👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 day, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
(वेळ काढून पूर्ण वाचा,विराट प्रेरणादायक संघर्षगाथा मांडली आहे)
आज यशाच्या उंच शिखरावर पोहचलेले अनेक व्यक्ती दिसतात.आजच success जगाला दिसतो,परंतु कालचा संघर्ष कुणाला दिसत नाही😔.हे जगाचा नियमच आहे जग तुमच फक्त output पाहत असतं,त्यासाठी तुम्ही सोसलेल्या वेदना,यातना नाहीत😒.यशस्वी होण्याचा प्रवास हा काट्यानिंच भरलेला असतो मग तो प्रवास अंबानींचा असो की विराटचा जोपर्यंत संघर्षाच्या त्या वेदना आपल्याला जाणवत नाहीत तोपर्यंत स्वतःवर असणारा विश्वास आणि आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा अंदाजही येत नाही👍म्हणून कोणतेही परस्थिती असो,आपल्याला चुकीचं समजणारी,टीका करणारी,टोमणे मारणाऱ्या व्यक्ती ह्याकडे जास्त लक्ष दिले नाही तरच कुठे काहितरी मिळेल.
विराट कोहलीचाही संघर्ष हाही अतिशय कसोटीचा.वाईट दिवस पहिल्याशिवाय चांग्याल्या दिवसांची किंमत समजत नसते.अनुभव हाच मोठा गुरू आहे,आणि त्यातूनच शिकत विराट न डगमगता पुढे गेला म्हणूनच आजही विराटचे वेगवेगळे रेकॉर्डस् बनतात.2006 साली फक्त 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने खेळ सोडला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याने शतकी धावा केल्या.त्याच्या हे देश,संघाप्रती असलेल्या समर्पणाने त्याचे किती मजबूत व्यक्तिमत्व आहे,हे दाखवले.स्वतचं फिटनेस जपण्यासाठी तो आजही आवडीचे पदार्थ खाणे टाळतो ह्यावरून त्याचा त्याग दिसतो. क्रिकेटच्या क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.प्रत्येक वेदनादायक प्रवासाचा सुखदायक शेवट होतोच आणि त्याचे उदाहरण म्हणजे 👑 किंग कोहली..
.........🦋🌺✍🙏.........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻****
चुकलेच का माझे
मुत्युला सुख म्हणालो
चुकलेच का माझे
जखमांना जगणे म्हणालो
चुकलेच का माझे
आप्तेष्टांना घात आघात म्हणालो
चुकलेच का माझे
मारेकऱ्यांना यार म्हणालो
चुकलेच का माझे
मंदिरातल्या ईश्वराला दगड म्हणालो
चुकलेच का माझे
डाॅक्टर रूपी माणसांना देव म्हणालो
चुकलेच का माझे
प्रियशिला दगाबाज धोकेबाज म्हणालो
चुकलेच का माझे
माय बापाला श्वास म्हणालो
चुकलेच का माझे
जीवनाला बंदिशाळा म्हणालो
चुकलेच का माझे
अंत्य याञेला कौतुक म्हणालो
चुकलेच का माझे
काळजाला वेदनेचे बाजार म्हणालो
चुकलेच का माझे
मनाला शब्दांचे आगार म्हणालो
चुकलेच का माझे
विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
चकवा
पिकल्या नाहीत शिमग्याला बोरी बाभळी
घरं धुऊन गेल्यात अनामीक वावटळी
झोपडीच्या दारांवर हिरव्या पानांचं तोरणं
स्मशानात एकटंच जळतं राहतं सरणं
पाठमोऱ्या आकृत्यांचा भास छळत राहतो
रस्ता चुकला की मग चकवा लागतं असतो
भुताच्या सावल्या उरावर नाचायला लागतात
घरावरून तेव्हांच मग टिटव्या फिरतं राहतात
प्रत्येकाचीच नसते पाडवा दिवाळी पाहट
डोळे करोडेच दिसतात मात्र ओले असतात काठ
विकास सुखधाने
युवा साहित्यक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलढाणा
परीक्षा एक महिन्यावर आलीय. I hope you are gearing up.
आपण लवकरच एक लाइव्ह सेशन घेऊ. वेळ कळवतो.
तब तक लगे रहो👍
पुण्याई
अडाणी माय ची माझ्या
किती सांगू पुण्याई
मला शिकवून तिने
केली किती मोठी कमाई
तिच्या चरणाशी आहे
माझे विश्व सारे
तिच आहे माझी
ज्ञाणाई अन विठाई
काळाकृस देह तिचा
उन्हां,तान्हांत राबला
पै,पैका घामाचा तिने
माझ्या शिक्षणासाठी लावला
किती टोचले काटे तिच्या
अणवाणी पायला
तिच्यामुळे सुगंध आहे
आज माझ्या टायकोटाला
अठराविश्व दारिद्र्याच
वरदान लाभल होत
संकटांना आयुष्याच्या तिन
जात्यात दळल होत
तिच्या कष्ट जिद्दी पुढे
आभाळ ही झूकल होत
तिच्यापोटी जंन्म घेवून
माझ आयुष्य सार्थक झाल होत
विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा
साली आधी घरवाली...🤔
खूप ठिकाणी आजही हे वाक्य बोलल्या जात की साली आधी घरवाली असते... पण हे खरं आहे का बोलणारा बोलायचं म्हणून बोलून जातो पण कधी विचार करत नाही की त्या मुलीवर किंवा तिच्या बहिणीच्या नवऱ्यावर याचा काय परिणाम होत असेल...? अरे हे नात म्हणजे एक बापलेकीचं नात, एक भावाबहिणीचं नात असत भाऊजी ह्या शब्दातच एक बाप दडलेला असतो, एक भाऊ दडलेला असतो जो कायम बापासारखं, भावासारखा त्या मुलीच्या पाठीशी उभा असतो ती मुलगी त्या व्यक्तीला बापासामान मानत असते....मान्य आहे ती एक म्हण आहे आणी त्याप्रमाणे सगळे बोलता पण प्रत्येक नात त्याच प्रकारचं असत का...? तर नाही काही नात्यांना त्या गोष्टीची गरज नसते काही नाती खूप निर्मळ, स्वच्छ असतात त्यात आदर असतो, काळजी असते, आपलेपणाची भावना असते... नाही प्रेम म्हणणार नाही कारण जग अर्थ काय काढणार हे चांगलंच माहिती आहे... आजकाल मी एक भाऊ आहे आणी ती माझी बहीण आहे हे सिद्ध करुन द्यावं लागत हीच एक शोकांतिका आहे...😔 किती आपले ते विचार पडलेले आणी आपणही हे या वरूनच कळते, घरच्यांनी संस्कार दिले आहेत की माणूस फक्त पोसल्या गेलाय हे त्याच्या विचारावरूनच कळत... कोणीतरी म्हणलेलंच आहे एकवेळेस कपडे फाटके असतील तर चालेल पण विचार फाटके नको... तरीही प्रश्न तिथंच आहे काही म्हणी ह्या फक्त म्हणायच्या जरी असल्या तरी वास्तव्यात घ्यायच्या नसता पण लोकांची सवयच आहे ती समोर कितीही निर्मळ नात दिसलं तरी ते कलंकित आहे हे घोषित करून मोकळे होणार त्या नात्यातल्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा एक क्षणही विचार करत नाही... कधी सुटेल हा प्रश्न आणी कधी बदलतील लोकांचे हे विचार...? हा प्रश्न छोटा जरी वाटत असला तरी वास्तव्यात खूप मोठा आणी विचार करायला लावणारा आहे... असो आपण फक्त निर्मळ हेतू ठेवून प्रत्येक नात निभावायचं राहिला लोकांच्या विचारांचा प्रश्न तर ते बदलावे असं मला वाटत... सगळ्यांना हेच सांगणं आहे साली आधी घरवाली नसते तर ती एक मुलगी असते तिच्या त्या वडिलांची...🙏
(कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व...🙏)
✍प्रियंका भोसले...✍
इतरांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या, निष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या श्रीकृष्णाने लोकांच्या दूषणांची पर्वा केली नाही. ‘मोह न मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा, भोगी म्हणूनी उपहासा, मी योगी कर्माचा, माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा” असे म्हणत श्रीकृष्णाने सोळा सहस्त्र कन्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्याशी विवाह केला. “पराधीन ना समर्थ मी घेण्या वार कलांकाचा” असे धोरण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाने त्याच्या अवतारकार्यात अन्याय करणाऱ्यांना शासन करत गांजलेल्या दुःखी जीवांना दुःखातून मुक्ती दिली. त्यामुळे इतर काय म्हणतील याचा विचार न करता जे घडून गेले ते चांगलेच घडले, जे घडतेय ते चांगल्यासाठीच घडतेय आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहणे हा जीवनाचा उद्देश असायला हवा.....🚩****
जगण्याचे राहून गेले
भाकरीच्या पुढे जगण्याचे राहून गेले
वय कोवळे उन्हातं राबताना भाजून गेले
कशाला देतोस मला तू दाखले हे जीवनाचे
जबाबदारी ,मजबुरीने आहे मला दत्तक घेतले
मला ही आला होता मोहर तारूण्याचा
गरिबीवर माझ्या नव्हते कुणीच भाळले
माझी कविता जाते रोज घरी त्यांच्या
माझाच गळा दाबून मी होते गीतं गायले
नाही म्हणत मी मला कधीचं शायर युगाचा
भावनांचे शब्दं आहेत हे काळजात साठलेले
विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 day, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago