Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

KSagar House Of Books

Description
UPSC MPSC & all others state &central Govt.& Pvt.Sector competitive exam books,motivational books
Official channel of KSagar house of books Wholesaler & Retailer of competitive exam book join us for upcoming books of all publications & for great discounts
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month, 2 weeks ago

MAHA TET May 2024 / CTET July 2024

मे 2024 मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात MAHA-TET परीक्षा होणार आहे. लवकरच वेळापत्रक येईल त्यामुळे अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकांचे वाचन करावे. मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाचे नियोजन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी दोन वर्षानंतर होणाऱ्या TET परीक्षेची तयारी जोरदार करण्याची आवश्यकता आहे.

MAHA TET परीक्षा मे / जून 2024 व CTET जुलै 2024 IMP Book List

#MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व  उपयुक्त संदर्भ पुस्तक#

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
2.मराठी भाषा(30 गुण)
के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे
3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)
के सागर/बाळासाहेब शिंदे
4.गणित (30 गुण)
के सागर/ सचिन ढवळे
5.परिसर अभ्यास (30 गुण)
    यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत

TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ
१.TET 14 प्रश्नपत्रिका पेपर पहिला (7 आदर्श व मागील 7 प्रश्नपत्रिकांसह)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे

TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी  संदर्भ
TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर
परीक्षभिमुख, मुद्देशीर अभ्यासाच्या दृष्टीकोनातुन  अत्यंत उपयुक्त संदर्भ

#MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक#

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
2.मराठी भाषा(30 गुण)
      के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)
       के सागर/बाळासाहेब शिंदे

# IMP पेपर दोन देतांना ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात आणि ज्यांची पदवी कला शाखेतील आहे त्यांना घटक पाच समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न  सोडवावे लागतात.#

4.गणित व विज्ञान (60 गुण)
        यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.   
4.1- गणित (30 गुण)
के सागर/सचिन ढवळे
4.2- विज्ञान (30 गुण)
शालेय पुस्तके 5 वी ते 10 वी /विनायक घायाळ/अनिल कोलते

5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)
    5.1- इतिहास (30 गुण)
१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
    5.2 - भूगोल.(30 गुण)
१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके

TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ
१.TET 13 प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (7 आदर्श व मागील 6 प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
Best of luck

1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
1 month, 3 weeks ago

प्राचीन भारत एक ऐतिहासिक रूपरेखा मूळ लेखक- प्रा. डी. एन. झा सर
sample PDF

1 month, 3 weeks ago
1 month, 3 weeks ago
2 months ago

संदर्भ पुस्तके : चालक पोलीस/ Driver पदांसाठी....
वरील सर्व पुस्‍तकांबरोबरच चालक पदाच्या अभ्‍यासक्रमातील मोटार वाहन चालविणे / वाहतूकीबाबतचे नियम– यावरील 20 प्रश्नांसाठी
1. पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक-विनायक घायाळ-वाहतूकविषयक 450 IMP प्रश्न व पूर्वीच्या प्रश्नपत्रिका, तसेच रंगीत आणि Black & White दोन्ही स्‍वरूपात वाहतूक चिन्हे, रोड मार्किंग, नंबर पटटया, वाहतूक पोलीसाचे इशारे, मोटार वाहन कायदे व नियम याप्रकारची परीक्षेत प्रश्न विचारतात अशी भरपूर माहिती आहे. गेल्‍या वर्षी या 450 प्रश्नातील बरेचसे प्रश्न जसेच्या तसे आले आहेत.
2. पोलीस शिपाई चालक भरती परीक्षा– डॉ. शशिकांत अन्नदाते – यात वरील प्रमाणेच 2023 व पूर्वीच्या परीक्षेतील प्रश्न आणि चालक विषयक महत्‍वाची माहीती कायदे नियम आहेत.
सरावासाठी : पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्‌मन / सशस्त्र पोलीस
शिपाई / कारागह शिपाई
1. पोलीस कॉन्स्‍टेबल 40 प्रश्नपत्रिका–36 वी आवृत्ती-वि.घायाळ/केसागर
(कृपया सदर माहिती पोलीस भरती 2024 परीक्षेची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)

2 months ago

#policebharti2024 पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्‌मन / सशस्त्र पोलीस शिपाई / कारागह शिपाई भरती-2023-24 भरती परीक्षेची तयारी कशी कराल ?#
पोलीस शिपाई / बॅण्डस्‌मन / सशस्त्र पोलीस शिपाई / कारागह शिपाई लेखी चाचणी:
(1) शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात
दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता7
बोलाविण्यास पात्र असतील.
(2) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४०
टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
(3) लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व
प्रश्‍न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक
निश्‍चित करण्यात येईल.
अभ्यासक्रम : पोलीस शिपाई / बॅण्डस्‌मन / सशस्त्र पोलीस शिपाई / कारागह शिपाई पदाचा अभ्यासक्रम समान असून त्यात पुढील घटक समाविष्ट आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता प्रत्‍येक घटकावर साधारणत: किती प्रश्न विचारण्यात येतात हे लक्षात येते.
लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश आहे:-
1) अंकगणित – 25 प्रश्न
2) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी–25 प्रश्न
3) बुध्दीमत्ता चाचणी–25 प्रश्न
4) मराठी व्याकरण–25 प्रश्न
पोलीस शिपाई चालक लेखी चाचणी:
(1) शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात
दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता
बोलाविण्यास पात्र असतील.
(2) लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (अ) हलके मोटार
वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) व (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण
मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
(3) कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
(4) कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलविण्यात येईल. लेखी
चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्‍न
बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक
निश्‍चित करण्यात येईल.
लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :-
1) अंकगणित– 20 प्रश्न
2) सामान्यज्ञान व चालू घडामोडी– 20 प्रश्न
3) बुध्दीमत्ता चाचणी– 20 प्रश्न
4) मराठी व्याकरण– 20 प्रश्न आणि–
5) मोटार वाहन चालविणे / वाहतकीबाबतचे नियम– 20 प्रश्न
संदर्भ पुस्तके : पोलीस शिपाई / बॅण्डस्‌मन / सशस्त्र पोलीस शिपाई / कारागह शिपाई पदांसाठी....
विद्यार्थ्यांना पोलीस भरती स्पर्धा परीक्षेचा लेटेस्‍ट पॅटर्न समजून घेण्यासाठी पालीस भरतीच्या नजीकच्या काळात घेतलेल्या म्‍हणजेच 2023 मध्ये घेतलेल्‍या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील परीक्षांमध्ये परीक्षेत विचारलेले विविध अभ्‍यास घटकावरील संबंधीत प्रश्न अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार नेमका काय अभ्यास करायचा याची दिशा मिळेल.
1.होणारच पोलीस कॉन्स्‍टेबल 78 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह लेखक- विनायक घायाळ - या पुस्तकात सन 2023 मध्ये झालेल्‍या परीक्षेच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह देण्यात आले असल्याने अभ्यासाची रणनीती व अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांवर भर द्यावा हे लक्षात येण्यासाठी पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
2.संपूर्ण पोलीस कॉन्स्‍टेबल– के सागर 93 वी आवृत्ती– वरील सर्व घटकांच्या कमी वेळात तयारीसाठी फायदेशीर
3.स्‍मॉलेस्‍ट जनरल नॉलेज 47 वी आवृत्ती- वि.घायाळ – सामान्यज्ञान व चालू घडामोडी वरील 25 व चालकच्या 20 प्रश्नांची तयारी करण्यासाठी फायेदशीर. जून्या प्रश्नपत्रिका पाहिल्‍यास 80 टक्‍के व कधीकधी 80टक्‍के+ प्रश्न यातून आलेली दिसतील. Authentic चालू घडामोउीसाठी पण चांगले आहे.
4. मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/ मराठी व्याकरण Notes वि.घायाळ
5. बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे/ अनिल अंकलगी
6.चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक काही वेबसाईट gktoday, Drushti
प्रश्नपत्रिकांचे संपूर्ण स्‍पष्‍टीकरणे असणारे पुस्‍तक
1. 25 निवडक प्रश्नपत्रिका विश्लेषण व स्‍पष्‍टीकरणांसह– वि.घायाळ– यात अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी सह चारही घटकांवरील सर्व प्रश्न सोडविले आहेत. त्‍यामूळे एका प्रश्नाच्या अभ्‍यासात वेगवेगळया बर्‍याच प्रश्नांची तयारी होते.

2 months ago

#MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिकारी गट अ व ब परीक्षेची तयारी कशी कराल?#
       समाजकल्याण गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब पदाचा अभ्यासक्रम समान असून त्यात पुढील घटक समाविष्ट आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता या घटकावर  किती प्रश्न असतील याचा अंदाज बांधता येतो.
1.समाजकल्याण अध्ययन - 40 ते 45 प्रश्न
2.बुद्धिमापन प्रश्न - 10 ते 15 प्रश्न
3.चालू घडामोडी - 5 ते 10 प्रश्न
4.विज्ञान व अभियांत्रिकी - 10 ते 15 प्रश्न
5.कला शाखेतील घटक इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था - 10 ते 15 प्रश्न
6.वाणिज्य व अर्थव्यवस्था - 8 ते 10 प्रश्न
7. मराठी - 10 ते 15 प्रश्न
विद्यार्थ्यांना आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या गट अ व ब पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील परीक्षांमध्ये परीक्षेत विचारलेले समाजकल्याण अध्ययन घटकावरील व इतर घटकांचे प्रश्न अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार नेमका काय अभ्यास करायचा हे लक्षात येईल.

MPSC समाजकल्याण संदर्भ पुस्तके

1.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका व इतर परिक्षातील समाजकल्याण प्रश्न विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते - या पुस्तकात mpsc परीक्षेच्या समाजकल्याण प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणासह देण्यात आले असल्याने अभ्यासाची रणनीती व अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांवर भर द्यावा हे लक्षात येण्यासाठी पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
2.विज्ञान व अभियांत्रिकी घटक के सागर सुधारित 37 वी आवृत्ती
3.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे
4.समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी
5.बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे/ अनिल अंकलगी 6.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज -  विनायक घायाळ (कला शाखा घटकासाठी)
7.वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - स्टेट बोर्ड 11 वी व 12 वी पाठ्यपुस्तक
8.चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक
9.मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
10. समाजकल्याण प्रशासन - डी आर सचदेव / नितीन कोतापल्ले

(कृपया सदर माहिती MPSC  समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)

4 months ago

TET पेपर 1
7 सराव प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका 2013 - 21 डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago