❤️शब्द मनाचे❤️

Description
"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...

Contact :- @kailasbobade
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago

3 days, 3 hours ago

🌅 " आजचे सुविचार "

1) श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो.

2) शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल. हक्क सांगत बसण्यापेक्षा कर्तव्याची पुर्ती करणारी नाती जास्त काळ टिकतात.

3) माणसाकडे पैसे, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण.. त्यांची किंमत ही त्यांच्या स्वभावातूनच समजते.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

4 days, 3 hours ago

🌅 " आजचे सुविचार "

1) वेळ मिळत नाही अशी कारणे सांगूनही काही जण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण गमावतात.

2) 'आयुष्य' हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जातं. अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा होतो...!

3) कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार, स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती..!

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

4 days, 11 hours ago

आजही आपल्या कोणत्या, नात्यास नाव नाही
प्रत्येक पाखराला उपलब्ध, एकही गाव नाही

कशाला तोलायचे नाते, हळव्या भावनांनी
मनातल्या ओलाव्याला, बाजारात भाव नाही

पाझरणाऱ्या झऱ्याचे फक्त, पाणी च गोड आहे
दगडाच्या काळजाला इथे, कोणतेही ठाव नाही

घेउ कसे तुझे नाव, ओठांवरती हलकेच रं
तशी मजला कोणत्याही, नात्यांचीच हावं नाही

राहु दे असेच कुशीत, आपल्या सहवेदना जपतांना
आता ह्या टप्प्यावर जाणिवांना, होणार घाव नाही

कांचन ठाकरे

3 months ago

@ तुम्ही ज्या पदावर असाल त्याचे जे जे कर्तव्य असतील ते जर वेळेवर पूर्ण केले तर गरजू व्यक्तीची गरज पूर्ण होते आणि तुमच्या कर्तव्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य निर्माण होते........खर तर आज जिल्हाधिकारी पासून ते शिपाई पर्यंत, जिल्याच्या SP पासून ते होमगार्ड पर्यंत ,  शाळा , कॉलेज मधील शिपाई पासून मुख्याध्यापक, प्राचार्य पर्यंत आज प्रशासनात जितके काही पदे  आहेत त्या सर्व पदाचे एक वेगळे महत्व  आहे. खर एक साधा दाखला काढण्या साठी आपण तहसील मद्ये गेलो आणि एक लिपिक हजर नसेल तर तालुक्याच्या ठिकाणावरून परत यावं लागते.संपूर्ण दिवस जातो,पैसे जातात आणि मानसिक त्रास होतो, प्रशासनात जाण्यासाठी प्रत्येकाने अभ्यास केलेला असतो पणं खरी परीक्षा तर प्रशासनात गेल्यावर असते आपले जे जे कर्तव्य आहेत ते जर वेळेवर पूर्ण केले तर खरच तुम्ही त्या पदाचा सन्मान करत असता. कोणत्याच व्यक्तीला किंमत नसते खर तर किंमत तुमच्या पदाला असते आज तुमच्या कडे पद असते म्हणून कोणीही त्या कामाची तुमच्या कडून अपेक्षा करत असते.शासन तुम्हाला त्या बदल्यात वेतन ही देत असते. आज आपण बगतो की प्रत्येक पदाच एक वेगळ महत्व आहे तुम्ही शिपाई ही असाल आणि तुमच्या अधिकारात जे काम असेल ते काम तुम्हीच करू शकता आणि तुम्ही उपजिल्हाधिकारी ही असाल तरी तुमच्या अधिकारात जे काम असेल ते काम तुम्ही करू शकतात....आपण जेंव्हा वेग वेगळ्या कार्यालयात जातो तेंव्हा तिथे गेल्यावर आपल्याला समजते की अमुक अमुक साहेब आले नाही तेंव्हा किती त्रास होतो ही वेळ ज्यांच्यावर येते त्यांना कळते.. सर्व सामान्य व्यक्ती साहेब साहेब म्हणून आमचं  अमुक अमुक काम करा किंवा तुमची सही द्या या साठी चार चार वेळा चकरा मारतात कुठ तरी हे माणुसकीच्या विरुद्ध होताना दिसते...प्रत्येकाची जबाबदारी असते मी माझ कर्तव्य वेळेवर पार पाडेल अस जा ठरवलं तर सर्व सामान्य जे व्यक्ती आहेत त्यांना एकाच कामा साठी चार चार वेळा चकरा माराव्या लागणार नाही...साधं बँकेत ही गेल्यावर समजते एक आधार नंबर लिंक करायचा असेल तर पूर्ण दिवस जातो...असे खूप काही उदाहरण आहेत आपण प्रशासनात आहे किंवा एखादे पद आहे म्हणजे सर्व सामान्य व्यक्तीला त्रास होईल...अस कृत्य नसावं..तुम्ही ज्या कोणतीही पदावर असाल त्या पदाचे कर्तव्य वेळेवर पार पाडले तर सर्व सामान्य जनतेला होणारा त्रास कमी होईल....
BY SANTOSH SIR
#शब्द_मनाचे
Join
?****@shabdamanache

3 months ago

? " आजचे सुविचार "

1) दररोज सकाळी आदल्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी विसरून जायची सवय लावली तर जीवनात सुखच सुख आहे...!

2) आयुष्यात काही शिका अथवा नका शिकू पण... लोकांना ओळखायला नक्की शिका, लोकं दिसतात तशी अजिबात नसतात...!!

3) जी माणसे सतत स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सकारात्मक बोलतात, अथवा विचार करतात त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच प्रभावित करणारे असते...!

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे ♥️
Join?*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

3 months ago

ती.... ?

आठवताना ति मला,
निखळ हसताना दिसते..

सुरकुतलेल्या हातांना पाहिल,
कि मला माझी आजी च दिसते..

सोबत नसतानाही ती ,
कनाकनात असते..

थोडा एकांत भेटला कि ,
ती असल्यागत भासते..

कधी खचून रडलच ,
कि ती माझ्या वरच हसते..

दिसेनाशी झालीच कि ,
पुन्हा तुला शोधत बसते..

आठवली ती कधी तर माझ्या,
चांगल्या कर्मात दिसते..

शोधत राहिले आसमंतात,
तरी आजी हद्दयातच वसते..

??????

शुभांगी शिवाजी शेळके
(धाराशिव✍?)

5 months, 3 weeks ago

? " आजचे सुविचार "

1) कधी कधी क्षमता असूनही माणसं आयुष्यात यशस्वी होत नाहीत कारण... माणसाच्या क्षमता माणसाचं यश-अपयश कधीच ठरवत नाहीत माणसाचे निर्णय ठरवत असतात.

2) यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे.

3) अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join?*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

5 months, 3 weeks ago

गुल मोहर
गच्च लाल गुल मोहर पहिला की हेवा वाटतो. किती दिलय याला सृष्टीने भर भरून...!!! एवढे दान किती श्रीमंत दिसतो गुल मोहर... नाव ही शानदार त्याचे. ज्या पाना तुन कळी, पाकळी खुलली... ती पान गौणत्व घेतलेली... झाकून घेतले त्यांनी या लाल बुंद आकाशाखाली... जणू हे एक झाड एक स्वतंत्र विश्व्... त्याचेच!!! डोक्यावर लाल केशरी अशी उगवलेली सकाळ... न मावळणारी झाडाखाली हीच केशरी चादर... किती वैभव हे देखणे सहज लक्ष व्यापतो हा गुल मोहर. आणि त्याच्या छायेत विसावयाचे मनात येते. पण मनात येते त्याचे निष्पर्ण होणे. तप्त उन्हात त्या तप्त झळा झेलून घेण्यासाठी... उभाच असतो गुल मोहर यातना झेलत... पण थान पत्ता ही लागू देत नाही. कुणाला भर मध्यानात हा बादशहा फुलायची तयारी सुरु करतो. कमाल या यातनां नंतर सुख ही धावत येईल फल द्रूप होणारी आशा त्याच्या उन्हातल्या घरी ही एखादी श्रावण सर घेऊन सुखद गारवा येतोच हेच जणू सांगतो गुल मोहर. मला होता येईल का गुल मोहर???
मी सुद्धा बघावी वाट सुखाची केशरी सायंकाळ होण्याची
मी ही सोसेल का गुल मोहरा सारखे उन्हेरी घाव??
मला ही गुल मोहर होणे जमेल का?
शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ

5 months, 3 weeks ago

? " आजचे सुविचार "

1) दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन अस्मानाचा फरक असतो.

2) आयुष्यात तडजोड तिथेच करायची जिथे आपल्या भावनांची मोडतोड होत नाही.

3) वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे, तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join?*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

8 months ago

? " आजचे सुविचार "

1) माणसाला माणसा पासुन दुर करते ती पहिली गोष्ट आपली जिभ, दुसरी म्हणजे पैसा होय.

2) आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे.

3) सुख आणि समाधान यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, आज लोकांकडे सुख आहे, परंतु समाधान नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join?*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago