Niranjan's Blog☘️

Description
Personal blog of Niranjan Kadam, Asst. Commissioner of State Tax(GST)


#जगणं

https://www.niranjanblog.in

Initiative for Financial Awareness👉 @arthyog2024
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago

1 month ago

*Success isn’t handed to you, it’s earned through relentless effort.

No matter how difficult it seems, every hour you invest in your growth is one step closer to your dreams.

Stay disciplined, wake up early, and build the future you’ve always wanted.

The grind leads to greatness.*

1 month ago

"The three big decisions - what you do, where you live, and who you’re with."

Naval Ravikant

1 month, 1 week ago

मर मर मेहनत करून, कष्ट करून टिकून रहायचं असतं आपल्याला ते मुळात का आणि कुठून येत असेल ही ऊर्जा.. कितीतरी वेळा, पुनःपुन्हा अपयश हाती येऊनही एवढंच काय तर सगळं सोडून द्यावं असं वाटूनही आपण सोडून देत नाही.. टिकून राहतो.. उलट अधिक जोमाने पुन्हा उभारी घेतो.. हा आपला चिरंतन स्वभावगुण आहे. सर्व्हायवल ही अगदी बेसिकपण कमालीची चिवट गोष्ट आहे.. सारं काही समष्टीसाठी असतं की नाही माहिती नाही परंतू "सारं काही सर्व्हायवलसाठी" नक्कीच असतं.. टिकून राहणं ही काही फक्त एखाद्या परीक्षेपुरती किंवा स्पर्धेपुरती मर्यादित गोष्ट नाहीये तर ती खरंतर एक लाईफ फिलॉसॉफी आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं पाहिलं तर या जगात मेहनत कुणालाच सुटली नाहीये.. अगदी गडगंज श्रीमंत असलेल्यांनाही काही ना काही प्रकारची मेहनत असेलच की.. पण त्यांचं राहू देत बाजूला.. आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला मेहनत कधीच सुटली नाही... आणि हो ती पुढेही सुटणार नाही.. होय तुम्ही अधिकारी होण्याचं स्वप्नं पहात असाल तर एक अधिकारी म्हणून अनुभवातून सांगतो.. अधिकारी झाल्याने मेहनत सुटत नाही तर ती अधिक वाढते.. तुम्ही अधिकाधिक व्यस्त होता.. कमालीचा ताणतणाव तुमच्या आयुष्यात ठाण मांडून बसतो.. रोज नवनवीन समस्या तुमच्या समोर उभ्या ठाकतात.. असं बरंच काही असतं.. पण तरीही ती मेहनत worth म्हणावी अशी असते.. कारण त्यातून आपल्या ज्ञानाच्या, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक क्षमतांच्या कक्षा रूंदावतात.. नवनवीन गोष्टी कळताय, शिकायला मिळतात... अधिकारी होणं म्हणजे मेहनत सुटणं नाही तर अधिकारी होणं म्हणजे एका चांगल्या स्तरावर पोहोचून मेहनत घेणं हाच काय तो एक अर्थ यात सापडतो त्यामुळे अधिकारी होण्याच्या प्रक्रियेत मेहनत घेताना कुचराई करायची नाही.. सारं काही सर्व्हायवलसाठी म्हणत टिकून रहायचं🙌

#जगण

5 months ago

जगण्याची धावपळ की धावपळ हेच जगणं हाच एक सवाल आहे......!

5 months, 1 week ago
5 months, 1 week ago

नमस्कार,

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका अभ्यासिकेत आग लागली होती त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अभ्यास साहित्याचे नुकसान झाले होते. यासाठी वयक्तिक स्तरावर थोडी मदत करण्याचा मी प्रयत्न केला. या मदतीच्या कार्यात प्राची भुतकर मॅडम यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यासाठी त्यांचे तसेच त्यांच्या कामात सहभागी सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार. या माध्यमातून 30+ लोकांना मदत केली गेली आहे. आता हे मदत कार्य आपण थांबवत आहोत.
सर्वांचे पुनश्च धन्यवाद?

8 months ago

(#Forwarded)
एखादयाला आयुष्य वर्थ लिव्हिंग न वाटनं यात काही आश्चर्यकारक नाही. वाटू शकतं. त्याला फूटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्यांचे दाखले देऊन आपण किती प्रिव्हिलेज आहो हे सांगण्यातही काही अर्थ नाही. ठराविक टप्प्यानंतर असल्या मोटिव्हेशनचा फोलपणा लक्षात आलेला असतो. खरंतर दिवसातले चोवीस तास आणि हप्त्यातले सात दिवस आयुष्य कुणालाच वर्थ लिव्हींग वाटत नसतं. आपण ही काय करतोय ही फिलिंग एखादया ऑफिस क्लर्क पासून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पर्यंत कुणालाही कुठेही गाठू शकते. Existential crisis पासून कुणाचीच सुटका नाही. एवढं सगळं असूनही लोकं आत्महत्या करत नाही. अगदी टोकाला जाऊन मागं फिरतात. कारण त्यांच्या आयुष्यात मागे खेचनारं काहीतरी शिल्लक असतं. भलेही त्यांनी ते कबूल करो वा ना करो. वरकरणी कितीही कोरडं भासलं तरी आपल्या आयुष्यात कुठेतरी ओल शिल्लक आहे हे नेणिवेच्या पातळीवर की असेना आपल्याला माहीत असतं. प्रत्येकाने आपापल्या आनंदाच्या जागा निवडलेल्या असतात. तिथं सुकून असतो. सभोवतालचा विसर फक्त दारूच पाडू शकते असं नाही. ती नशा कशातही असू शकते. अगदी कशातही. कुमार सानूचं गाणं, एखादया मित्रासोबतच्या गप्पा, नदीच्या घाट. अगदी काहीही. माणूस फक्त तेव्हढेच क्षण जगतो, बाकी एरव्ही तो फक्त जिवंत असतो. पण हे क्षण अनुभवण्यासाठी जिवंत राहणं गरजेचंय. म्हणून वाटेत हजार मरण्याची कारणं असली तरी माणूस ह्या जगण्याच्या चार क्षणांसाठी चालत राहतो. हा सौदा परवडतो म्हणून आपण निवडलेला असतो. नाहीतर सारं जग आत्महत्या करून मोकळं झालं असतं. त्यामुळे ह्या जगण्याच्या जागा शोधल्या पाहिजे. त्या टोकाच्या क्षणी मागे फिरण्याची कारनं वाढवली पाहिजे. जॉब, पैसा, जबाबदाऱ्या या खूप उपऱ्या प्रेरणा आहे. त्यांच्या आधारे आयुष्य कडेला जाणं कठीण आहे. मागे एक मिम बघितला. त्यात थ्री इडियटच्या टेम्प्लेट खाली लिहलं होतं. ‘’अटेंडन्स की चिंता मत करो, क्लास मे कोई क्रश बनाओ अटेंडन्स अपने आप बढे जायेगी’’. आयुष्य लंबी शाळा घेणारं आहे, तिथं बोर व्हायचं नसेल तर आपण आपल्या क्रश शोधल्या पाहिजे. या प्रवासाचा सौदा परवडेल अशा मुक्कामाच्या जागा शोधल्या पाहिजे.

(#Forwarded)

8 months ago

प्रयास सेवांकुर, अमरावती व नयी तालीम समिती, सेवाग्राम, द्वारा 2016 नंतर सेवाग्राम परिसरात प्रथमच होत आहे, तीन दिवसांचे निवासी राज्यस्तरीय सेवांकुर प्रेरणा शिबिर. शिबिरार्थींची अपेक्षित संख्या 250 (संपूर्ण राज्यातून, किमान २०-२२ जिल्ह्यांमधील) (ज्यांना…

8 months ago

? काही आवडलेल्या पुस्तकांची यादी

द अल्केमिस्ट-पाऊलो कोईल्लो

भालचंद्र नेमाडे- कोसला, बिढार, हूल, जरीला, झूल, हिंदू

वि.स.खांडेकर यांच्या
विविध कादंबऱ्या विशेषतः ययाती आणि अमृतवेल

रवि आमले यांची पुस्तके

जी.ए.कुलकर्णी यांचे विविध कथासंग्रह

अनिल अवचट- प्रश्न आणि प्रश्न, आणखी काही प्रश्न

भुरा-प्रा.शरद बावीस्कर

रस-अनौरस- राजन खान

Unposted letters- Mahatria Ra

अरूण साधू- सिंहासन, मुंबई दिनांक

10 months, 3 weeks ago

"The edge is in the inputs.
The person who consumes from better sources, gets better thoughts. The person who asks better questions, gets better answers. The person who builds better habits, gets better results.
It's not the outcomes. It's the inputs."

~James Clear

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago