? Marathi Money | मराठी मनी

Description
?| आर्थिक साक्षरता
?| गुंतवणूक आणि व्यवसाय टिप्स
?| एक पाऊल आर्थिक स्वातंत्र्याकडे

Powered by - @Marathi_business_ideas
Advertising
We recommend to visit

Shashwat Academy’ WE, the team, cater the 'EXACT KNOWLEDGE' to the upcoming civil servants. We address the young minds with the new thoughts.
Our complete focus is the 'EXAM PATTERN' itself.


Patil Sir: 8983569353

Last updated 4 months, 1 week ago

HD STATUS ?

जल्दी ज्वाइन करें सभी

join now ?

Buy ads :- https://telega.io/c/MOTIVATIONAL_STATUS7

Last updated 4 months, 3 weeks ago

We bring you Lit Memes & Jokes ??Clean Content 24/7???
I recommend you join now?

Check out these channels

?? @wallpaper_channell1
?? @kenyanmemesandjokes
?? @quotesKe001
?? @twerk_videos1
?? @jokesempire001
Admin- @jokersmoker002

Last updated 1 month, 4 weeks ago

5 months, 4 weeks ago

उत्कर्षाच्या काळात पैसा कमवायची अक्कल होती, मात्र तो वाचवायचा कसा हे माहिती नव्हते, त्याची गुंतवणूक ही तर फार पुढची गोष्ट होती.
पैसा ही खूप मोठी ताकद आहे, याची जाणीव आपल्याला पदोपदी होतच असते. आपण करंटे नी वास्तव मान्य करायला नकार देणारे लोक हे मानत नाहीत, हा भाग निराळा.
पैसा दुःख हरण करु शकत नाही, ते आपल्याला मनाच्या पातळीवरच करावे लागते. मात्र जगण्यासाठी जो Ease हवा असतो, तो पैसाच देऊ शकतो.
उत्कर्षाच्या तीन-चार वर्षांच्या काळात आलेला बराच पैसा आवश्यक नव्हता त्या ठिकाणी खर्च करून त्याची माती केल्यानंतर आलेले शहाणपण म्हणजे ही लहानशी टीप, तुमच्यापैकी बहुतेक लोक पोस्ट वाचल्यानंतरही जे करायचे तेच कराल, त्याचे कारण जॉन इलिया एका शेरातून देतात.
कौन सिखता हैं सिर्फ बातोंसे,
सभी को एक हादसा जरुरी हैं!
लहानशी टीप खालीलप्रमाणे:
पैसे येत असतील (उत्तम कमाई होत असेल) तेव्हा ते वाचवून ठेवा, येणे कमी झाले, बंद झाले तर तेच कामी येतील.
वेळ काळ सांगून येत नसते. त्यामुळे जमेल तितकी तजवीज केलेली बरी.
जसा आपला Bad time कायम नसतो, तसा Good Timeही कायम नसतो, हे लक्षात ठेवले की बचत करण्याची प्रेरणा मिळते.
भरभराटीच्या काळात जपून ठेवलेले 'धान्य'च दुष्काळात कामी येते.
- निलेश अभंग, कल्याण.
#randomthoughts

7 months, 1 week ago
? Marathi Money | मराठी मनी
7 months, 1 week ago

Vijay Gaikwad सरांची पोस्ट:

ये 'सचिन शर्मा' कोण है..!

घर भाड्यावर देणे किंवा घराची विक्री करणे. हे आता पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे.

अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घर भाड्यावर देणे विक्री करणे हा आता सवयीचा भाग झाला आहे. तरी घर भाड्याला देण्याच्या प्रक्रियेमध्ये अजूनही एजंट किंवा प्रत्यक्ष भेटून घर पाहून एग्रीमेंट करणं आणि विश्वासाने चावी हातात देणं हा या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे.

आयुष्य सुखकर करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रॉड लोकांनी प्रवेश केला आहे. उदा. बँकिंग, क्रेडिट कार्ड आणखी बरचं काही.

या फ्रॉड करणाऱ्या लोकांची मोडस ऑपरेंडी अपडेट असते.

ऑनलाइन हाऊसिंग रेंट यांच्या माध्यमातून यावर्षीही मी प्रॉपर्टी रेंट साठी ठेवली होती. गेली आठ दिवस लीड येत होत्या अनेकांशी चर्चा सुरू होती. दोघेजण प्रत्यक्ष येऊन फ्लॅट देखील पाहून गेले होते.

शनिवारी सकाळी सचिन शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. हिंदीमध्ये बोलत होता. पुण्याला राहतो.डिफेन्स मध्ये कामाला आहे. तुमच्या फ्लॅटचे फोटो पाठवा. बायकोला दाखवून कन्फर्म करतो. मी फोटो पाठवले. वीस मिनिटानंतर फोन आला. फ्लॅट आवडला आहे. रेंट डिपॉझिट किती? मी रक्कम सांगितली. अजिबात आडेवडे न घेता लगेच डन केले. स्वतःहून सचिन शर्मा नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाठवले सचिन शर्मा मला म्हणाला, ' मी डिफेन्स मध्ये काम करतो आमच्याकडे सिस्टीम वेगळी आहे. तुम्हाला रवी कुमार चा फोन येईल. तो पैसे डिपॉझिट करेल असं सांगितलं.'

आता मला शंका आली. एवढ्या जलद गतीने रेंट एग्रीमेंट होण्याची ही पहिलीच वेळ मला दिसत होती.( प्रत्यक्ष भेट आणि बार्गेनिक न करता).

ताबडतोब सचिन शर्मा नावाने गुगल सर्च केले. फ्रॉडची मोठी लिस्ट पुढे आली. सन्मित्र ज्ञानेश चव्हाण Dnyanesh Chavan यांना ताबडतोब त्याने पाठवलेले कागदपत्र पाठवले दुसर्‍या सणाला ज्ञानेशनं सांगितले की फ्रॉड आहे पुढे जाऊ नको.
अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात रवी कुमार चा फोन आला.

" आप क्या युज करते हो? फोन पे या गुगल पे?
मी, सचिनने गुगल पे नंबर मांगा था..! उसके पास दिया है.!
आता रवी कुमार, आपना जीपी अकाउंट खोलो.
मी, नंबर दिया है अकाउंट खोलने की जरुरत नही है!
रविकुमार संतापला.. आप फोन रख दो ऐसा पेमेंट नही हो सकता..
मी म्हटलं.. ठीक आहे..!

फ्रॉड आहे याची शंभर टक्के खात्री झाली होती.

साधारणपणे यांची मोडस ऑपरेंडी. हाउसिंग डॉट कॉम ,नो ब्रोकर डॉट कॉम, MagicBricks,99 Acres, अशा संकेतस्थळावर नोंदणी करून अपेक्षित ग्राहक गाठायचे. संरक्षण दलामध्ये ( defence) काम करत असल्याचे सांगत सहानुभूती मिळवायची.

डिपॉझिट च्या नावावर पैसे जमा केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा .त्यावर आधारित व्यवहार करून परत पैसे ट्रान्सफर करायला सांगायचे आणि अकाउंट रिकामे करायचे ही साधारणता यांची पद्धत आहे.

थोडी जागरूकता ठेवली तर अशा भामट्यांना सहज ओळखता येते.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवतंत्राचा अंगीकार करणे हा अविभाज्य भाग आहे. तो स्वीकाराच पाहिजे. थोडे सजग राहिले तर या माध्यमात घुसून लबाडी करणाऱ्यांचा सहज परदा फाश होऊ शकतो.

मला लाखभर चुना लावण्याचा त्यांचा डाव क्षणात उथळून लावला. तुम्ही देखील सजग राहा. असे आणि सचिन शर्मा तुमच्या आजूबाजूला असतील.
बुद्ध सांगतो,क्रोध, वासना, लोभ दूर ठेवले तर आयुष्याचा मंगलमय कल्याण होईल.

(इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या लिंक वरून हे दिसतंय की सचिन शर्मा नावाच्या माणसाने गेल्या अनेक वर्षापासून अनेकांना चुना लावला आहे पोलिसांनी कारवाई देखील काही ठिकाणी केल्याचे दिसते परंतु हा सचिन शर्मा अजून मोकाट कसा?)

असो
जय किसान
जय संविधान
विजय गायकवाड
मुंबई

Mumbai: Man loses Rs 98,000 to e-fraudster posing as potential tenant -
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-man-loses-rs-98k-to-e-fraudster-posing-as-potential-tenant/amp_articleshow/82009988.cms?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=AmpArticleshowicon
https://timesofindia.onelink.me/efRt/ASmwebshare0

The Times of India

Mumbai: Man loses Rs 98,000 to e-fraudster posing as potential tenant | Mumbai News - Times of India

A director of a private company lost Rs 98,000 from his bank account after a person posed as Border Security Force personnel and duped him under the

Vijay Gaikwad सरांची पोस्ट:
9 months, 1 week ago

https://t.me/+8WwbU7raHMQ2MDQ1

Telegram

ALL MOVIES ️HUB 🌎

Backup - @films\_movies\_hub

? Marathi Money | मराठी मनी
10 months, 2 weeks ago

https://t.me/+bUyOR79tPHw1N2Y1 मराठी वाचक आणि साहित्य#पुस्तके #साहित्य #वाचन

11 months ago
? Marathi Money | मराठी मनी
11 months ago
? Marathi Money | मराठी मनी
11 months ago
? Marathi Money | मराठी मनी
11 months ago

परवा सकाळी wtsp उघडला आणि एका अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज वाचून हादरलो.

तुमच्या वाहन क्रमांक .....यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्याचे पुरावे हवे असतील तर खालील वाहन परिवहन ॲप इंस्टॉल करून पहा.

खरंतर वाहन वापरताना मी पूर्ण काळजी घेतो,सर्व नियम पाळतो. पण तरीही असे काय घडले असावे, याचा विचार करू लागलो. मनात थोडा घाबरलो होतोच. विशेष बाब अशी की माझा वाहन क्रमांक व मोबाईल नंबर अस्सल (खरा) होता.

माझ्या मोबाईलमध्ये Mahatraffic ॲप कायमच असते. त्यावर चेक केले तर कुठलेही अनियमितता दिसली नाही. जरा शंका येऊ लागली. अस्वस्थ मनःस्थितीत, त्यासोबत APP म्हणून दिलेली केवळ 34 kb ची फाईल इंस्टॉल करू लागलो.

या दरम्यान माझ्या BE COMPUTER शिक्षण घेतलेल्या दोन्ही मुलांना याविषयी सांगितले. ते दोघेही या मेसेजच्या सत्ततेची पडताळणी करू लागले.

सक्रिय पत्रकार असलेल्या धाकट्या भावाला ही कॉल करून संबधित नंबर नक्की आरटीओ व ट्रॅफिकचा आहे की नाही, याची खात्री करण्यास सांगितले.

ॲप म्हणून पाठवलेली फाईल हा SCAM आहे, हे आतापर्यंत लक्षात आले होते. ती प्रथमतः काढून टाकली व काहीसा निश्चिंत झालो.

दोन दिवस वारंवार MAHATRAFFIC ॲपवर कारवाईबाबत काही माहिती मिळते का, याची पडताळणी करत होतो, पण काहीच दिसत नसल्याने दिलासा मिळाला.

काल पत्रकार भावाचा कॉल आला की हा सायबर FRAUD आहे व त्याबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आज सकाळी त्या नंबरवर कॉल केला, चंदीगड येथे राहणाऱ्या रोशन सिंग नावाच्या एका व्यक्तीने तो घेतला. मी सामान्य माणूस असून माझा WTSP ब्लॉक करण्यात आले असल्याचे त्याने सांगितले. त्याला सर्व घटना समजावून सांगितली आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

आपल्याबाबतही असे घडू शकते; तेव्हा खात्री केल्याशिवाय कोणत्याही अनोळखी नंबरला कृपया प्रतिसाद देऊ नका.

सावधान सर्वदा!

- Suresh Yamuna Gopalrao Deshmukh

11 months, 1 week ago

मुंबई: अर्धवेळ नोकरी किंवा घरबसल्या अर्थार्जनाची संधी देण्याचे आमिष दाखवून पाठवलेल्या इंटरनेट लिंकच्या मदतीने समोरच्या व्यक्तीच्या बँकखात्यातील रक्कम हडपण्याचे प्रकार वाढत आहेत. नोकरी किंवा उत्पन्नाचे पूरक साधन शोधण्याचे प्रमाण वाढल्याचे हेरून अशा व्यक्तींची फसवणूक केली जात आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात घडलेल्या अशा गुन्ह्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट वाढल्याचे दिसून आले आहे.

बोरीवलीतील २७ वर्षीय तरुणीने २ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर एक चित्रफीत पाहिली होती. त्यात अर्धवेळ नोकरी करा आणि कमवा अशी जाहिरात करण्यात आली होती. तरुणीने ती जाहिरात पाहून चित्रफिती खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तिला शेअर चार्टमध्ये चित्रफीत लाईक करण्याचे काम सागण्यात आले. सुरुवातीला तिला दोन-तीन वेळा केलेल्या लाइकचा मोबदला देण्यात आला. त्यानंतर ‘प्रीपेड टास्क’च्या नावाखाली ठरावीक रक्कम भरून त्या मोबदल्यात अधिक रक्कमही तिला देण्यात आली. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर भामटयांनी तिला अधिकाधिक रक्कम भरायला सांगितली. तिने अधिक फायद्याच्या मोहात नऊ बँकांमधील खात्यांमध्ये साडेचार लाख रुपये जमा केली. मात्र, ती रक्कम तिला मिळालीच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने बोरिवली पोलीस ठाणे गाठले.

फसवणूक कशी केली जाते?

सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अर्धवेळ नोकरीबाबतचा संदेश पाठवला जातो. त्याला फसवणूक संदेशावरील लिंक क्लिक केल्यानंतर सुरुवातीला काही व्हीडिओ लाईक करायला सांगितले जातात. ते केल्यानंतर ५०-१०० रुपये खात्यात जमा केले जातात. त्याद्वारे विश्वास संपादन करून मोठया गुंतवणुकीचे आमिष दाखवले जाते. त्याला बळी पडल्यानंतर गुंतवणूक अथवा बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले जाते. त्याबद्दल थोडा मोबादलाही दिला जातो. असे करून लाखो रुपये काढले जातात.

खबरदारी घेणे गरजेचे..

  • ऑन लाईन अर्धवेळ नोकरीच्या आमिषाला बळी पडुन नका.

  • अनोळखी मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या व्हॉटसॅप संदेश किंवा एसएमएसव्दारे प्राप्त प्रलोभनाला प्रतिसाद देवु नये.

  • एखादा व्हीडिओ पाहणे व त्याबदल्यात पैसे कमविणे हा सापळा आहे. त्यापासून दूर राहणेच योग्य आहे.

  • अशा प्रकारे अर्धवेळ नोकरीसाठी गुंतवणूक सुरू केली असल्यास ती तात्काळ थांबवा

’फसवणूक झाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार करा.

We recommend to visit

Shashwat Academy’ WE, the team, cater the 'EXACT KNOWLEDGE' to the upcoming civil servants. We address the young minds with the new thoughts.
Our complete focus is the 'EXAM PATTERN' itself.


Patil Sir: 8983569353

Last updated 4 months, 1 week ago

HD STATUS ?

जल्दी ज्वाइन करें सभी

join now ?

Buy ads :- https://telega.io/c/MOTIVATIONAL_STATUS7

Last updated 4 months, 3 weeks ago

We bring you Lit Memes & Jokes ??Clean Content 24/7???
I recommend you join now?

Check out these channels

?? @wallpaper_channell1
?? @kenyanmemesandjokes
?? @quotesKe001
?? @twerk_videos1
?? @jokesempire001
Admin- @jokersmoker002

Last updated 1 month, 4 weeks ago