Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated vor 14 Stunden
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 Monate, 3 Wochen her
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 Jahr, 8 Monate her
बाबासाहेब... ?
✍️"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असं एक नाव आहे की,जे नाव घेवून असंख्य लोक मोठे झाले.इतकच नाही तर ज्यांना कधी गल्लीतले लोक सुद्धा ओळखत नव्हते.त्यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरामुळे दुनिया ओळखायला लागली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक चलनी नाणं आहे त्यांच्या अनुयायांना तर ते हवेच असतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करणाऱ्या मुर्खांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही..आणि हेच पूर्ण सत्त्य आहे त्यामुळे व्यक्ती कोणताही असो,आंबेडकर यांचा अनुयायी असो वा विरोधक बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तुम्हाला लोक तुमची किमान दखल तरी घेतात...हे सत्त्य सर्वांनी मान्य केल पाहिजे..!"
©️*®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
लिखाण दी.27सप्टेंबर 2023
✍️संपर्क -:*@ABCs1432
ज्वारी...
✍️"आमच्या लहानपणी गावाकडे ज्वारी हेच प्रमुख पीक होतं. पावसाळ्यात सगळीकडे हिरवीगार ज्वारीची शेती दिसायची.हिवाळ्यात हुरडा खाण्यात खूप मजा होती ज्वारीचे कणसं भाजून त्यामध्ये तीळ टाकून खाल्या जात होतं.. एक काळ असा होता की तेव्हा गावाकडे प्रत्येक घरी ज्वारीच्याच भाकरी असतं.गव्हाची पोळी डोळ्याने दिसत नव्हती.. गावातल्या एखाद्याच श्रीमंताच्या घरी गव्हाच्या पोळ्या असतं.नाहीतर गरिबाला फक्त दिवाळी किंवा इतर सणालाच पोळ्या मिळायच्या.कारण गहू खूप महाग होते.नंतर काळ बदलला, परिस्थिती बदलली सिंचन सुविधा वाढल्या आणि गव्हाच पीक आल.. जस गव्हाच पीक आल तस ज्वारी, बाजरी मागे पडली खर पाहता ज्वारी, बाजरीची भाकर पचायला सोपी आणि गव्हापेक्षा पोषक असते.. पण लोकांना नरम चारा हवा असतो.. ?म्हणून लोक गव्हाच्या पोळीच्या प्रेमात फसले.. ?*?आणि आता त्यांना ज्वारीची आठवण येते.. ठेचा भाकर हवी म्हणतात..अश्या पिकाच्या अनेक जाती नष्ट झाल्या त्याच संवर्धन करणं आवश्यक आहे..!"
✍️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
( पर्यावरण प्रेमी ?)
लिखाण दी 25सप्टेंबर 2023
( गावाकडच्या आठवणी )
✍️संपर्क -:*@ABCs1432
मानसिक तणाव
आणि उपाय योजना.....!
लेखक मार्गदर्शक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️**"मानसिक तणावाने अनेक माणसं ग्रस्त आहेतं, अनेक माणसं रोज प्रचंड तणावात येतात,तणाव हा प्रामुख्याने रात्री येतो कारण दिवसभर आपण कामात असतो,रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेंदूला थोडी विश्रांती मिळते.आणि नेमक त्याच वेळी डोक्यावर टेन्शन यायला लागतात. दिवसभरात एखाद काम पूर्ण झालं नाही की दिमाख हँग होतो.. MPSC UPSC स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता सतावायला लागते आपण यशस्वी होवू कां नाही..? नाही झालो तर मग काय? असे वेगवेगळे प्रश्न मनात येतात,तर हे सगळं कां होत..? यावर आपण चर्चा करू आणि त्यावर उपाययोजना सुद्धा बघू..
1)शांत आणि प्रसन्न वातावरणाचा अभाव..
-खरं तर माणसाची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आणि मेंदूची ताकद वाढण्यासाठी शांत आणि प्रसन्न वातावरण हवं असतं.शुद्ध ऑक्सिजन हवा असतो पण अलीकडच्या प्रदूषित जगात शुद्ध ऑक्सिजन मिळण फार कठीण झालं आहे.. त्यामुळे अलीकडे काळात तरुण पिढीचा मेंदू आयुष्यात येणारे वेगळेवेगळे तणाव झेलण्यास आकार्यक्षम असा आहे.. मेंदूला शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी व्यायाम व विपश्यना आवश्यक आहे आणि त्यासाठी शांत आणि प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरण हवं
2)धावपळ..
"माणसाच जीवन म्हणजे जगण्यासाठी सुरु असलेला एक संघर्ष आहे सततची धावपळ आहे.. त्यामुळे अश्या धावपळीत माणसाच आयुष्य इतकं busy झालं आहे की, माणसाला विचार करायला चिंतन मनन करायला वेळ उरला नाही.. चिंतन मनन ध्यान नं करणे हे सुद्धा मानसिक तणावाच कारण आहे..
3)ध्वनी प्रदूषण
- मानवी कान हा खूप नाजूक असतो. त्यामुळे विशिष्ट मर्यादेपर्यंत आवाज सहन करण्याची क्षमता आपल्या कानात असते मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी गाणे आपल्या आसपास वाजत असले की चिडचिड सुरु होते.कारण कानाची ऐकण्याची क्षमता संपलेली असते.. त्यामुळे कधीही कोणतेही उपकरण असो आवाज कमी असावा...
4)अनुभवाची कमी...
- प्रत्येक माणूस हा अनुभवातून खूप काही शिकत असतो.त्यामुळे आयुष्यात येणारे दुःख, कठीण परिस्थिती संकट आयुष्यात आली की आपल्याला त्याला समोर कस जायच हे शिकता येत.. त्यांमुळे अनुभव कमी असतील तर तणाव येतोच..
5)अतिवीचार..
- माणूस हा विचारशील प्राणी आहे माणूस सतत स्वप्नरंजन दुनियेत असतो आणि सतत स्वप्न पाहत असतो.. स्वप्न पाहणं ही चांगली गोष्ट आहे पण सतत विचार करणं चुकीचं आहे. अतिवीचारामुळे माणूस आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो त्या अस्तित्वात नसतात.. छोट्या छोट्या आणि नको त्या गोष्टीवर विचार करत बसणं म्हणजे डोक्यावरच टेन्शन वाढवून घेणं आहे.. त्यामुळे अतिविचार टाळा...
अतिवीचार केल्याने बौद्धिक टाकद कमी होते..
उपाय योजना..
????
1)मानसिक तणाव मुक्तीसाठी अतिवीचार करणं टाळलं पाहिजे..
2)ध्यान आणि विपश्यना करा..
3)स्वतः साठी वेळ द्या कधी कधी एकांत आणि शांत वातावरनातं जा..
4)कोणत्याही गोष्टी मनात ठेवू नका जवळच्या व्यक्तीला सांगा मन हलक होईल आणि उपाय सुद्धा सापडेल.. कारण कोणत्याही गोष्टी मनात ठेवल्या की भावनेचा स्फ़ोट होवू शकतो..
5)आपल्या आसपास शांत आणि प्रसन्न वातावरण तयार करा..
निसर्गाच्या सहवासात रहा..
6)सुमधुर संगीत हे मानसिक तणाव कमी करत त्यामुळे वेळोवेळी सुमधुर संगीत ऐकां चित्रपट बघा..
7)सतत सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार कधीच करू नका..
8)भविष्याबद्दल अधिक चिंता करत बसू नका आणि भूतकाळात रमु नका जे झालं ते झालं काही गोष्टी जिथल्या तिथे सोडून नव्याने एक नवं आयुष्य सुरु करा..
9)काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजे काही डिलीट केल्या पाहिजे प्रत्येक गोष्टीला धरून बसू नका..
10)भूतकाळात अधिक रमू नका आणि भविष्याची अधिक चिंता करू नका..
आज आता आपण जे करत आहोत त्यावर लक्ष केंद्रीत करा.. आणि आयुष्यात यशस्वी.. व्हा...
Be Happy and Be Positive ?
लिखाण दी 15सप्टेंबर 2023
प्रतिक्रिया नक्की कळवा..
लेखक संपर्क -:8806379959 टेलिग्राम ID -:@ABCs1432 (टीप -:हे लिखाण कोणीही लेखकांच नाव कट करून इतर ठिकाणी share करू नका )**
*??√√ राज्यासेवा PSI STI ASO पूर्व मुख्य मुलाखत परीक्षाभिमुख माहितीसाठी आजच जॉईन करा??
?♂️जाँईन करा @eMPSCKattaBhushanSir2021http://t.me/eMPSCKattaBhushanSir2021 *अभ्यास सुरू करताना आजपर्यंत कसे प्रश्न विचारले गेले ते पाहावे आणि अभ्यास करताना मनातल्या मानत प्रश्न तयार करावेत त्याचबरोबर जो भाग लक्षात राहणार नाही अथवा महत्वाचा वाटतो त्याच्या शॉर्ट मध्ये नोट्स काढा..वाचताना घाई करू नका..शांतपणे समजून उमजून वाचा..एखादा कन्सेप्ट समजत नसेल तर आपल्या ज्याला चांगली त्या विषयावर पकड आहे त्यांना विचारा..त्यावर अधाररीत प्रश्न कोणत्याही मार्केटमधील प्रश्नसंच मधून सोडवा..आपण मागील परीक्षेत का fail झालो याची कारणे शोधा आणि ती एका डायरी मध्ये लिहा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा..अभ्यासासाठी छोटासा ग्रुप तयार करा..एकमेकांना नोट्स शेअर करा..खूप वेगवेगळ्या पुस्तकसूची आणि अभ्यासाच्या strategy मुळे गोंधळून जाऊ नका.कोणतेही तुम्हाला योग्य वाटेल ती वापरा.हि परीक्षा पास होण्याचा कोणताही एक विशिष्ट मार्ग नाही.वेगवेगळ्या मार्गाने यशस्वी होता येते.कोणतापण एक चांगला मार्ग निवडा.कोणतेही पुस्तकसूची वापरा.भरमसाठ पुस्तके खरेदी करू नका.कोणतेही एकच चांगले पुस्तक करा.हि परीक्षा पुस्तकांची परीक्षा नाही.आपण जे वाचले आहे त्यावर confident राहावा.खाली मी मोबाईल चा वापर कसा करता येईल ते लिहले आहे ते बघा तुम्हला जमले तर use करा...किती तास अभ्यास केला यापेक्षा किती तो अभ्यास आत्मसात झाला यावर भर द्या..भरपूर प्रश्न हे शालेय पुस्तके,इकॉनॉमिक सर्व्हे, लोकराज्य मासिके,शासनाच्या वेबसाईट्स यावर आधारित असतात.त्यांचा चांगला अभ्यास करा...लक्षात घ्या हि तुमची आत्मविश्वासाची परीक्षा आहे..जे उमेदवार upsc आणि mpsc या दोघांचा अभ्यास करतात त्यांनी कोणत्यातरी एक परीक्षा द्यावी कारण दोघांचा अभ्यासक्रम,अभ्यास approach आणि परिक्षपद्धती मध्ये फरक आहे..जर तुम्ही upsc चा अभ्यास सुरु केला नसेल तर mpsc द्या आणि जर तुमचा optional विषयाचा अभ्यास चांगला पूर्ण होत आला असेल तर upsc करा..जे लोक नोकरी करत असतील त्यांना दिवसातून 5 ते 6 तास अभ्यास suffucient राहील....आणखी या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उमेदवारांनी जर तुमचा खरंच इंटरेस्ट असेल तर तयारी करा.competition खूप वाढले आहे आणि जागा त्या प्रमाणात कमी आहेत.अनिश्चितीता वाढली आहे..तुमचे आवडते क्षेत्र निवडा(कोणी सांगितले म्हणून अथवा कोणतातरी जाहिरात,विडिओ पाहून या क्षेत्रात येऊ नका)
प्रथमतः ही पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही..आपण कशासाठी आणि का अभ्यास करतो याची जाणीव आपणास सतत असणे आवश्यक आहे...परीक्षेचे स्वरूप पहा..अभ्यासक्रम पहा..कोणत्या विषयावर आपली कमांड नाही तो विषय पाहीले घ्या..एक विषय एकदाच घ्यायचा आणि अभ्यास पूर्ण करायचा..प्रश्न सोडवायचे.. शॉर्ट नोट्स काढायच्या आणि प्रत्येक विषयात पारंगत परीक्षेच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे..अभ्यासाबरोबर स्वतःवर विश्वास आणि कंट्रोल असणे आवश्यक आहे
जर अभ्यास करताना एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा प्रथम बेसिक चांगले करून घ्या
--अभ्यास करताना घाई करू नका
--जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक घेऊ नका
--आपल्या मित्रकडून समजून घ्या
--त्या टॉपिक च्या शॉट मध्ये नोट्स काढा
जास्तीतजास्त प्रश्न सोडवा
मुख्य परीक्षेला जवळजवळ 40% भाग हा पूर्व परीक्षेतील syllabus मध्ये आहे..जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याचा दररोज अभ्यास करा..कोणताही विषय optionla नका ठेऊ..अजून भरपूर वेळ आहे..सर्व कव्हर करू शकता..दररोज केलेल्या अभ्यासाची त्याच दिवशी revision करा(9pm rule--रात्री 9 नंतर कोणताही नवीन टॉपिक वाचायचा नाही दिवसभर केलेल्या अभ्यासाची revision करायची..दररोज आपण काय अभ्यास करणार आहोत याची सकाळीच तयारी करायची आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करायचा..त्यामध्ये किती pages वाचणार असे नसावे तर syllabus चा किती भाग पूर्ण करणार असे नियोजन असावे..आपण केलेला अभ्यास फावल्या वेळेत आपल्या मित्राला सांगणे आपण काय अभ्यास केला ते..सांगितल्यामुळे अभ्यास आणखी पक्का होतो..
★★★★★मार्गदर्शक★★★★★
Join our channel here https://t.me/eMPSCkattaBhushanSir2021 Dont copy only forward*
Telegram
MPSC UPSC Katta Bhushan Sir
महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम प्रामाणिक मदत हा हेतु #कुठलेही\_कॉपी\_पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही ADMIN संपर्क :- UPSC Aspirant . @DeputySectionsOfficer
?**भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)
?भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)
?भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते.)
?भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण
?भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)
?भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)
?भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड)
?भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली
?भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)
?भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)
?भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)
?भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली
?भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
?भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्वर
?भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
?भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी
?भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता
?भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
?भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश
?भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
?भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे
?भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
?भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर
?भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर
?भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई
?भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात
?भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)
?भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे
?भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश
?भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
?भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
?भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)
?भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
?भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
?भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई
?भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
?भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक
?भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)
?भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश
?भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर
?भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
?भारतातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)
?भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम
?भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र
?भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
?भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली
?भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)
?भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड
?भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
?भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र
?भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा
?भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत
?भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
?भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू
?भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
?भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश
?भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र
?भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)
?भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल
?भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश
?भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान
?भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)
?भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
?भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य – हरीयाणा**
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना मेन्स परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा?*❤️*✌️
ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आला नाही किंवा थोड्याफार मार्क करून गेला त्यांनी काळजी करू नका 2024 तुमच्यासाठीच आहे**
शिक्षक...
✍️"मातीच्या मडक्यासारख्या नाजूक आयुष्याला आकार देवून माणूस नावाची सुंदर कलाकृती घडवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!"
✍️ABCs Diaries ?
सुप्रभात ?****
MIDC जाहिरात....
✍️परीक्षा - IBPS घेणार.
?Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर
?३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत
?फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : https://www.midcindia.org/
?तलाठी आजचा झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न
समनार्थी शब्द :- ४
विरुद्धार्थी शब्द :- ३
कादंबरी:- महानायक, वारणेचा वाघ , विठुर
समास:- २
वाक्प्रचार:- ३
वाक्याचे प्रकार:- २
म्हणी:- १
अलंकार:- १
Maths/reasoning:-
नळ टाकी
Percentage:- १
सरळव्याज:- १
चक्रवाढ:- १
Profit loss:- १
तर्क वितर्क:- ३
Direction:- २
GS:-
मूलभूत हक्क , वृत्तपत्रे ,नद्या , लोकसंख्या सेक्स ratio.
?Question BY:- Vaishu Rukhmini Laxman Abdagire?
PATTERN SAME आहे त्यामूळे जोरात त्याच टॉपिक वर Focus करा.
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated vor 14 Stunden
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 Monate, 3 Wochen her
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 Jahr, 8 Monate her