कृषिक अँप Krushik app

Description
Krushik app
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 days, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

4 months, 1 week ago

हळद बाजारभाव
दिनांक:- १५ जुलै (कृषी उत्पन्न बाजार समिती,वसमत)
https://www.facebook.com/share/r/xBEsCYeZpqqvH9Ad/

Facebook

Log in or sign up to view

See posts, photos and more on Facebook.

8 months, 2 weeks ago

फूल बाजारात फुलांची आवक चांगली झाली. मात्र, तुलनेने मागणी कमी आहे. परिणामी गेल्या आठवड्यातील भाव स्थिरच असल्याचे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ९०-१२०, अ‍ॅष्टर : जुडी २०- ३०, सुट्टा १५०-२००, कापरी : २०-४०, शेवंती : ८०-१२०, (गड्डीचे भाव)
गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, आॅर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : १००-२००.

मोफत पीकनिहाय बाजारभाव माहितीसाठी कृषिक अॅप च व्हाटअसप चॅनल नक्की जॉइन करा ?
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A

WhatsApp.com

Krushik App | WhatsApp Channel

Krushik App WhatsApp Channel. कृषिक शेतकरी आधुनिक शेतकरी. 1.8K followers

फूल बाजारात फुलांची आवक चांगली झाली. मात्र, तुलनेने मागणी कमी आहे. परिणामी गेल्या आठवड्यातील भाव स्थिरच असल्याचे फुलांचे व्यापारी सागर …
8 months, 2 weeks ago

पुणे : शेतमाल बाजारभाव वृत्तांकन

दिनांक : 11-March-24
सौजन्य : अॅग्रोवन
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी काकडी, कोबी, शिमला मिरची आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली असून शेवग्याच्या भावात मात्र घट झाली आहे. इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता.१०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक इतकी फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १० ते १२ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून ४ ते ५ ट्रक मटार, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे १२ ते १३ टेम्पो, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ३००बॉक्स इतकीआवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सुमारे ८ ते ९ हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, घेवडा ४ ते ५ टेम्पो, कांदा सुमारे १५० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा :१३०-१७०, बटाटा : १५०-२२०, लसूण : ७००-१३००, आले सातारी : ९५०-१०००, भेंडी : ३००-५००, गवार : गावरान ५००-६००, टोमॅटो : १३०-१८०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ४५०-६००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : १५०-२००, वांगी : १५०-३००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ५५०-६००, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : २००-२५०, शेवगा : २५०-३००, गाजर : १२०-१४०, वालवर : २५०-३००, बीट : १४०-१६०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ७००-८००, मटार : ४००-६००, पावटा : ४००-५००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण :१८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
कोथींबीर, शेपू, कांदापात, करडईच्या भावात वाढ
मार्केटयार्डात रविवारी (ता. १०) कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात, करडई, पुदीना, चुका आणि अंबाडीच्या भावात वाढ झाली असून मेथी, चाकवत, मुळे, राजगिरा, चवळई, पालक आणि हरभरागड्डीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिरीची सव्वा लाख जुडी तर मेथीची ७० हजार जुडींची आणि हरभरागड्डीची सहा हजार गड्डींची आवक झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात गड्डीमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच शेपू, कांदापात आणि पुदीनाच्या भावात प्रत्येकी दोन रुपये, करडई, अंबाडी आणि चुक्याच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ६००-८००, शेपू : ४००-८००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-७००, पुदीना : ४००-७००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ४००-१०००, राजगिरा : ४००-७००, चुका : ४००-७००, चवळई : ३००-७००, पालक : ८००-१५००, हरभरा गड्डी : ८००-१५००.
कलिंगड, पपई महागली
फळबाजारात कलिंगड आणि पपईच्या भावात वाढ झाली असून खरबुजाच्या भावात घट झाली आहे. लिंबू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिक्कू आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी
दिली. केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी ४० ते ५० टन, संत्रा ४० ते ५० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते दीड हजार गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१७००, अननस (१ डझन) : १००- ६००, मोसंबी : (३ डझन): १००- २२०, (४ डझन) : २०-८०, संत्रा : (१० किलो) : १५०-५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०, कलिंगड : १०-२२, खरबूज : १५-३५, पपई : १०-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-५००. पेरू (२० किलो) : ३००-४००.
फुलांना मागणी घटली

10 months, 3 weeks ago

पूर्वहंगामी ऊस पिक सल्ला ??
मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी
ऊस पिकासाठी जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे, तेवढीच सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा अवश्यकता असते. मल्टी मॅक्रोन्यूट्रीयंट (नत्र ८ %, स्फुरद ८ %, पालाश ८ %) आणि मल्टी मायक्रोन्यूट्रीयंट (ग्रेड-II : फेरस २.५ %, मँगेनीज १ %, झिंक ३ %, कॉपर १ %, मॉलीब्डेनम ०.१ %, बोरॉन ०.५ %) या द्रवरूप खतांची एकरी प्रत्येकी २ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि ३ लिटर प्रति ३०० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ होते.
खोडवा ऊस पिक सल्ला ??
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
ऊस तोडणी केल्यानंतर नवीन येणारे फुटवे पिवळे किंवा केवडा पडल्यासारखे दिसतात अशा ठिकाणी माती परिक्षण करावे. त्यानुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असल्यास एकरी ८ किलो झिंक सल्फेट, १० किलो फेरस सल्फेट, ४ किलो मँगेनीज सल्फेट आणि २ किलो बोरॅक्स ही खते वापरावीत.

?? कृषिक प्रदर्शन २०२४ नोंदणी ??
त्वरित आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरून(कृषिक अॅप) करून घ्यावी. ??
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US

Google Play

Krushik/कृषिक – Apps on Google Play

Weather forecast: Next 7 days taluka level weather forecast

*पूर्वहंगामी ऊस पिक सल्ला* ***?******?***
10 months, 3 weeks ago
10 months, 3 weeks ago

?? ??????? ???? ??

कृषिक २०२४- नोंदणी विशेष सवलत ✍?
प्रात्यक्षिक आधारित भव्य कृषी प्रदर्शन
प्रती व्यक्ती प्रती दिवस शुल्क रु. ६० (कृषिक अॅपद्वारे नोंदणीवर रु. २० सवलतीसह शुक्ल रु ४०)
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती आयोजित “कृषिक २०२४- प्रात्यक्षिक आधारित भव्य कृषी प्रदर्शन ” दि. १८ ते २२ जानेवारी २०२४
ठिकाण : कृषी विज्ञान केंद्र बारामती, पोस्ट : माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र ४१३११५

?? कृषिक प्रदर्शन २०२४ नोंदणी ??
त्वरित आपली नोंदणी पुढे दिलेल्या लिंक वरून करून घ्यावी. ??
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US

Google Play

Krushik/कृषिक – Apps on Google Play

Weather forecast: Next 7 days taluka level weather forecast

***?******?*** ??????? ???? ***?******?***
1 year ago

राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच ‘इतक्या’ हजारांची मदत! वाढीव मंडळांना फक्त ८ सवलती, आर्थिक मदत नाहीच

सौजन्य : सकाळ
दिनांक : 21-Nov-23
पावसाळ्यात सरासरीपेक्षा ५० ते ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. या पार्श्वभूमीवर ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. मात्र, वाढीव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना केवळ सवलतीच मिळणार असून आर्थिक मदत परवडणारी नसल्याने त्या ४० तालुक्यातील शेतकऱ्यांनाच अर्थसहाय मिळेल, असे मदत व पुनवर्सन विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.राज्यातील १० जिल्ह्यांमधील ३५५ गावे आणि ९५९ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी ३७७ टॅंकर सुरु झाले आहेत. धरणे व मध्यम- लघू प्रकल्प साठ्यातील पाणीसाठी देखील झपाट्याने कमी होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जाणवू लागला आहे. पावसाअभावी खरीप वाया गेला, परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही कमीच झाल्याची वस्तुस्थिती आहे. सॅटेलाईट सर्व्हेत राज्यातील काही तालुक्यांमध्येच दुष्काळी स्थिती असल्याचे नमूद झाले. परंतु, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत एक हजार २१ महसूल मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर झाला.
मात्र, ४० तालुक्यांनाच दुष्काळी सवलतीसह आर्थिक मदत मिळणार आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव येतील. त्यानंतर तेथून संबंधित ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मदत वितरीत करण्याचा निर्णय अपेक्षित आहे. पण, मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यास वाढलेल्या महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
‘एसडीआरएफ’अंतर्गत राज्य सरकारने सात हजार कोटींची तरतूद यापूर्वीच केली असून त्यातून ही मदत वितरीत होईल. मदतीसाठी केंद्र सरकारकडेही ‘एनडीआरएफ’मधून मदत मागणीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
दुष्काळग्रस्तांसाठी ‘या’ ८ सवलती
- शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट
- शेतकऱ्यांकडील पीक कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती
- कृषीपंपाच्या चालू विजबिलाबात ३३.५ टक्के सूट
- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता
- आवश्यक त्या गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे
- ‘महावितरण’ने शेतीपंपाची वीज जोडणी खंडीत करू नये

खरीप व रब्बी पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅपच्या व्हाटअसप चॅनेल खालील लिंक वरून जॉइन करा ??????
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A

WhatsApp.com

Krushik App | WhatsApp Channel

Krushik App WhatsApp Channel. कृषिक शेतकरी आधुनिक शेतकरी. 1.8K followers

**राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच ‘इतक्या’ हजारांची मदत! वाढीव मंडळांना फक्त ८ सवलती, आर्थिक मदत नाहीच**
1 year ago

गहू पिक सल्ला
खपली गहू लागवड
खपली गव्हास साधारण १०-२३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. तापमान थोडे वाढले तरी खपली गहू ते सहन करू शकतो. तसेच पाण्याचा ताणदेखील सहन करू शकते. खपली गहू काळ्या, कसदार जमिनीत चांगला येतो. चांगल्या निचर्‍याच्या जमिनीची निवड करावी. मातीचा सामू ६-८ दरम्यान असावा. खरिपाचे पीक निघाल्यावर जमिनीची चांगली मशागत करावी. उन्हाळ्यात शेणखत टाकले नसल्यास एकरी ४ टन शेणखत मिसळावे. २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद, १६ किलो पालाश पेरताना द्यावे. उर्वरित २४ किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे. बियाणे म्हणून वापरताना खपली गहू टरफलासहीत वापरला जातो. एक एकर पेरणीसाठी ४० किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी १६ ते २० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया गुळाच्या द्रावणाबरोबर करावी. बियाणे सावलीमध्ये सुकवून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींत २० सें.मी. अंतर ठेवून पाभरीने किंवा पेरणी यंत्राच्या साह्याने एकसारखे बी पडेल याची दक्षता घ्यावी. शक्‍यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सें.मी. खोल करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता एकेरी करावी.
सुधारित जाती
आघारकर संशोधन संस्था, पुणे: एमएसीएस-२९७१
धारवाड कृषी विद्यापीठ, कर्नाटक: डीडीके-१०२५, डीडीके-१०२९
प्रादेशिक संशोधन केंद्र, वेलिंग्टन, तामिळनाडू: एचडब्लू-१०९८
हरभरा पिक सल्ला
बी.बी.एफ. पद्धतीने लागवड
रब्बी हंगामामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी या हंगामात हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.
?हरभरा लागवड पद्धती
?चार ओळी, ३० सें.मी. अंतर
एका वरंब्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी (३० सें.मी. अंतरावर) घ्यावयाच्या असल्यास, सरी घेण्यासाठीच्या खुणा म्हणजेच फाळातील अंतर १५० सें.मी. ठेवावे. ट्रॅक्‍टरचलीत बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. यामुळे १२० सें.मी. अंतराचा रुंद वरंबा तयार होतो. त्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी ३० सें.मी. अंतरावर बसतात. दोन्ही बाजूच्या सर्‍या ३० सें.मी. रुंदीच्या पडतात.
?तीन ओळी, ३० सें.मी. अंतर
एका वरंब्यावर ३० सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घेताना, ९० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा लागतो. त्यात जमिनीच्या प्रकारानुसार दोन्ही बाजूच्या सर्‍या ३० सें.मी. रुंदीच्या मिळू शकतात. त्यासाठी दोन फाळातील अंतर १२० सें.मी. ठेवून, बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर ठेऊन चालवावे लागते. सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूच्या सर्‍या या गरजेनुसार ३० सें.मी. किंवा कमी-जास्त रुंदीच्या मिळू शकतात.
?तीन ओळी, ४५ सें.मी. अंतर
एका वरंब्यावर ४५ सें.मी. अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घ्यावयाच्या असल्यास, १३५ सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा. त्यासाठी दोन फाळातील अंतर १८० सें.मी. ठेवून बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. दोन्ही बाजूच्या सर्‍या या ४५ सें.मी. रुंदीच्या पडतात. त्यांची रुंदी कमी-जास्त करता येते.

खरीप व रब्बी पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅपच्या व्हाटअसप चॅनेल खालील लिंक वरून जॉइन करा ??????
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A

WhatsApp.com

Krushik App | WhatsApp Channel

Krushik App WhatsApp Channel. कृषिक शेतकरी आधुनिक शेतकरी. 1.8K followers

*गहू पिक सल्ला*
1 year ago

दुष्काळी तालुक्यांसाठी केंद्राकडे मागणार मदत

सौजन्य : पुढारी
दिनांक : 08-Nov-23
यंदा राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधीच्या निकषानुसार 40 तालुक्यांत दुष्काळ जाहिर केला आहे. या भागातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने 3 हजार कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. तत्पूर्वी, उद्या बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या 40 तालुक्यांपैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे असून, दुष्काळामध्येही सरकार राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. एनडीआरएच्या निकषामुळे या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात दुष्काळ जाहीर करायचा झाल्यास पर्जन्यमान कमी झालेली गावे विभागीय महसुली मंडलनिहाय निवडण्याची शक्यता असून त्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात येणार आहे.

खरीप व रब्बी पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला,बाजारभाव व मार्गदर्शनासाठी कृषिक अॅपच्या व्हाटअसप चॅनेल खालील लिंक वरून जॉइन करा
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A

WhatsApp.com

Krushik App | WhatsApp Channel

Krushik App WhatsApp Channel. कृषिक शेतकरी आधुनिक शेतकरी. 1.8K followers

**दुष्काळी तालुक्यांसाठी केंद्राकडे मागणार मदत**
1 year ago

दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार!

सौजन्य : पुढारी
दिनांक : 06-Nov-23
खरीप हंगाम २०२३ करिता राज्यातील ४० तालुक्यांत सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता इतर जिल्ह्यांतही दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यवाही करत आहे.सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित तालुक्यांतील मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमतरता विचारात घेतली जाणार आहे. याशिवाय आवश्यक निकष निश्चित करून या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. या विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही मंत्रिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.राज्य सरकारने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, भूजलाची कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या घटकांचा विचार करून १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांमध्ये गंभीर व १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. आता केंद्र शासनाच्या निकषात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात कमी पाऊस पडला आहे त्याचा विचार करण्यात येणार आहे, असेही मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

आजच पुढे दिलेल्या लिंक वरून /गुगल प्ले स्टोअरवरून कृषिक अॅप अपडेट/ डाऊनलोड करून मोफत सेवेचा लाभ घ्या?? ????
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en

Google Play

Krushik/कृषिक - Apps on Google Play

Weather forecast: Next 7 days taluka level weather forecast

**दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार!**
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 days, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago