जय बाबाजी डेली न्यूज चैनल

Description
आश्रमातर्फे प्रसारित चैनल
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

1 month, 2 weeks ago

मैत्रेय म्हणाले - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशी आज्ञा केली, तेव्हा रुद्राने ‘फारच चांगले’ असे म्हणून आज्ञा शिरसावंद्य मानली आणि त्यांची अनुमती घेऊन, त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. (२०)
यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला, तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष, आणि दहावे नारद अशी त्यांची नावे होत. यांपैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष आंगठ्यापासून, वसिष्ठ प्राणांपासून, भृगू त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानांपासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून, आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले, त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठांपासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निर्ऋती उत्पन्न झाले. सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जग जगत्कर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. (२१-२७)
विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की, ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले. तात, आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाहीत आणि कन्या-गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे तर यापूर्वी कोणीही केले नाही, आणि पुढेही कोणी करणार नाही. हे जगद्‌गुरो, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही. कारण आपल्यासारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते. ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रगट केले आहे, त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्यासमोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. (२८-३३)

1 month, 2 weeks ago
प.पु.बाबाजींची अमृतवाणी 893

प.पु.बाबाजींची अमृतवाणी 893

1 month, 2 weeks ago
एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान …

एकनाथी भागवत ( मराठी भाषांतर) पान नं.934

1 month, 3 weeks ago

भगवान या मन्वन्तरांमध्ये सत्त्वगुणाच्या आश्रयाने, आपल्या मनू इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रगट करून या विश्वाचे पालन करतात. कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा तो तमोगुणाचा आश्रय करून आपले सृष्टिरचनारूप कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहातो.जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलयरात्र होते, तेव्हा भूः भुवः, आणि स्वः असे तिन्ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात. त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात. म्हणून त्या तापाने व्याकूळ हो‌ऊन भृगू आदी ऋषी महर्लोकातून जनोलोकात येतात. इतक्यात प्रलयकालाच्या प्रचंड तुफानामुळे सातही समुद्र उचंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात. त्यावेळी त्या जलात शेषशायी भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात. तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात. अशा प्रकारे कालाच्या गतीने एकेक हजार चतुर्युगांच्या रूपाने होणार्‍या दिवस-रात्रींमुळे ब्रह्मदेवाच्याही शंभर वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते, असे दिसते. (१८-३२)

1 month, 3 weeks ago

विदुर म्हणाला - मुनिश्रेष्ठ, आपण देवता, पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचे वर्णन केले. आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहाणारे आहेत, त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे. आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तर्‍हेने जाणता. कारण ज्ञानीलोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहातात. (१६-१७)
मैत्रेय म्हणाले - विदुरा, असे सांगितले जाते की, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली ही चार युगे संध्या आणि संध्यांशांच्यासह देवांच्या बारा हजार वर्षांपर्यंत राहातात. या सत्यादी चार युगांची क्रमाने चार, तीन, दोन आणि एक हजार दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्षे असतात, त्याच्या दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्यांशात असतात. युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. यांची वर्षगणना शेकडयांच्या संख्येने सांगितली गेली आहे. यांच्या मधल्या काळाला कालवेत्ते ‘युग’ म्हणतात. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे. सत्ययुगातील मनुष्यांमध्ये धर्म आपल्या चार चरणांनी राहातो. नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक-एक चरण कमी होत जातो. प्रिय विदुरा, त्रैलोक्याच्या बाहेर महर्लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील एक हजार चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. त्या रात्री जगत्कर्ता ब्रह्मदेव शयन करतो. त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो, तोपर्यंत चालू असतो. त्या एका कल्पात चौदा मनू होतात. प्रत्येक मनू एकाहत्तर चतुर्युगांपेक्षा थोडा अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो. प्रत्येक मन्वन्तरामध्ये निरनिराळे मनुवंशी राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबरच उत्पन्न होतात. ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे; यामध्ये तिन्ही लोकांची रचना होते. त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशु-पक्षी, मनुष्य, पितर आणि देवतांची उत्पत्ती होते. 

1 month, 3 weeks ago

दोन परमाणूंचा एक अणू होतो आणि तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो. (म्हणजे) जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. असे तीन त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो, त्याला ‘त्रुटी’ म्हणतात. याच्या शंभरपट काळाला ‘वेध’ म्हणतात आणि तीन वेधांचा एक ‘लव’ होतो. तीन लवांचा एक ‘निमिष’, तीन निमिषांचा एक ‘क्षण’, पाच क्षणांची एक ‘काष्ठा’ आणि पंधरा काष्ठांचा एक ‘लघू’ होतो.पंधरा लघूंना एक ‘नाडिका’ म्हणतात. दोन नाडिकांचा एक ‘मुहूर्त’ आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक ‘प्रहर’ होतो.यालाच ‘याम’ म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग होय. सहा पल तांब्याचे एक असे भांडे बनवावे की, ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल आणि चार मासे सोन्याची चार बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांडयाच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे. जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांडयात भरले जाईल, तेवढया वेळेला एक ‘नाडिका’ म्हणतात.विदुरा, मनुष्याचे चार-चार प्रहराचे ‘दिवस’ आणि ‘रात्र’ होतात आणि पंधरा दिवसांचा एक पंधरवडा होतो, जो शुक्ल आणि कृष्ण या नावांनी दोन प्रकारचा मानला गेला आहे. या दोन पक्षांचा मिळून एक महिना होतो, जो पितरांचा एक दिवस-रात्र असते. दोन महिन्यांचा एक ऋतू आणि सहा महिन्यांचे एक ‘अयन’ होते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन अयने आहेत. ही दोन्ही अयने मिळून देवतांची एक दिवस-रात्र होते. मनुष्यलोकात बारा महिन्यांना एक वर्ष असे म्हणतात. अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे. चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारामंडलांचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात बारा राशीरूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो. विदुरा ! सूर्य, बृहस्पती, सवन, चंद्र आणि नक्षत्रासंबंधी महिन्यांच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते. अशी पाच प्रकारची वर्षे करणार्‍या भगवान सूर्याची आपण पूजा करा. हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणार्‍या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात. पुरुषांची मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात. तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मांपासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात. (५-१५)

2 months ago

श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १० वा

दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन -

विदुर म्हणाला - मुनिवर, भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यांपासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली ? भगवन, याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या, त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत. कारण आपण सर्वज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. (१-२)
सूत म्हणाले - शौनका, विदुराने असे विचारल्यावर मुनिवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. (३)
मैत्रेय म्हणाले - अजन्मा भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपले चित्त आपला आत्मा श्रीनारायण यांचे ठायी तसेच एकाग्र करून दिव्य शंभर वर्षांपर्यंत तप केले. ब्रह्मदेवांनी असे पाहिले की, प्रलयकालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे. प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे ज्यांचे विज्ञानबल वाढले आहे, अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले. नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की, पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन. भगवंतांनी सृष्टिकार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भूः भुवः आणि स्वः असे तीन भाग केले. वास्तविक ते कमल एवढे मोठे होते की, त्याचे चौदा किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते. जीवांची भोगस्थाने म्हणून याच तिन्ही लोकांचे शास्त्रांत वर्णन आले आहे. जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत, त्यांना महर्लोक, तपोलोक जनोलोक आणि सत्यलोकरूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. (४-९)

2 months ago
प.पु.बाबाजींची अमृतवाणी 881

प.पु.बाबाजींची अमृतवाणी 881

2 months ago

प्रिय ब्रह्मदेवा, माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी जी स्तुती केली आहेस आणि तपश्चर्येमध्ये तुझी जी निष्ठा आहे, तेसुद्धा माझ्या कृपेचेच फळ आहे. लोकरचनेच्या इच्छेने, सगुण प्रतीत हो‌ऊन सुद्धा तू जे निर्गुणरूपाने माझे वर्णन करून स्तुती केलीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे कल्याण असो. सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणारा जो पुरुष दररोज या स्तोत्राने स्तुती करून माझे भजन करील, त्याच्यावर मी लगेच प्रसन्न होईन. तत्त्ववेत्त्यांचे असे मत आहे की, वास्तुनिर्माण, तप, यज्ञ, दान, योग आणि समाधी इत्यादी साधनांनी प्राप्त होणारे परमकल्याणकारी फळ जर कोणते असेल तर ते म्हणजे माझी प्रसन्नता ! हे विधात्या, मी आत्म्यांचा आत्मा आणि प्रिय वस्तूंमध्ये अत्यंत प्रिय आहे. म्हणून देहादिक ज्याच्यासाठी प्रिय आहेत, त्या माझ्यावरच प्रेम केले पाहिजे. ब्रह्मदेवा ! त्रैलोक्य तसेच जी प्रजा यावेळी माझ्यामध्ये लीन आहे, या सर्वांची तू पूर्वकल्पाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्ववेदमय स्वरूपापासून स्वतःच रचना कर. (३८-४३)
मैत्रेय म्हणाले - प्रकृती आणि पुरुषाचे स्वामी कमलनाभ भगवान सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाला याप्रमाणे जगाचे स्वरूप दाखवून आपल्या त्या नारायणरूपात अदृश्य झाले. (४४)

स्कंध तिसरा - अध्याय नववा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

2 months, 1 week ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago