोणाचे विचार,कृती आवडत नसेल तोपर्यंत ठीक आहे परंतु असा खेळाडू जो भारताला एका allrounder ची गरज होती तेव्हा मिळाला,champion trophy मध्ये पाकिस्तान कडून लाजिरवाणी हार होताना वाचवली,खूपदा शेवटच्या षटकात सामने जिंकून दिले.कित्येकदा उत्तम झेल घेऊन महत्वपूर्ण सामने जिंकवले.खूपदा क्षेत्ररक्षण करताना injured झाला अश्या खेळाडूला छप्परी,कुत्रा जर मैदानात गेला तर त्याला त्या खेळाडूच्या नावाने ओरडले जाते,हे खूप लाजिरवाणे स्वतः भारतीयांसाठी.अरे पण जरा विचार करा त्याने आपल्या देशासाठी ह्या अगोदर काय केलंय,एका आरोप संपत नाहीत तोपर्यंत दुसरे आरोप काय परस्थिती होत असेल त्याचा विचार करा.
मान्य आहे त्या खेळाडूच्या चुका झाल्या असतील,तो आपल्या senior खेळाडूचा आदर करायला विसरला असेल पण एवढं त्याला troll करणे की स्वतः सारख्या काही महान खेळाडूंना आता हे थांबवा असे भर मैदानात सांगावे लागते.आपण संघासाठी सामना पाहत असतो व्यक्तितीक खेळाडूच्या कामगिरीसाठी नाही आणि तो संघाचा कर्णधार बनला ही त्याची चूक नाही आहे,टीम मॅनेजमेंट ची आहे.जर कोणाचे समर्थन केले ह्याचा अर्थ असा नाही की इतरांना विरोध केला जातो.
एक साधा विचार करा आपण जुन्या कंपनीत कामाला होतो जेव्हा नवीन कंपनीत जातो तेव्हा काही काळाने जुन्या कंपनीकडून आपल्याला ऑफर येते परत जॉइंनिगची आणि वरून जास्त पगार पण व मुख्य बनवलं पणं जाते त्या संघाचा आणि ती कंपनी खूपच नामिवंत आहे तर त्या ठिकाणी आपण काय केलं असत जुनीच कंपनी जॉईन केली असती ना है चुकीचं आहे मान्य आहे परंतु आपण काय केलं असत त्याचा पण विचार करा ना.
व्यकक्तिक खेळाडूला एवढे पण troll करण्याचा प्रयत्न करू नका,शेवटी तोपण एक माणूस आहे,जर तुम्हाला त्याचे वागणे पटत नसेल तर त्याला support नका करु.किमान भारतीय संघाल support करा.आयपीएल काही काळाने संपेल आगामी वर्ल्डकप येईल त्याचा विचार करा.जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा त्यातून बाहेर निघ्यन्यासाठी अश्याच अष्टपैलू खेळाडूची उणीव भाजते असे नाही की बाकीचे खेळाडू चांगले नाही आहेत परंतु आपण कोणत्याही भारतीय खेळाडूला ह्या स्तरापर्यंत विरोध करणे माणूस म्हणून चुकीचे वाटते सर्वांचा जीवनात मग तो कोणतही खेळाडू असो वाईट काळ येत असतो इतर नावबोट ठेवत असतात अश्या काळात भारतीय म्हणून आदर देणे गरजेचे आहे शेवटी चुका ह्या सर्वणाकडून होतात माणूस म्हणून त्यांना माफ करणे पुढे जाणे गरजेचे आहे.
.............🦋🌺😇💞..............
शब्दांकन -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...✍🏻😇

3 weeks, 6 days ago

निसर्ग वाचवा.... 🌿*🌿*🌿
( जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विशेष लेख...)
©️®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) 🌿
✍️"एक शेतकरी होता नदीच्या कडेला त्याच शेत होतं नदीला बरेच दिवस पाणी असायच. त्यामुळे शेतकऱ्यांला दोन पिकं सहज घेता येतं होते..नदीच्या कडेला पुष्कळ झाड होती.. ही झाड वादळ वाऱ्यापासून त्या शेताच संरक्षण करत होते..एकदा पावसाळ्यात शेतकऱ्यांने शेतात पिकं पेरलं.पिकं लवकरच मोठं झालं पिकं मोठं झाल्यावर नदीच्या तिरावर माकड येवून त्या उभ्या पिकात दुडघूस घालायला लागली.. उड्या मारायला लागली.. शेतकरी त्यांना रोज हाकलून देतं होता.. पण ही माकड रोज झाडावर बसून उड्या मारायचे शेतकऱ्यांने बघितलं की, या झाडावर माकड बसतात या झाडामुळेच ते आपल्या शेतात येतात आणि उड्या मारतात.. शेतकऱ्यांने ठरवलं की ही सगळी झाडाच तोडून टाकायची..त्या वर्षी उन्हाळ्यात त्याने JCB लावून सर्व झाड तोडून टाकली.. त्यामुळे नदीच्या कडेल एक पण झाड शिल्लक राहील नाही... पर्यायाने माकड येणं बंद झालं.. माकडाचा बंदोबस्त झाला पण त्या वर्षी पाऊसच पडला नाही.. केवळ सुसाट वारा सुटायचा. थोड्या उशिरा पाऊस पडला कस बस शेतकऱ्यांने शेत पेरलं पण.. शेतातील पिकं जस जस मोठं होतं होतं तस तस जोरात येणाऱ्या वाऱ्याने ते मोडून पडतं होतं.शेतकरी कंटाळला.. काय करावं सुचेना काही काळाने पाऊस पडणं कायमच बंद झालं.. आणि त्या शेतात शेतकऱ्यांला काहीच उत्त्पन्न मिळाल नाही.. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आणि तो कर्जबाजारी झाला...
सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की झाड, प्राणी, पक्षी ही आपली अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे त्यामुळे झाड तोडणं थांबवलं पाहिजे.. झाडे तोडल्यामुळे पाऊस पडला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली. आज तुम्ही शेती तयार करण्यासाठी झाड तोडता तर उद्या पाऊसच पडला नाही तर काय खाणार? झाडावर माकड बसतात म्हणून झाड तोडणं योग्य नाही.. आणि माकड तरी कुठे बसतील जे जंगल त्यांच घर होत ते जंगल तोडून माणसाने घर, रस्ते व शेती विकसित केली.त्यामुळे प्राण्याना निवाराच शिल्लक राहिला नाही...पर्यायाने वन्यजीव व मनुष्य संघर्ष सुरू झाला.. अलीकडच्या काळात अनेक गावात बिबट्या व वाघ, अस्वल सारखे प्राणी आल्याच्या बातम्या येतात.. कां येतं आहे हे प्राणी गावात..? तर जंगलच शिल्लक राहील नाही तर ते राहणार कुठे..?झाड तोडले, पर्वत सपाट करून शेती केली नद्या नाले दाबून त्यावर अतिक्रमण केल.. मग काय होणार..? प्रगती आणि विनाश ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहे.. एकीकडे प्रगती आहे तर दुसरीकडे प्रदूषण, विषारी रसायन नदीत व हवेत सोडली जातं आहे.. त्यामुळे कोणत्याही नदीच पाणी पिण्यास योग्य राहील नाही..पूर्वीला लोक नदीच पाणी पीत होते ते पाणी फिल्टर करावं लागतं नव्हतं.. पण आता कोणतंही पाणी फिल्टर केल्याशिवाय पिवू शकतं नाही.त्यामुळे कुठेतरी हे थांबवून पर्यावरण व निसर्ग वाचवण काळाची गरज आहे..22एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे त्यामुळे ही वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवे जल, जंगल,जमीन वाचवण्याचा संकल्प करून येणाऱ्या काळात झाडें लावा आणि जगवा.....!"
✍️लिखाण दी.22एप्रिल 2024 (जागतिक वसुंधरा दिवस )
प्रतिक्रिया नक्की कळवा....
✍️लेखक संपर्क -:8806379959 टेलिग्राम ID -:**@ABCs1432

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago