Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

Marathi Business ideas - मराठी बिझनेस

Description
नवनवीन बिझनेस आयडिया आणि बिझनेस प्लॅन्स 🔰

✅ मार्केटिंग स्ट्रॅटेजी
✅ बिझनेस मोटिवेशन
✅ उद्योजकता शिक्षण
✅ मोफत मार्गदर्शन

Powered By - @MarathiMoney
Advertising
We recommend to visit

Shashwat Academy’ WE, the team, cater the 'EXACT KNOWLEDGE' to the upcoming civil servants. We address the young minds with the new thoughts.
Our complete focus is the 'EXAM PATTERN' itself.


Patil Sir: 8983569353

Last updated 2 weeks, 2 days ago

HD STATUS 🔐

जल्दी ज्वाइन करें सभी

join now 👇

Buy ads :- https://telega.io/c/MOTIVATIONAL_STATUS7

Last updated 1 month, 1 week ago

We bring you Lit Memes & Jokes 😍😂Clean Content 24/7😂😂🔥
I recommend you join now💪

Check out these channels

👉🏻 @wallpaper_channell1
👉🏻 @kenyanmemesandjokes
👉🏻 @quotesKe001
👉🏻 @twerk_videos1
👉🏻 @jokesempire001
Admin- @jokersmoker002

Last updated 3 weeks, 3 days ago

2 months, 1 week ago

https://t.me/+bUyOR79tPHw1N2Y1

Telegram

मराठी वाचक आणि साहित्य

https://t.me/+bUyOR79tPHw1N2Y1

Marathi Business ideas - मराठी बिझनेस
2 months, 3 weeks ago
धक्कादायक! AnyDesk हॅक झाला, युजर्सनी लगेच …

धक्कादायक! AnyDesk हॅक झाला, युजर्सनी लगेच पासवर्ड बदलावे.
#AnyDeskHacked

मित्रानो, सध्या वापरली जाणारी लोकप्रिय रिमोट डेस्कटॉप ऍप्लिकेशन AnyDesk ची ही सिस्टम हॅक झाल्याचा धक्कादायक वृत्ता समोर आली आहे.

काय झालं?

AnyDesk Software GmbH ने शुक्रवारी संध्याकाळी हे कबूल केलं की त्यांच्या प्रोडक्शन सिस्टमवर सायबर हल्ला झाला आहे.

या हल्ल्यामुळे कंपनीची डेटाबेस किंवा इतर संवेदनशील माहिती चोरी झाली का हे अद्याप स्पष्ट नाही.
या हल्ल्याशी संबंधित तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.

युजर्स काय करायचं?

AnyDesk ने युजर्सना तातडीने त्यांचे पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.
29 जानेवारी 2024 रोजी रिलीज झालेलं AnyDesk व्हर्जन 8.0.8 वापरत असाल तर ते अपडेट करा कारण हे नवीन व्हर्जन नवीन सिक्युरिटी सर्टिफिकेटसह येतं.
दुसऱ्या एंटी-व्हायरस सॉफ्टवेअरने तुमचा सिस्टम स्कॅन करा.

काळजी घ्या!

जुन्या पासवर्ड पुन्हा वापरू नका आणि मजबूत, युनिक पासवर्ड वापरा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.
फिशिंग ईमेल आणि संशयास्पद लिंक टाळा.

#cybersecurity #dataprotection #staysafeonline

2 months, 3 weeks ago

बुके बनवून विकण्याचा बिजनेस करणे, हा अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये करण्याचा बिजनेस आहे. याला फार खर्च लागत नाही.

एखाद्या Sweet shop (मिठाईचे दुकान), Cake Shop च्या आवारात, व्हरांड्यात हा बिजनेस करण्यासाठी तुम्ही जागा मिळवू शकता. त्याचे थोडेफार भाडे दिले की तो दुकानदार तुम्हाला एक टेबल आणि पुष्पगुच्छ बनवण्यासाठी आवश्यक असलेले material ठेवण्यासाठी जागा देऊ शकतात.

लोक आनंदाच्या क्षणी, वाढदिवसाच्या दिवशी, कुणाची भेट घेण्याकरता बुके विकत घेतात. त्यामुळे cake shop, Sweet shop मध्ये येणारे ग्राहक बुके घेण्यासाठी तुमच्याकडे वळू शकतात.

शिवाय गल्लीगल्लीत झालेले युवानेते, भाऊ, दादा, शेठ त्यांच्या आवडत्या नेत्यांना बुके देतच खुश करण्याचा प्रयत्न करत असतात.

बुके कसे बनवायचे , याचे लाखो व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही मोफत प्रशिक्षण घेऊ शकता.

हा बिजनेस अत्यंत चालणारा आहे. शिवाय सध्या लोकांना लहान मोठ्या प्रसंगाचा इव्हेंट करण्याची सवय लागली आहे. त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची लोकांना घाई असते, त्यामुळे सध्याचा काळ बुके विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी अत्यंत पूरक आहे.

करून तर पाहा.

4 months ago

https://t.me/+bUyOR79tPHw1N2Y1 मराठी वाचक आणि साहित्य#पुस्तके #साहित्य #वाचन

4 months, 1 week ago

एक नवउद्योजक... तरुण वय... त्याच्या एका कस्टमरकडे त्याची भली २०-२५ लाख रुपये उधारी थकलेली. वर्षभर झाले तरी उधारी देईना, कॉल ला प्रतिसाद देईना...

शेवटी या नवउद्योजकाने आपल्याकडे काम करणाऱ्या पाचसहा जणांना घेऊन त्या ग्राहकाचे ऑफिस गाठले, सोबत लोखंडी रॉड घेऊन गेले. तिथे समोरासमोर थोडे वादविवाद झाले. याने लगेच आपल्या माणसांच्या सोबतीने त्या ऑफिसमधल्या सगळ्यांना रॉड, पाईपने मारहाण करायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये कामासाठी मुली सुद्धा होत्या. सगळाच गोंधळ.

त्या ग्राहकाने पोलिसांना बोलावले. याच्यावर आणि याच्या कार्यकर्त्यांवर खंडणी, दरोडा, विनयभंग असे बरेच गुन्हे दखल झाले. हे पाच सहा जण थेट जेलमधे... नवउद्योजकाचा व्यवसायाचा मोबाईल सुद्धा जप्त झाला... वर्षभर आतमध्ये... मोबाईल जप्त असल्यामुळे संपर्क ठप्प, इकडे व्यवसाय सांभाळायला कुणी नाही. घरातल्यांनी व्यवसाय हाताळण्याचा प्रयत्न करून पहिला, पण त्यांना जास्त काही जमले नाही. थोडेफार जमले तरी कामाचा मोबाईल, गाडी जप्त असल्यामुळे आणि हा स्वतःच आत असल्यामुळे ७०-८०% व्यवहार ठप्प झाले.

वर्षभरानंतर बाहेर आल्यावर आता व्यवसाय तसाही संपल्यात जमा आहे. उधारी तशीच गेली, ती आता वसुलीच्या बाहेर गेली आहे... नवउद्योजक आता म्हणतोय, भाऊ व्यवसायात संयम पाहिजे...

  1. उधारी वसुलीचे कौश्य असेल तरच उधारी करावी. मार्केटमध्ये ८०% व्यवहार उधारीचेच आहेत, त्यामुळे त्याला आपण टाळू शकत नाही. पण उधारी करताना समोरच्या ग्राहकाची मार्केट मधील प्रतिमा सुद्धा तपासून घेणे आवश्यक असते. यासोबतच चांगले संबंध ठेवणे, पाठपुरवठा करणे अशा गोष्टींची आवश्यकता असते.
  2. उधारी वसूल होत नसल्यास कायदेशीर कारवाईचा पर्याय असतो. (उधारी संबंधी उद्योजक मित्र च्या वेबसाईटवर एक दोन लेख आहेत)
  3. मोठ्या उधारीवेळी चेक घेऊ ठेवता आल्यास उत्तम
  4. उधारी वसुलीचे सर्व व्यावसायिक मार्ग संपल्यानांतर सुद्धा समोरचा प्रतिसाद देत नसेल तर त्याचा उद्देश उधारी फेडण्याचा नाही हे लक्षात येते
  5. एकदा समोरच्याचा उधारी फेडण्याचा उद्देश नाही असे लक्षात आल्यावर मग चांगला वकील गाठावा, व फौजदारी आणि दिवाणी कारवाईला सुरुवात करावी.
  6. उगाच काठ्या घेऊन हाणामारीला सुरुवात करू नये. आपण व्यावसायिक आहोत, गुंड नाही. कॉलेजमधे गुंडगिरी केली, मारामाऱ्या केल्यात म्हणून पुढेही तोच प्रकार चालून जातो या भ्रमातून बाहेर या. कॉलेज जीवन आणि कॉलेजनंतरचे जीवन यात फरक असतो.
  7. कोणतेही व्यवहार करताना लिखापढी ठेवावी. पर्चेस ऑर्डर, बिल, डिलिव्हरी चलन जपून ठेवावेत. बिल ईमेल वर सुद्धा पाठवावे. डिलिव्हरीचे कन्फर्मेशन घ्यावे. उधारीचे पाठपुरवठा तसेच इतर जी काही चर्चा करायची असेल ती ईमेल वर किंवा WhatsApp वर करावी. शक्यतो ईमेल ला प्राधान्य द्यावे.
  8. या चर्चेवेळी आपल्याला गरज पडल्यास पुढे कायदेशीर कारवाईत कामी येतील अशा शब्दांचा विचारपूर्वक प्रयोग करावा.
  9. सुरुवातीला गोडगोड बोलूनच उधारी वसुलीला प्राधान्य द्यावे. न जमल्यास विनंती करून चेक घेण्याचा प्रयत्न करावा, भलेही तो दूरच्या तारखेचा असेल. आणि हेही जमले नाही तर पुढील कायदेशीर कारवाईचा विचार करावा...
  10. व्यवसायात संयमाला पर्याय नाही. इथे चुकीला माफी मिळत नाही. एक चुक सुद्धा व्यवसायाला संपवू शकते. त्यामुळे संयम महत्त्वाचाच आहे.
  11. आपल्याला सगळं कळतं हा विचार कधीच करू नका. योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची मदत नेहमी घ्यावी.

व्यवसाय साक्षर व्हा...

© श्रीकांत आव्हाड

===========

4 months, 1 week ago
5 months, 3 weeks ago

हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त चांगली जागा कशी होऊ शकेल याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे.

मागील १६ जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला.

जी माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे, अश्या माझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले.

मी आईपासून एक गोष्ट लपवली होती. मी ७ वर्षाचा असतांना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहीत नाही अश्या आविर्भावात मी आईला विचारले होते. आई डॉक्टर काय म्हणाले? त्यावर आई म्हणाली होती, "काही नाही, सर्व ठीक होईल."

मला पहिला हार्टअटॅक आला तेंव्हाही आई म्हणाली होती, सर्व ठीक होईल. "सर्व काही ठीक होईल" हे तिचं वाक्य माझ्यावर ऋण होते. पण दैव बघा, यावर्षी मला तिचे हे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली.

आईच्या घश्यात ४ ट्युमर डिटेक्ट झाले. आईने विचारले, "डॉक्टर काय म्हणाले?" मी म्हणालो, "सर्व काही ठीक होईल."

तुम्ही किती वेळ या पृथ्वीतलावर जगले याला महत्व नाही, इथे असतांना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे.

तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्वाचे आहे.

आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्वाची आहे. आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. आपण या आशीर्वादांचे सोने करू शकतो की नाही हे महत्वाचे.

आज इथे मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा, किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर, तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काही करा.

मित्रांनो, मी आहे मायकल क्रॉसलँड !!!

Michael Crossland is an Author of the best seller book,

Everything will be Ok: A story of Hope, Love and Perspective. (Post Courtesy : Prashant Pawar)

#वाचनकट्टा, कोल्हापूर

5 months, 3 weeks ago

वेळ काढून वाचावे ही विनंती.

मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले, "या मुलाला घरी घेऊन जा, स्पेन्ड टाइम विथ हिम. आम्ही आता काहीही करू शकत नाही."

ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो पण जो आपलं, आपल्या माणसांचं अन् या जगाचं भवितव्य बदलू शकतो असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात.

असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, "माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत?"

डॉक्टरांनी ९६% माझा मृत्यूच होईल असे सांगितले.

माझ्या आईने त्या ९६% कडे न पाहता उरलेल्या ४% कडे पाहिले आणि मला घरी घेऊन आली.

अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली.

त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे असे सांगितले. अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ २५ मुलांवर ते औषध ट्राय करणार होते. एकही क्षण न घालवता आईने डॉक्टरांना तात्काळ होकार दिला.

पहिल्या महिन्यात २५ पैकी २० मुले दगावली. काही दिवसात अजून ४ गेली. मी एकटा उरला होतो. रोज डॉक्टर येत आणि त्यांची बॅग उघडून औषध काढून देत असत.

इंग्लिश डिक्शनरीतल्या Love या शब्दापेक्षा Hope हा शब्द जास्त पावरफुल आहे असे मला नेहमी वाटते.

लोकांना वाटते मी वाचलो कारण मी लकी होतो. पण मी लकी नव्हतो मित्रांनो, माझ्या आईने मला लकी बनवले.

ज्या औषधाने २४ मुलांचे प्राण वाचू शकले नाहीत ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती.

मग तो दिवस उजाडला आणि डॉक्टरांनी मला, मी बरा झालोय अशी बातमी दिली.

पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, "हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही, याने आपले टीन एज पाहिले तरी तो एक चमत्कार असेल."

पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच.

मी दवाखान्यात असतांना आईने मला एक वेलक्रो ग्लोव्ह आणि बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकायचो. हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हान उभे केले. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणे आवडू लागले.

मग एक दिवस मी आईला म्हणालो, "आई माझे एक स्वप्न आहे, मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार!"

मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही. पण तुम्ही काय करू शकणार नाही हे मात्र सगळेच सांगत सुटतात.

माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले. मला ताप यायचा, मला मेंदूज्वर झाला. माझ्या आयुष्यात मला पहिला हार्टअटॅक आला तेव्हा मी फक्त १२ वर्षांचा होतो.

लोक म्हणत होते, मी हे करू शकणार नाही, मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो.

वयाच्या १७ व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो.

एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखे असते. क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटत.

ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या १८ व्या वर्षी माझे करियर संपवणारा दुसरा हार्टअटॅक आला. मला घरी परत पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत 'अनफेअर' वागते आहे असे मला वाटायला लागले.

मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपतांना मी प्रार्थना करायचो, देवा मला उचलून घे. पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता आणी मला मृत्यू येत नव्हता.

पण परत एकदा मला माझा परमेश्वर इथेच भेटला आईच्या रुपात. तिने मला या नैराश्यातून बाहेर काढले.

नंतर मी बँकेची नोकरी जॉईन केली.

एक दिवस एक उंचापुरा माणूस जो आमच्या बँकेचा सीइओ होता त्याचे मला बोलावणे आले. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने प्रश्न विचारला, "डाऊन द लाईन पाच वर्षे तू कुठे असशील?"

मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले. दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार. चंद्राला नाही लागला तर किमान कुठल्यातरी ताऱ्याला तरी लागेल. मी बॉसला म्हणालो, "तुमच्या खुर्चीत!"

मित्रांनो, असे बॉसला म्हणू नये कारण ते कोणत्याही बॉसला आवडत नाही. माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली, मला त्रास द्यायला लागला.

पण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रासच माझ्या महत्वाकांक्षेचे फ्युएल ठरले. मी बेदम काम करायला लागलो.

वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो, दोन वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर, तीन वर्षांत यंगेस्ट स्टेट मॅनेजर, चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो.

वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या हाताखाली ६०० माणसे काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या १२० ब्रांचेस सांभाळत होतो.

माझ्याकडे मिलियन डॉलरचे घर होते, अरमानीचे सुट्स होते, रोलेक्सच घड्याळ होते, लाखभर डॉलरची कार होती.

पण हे यश मटेरियलास्टिक होते. आपण ज्या जगात राहतो त्या जगाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण त्या जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का?

7 months, 2 weeks ago

https://t.me/+_Q9hwgg4-k03NGFl

Telegram

Hollywood Films Hindi 🎬

@films\_movies\_hub

Marathi Business ideas - मराठी बिझनेस
7 months, 3 weeks ago

पुस्तक : फॉलींग फॉरवर्ड
लेखक : जॉन मॅक्सवेल

यश कसं मिळवावं, यशासाठी काय करावं यावर बरीच पुस्तकं आहेत, पण यशासोबतच अपयश देखील आलाच, त्यासाठी कसं तयार राहावं आपण काय चुका करतो ज्या टाळता येतील यावर हे पुस्तक या पुस्तकातील ७ अतिशय महत्त्वाच्या शिकवणी. पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करा.

  1. अपयश नाकारणे
    एखाद्या गोष्टीमध्ये खूप प्रयत्न करून देखील अपयश आल की बरेच लोक ते मान्य करत नाही, हे कसं झालं शक्यच नाही मला हे मान्यच नाही म्हणून दुःख करत बसतात, दुःख होण साहजिकच आहे पण त्यात डुंबून जाणं हा पर्याय नाही, अपयश नाकारू नका, ते स्वीकारा आणि ते का आल, कुठे चूक झाली यावर अभ्यास करा, आणि पुन्हा प्रयत्नांना सुरुवात करा.

  2. दुसऱ्याकडे बोटे दाखवू नका
    👉🏻 जेव्हा कधी लोक त्यांच्या आयुष्यात अपयशी होतात तेव्हा ते त्यांच्या यशाच्या अभावासाठी इतरांना दोष देऊ लागतात, पण इतरांकडे बोट दाखवून ते स्वतःचेच नुकसान करून घेतात कारण अपयश दुसऱ्यावर ढकलून त्यातून ते काहीच शिकत नाहीत, आणि चुकीची मानसिकता बनते.

  3. अपयश हे तात्पुरते आहे
    🔁 साध्य करणार्‍यांना समस्या तात्पुरत्या दिसतात म्हणून ते त्यांच्या समस्यांशी कधीच चिकटून राहत नाहीत.
    तुम्ही अपयशाला क्षणिक घटना म्हणून पाहिले पाहिजे, ते आयुष्यभराचे लक्षण म्हणून पाहू नये.

  4. वास्तववादी अपेक्षा सेट करा
    🍀आपल्या सर्वांना माहित आहे की परिपूर्णता किंवा परफेक्शन हे एक मिथक आहे.
    📍 या जगात कोणीही असे म्हणू शकत नाही की ते त्यांच्या जीवनात अयशस्वी झाले नाहीत म्हणून अडचणींची अपेक्षा करा कारण ते सामान्य आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी स्वतःला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करा.

५.सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा
🧠 आपण आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, दोषांवर दुःख करत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपला वेळ आपल्या ताकदीवर गुंतवावा, आपण यासाठीच जन्माला आलो आहोत जेणेकरून आपण आपली प्रतिभा जगासोबत शेअर करू शकू. यावर पूर्ण विश्वास ठेवा.

  1. उपलब्धींसाठी दृष्टीकोन बदला
    👤 जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्षात काम करणारा मार्ग सापडत नाही आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळत नाही तोपर्यंत तुम्ही विविध मार्गांनी प्रयत्न केले पाहिजेत.

  2. पुन्हा उभे रहा
    ज्या लोकांची ही मानसिकता साध्य होते त्यांच्याकडे अपयशच्या फक्त आठवणी आणि शकवणी असतात म्हणजे ते त्या अडथळ्यांना आणि नकारात्मक भावनांना लवकर विसरतात आणि त्यांच्या यशाच्या दिशेने पुढे जातात.

We recommend to visit

Shashwat Academy’ WE, the team, cater the 'EXACT KNOWLEDGE' to the upcoming civil servants. We address the young minds with the new thoughts.
Our complete focus is the 'EXAM PATTERN' itself.


Patil Sir: 8983569353

Last updated 2 weeks, 2 days ago

HD STATUS 🔐

जल्दी ज्वाइन करें सभी

join now 👇

Buy ads :- https://telega.io/c/MOTIVATIONAL_STATUS7

Last updated 1 month, 1 week ago

We bring you Lit Memes & Jokes 😍😂Clean Content 24/7😂😂🔥
I recommend you join now💪

Check out these channels

👉🏻 @wallpaper_channell1
👉🏻 @kenyanmemesandjokes
👉🏻 @quotesKe001
👉🏻 @twerk_videos1
👉🏻 @jokesempire001
Admin- @jokersmoker002

Last updated 3 weeks, 3 days ago