विशाल सुतार -मराठी

Description
स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा.
@vishalsutar

ऑफिस संपर्क -7875757252
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago

1 month, 4 weeks ago
1 month, 4 weeks ago

भावकर्तुक क्रियापदे –

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना ‘भावकर्तृक क्रियापद’ असे म्हणतात.

उदा.

मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.

पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळते.

पुण्यात जातांना कात्रज जवळ उजाडले.

आज दिवसभर सारखे गडगडते.

अशा क्रियापदांना कर्त्याची आणि कर्माची गरज नसते.
म्हणून अशा क्रियापदाला अकर्तुक क्रियापद म्हणतात.

1 month, 4 weeks ago
2 months ago

संकर प्रयोग....

कर्तू कर्म व कर्तुभाव या दोन्हीही प्रयोगातील कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो.

कर्मभाव या संकर प्रयोगातील कर्ता हा तृतीय पुरुषी असतो.

2 months ago
2 months ago

यमक:-

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा:
जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ

पुष्ययमक-

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो

दामयमक-

आला वसंत कविकोकिल हाही आला
आला पितो सुचवितो अरुणोदयाला.

2 months ago

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI - बार्टी )द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा 'गट ब व क' प्रशिक्षणाकरिता यावर्षी बार्टी संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.

संस्था विकल्प निवडण्याचा पर्याय लिंक द्वारे उपलब्ध झाला आहे.
उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे चा प्रथम पसंती क्रमांकासाठी पर्याय आपण नक्की निवडाल अशी आशा आहे.
आपल्याला अपेक्षित आणि दर्जेदार शिक्षण रयत च्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल याची आम्ही खात्री देत आहोत.

👉🏻लिंक - https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin

अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा..
9762131361 / 8484920407

आपलाच,
विशाल सुतार
रयत सेवक 🙏🙏

2 months, 1 week ago

रयतची निवड करण्यापूर्वी हॆ गांभीर्याने वाचा 🙏🙏

नमस्कार,
या वर्षी प्रथमच रयत प्रबोधिनीची निवड खालील संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या गट 'ब' आणि गट 'क' प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली आहे.

1)TRTI - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे.
2)BARTI - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
3)SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण संस्था पुणे.

वरील संस्थांच्या माध्यमातून चाळणी परीक्षा घेऊन जे विद्यार्थी निवडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांना  प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प देण्यात आले आहेत.
रयत प्रबोधिनीची निवड करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्ष्यात घ्याव्यात-
1) हजेरी बाबत वरील संस्थानी घालून दिलेले निकष काटेकोरपणे पाळले जातील.
(ऑफलाईन/ऑनलाईन
अशी ती संस्था हजेरीस जशी मान्यता देईल तोच नियम 100% अंमलात आणला जाईल )

2) अभ्यासक्रम कालावधी 6 महिने इतका देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करताना आयोगाच्या परीक्षेच्या तारखेनुसारच पूर्व / अथवा मुख्यचा अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केले जाईल त्याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कारण या प्रशिक्षनाचा अंतिम उद्देश तुम्हला पद मिळताना मदत होणे हाच आहे.या दरम्यान प्रशिक्षण कालावधी संपला तरी अतिरिक्त वेळ बसून आपण सगळे मिळून अभ्यासक्रम पुर्ण करणार आहोत.

3) रयतमध्ये ज्या पद्धतीने Integrated / Super 60 Batches मध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच पद्धतीने तो होईल, त्याचनुसार टेस्ट, Test series, अभ्यास आढावा पार पडेल.
या मध्ये कोणताही Excuse ऐकून घेतला जाणार नाही व आपले Record जसे असेल तश्याच पद्धतीने ते वरील संस्थाना दिले जाईल..
या मध्ये ओळख,फोन, सेटिंग असला काहीही प्रक्रार केला जाणार नाही.

4) वैयक्तिक अडचणीमुळे Online च्या माध्यमातून शिकू  इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचणीची खतरजमा करुनच वरील संस्थांना तसेच कळवले जाईल आणि त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी देखील Record करून जमा केली जाईल.

( अपवादात्मक स्थितीमध्ये ऑनलाईन करण्याचा पर्याय संस्थानी दिलेला आहे )

5) रयतला हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ गट 'ब' आणि गट 'क' यासाठी दिला गेला असल्याने आणि रयत केवळ याच Domain मध्ये काम करत असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेच प्रशिक्षण दिले जाईल.
( UPSC /राज्यसेवा /इतर परीक्षा देतो त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचे आहे असे कळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो Issue मूळ संस्थेसोबत चर्चा करावा आहि विनंती राहील )

6) ताकदीने शिकवणे आणि अभ्यास करून घेणे याबाबत आम्ही आजवर जसे काम करत आहोत तसेच याही वेळी होईल विद्यार्थ्यांनी ताकदीने अभ्यास करणे अपेक्षित आहे.

6) आपल्या पालकांचे ग्रुप तयार करून आपल्या अभ्यासाची प्रगती त्यांनाही वेळोवेळी कळवली जाईल.

7) Batch दरम्यान गैरशिस्त,अनियमितता , अभ्यासातील अप्रामाणिकपणा या बाबी गांभीर्याने पहिल्या जातील.

8) रयत प्रबोधिनीकडून प्रशिक्षण कालावधीत अभ्यास, शिस्त, नियमपालन याबाबत कोणतीही गोष्ट 'adjustment' म्हणून केली जाणार नाही.याची रयत प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो.

9) हॆ प्रशिक्षण रयत प्रबोधिनी याच नावाने आणि रयतच्याच सर्व अध्यापकांमार्फत पुर्ण केले जाणार आहे.

वरील सर्व गोष्टी गांभीर्याने वाचून, समजून घेऊनच विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनी,पुणेचा पर्याय निवडावा ही विनंती.. 🙏

छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतिशील वंदन या उपक्रमामार्फत रयतला करता येणार आहेत व या उपक्रमात आमची निवड झाली हॆ आम्ही आमचे भाग्य समजतो. वंचित, मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणत शासकीय सेवेत घेऊन जाण्याचा वरील संस्थाचा हेतू रयत च्या माध्यामातून नक्की पुर्ण होईल याची मी खात्री देतो..

ही scholorship तुमच्या अभ्यासाला मदत करून तुमचा आर्थिक ताण कमी करत योग्य मार्गानी आणि योग्य दिशेने तुमचे उद्दिष्ट गाठावे या उद्देशाने देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांनी हॆ लक्षात घेऊनच संस्था निवडावी.

ही विनंती..

आपलाच
विशाल सुतार,
रयत सेवक.

🙏🙏

2 months, 1 week ago
विशाल सुतार -मराठी
2 months, 1 week ago
आज दसरा..

आज दसरा..

श्रीक्षेत्र भगवानगडाचा 73 वा वर्धापनदिन,आजच्या दिवशी 'रयत शिष्यवृत्ती' घोषित करताना अधिक आनंद होत आहे.
श्रीक्षेत्र भगवानगड आणि आई फौंडेशन ,शिक्रापूर या दोन्ही ठिकाणासाठी पुढील 1 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना प्रवेश दिला जाणार आहे.

मुख्य परीक्षा, मुलाखत दिलेले आणि अंतिम गुणवत्ता यादीतुन काही गुण कमी असल्याने, यशस्वी न होऊ शकलेल्या,एकूण 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
ही शिष्यवृत्ती निवासी असणार आहे.विध्यार्थ्यांना कोचिंग, अभ्यास साहित्य संपूर्ण मोफत असणार आहे.

रयत शिष्यवृत्तीचा अर्ज गूगल फॉर्म च्या माध्यमातून सोबत देत आहोत.इच्छुक आणि गरजवंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज व्यवस्थितपणे भरावा..

https://forms.gle/U5Ajjn9KUMjCP5hFA

ही प्रक्रिया 22 ऑक्टोबरपर्यंत सुरु असणार आहे.

वरील अर्हताप्राप्त असणाऱ्या, गरजवंत विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा..

धन्यवाद.. 🙏🙏

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago