HD STATUS 🔐
जल्दी ज्वाइन करें सभी
join now 👇
Buy ads :- https://telega.io/c/MOTIVATIONAL_STATUS7
Last updated 3 months ago
Shashwat Academy’ WE, the team, cater the 'EXACT KNOWLEDGE' to the upcoming civil servants. We address the young minds with the new thoughts.
Our complete focus is the 'EXAM PATTERN' itself.
Patil Sir: 8983569353
Last updated 5 months, 3 weeks ago
We bring you Lit Memes & Jokes 😍😂Clean Content 24/7😂😂🔥
I recommend you join now💪
Also Check out these channels
👉🏻 @wallpaper_channell1
👉🏻 @kenyanmemesandjokes
👉🏻 @quotesKe001
👉🏻 @twerk_videos1
👉🏻 @KenyanMemesGroup
👉🏻 @leaks_kenya1
Last updated 1 day, 10 hours ago
Time is money, वेळ म्हणजे धन असा याचा केवळ अर्थ नसून 'वेळ साधणे' असा याचा खरा अर्थ आहे. यालाच 'मौके पे चौका' असे म्हणतात.
अन अशा संधी फारशा येत नसतात, आल्या की करेक्ट कार्यक्रम करायचा असतो. अन्यथा वेगाने प्रगती होत नसते.
महाराष्ट्रातील अनेक व्यवसायीक जेव्हा लोकांचे फक्त आधार कार्ड काढत होते, तेव्हा आम्ही काय करत होतो, हे सांगतो.
कोणताही बिझनेस छोटा नसतो, फक्त त्याचा गुणाकार करता आला पाहिजे. बेरीज करत करत गाडी पुढे सरकायला बराच वेळ जातो, त्यापेक्षा गुणाकार कधीही उत्तम.
मी स्वतः ई-सेवा केंद्र चालवणारा व्यक्ती म्हणूनच व्यवसायाला सुरुवात केली होती. मात्र त्या कामात हुशार होऊन 2016 नंतर महाराष्ट्रातील अनेक इ-सेवा केंद्रांच्या चालकांना मोफत trainings दिल्या. त्यामुळे त्यांच्याशी माझा संपर्क आला. दिलेल्या training मुळे त्यांचा बिझनेस वाढला. माझ्याबद्दल त्यांना विश्वास निर्माण झाला. माझं नेटवर्क वाढतच राहिलं. काही अडचणी आल्या तर ते मला विश्वासाने सल्ला विचारत असत.
सुरुवातीपासून माझा कल बिझनेसच्या गुणकाराकडे राहिलेला आहे. तसे पाहिले तर माझें बिझनेस मॉडेल अतिशय छोटेसे आहे. यातून इतर लोक दिवसाला जास्तीत जास्त 1000-1500 रुपये मिळवू शकतात.
मात्र मी काय केले, मी आधारच्या चार मशीन्स घेतल्या, त्या सतत नगरसेवकांकडे शिबिरासाठी busy ठेवल्या. सात माणसं कामाला होती आणि मी एक.
चार मशीन्स सांभाळायला चार मुलं होती.
तसेच आधार मशीन कुणाला विकता येईल का ते पाहिले, त्यासाठी गुजरातमधील एका कंपनीला contact केला, ती आधारच्या भारतभर असलेल्या मोजक्याच service provider पैकी एक होती. त्यांच्याकडून महाराष्ट्र-मुंबईसाठी vendor ship access मिळवला. महाराष्ट्रातील अनेकांना आधारच्या trainings दिल्या. त्यांना operator/supervisor चे license मिळवून दिले. ह्या लायसन्ससाठी रितसर exam होते, त्याच्या trainings घेतल्या. परीक्षेला बसवले. त्यातली consultancy करून revenue मिळवला.
शिवाय operator तयार केल्यावर त्याला त्याच्या गावात/शहरात आधार सेंटर टाकायचे असे, त्यासाठी त्यांना पूर्ण setup लावून दिला. त्यातून revenue जमवला.
त्यासाठी लागणारे 10 finger print device आणि iris scanner बंगलोरमधील कंपनीकडून मिळवले. ते आधार centre वाल्यांना विकून r
Revenue Generation केले. ह्या दोन device ची किंमत 60,000 रुपये आहे. शिवाय Installation वगैरेच्या कामातून पैसा मिळत असे.
आधार Enrollment मशीनला GPS Tracker असते. ते Gps Tracker इंडियामध्ये 3000 रुपयांना मिळते, तेच China मध्ये 1200 रुपयांना मिळते. बाहेर देशातून वस्तू कशा मागवायच्या, म्हणजे Import करायच्या, पाठवलेले पैशे बुडणार तर नाही ना, अशी धास्ती होतीच, याआधी आपल्या खानदानीत असले उद्योग कोणी केले नव्हते. तरी त्याबद्दल थोडासा अभ्यास केला. अभ्यासातून कॉन्फिडन्स आल्यावर Paypal वरून Payment करून भरपूर GPS Trackers मागवली अन इथे 2500 रुपयांना विकली. इंडियात 3000 रुपयांना मिळणारे Device आम्ही 2500 रुपयांना देऊ शकल्याने महाराष्ट्रभरातील भरपूर ग्राहकांनी मागणी नोंदवली.
असे एकाच Service मधून वेगवेगळ्या प्रकारे आत शिरून धंदा केला.
अशा आम्ही अनेक सेवा देत असू, आताही देतो. सगळ्या Services अशा पद्धतीने Explore करत असतो.
मौके पे असे अनेक चौके मारायचे संधी आली, तेव्हा फुल्ल धोनी स्टाईलने खेळलो, आणि एरवीच्या काळात राहुल द्रविडसारखे एकेक रन काढत पीचवर टिकून राहण्याकडे कल असतो.
असेच Leave and License Service बद्दल, आम्ही फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये मध्ये सेवा देत नाही. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक ह्या पाच शहरात काम करत होतो. अन त्यातून अधिकचा Revenue मिळवत होतो.
ह्या कामात दिवसाला दोन agreement चे ग्राहक मिळवले तरी त्या व्यवसायिक व्यक्तीला उत्तम व्यवसायिक मानले जाते, आम्ही त्याच ठिकाणी दिवसाला 12-15 Rental agreements सहज करत असतो.
आता आम्ही आमचा आवाका, नेटवर्क वाढवत वाढवत हीच Leave and License registration ची सेवा 'जगभर' खात्रीशीररित्या doorstep देतो आहोत. अट एकच, ज्या जागेचा भाडेकरार करायचा आहे ती प्रॉपर्टी महाराष्ट्र राज्यातील पाहिजे.
Backward Integration, Forward Integration ही नक्की काय भानगड असते, हे मला अजिबात माहिती नव्हते. मात्र तिचा अवलंब मी आधीपासूनच करत आलो आहे.
डोक्याडोक्याने काम केले की यश मिळतेच. संधी ओळखणे महत्त्वाचे असते, असे मला वाटते. आपण जे करत असतो, त्यातसुध्दा आणखी खूप साऱ्या संधी असतात, आपल्याला फक्त त्या ओळखता आल्या पाहिजेत.
जर गाईची दुध देण्याची क्षमता पाच लिटर आहे, तर अवघ्या अर्धा लिटरमध्ये खूश का व्हावे!
निलेश अभंग, कल्याण.
नोकरी करताना अनुभव वाढतो तसा पगार वाढतो. जितक्या जास्त वर्षांचा अनुभव तितका जास्त पगार मिळतो. Experience वाल्या उमेद्वाराला अधिकचा पगार देऊन नोकरीवर घेतले जाते.
असेच व्यवसायात वाढत्या अनुभवाचे खूप सारे फायदे आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कृती केल्यामुळे अनुभवाने काय करायचे नाही ते कळते. अनुभवामुळे आपल्याला व्यक्तींचा फोलपणा लक्षात येतो (ज्यांनी आपल्याला तू व्यवसायात आलास तर कधीही फोन कर, मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन अशी आश्वासने दिलेली असतात) आपणही त्यांच्यावर विसंबून राहतो, मात्र अनुभव घेतल्यानंतर कळते की तो उगाच राजकारणी माणसासारखा खोटी आश्वासने देत होता.
शिवाय कोणत्या प्रकारच्या जाहिराती करायच्या, कोणत्या प्रकारच्या नाही करायच्या, कोणते प्लॅटफॉर्म्स वापरायचे, कोणते वापरायचे नाही, आवश्यक लायसन्स कोणते ते सारे समजते.
कमावलेले पैसे कसे जमवायचे, बचत करायचे, शक्य असल्यास कुवतीनुसार लहानमोठ्या गुंतवणुकी करायच्या. (जे पहिल्यांदा व्यवसाय करताना बहुतांशी व्यवसायिक करीत नाहीत, त्यांना वाटते की आपल्याकडे पैशाचा flow असाच कायम राहणार आहे.)
व्यवसायात येणारी लहान सहान अपयशे, अनिश्चितता, नकार पचवण्याचा सराव झालेला असतो. त्यामुळे हाही अनुभव खूप कामी येतो.
अनावश्यक खर्च कसा टाळायचा, हे अनुभवातूनच कळते. अनुभव नसताना व्यवसायिक अंधाऱ्या वाटेतून चाचपडत चालत असतो, मात्र अनुभवरुपी टॉर्चमुळे अंधारातही वाट स्पष्ट दिसते.
एक छोटेसे उदाहरण देतो, मी जवळजवळ चार वर्षे सत्तर whatsapp groups वर रोज वा दिवसाआड माझ्या व्यवसायाच्या जाहिराती टाकायचो, मात्र कधीच एकसुध्दा प्रतिसाद मिळाला नाही. ह्या अनुभवामुळे मी आता ते करणे पुर्णतः टाळतो. मला असे वाटते की WhatsApp Groups मधील लोक तुम्हाला प्रत्यक्ष ओळखत असतील, तुमच्या अधूनमधून भेटीगाठी होत असतील तरच तुम्हाला ह्या WhatsApp advertisement चा उपयोग होऊ शकतो.(तुमचा अनुभव वेगळा असू शकतो)
अनुभवामुळे सराव होतो, सरावामुळे आपला प्रवास परिपूर्णतेकडे व्हायला सुरुवात होते, त्यामुळे व्यवसायात यशाच्या शक्यताही वाढतात.
नोकरी असो वा व्यवसाय वा जीवन अनुभवाचे खूप मोठे योगदान असते.
- निलेश अभंग, कल्याण
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या शहरात एखादा Business Networking Club जॉईन करा, आवर्जून करा.
आपल्याला व्यावसायिकांचा सहवास मिळतो, त्यातून जे केले पाहिजे ते आपण आपल्या व्यवसायात करत नाही आहोत हे कळते. तिथल्या अनेक व्यवसायिक मित्रांकडून व्यवसायाचे मार्गदर्शन मिळते, मुख्य म्हणजे व्यवसाय (ग्राहक) मिळतो. एकमेकांच्या Reference ने ग्राहक मिळत जातात. अनेकांना अनेक Service Providers तिथे भेटतात. अनेक Service Providers ना ग्राहक तिथे भेटतात. हाती घेतलेले काम जबाबदारीने पार पाडावे लागते. अन्यथा समूहात नाव खराब होऊ लागते, ज्याचा थेट परिणाम इतर सदस्यांकडून मिळणाऱ्या बिजनेसवर होतो.
तिथे आणखी प्रगती करु इच्छिणारे लोक असतात, त्यांच्याकडून ऊर्जा मिळते, आपण कशाबाबतीत मागे आहोत ते समजते. आपल्या व्यवसायात आणखी क्राफ्ट कसा आणता येईल, याचा आपण इतरांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धती पाहून विचार करू लागतो.
दर आठवड्याला, पंधरा दिवसाला तीस-चाळीस Business Owners ची प्रत्यक्ष भेट होते, अनेक विषयांवर चर्चा करता येते, सल्ला घेता येतो.
शाळा कॉलेजात मुले-मुली एकत्र शिकतात, ते एकमेकांपासून खूप काही शिकत असतात, जे त्यांचे शिक्षकही शिकवत नाहीत वा शिकवू शकत नाहीत, अशा अनेक आवश्यक बाबी ते शिकत असतात. शिवाय लोकांमध्ये (समाजात ) कसे वावरायचे, कसे बोलायचे, काय बोलायचे, काय नाही बोलायचे, कसे वागायचे याचे सारे शिक्षण विदयार्थ्यांना शाळेत, कॉलेजात मिळते, जे Home schooling मध्ये मिळणे शक्यच नाही, (ही Home schooling ची सर्वात कमजोर बाजू आहे) विद्यार्थी निरीक्षणांतून शिकत असतात.
तसेच व्यवसायिकही त्याच्या भोवती व्यवसाय करणारे लोक असतील तर त्यांच्याकडून कळत नकळत खूप काही शिकू शकतो. म्हणून मला असे Networking Platforms खूप महत्त्वाचे वाटतात.
आता माणसं आले तिथे राजकारण हे असणारच आहे. हेवेदावे, रुसणे खुपणे, एखाद्याची नालस्ती करणे हे आलेच. मी हा दोष त्या platform ला देत नाही, माणसं आले की हे सारे उद्योग होणारच. आपण ह्या पृथ्वीवरचा थोर जीव आहोत, ज्याचे प्रमाण आपण कुठेही गेलो की द्यायला विसरत नाही.
तुमचे साऱ्या चाळीस जणांशी मैत्र होणार नाही, मात्र एक-दोघे असे असतील की ज्यांना तुम्ही काही काळाने जिवाभावाचे मित्र म्हणू शकता, कारण आपल्या स्वभावाशी साधर्म्य असणारे लोक कुठल्याही समूहात कमीच असतात, जो तो त्याच्या स्वभावानुसार मित्रमंडळी निवडत असतो.
तुम्हाला प्रगती करावयाची असल्यास तुमचे सर्कल बदलणे, आणखी अद्ययावत सर्कलमध्ये प्रवेश करणे फार गरजेचे असते, जे तुम्हाला अशा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्समुळे सहज शक्य होते.
मात्र इथे मिळणाऱ्या मोठेपणात वाहवत जाऊ नये. जे वाहवत जातात त्यांचे नुकसान होतेच होते.
थोडक्यात, असे प्लॅटफॉर्म जॉईन करणे हा तसा नफ्याचा सौदा आहे.
- निलेश अभंग, कल्याण
समजा IPL जेवढी चालली तेवढी चाललीच नसती किंवा काही कारणाने IPL चे अर्थकारण गडबडले असते किंवा एखादी टीम बॅन झाली असती तर आपण निवडलेला खेळाडू चांगला असूनही नुकसान झाले असते. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीला बाहेरील परिस्थीचा फायदा/तोटा होऊ शकतो याची जाणीव ठेवून हुशार गुंतवणूकदाराने शेअर बाजाराबाहेरही गुंतवणूक केली पाहिजे. उदा. रिअल इस्टेट, सोने, debt म्युच्यअल फंड इत्यादी.
IPL ची फायनल कालच संपली आहे. महाराष्ट्रात निवडणुका पण संपल्याच आहेत. आता मोकळा वेळ मिळाला असेल आणि चर्चेचे आवडते विषय संपले असतील….तर जरा गंभीरपणे “पोर्टफोलिओ ऍनालिसिस” करायला घेऊया ! नेटभेटचे फेसबुक पेज, युट्युब चॅनेल आणि व्हाट्सअँप चॅनेल मध्ये याबद्दल बरच शिकायला मिळेल. तुम्हाला फक्त follow करायचं आहे ! कराल ना ?
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
कल्पना करा की २००८ साल चालू आहे. IPL चे पाहिले वर्ष आहे.
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत.
आणि तुम्हाला त्यांच्यापैकी एका स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे.
तर तुम्ही कोणता स्टॉक निवडणार आणि का ?
निर्णय घेणे तुम्हाला सोपे जावे म्हणून या सर्व खेळाडूंसाठी २००८ मधील IPL मधील त्या त्या संघानी मोजलेली किमंत (Stock Price) सांगतो.
महेंद्रसिंग धोनी - 6 cr
विराट कोहली - 12 Lakh
रोहित शर्मा - 4.8 cr
दिनेश कार्तिक - 2.1 cr
रवींद्र जाडेजा - 10 lakh
पुढे वाचण्यापूर्वी एक गुंतवणूकदार म्हणून यापैकी कोणता शेअर तुम्ही विकत घेणार याचा विचार करा. तुमचे उत्तर ठरले की पुढे वाचा….
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
चला आता तुमचे उत्तर ठरले आहे असे मी समजतो. आता या खेळाडूंना १६ वर्षांनंतर मिळालेली IPL Salary म्हणजे २०२४ ची आकडेवारी पाहूया. थोडक्यात तुम्ही निवडलेला शेअर किती वाढला आहे ते पाहूया.
(लेखापुरता IPL salary गृहीत धरली आहे. प्रत्यक्षात जाहिराती, स्पॉन्सरशिप आणि पार्टनरशिप मधून त्यांची कमाई वेगळी असू शकते. आता सोपं करण्यासाठी केवळ IPL मध्ये त्यांना मिळालेली बोली (IPL Salary) धरूया.)
महेंद्रसिंग धोनी -
2008 - 6 cr
2024 - 12 cr
विराट कोहली -
2008 - 12 Lakh
2024 - 15 cr
रोहित शर्मा -
2008 - 4.8 cr
2024 - 16 cr
दिनेश कार्तिक -
2008 - 2.1 cr
2024 - 5.5 cr
रवींद्र जाडेजा -
2008 - 10 lakh
2024 - 16 cr
सगळ्यात जास्त वाढ कोणत्या शेअर मध्ये दिसली ? तुम्ही निवडलेला शेअर मनाप्रमाणे वाढलेला दिसला का ?
प्रत्येक शेअरची वार्षिक दरवाढ (CAGR) पाहूया -
महेंद्रसिंग धोनी - 4.43%
विराट कोहली - 35.22%
रोहित शर्मा - 7.82%
दिनेश कार्तिक - 6.20%
रवींद्र जाडेजा - 37.33%
IPL मधील सर्वात भरवशाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी या शेअरची वाढ FD च्या दरापेक्षा कमी झाली आहे.
विराट कोहली या २००८ मधील नवख्या पण आशादायक खेळाडूने ३५% वार्षिक अशी भरघोस दरवाढ नोंदवली आहे.
रोहित शर्मा या तेव्हाच्या नवख्या पण धडाडीच्या फलंदाजाने सुरुवात तर चांगली केली होती पण पुढे म्हणावी तशी वाढ नोंदवलेली नाही.
दिनेश कार्तिक ची सुरुवात चांगली झाली मात्र सतत टीमच्या आतबाहेर असण्यामुळे त्याला म्हणावी तशी वाढ मिळाली नाही.
रवींद्र जाडेजा सुरुवातीला एकदम नवखा खेळाडू होता , संघात त्याची जागा गोलंदाज म्हणून होती पण प्रयत्नपूर्वक तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनला. आणि टीमसाठीचे त्याचे मूल्य सतत वाढवत नेले त्यामुळे स्वतःचीही किंमत वाढवत नेली. या यादीमधील इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक CAGR वाढ नोंदवत तो एक मल्टिबॅगर खेळाडू बनला.
तर मित्रहो, सांगायचा मुद्दा हा की कोणता स्टॉक किती वाढेल हे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मोठे चांगले (Blue Chip large Cap) स्टॉक फार वाढतील असे नाही. Growth Stocks वेगाने वाढले तरी ते सातत्याने वाढतील का सांगता येत नाही. आणि मल्टिबॅगर म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवू ते सर्वच लहान स्टॉक वाढतील हे ही सांगता येत नाही.
आणि तरीही वरील सर्व खेळाडू २००८ ते २०२४ पर्यंत खेळले म्हणून खूप Valuable बनले. एवढ्या आव्हानात्मक स्पर्धेत “दीर्घकाळ टिकून राहणे” हेच त्यांचे सगळ्यात मोठे यश आहे.
गुंतवणूकदार म्हणून आपल्याला यापासून काय शिकता येईल ?
Diversified Portfolio -
कोण्या एका जबरदस्त स्टॉकवर पैसे लावणे योग्य नाही. पोर्टफोलिओ आपल्याला या धोक्यापासून वाचवतो. आणि पोर्टफोलिओ बॅलन्सड असेल (Mix of Large cap, Mid Cap, Small Cap, Value & Growth) तरच तो गुंतवणूकदाराला सर्वाधिक फायदा मिळवून देऊ शकतो.
Consistency of Performance
या लेखापुरता आपण १६ वर्षांचा point to point डेटा पहिला. प्रत्यक्षात दर वर्षीचा प्रत्येक स्टॉकचा परफॉर्मन्स पहिला तर प्रत्येक वेळी सर्वाधिक कमाई केलेले शेअर्स वेगळे असतात हे लक्षात येईल. एका वर्षाचा परफॉर्मन्स बघून त्यात गुंतवणूक केली तर त्याच परफॉर्मन्सची पुनरावृत्ती पाहायला मिळेल असे नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये फक्त वाढ न बघता , वाढीतील सातत्य पाहणे अधिक महत्वाचे ठरते !
Risk Analysis
सुरुवातीला भरवशाचे वाटलेले कितीतरी खेळाडू IPL च्या ३-४ हंगामांनंतर दिसेनासे झाले. काहींचा परफॉर्मन्स खराब होता, काहींना दुखापतीने ग्रासले तर काहींचे केवळ नशीब खराब म्हणून निवडच झाली नाही. आपल्या पोर्टफोलिओ मधील काही शेअर्स सोबत पण हेच होऊ शकते. म्हणून शेअरच्या किमतीचा अभ्यास करण्याइतकाच त्यामागील कंपनीचा (Fundamental) अभ्यास करणे देखील आवश्यक ठरते.
Market Conditions
व्यवसायात Reference ने कामे मिळतात. अधिकाधिक reference ते लोक देतात ज्यांनी आपली Service वा product घेतले आहे. ज्यांना आपल्या सेवेचा वा उत्पादनाचा उत्तम अनुभव आला आहे.
त्यामुळे जो ग्राहक मिळाला आहे, त्याचे उत्तम पद्धतीने काम करून देणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, संपर्कात राहणे (फोन उचलणे) अतिशय महत्त्वाचे आहे.
नवख्या माणसावर कोणी विश्वास ठेवत नाही, ओळखीच्या माणसाला वा कुणी तरी Refer केलेल्या माणसाला लोक काम देतात.
कारण Refer करून काम व्यवस्थित पार पडले तर कोणी शाबासकी देत नाही, मात्र काही चुकीचे झाले की ज्याने Refer केले होते त्याला बोल लावले जाऊ शकतात, की कसा माणूस दिला म्हणून.
आम्ही गेली आठ वर्षे Online Rental agreement ची सेवा देत आहोत, हजारो ग्राहकांना जगभर सेवा दिली आहे, त्यामुळे Reference मधून आणि ज्यांनी याआधी सर्व्हिस घेतली आहे, ते लोक Leave and License registration Service साठी फोन करत असतात. त्यांचे Renewal साठी पुन्हा फोन करणे म्हणजे त्यांना आमचे काम आवडल्याची पोचपावतीच असते.
कामात जरी कधी गैरसमजाने, Communication Error मुळे आमच्या बाजूने काही चूकभूल झाली असली तरी ती आम्ही स्वखर्चाने दुरुस्त करून दिली आहे, अशा वेळी ग्राहकाला टाळत त्याला वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. कारण आपण त्याला टाळले की आपल्याला तीच सवय लागते आणि मग अशा असंतुष्ट ग्राहकांची साखळी वाढत जाऊन, हीच साखळी आपल्या व्यवसायाचा गळा आवळते, याची आम्हाला कल्पना आहे.
- निलेश अभंग, कल्याण
#businesspost
#randomthoughts
HD STATUS 🔐
जल्दी ज्वाइन करें सभी
join now 👇
Buy ads :- https://telega.io/c/MOTIVATIONAL_STATUS7
Last updated 3 months ago
Shashwat Academy’ WE, the team, cater the 'EXACT KNOWLEDGE' to the upcoming civil servants. We address the young minds with the new thoughts.
Our complete focus is the 'EXAM PATTERN' itself.
Patil Sir: 8983569353
Last updated 5 months, 3 weeks ago
We bring you Lit Memes & Jokes 😍😂Clean Content 24/7😂😂🔥
I recommend you join now💪
Also Check out these channels
👉🏻 @wallpaper_channell1
👉🏻 @kenyanmemesandjokes
👉🏻 @quotesKe001
👉🏻 @twerk_videos1
👉🏻 @KenyanMemesGroup
👉🏻 @leaks_kenya1
Last updated 1 day, 10 hours ago