Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande

Description
पु. ल. देशपांडे यांची पुस्तके, विचार, विनोद आणि बरंच काही...
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

2 months ago

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.@suvichar_marathi

2 months, 2 weeks ago

आता झालंय असं की, जगण्यातली विसंगती आम्हाला दिसतच नाही. दिसली, तरी आम्ही ती टिपत नाही. टिपली, तरी ती मांडण्याची खाज आम्हाला सुटत नाही. सुटली, तरी मग त्यातून कोणाच्या तरी भावना दुखावतात. मग कधीकधी आम्ही अॅट्रॉसिटी केली असते, तर कधी देशद्रोह. पुलं, तुम्ही लिहीत होतात तेव्हा तुम्हालाही निषेधाची प्रेमपत्रं येत होती. पण आता प्रेमपत्रांवर भागत नाही. आता घरांवर मोर्चे येतात, लिहिणाऱ्याला सगळेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून परस्पर खटला चालवतात. त्याला दोषी ठरवून यथेच्छ समाचार घेतात. नकोसं होऊन जातं. आपण 'वझ्याचे बैल' बनून जगावं, तेच बरं, असं होतं.
पण मग पुन्हा तुम्हीच आठवता. तुम्हाला ज्या ज्या वेळी जी भूमिका योग्य वाटली, ती तुम्ही ठामपणे मांडलीत. त्याचे परिणाम काय होतील, याचा जराही विचार केला नाहीत. प्रसंगी परिणाम भोगायलाही तयार होतात आणि तसे भोगलेतही. तुमच्या भूमिकांवर टीकाही झाली. तुम्ही नेहमीच बोटचेपी भूमिका घेतलीत, असंही काहींचं म्हणणं आहे. पण उगाच पेटून वगैरे उठणं आणि कोणाच्या तरी कानशीलात भडकावणं, हा तुमचा स्वभावच नव्हता. त्या अर्थी तुम्ही मध्यमवर्गीयच राहिलात. आमच्यासारखे. पण तरीही भूमिका मांडणं तुम्ही सोडलं नाहीत. कधीकधी आयुष्यात खूप नैराश्य येतं. सगळं जग आपलं दुष्मन झालंय, असं वाटतं. मग मी शांतपणे तुमचं एखादं पुस्तक काढतो. पाचव्या मिनिटाला भोवतालाचा विसर पडतो. मी दंग होऊन जातो. पुस्तक खाली ठेवून उठतो, तेव्हा मी बदललेला असतो. जगण्याची, झुंजण्याची नवी ऊर्मी घेऊन तयार असतो.
आज तुमचा वाढदिवस... आम्ही मराठी माणसं खरंच थोर की, आमच्या मातीत तुमच्यासारखा माणूस घडला ज्याने आम्हाला एवढं भरभरून दिलं. हजार हातांनी दिलंत. आमच्या झोळ्या फाटक्या... जेवढं घेऊ शकलो, तेवढं घेतलं. पण घेता घेता देणाऱ्याचे हात मात्र घेता आले नाहीत, हेच शल्य आहे.
- तुमचा,
रोहन टिल्लू.
Rohan Tillu

पूर्वप्रकाशित दि. ०९/११/२०१७

2 months, 2 weeks ago

फक्त मीच नाही, घरातले सगळेच पुलं मय झाले होते. मला आठवतं पुलकित होणे, या वाक्प्रचाराचा अर्थ परीक्षेत विचारला होता आणि मी 'पुलंचं पुस्तक वाचणे' असं लिहीलं होतं. कारण ते वाचताना पुलकित होतच होतो की आम्ही! घरात बाबा, दादा, काका वगैरे गप्पा मारायला बसलो की, तुमच्या लेखनाचा विषय निघाला नाही, असं झालंच नाही.
खिल्ली लिहीताना तुमच्याकडलं विनोदाचं अस्त्र किती काळजीपूर्वक परजलं होतंत तुम्ही. एक शून्य मी वाचूनही ज्यांना तुमच्यातला विचारी माणूस दिसला नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. घरमालकास मानपत्र लिहिलंत, पण आमच्यासारख्या तुमच्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्यांनाही ते मानपत्र मायबाप भारत सरकारलाच लिहिलंय असंच वाटतं. आणि अजूनही वाटतं. हे तुमच्या लिखाणाचं यश म्हणावं की, व्यवस्थेचा पराभव?
तुमचं लेखन... मी त्याबद्दल काय लिहावं. तुमचं एक एक वाक्य असं डौलदार असतं की, काय बोलावं. तुमच्या वाक्यातला एखादा शब्द इकडचा तिकडे केला किंवा तुम्ही लिहिलेल्या शब्दाच्या जागी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला, तरी त्या वाक्याचा डौल बिघडलाच म्हणून समजा. तुम्ही लिहिलेली 'तुझे आहे तुजपाशी', 'ती फुलराणी', 'सुंदर मी होणार' ही नाटकं गद्य असली, तरी त्यातली गेयता काही वेगळीच आहे. ही नाटकं नुसती ऐकतानाही त्यांचा ताल खिळवून ठेवतो.
तुम्हाला माहीत नाही, पण सध्या इथे 'आम्ही बुवा वाचतो' असं सांगणाऱ्यांची एक टोळी तयार झाली आहे. भरीव दिसणारी, तरी प्रचंड हलकी (वजनाने म्हणतोय मी) पुस्तकं घेऊन ती वाचून 'अमक्याच्या लव्हस्टोरीत काय लफडं झालं होतं, तमक्याने गर्लफ्रेंडला कसं पटवलं' यावर चर्चाही झडतात. ते साहित्य असेल कदाचित. पण तुमच्यासारख्यांच्या साहित्यावर पोसलेल्या आमच्या पिंडाला ते कसं काय मानवावं?
'असा मी असामी'मध्ये तुम्ही मध्यमवर्ग कसा कसा बदलत गेला, हे किती समर्पकपणे मांडलं होतंत. बरं ते मांडतोय, असा कोणताही आव आणू न देता. खरं तर माझ्या पिढीने झंझावातासारखे बदल पाहिले. अजूनही पाहतोय. आम्ही चूल पाहिली, गॅस पाहिले, स्टो वर होणारा स्वयंपाक बघितला, सोलार शेगडी बघितली, पाइपलाइन गॅस बघितला आणि आता तर वीजेवर चालणारी शेगडीही बघतोय. घरात फोन नसणं इथपासून ते फोन आल्यानंतर त्याची साग्रसंगीत पूजा करून पहिला फोन लावणं, प्रेमात पडण्याच्या वयात ब्लँक कॉल्स देणं, हक्काचा पीसीओवाला गाठून एक-एक रुपयाची नाणी सरकवत समोरचा 'त्या वेळी' गोड वाटणारा आवाज कानात साठवणं, आपल्या हितगुजांची स्मारकं असलेले ते पीसीओ बुथ बंद होताना बघणं, त्याची जागा मोबाइलने घेणं, त्यातही कॉल लावायला १६ रुपयांपासून ते आता १ पैसा प्रतिमिनिटापर्यंत किती तो बदल...
आम्ही मोठे होत असतानाच नेमकं ते जागतिकीकरण-उदारीकरण आणि खासगीकरण झालं आणि झपाट्याने आसपासचं जग आणि आम्हीही बदललो. आतापर्यंत कधीच न ऐकलेले ब्रँड्स हलक्या पावलांनी भारतात शिरले होते. उच्च मध्यमवर्ग नावाची एक जमात निर्माण होत होती. आधी लोअर मिडलक्लासमध्ये असलेली आमच्यासारखी कुटुंब मिडलक्लासची पायरी चढत होती. नाक्यावरचा वाणी टापटीप झाला होता. इराणी तर केव्हाच बंद पडले होते, पण आता ठिकठिकाणच्या उडप्यांनीही मान टाकायला सुरुवात केली आणि मॅक्डोनाल्ड्ससारखी चेन उभी राहत होती. खरेदी करणं हा सुखद अनुभव बनत चालला होता. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बंद पडून त्या जागी सर्व्हिस इंडस्ट्री फोफावत चालली होती. पूर्वी अगदी मोजक्या घरांपुढे दिसणारी चारचाकी इतकी स्वस्त झाली की, घरटी दोन, तीन गाड्या येऊ लागल्या.
तुम्ही असतात, तर हा बदल कसा टिपला असतात? असा मी असामीची पुढली आवृत्ती आली असती का? बटाट्याची चाळ संपवताना तुम्ही 'एक चिंतन' लिहीलं होतंत. इथे तर एक समाजव्यवस्था मोडकळीला येत होती आणि दुसरी तयार होत होती. आमची वयं कमी होती, पण आमच्या पालकांची अवस्था नक्कीच सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच. मंगेशराव, जनोबा रेगे यांच्यासारखीच झाली असणार. पण भाई, त्यांची दु:खं नेमकी पकडणारा, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या विवंचना मांडणारा तुमच्यासारखा कोणीच आसपास नव्हता. तो असता, तर परिस्थिती बदलली असती, असं बिलकुलच नाही. पण रोजचा गाडा मुकाटपणे ओढणाऱ्या आपलीही दखल कोणीतरी घेतंय, हे बघून जरासं बरं वाटलं असतं.
माझ्या पिढीतल्याच नाही, तर माझ्या नंतरच्या पिढीतल्या अनेकांसाठीही तुम्ही आउटडेटेड झाला नाहीत. तुम्ही तेवढेच रेलेव्हंट राहिलात. तुमच्या लेखनाचा प्रभाव आमच्यापैकी अनेकांवर आहे. आमच्या लिखाणातून कधीकधी अचानक तुम्ही डोकावता. मग आमचं आम्हालाच कौतूक वगैरे वाटतं. आणि लगेचच दुसऱ्याच क्षणी स्वत:च्या खुजेपणाची जाणीवही होते. आम्ही लिहीलेलं वाईट असतं, असं नाही. पण ते तुमच्या आसपासही पोहोचत नाही.

3 months, 1 week ago

'चंदकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं, 'नको, हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की 'हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळी त्यांच्या येणाऱ्या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील.' त्यावर पुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या 'तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय?' मी मनात म्हणालो 'मी काय किंवा इतरांनी काय, तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन, जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते. म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता. शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो, 'एक आनंदाचं देणं'. पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे... '

चंदकांत बाबुराव राऊत
शनीवार, नोव्हेंबर ११ २००६
महाराष्ट्र टाईम्स

3 months, 1 week ago

पुलंचं देणं

चंद्रकांत बाबुराव राऊत

( कृपया, कोणताही लेख share किंवा forward करताना मूळ लेखक, व्यक्ति यांच्या नावानेच forward करा.
संकलन मध्ये स्वतःचे नाव टाकून मूळ लेखकाचे नाव डिलीट करू नका.)

' पुलं'चं लिखाण, त्यांचे परफॉर्मन्सेस आजही अनेकांना आनंद देतात, क्षणभर का होईना त्यांच्या निखळ विनोदातून जगण्यातल्या दैनंदिन विवंचनांचा विसर पडतो... 'पुलं'च्या या मोठेपणाची जाणीव मराठीतून एमए करूनही केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या या लेखकाला आहे. म्हणूनच कामाच्या निमित्ताने त्यांचा 'पुलं' आणि सुनिताबाईंशी जो काही संबंध आला, ती त्यांना त्यांच्या आयुष्यातील फार मोलाची कमाई वाटते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात, निमित्त पुलंच्या नुकत्यात पार पडलेल्या जयंतीचं...

सकाळी नऊ-साडेनऊची वेळ; विद्याथीर् सहाय्यक समितीचा एक विद्याथीर् दुकानाचे दार उघडून आत आला. 'तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे.' -त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून 'सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत'- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गिऱ्हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला 'हो लगेच निघतो' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गिऱ्हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. 'पुलं'चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गिऱ्हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. 'राहू द्या होे; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही.' त्याच्या या वाक्यातून 'पुलं'बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मागीर् लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महषिर् देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.

थोड्याच वेळात मी 'रुपाली'मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि 'या' म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले. 'थोडावेळ बसा; भाई जरा नाश्ता करतो आहे' असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या. आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणार याचा आनंद जेवढा झाला होता, तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारी आज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो. इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुचीर् देऊन, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. 'चंदकांत, यांचे केस बारीक करून टाका' म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या. त्यांचे लक्ष नाही असे पाहून 'फार लहान करू नका, थोडेच कापा' पुलं माझ्या कानात कुजबुजले. माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या. पहिल्याच दिवशी पुलं त्यांना 'पुलं-स्वामिनी' का म्हणतात याचा अर्थ उमगला. त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजला असता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा, विश्रांतींच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे, लिखाण करणे, चर्चा करणे हेही चालूच होते.
केस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व 'वा छान!' म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गंुडाळू लागलो, तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले.

4 months, 2 weeks ago

नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल, आणि हारलात तर अहंकार हारेल.@suvichar_marathi

5 months ago
5 months, 1 week ago

४८) ' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा.त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !

४९) "हॅलो , शांताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''
"' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?'' फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शांताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ... बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्य क्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शांताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .

50) एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? " त्यावर पु ल लगेच म्हणाले, "हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून विकायचो आम्ही.!"..

5 months, 1 week ago

३९) आणीबाणी नंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, ' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते. त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !

४०) एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं. प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ? एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... ' पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.

४१) एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.

४२) एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं. ' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.

४३) गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '

४४) हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं.'मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअर होस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?' त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात

४५) अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, " चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज. चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ' चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'

४६) पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'

४७) १९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.

6 months, 3 weeks ago
***वाचा कुसुमाग्रज यांची देशभक्तीपर कविता - …

वाचा कुसुमाग्रज यांची देशभक्तीपर कविता - आवाहन
👇🏻**👇****https://www.marathisahitya.in/2023/09/blog-post.html?m=1

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago