Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
श्वेता तिवारी, हिंदी सिरीयलमध्ये काम करणारी अभिनेत्री. तिने 2007 साली कोर्टात राजा चौधरीपासून separate होण्यासाठी filing केली. 2013 ला घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया संपली. दोघे वेगळे झाले.
श्वेता तिवारी 2021 साली एका मुलाखतीत राजा चौधरी कसा वाईट होता, हे सांगते, त्याच्याविरोधात बोलत राहते. तिच्या म्हणण्यात तथ्य आहे, असे मी मानतो.
तरी तब्बल वेगळे होऊन 8 वर्षे लोटूनही तिच्या डोक्यातून राजा चौधरी गेलेला नाही. ती अजूनही नकारात्मक image का असेना त्याचे ओझे वाहतेच आहे. त्याच्याबद्दल बोलतेच आहे.
श्वेता तिवारीसारखे आपणही आयुष्यातून वजा झालेल्या, वजा केलेल्या लोकांबाबत बोलत राहतो, विचार करत राहतो, त्यांची ओझी वाहत राहतो, हे मला मुलाखत पाहताना पटकन realize झाले. शेवटी आपण त्या व्यक्तीला-त्या व्यक्तींना मानगुटीहून खाली उतरवतच नाही. आपल्या अशा वागण्याने आपल्या नकळत ती व्यक्ती आपल्यावर राज्य करीत असते अन आपण गुलामासारखे त्यांचेसाठी राबत असतो.
गढूळ पाण्याने भरलेली बादली रिकामी करून नवीन स्वच्छ पाणी भरणे वा खोलवर तुरटी फिरवत गढूळपणा संपवणे गरजेचे असते. तसे न करता आपण मात्र आठवणींचा चिखल चिवडत राहत, आपल्या मनाला वेदना देत राहतो.
आपल्या मनाला वेदना देणाऱ्या सर्व विचारांना थांबवणे, रोखणे हे आपले इतिकर्तव्य आहे, असे मी समजतो.
आपल्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे, आपल्या आनंदाआड येणाऱ्या सर्व विचारांचा क्षय करण्याला आपले प्राधान्य असले पाहिजे, असे मनापासून वाटते.
- निलेश अभंग, कल्याण.
https://t.me/+CEfdsvjYr0RkNzNl
Marathi video
जे झाले तेही गैरसमजाने हेही, पण मन मानत नव्हते. तिने टाकलेला कटाक्ष... स्वप्नातही येत होता.
विज्याची लग्नाची तारीख ही ठरली. मी त्या लग्नात गेलो आणि चुकून मधू समोर दिसली तर... या विचाराने मी हैराण होतो. विजय त्याच्यात मशगुल होता... वडील बाहेर असायचे त्यामुळे माझी अस्वस्थता आईच्या लक्षात आली. तिकडून आल्यावर मी झालेली गोष्ट गमतीचा भाग म्हणून मी तिला सांगितली होती. पण ते सारे प्रकरण विसरून जाऊ असे मलाही वाटले.आईने हे अप्पांना सांगितले असावे.
त्यादिवशी लग्नाच्या व्यवस्थे संबंधी बोलण्यासाठी प्रभाकाका घरी आला तेव्हा अप्पा त्याला म्हणाले की आता ashwinchehi करून टाकू ह्यावर्षी. मग अप्पा आणि काका बराच वेळ बोलत बसले. मला ऑफिस ला जायचे असल्याने मी बाहेर पडलो.
विज्याचे लग्न झाले तेव्हा माझें लग्न ठरवण्याच्या हालचालीना वेग आला होता. सहा महिन्यानंतर माझेही लग्न झाले. त्यात प्रभाकाकाने फार मदत केली.... किंबहुना त्याने माझी गॅरेंटीच घेतली म्हणा ना..माझ्या सासरच्या लोकांनीही चांगले सहकार्य केले.त्याकाळी अंतरजातीय विवाह आणि तेही ठरवून, शक्यच नव्हते.
मी ऑफिसला निघालो.
" मधू मी जातो ग "
डोक्यावर पदर घेतलेली मधू लगबगीने बाहेर आली आणि मला बघून तिने मान डोलावली
" लवकर या हं. मी वाट पाहते. "
मी प्रसन्नचित्ताने बाहेर पडलो.
माझे लग्न मधुशीच झाले हे सांगायला नकोच. आणि हो.. त्यासाठी मधुनेही हट्ट धरला होता... हे मात्र सांगायलाच हवे...
©® विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
पसंद आहे मुलगी ©®विवेक चंद्रकांत...
खूप जूनी गोष्ट... विजयने मला निरोप दिला.अश्विन ... उद्या मला मुलगी बघायला जायचे आहे तर मित्र म्हणून तू पण चल. त्यावेळी मोबाईल नव्हते. लँडलाईन अगदी मोजक्या लोकांकडे. लग्नाअगोदर फोटो पाहायला मिळे पण तो स्पष्ट नसे... आनंदच सर्व.
मी आईला सांगितले की मी विज्याबरोबर जाणार आहे त्याच्यासाठी मुलगी बघायला तर आई नको म्हणाली. तरीही मी ऐकले नाही. कारण नवरदेवाचा जवळचा मित्र म्हणून मला जरा भाव खाता आला असता. शिवाय माझेही लग्न बाकी असल्याने पुढे हा अनुभव आपल्याला उपयोगी पडू शकतो हाही विचार होताच.
सकाळी विज्याचे आईवडील, मामा, एक मध्यस्थ आणि आम्ही दोघे म्हणजे मी आणि विज्या असे सगळे st ने जवळच्या गावाला निघालो. (गाव एक दीड तासावर ). तिथे पोहचलो. मुलींवाल्यांनी घर जरा साफसूफ करून ठेवले होते. आम्ही दिवाणखान्यात बसलो. मुलीचे वडील, मामा आणि त्या गावातले एक दोन लोक होते. थोड्या गप्पा झाल्यावर मुलीने चहा आणून दिला. मुलगी नाकीडोळी चांगली वाटली. विज्याला मी कोणाचे लक्ष नाही हे पाहून ? इशारा केला.
तेवढ्यात आतून मुलीच्या वडिलांना बोलावले... ( बहुदा मुलीच्या आईने ) ते पाच मिनिटात बाहेर आले. तोंपर्यंत अगं एवढी काय घाई? अहो विचारायला काय हरकत? अशी काहीतरी कुजबूज आमच्या कानी पडली.
ते आले तसे माझ्याकडे बोट दाखवून विज्याच्या वडिलांना (त्यांना आम्ही प्रभाकाका म्हणायचो ) विचारू लागले.
"हे कोण?"
"हाही आपलाच पोरगा आहे... अश्विन .,. म्हणजे लहान भावाचा पोरगा." (प्रभाकाका आणि माझे वडील मित्र, पण जाती भिन्न होत्या.)
मग माझ्याबद्दल समोरून बरीच विचारणा झाली. म्हणजे शिक्षण, नौकरी वगैरे.प्रभाकाकानीं सगळ्यां प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.
नंतर नास्ता दिला. खरे तर त्याकाळी मुलगी पसंद आहे असे लगेच सांगत नसतं पण प्रभाकाकाला काय वाटले कोणास ठाऊक त्याने बैठकीतच मुलगी पसंत आहे हे सांगितलं आणि देण्याघेण्याचं नक्की करू असे आडवळणाने सांगितले.
देण्याघेण्याचे ठरणे म्हणजे मोठे कठीण काम त्याकाळी. हुंड्यावरून घासाघिस, लग्नाला किती लोक येणार? व्यवस्था काय? सोने किती देणार? मेनू काय? दोन तीन चार तास बैठक चाले. सुदैवाने दोन्हीकडची मंडळी समजदार होती. त्यामुळे लवकर देण्याघेण्याचे संपले. मग एका कागदावर सगळी नोंद करण्यासाठी आमच्याकडच्या एका माणसाने कागद काढला पण त्याला थांबवत मुलीच्या वडिलांनी सांगितले
"अजून एक एक कप चहा घेऊया. मग नोंद करू."
थोडया वेळाने एक दुसरीच मुलगी चहा घेऊन आली. तिही दिसायला सुंदर होती. चेहरा मोहरा मुलीच्या चेहऱ्याशी मिळतजुळता.
"ही मधू. माझ्या भावाची मुलगी. हिचेही बघतोय आम्ही लग्नासाठी. जमले तर दोन्हीचे एकाच मांडवात. बैस ग पोरी."
मधू अवघडवून बसली. तिने हळूच माझ्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.मी खल्लास.
प्रभाकाकाने तिला जुजबी माहिती विचारली. नंतर ती उठून गेली.
"कशी वाटली आमची मधू?"
"म्हणजे?"प्रभाकाका ने विचारले.
माझ्याकडे बोट दाखवत मुलीचे वडील म्हणाले " यांच्यासाठी म्हणतोय मी. पसंद असेल तर एकाच मांडवात होऊन जातील दोन्ही बहिणींचे लग्न. एकाच घरात देऊन टाकू. "
आता मात्र प्रभाकाका गडबडला. हे असे एकदम स्पष्टपणे विचारले जाईल अशी त्याला कल्पना नसावी.मध्यस्त त्यावेळी तंबाखूची पिंक टाकायला बाहेर गेले होते.
"अहो असे कसे सांगू? त्याचे आईवडीलांचे मत घ्यावे लागेल. मी कसा काय निर्णय घेणार?"
"तुम्ही चिंता करू नका. आमची मधू त्यांना पण आवडेल. देण्याघेण्याचे तुम्ही पाहिलंच. आम्ही काही कमी पडू देणार नाही. तुम्ही मोठे आहात निर्णय घ्यायला."
" ते शक्य नाही. हो. " प्रभाकाकाला काय बोलावे समजेना.
"उद्या तुम्ही तुमच्या भावाला आणि वहिनीला पाठवून दया, हवे तर."
गोष्टी भलतिकडेच चालल्या हे बघून प्रभाकाका उठला आणि मुलीच्या वडिलांना घेऊन बाहेर गेला. पाच मिनिटांनी दोघे आत आले तर मुलीच्या वडिलांचा चेहरा उतरलेला होता. ते घाम पुसत होते. त्यानंतर बाकी गोष्टी पटापट झाल्या. जेवण झाल्यावर मुलगी सगळ्यांच्या पाया पडली. आणि आम्ही परत निघालो.
येतांना मी प्रभाकाकाला काय झाले ते विचारले.त्याने प्रामाणिकपणे त्या लोकांना सांगितले की त्या मुलाचे वडील माझ्या सख्या भावापेक्षा जवळचे असले तरी ते आपल्या जातींचे नाही.
मी घरी आलो आणि अस्वस्थ झालो. विजयचे लग्न ठरले ह्याचा आनंद होता तर मधुची छबी नजरेसमोरून हलत नव्हती..जे झाले ते विसरून जायला हवे होते. कारण ते प्रत्यक्षात येणे अशक्य होते. जाती वेगळ्या तर होत्याच त्याकाळी तर हे खूपच मोठे कारण होते. ( अंतरजातीय विवाह बहुतेक प्रेमाविवाह असत आणि तेही समाज सहसा accept करत नसे.) आणि विज्याची घरची परिस्थिती चांगली होती. शेतीवाडी होती. तिकडची मंडळीही तोडीसतोड होती. आमच्याकडे मी,वडील सगळे नौकरीवाले.. खाऊनपिऊन सुखी. त्यांची बरोबरी अशक्य.सगळ्या गोष्टी मान्य होत्या...
हल्ली जरा सुट्टी मिळाली कि जगबुडी झाल्यासारखे लोक "विकेन्ड" साजरा करायला कुटुंबला घेऊन निघतात. जाण्यायेण्यात सात आठ तास (ट्रॅफिक नसेल तर), तिथे जाऊन गर्दीत मिसळून थातुर मातुर साईट सिईंग करायचं किंवा रिसॉर्टच्या रूम मध्ये टीव्ही पहात झोपून राहायचं.
सुट्टी संपवून दमून यायचं आणि दुसर्या दिवशी कामाला जुंपायचं! आपण नक्की का जातो वीकएंडला?
कशापासून लांब पळतो?
मला वाटत रोजची चाकोरी मोडणे हा त्यामागील महत्वाचा हेतू असतो.
चाकोरी म्हणजे काय?
नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा आणि बायकोचे घरकाम?
चाकोरी म्हणजे रोजची मेल्स, व्हाट्सअँप, फेसबुक, टीव्ही, गर्दी, ट्रॅफिक? मग हे मोडायला, ह्यापासून आराम मिळवायला परत त्यातच का जायचं?
सुट्टीच्या दिवशी घरातलं वायफाय आणि टीव्ही बंद करून टाकावे. फोन स्वीचऑफ करून कपाटात ठेवावा. मुलांची अभ्यासाची पुस्तके दप्तरात भरून ठेवावी. किचनचा गॅस बंद ठेवावा. खूप गप्पा माराव्या. मुलांशी खेळावे, वयस्कांना वेळ द्यावा, बाहेरून ब्रेकफास्ट सकट सर्व मिल्स मागवावी.
सर्वांना मान्य असेल तर जवळचे भावंड किंवा जिवलग मित्रांना सहकुटुंब घरी बोलवावे. गप्पांचे फड जमवावे, पत्ते खेळावे, गाणी ऐकावी, वाद्यावरची धूळ झटकून त्यावर एखादा साज छेडावा, मस्त पुस्तक वाचावे.
बायकोला सकाळी सायंकाळी स्वहस्ते चहा करून द्यावा.
नको ती गर्दी, नको ते ट्रॅफिक, नको ते ड्रायव्हिंग!
विकेन्ड कधी एन्ड होईल ते कळणार सुद्धा नाही. एन्ड न होणाऱ्या अनेक आठवणी देत!
अनावश्यक प्रवास तसेच प्रदूषण टाळा ! आनंद मिळवण्यासाठी लांबचा प्रवास किंवा पैसे खर्च केलेच पाहिजेत असे नाही.
आपणच पुढील पिढीला चुकीच्या सवयी लावत आहोत अस नाही ना ?
✍️ मंदार जोग
मोबाइलच वेड लागलं
एक वेड कारमध्ये मोबाईलवर
बोलत बोलत पुण्याला चाललं ,
फोनवर बोलता बोलता ते,
ठाण्याला पोहोचल.
वेड लागलं या माणसांना
मोबाइलच वेड लागलं.....
एक वेड हेडफोनवर गाणी ऐकत
ऐकत दात घासू लागलं
टूथपेस्टच्या ऐवजी सेविंग क्रीम हाती घेतलं.
वेड लागलं या माणसांना
मोबाईलच वेड लागलं.....
एक वेड मोबाईलवर ,
व्हाट्सअँप पाहत पाहत मंडईला चाललं,
पिशवीच्या ऐवजी बनियन हाती घेतलं
खड्यात पडला शर्ट फाटला,
तोही उघडा चालला .
एक वेड मोबाईलवर मेसेज ,
पहात पहात जेवू लागलं ,
भातात आमटीच्या ऐवजी पाणी घालून , खाऊ लागलं.
वेड लागलं या माणसांना
मोबाईलच वेड लागलं....
लेखक- चैतन्य नागरहल्ली (उपनाम-चिंटू)
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago