𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
*?* आगामी परीक्षांसाठी सध्या आपल्या उपलब्ध असणाऱ्या बॅचेस -
1) राज्यसेवा पूर्व + मुख्य- संपूर्ण भूगोल
2) संयुक्त पूर्व + मुख्य -संपूर्ण भूगोल
3) राज्यसेवा पूर्व- Revision बॅच - संपूर्ण भूगोल
4)राज्यसेवा पूर्व - जगाचा भूगोल
5) राज्यसेवा पूर्व + मुख्य आणि संयुक्त मुख्य - संपूर्ण पर्यावरण
6) राज्यसेवा मुख्य - कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र
? उद्या श्री गणेश स्थापनेनिमित्त या सर्व बॅचेस वरती दहा टक्के डिस्काउंट असेल
? आपल्या अभ्यासाच्या अनुषंगाने यामधील एखादा विषय अजूनही परीक्षाभिमुख पद्धतीने करायचा राहिलेला असल्यास नक्की जॉईन करा
सोबत आहोत ,सोबत राहू**@PremrajChavan
✍️मार्गदर्शकाची भूमिका (Role Of Mentor)?
कवी वैभव देशमुख लिहितात,
तू लोटले कड्याहून
अन् पंख खोलले मी,
वाटा तुझाच मोठा
आहे यशात माझ्या!
मित्रहो, स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये शिरणं फार सोपं, परंतु यातून विजयी होऊन बाहेर पडायचं असेल, तर श्रीकृष्णासारखा एखादा गुरू तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. गुरूचा उद्देश तुम्हाला एक व्यक्ती म्हणून वाढण्यास आणि स्वत-ची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यास मदत करणे हा आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधील मार्गदर्शक किंवा गुरू हा फक्त तुमचा वेळ वाचावा म्हणून तुम्हाला नोट्स देणारा व्यक्ती नसतो, तर तो खऱ्या अर्थाने दिशा देणारा आणि तुमची उत्पादकता क्षणोक्षणी वाढवणारा व्यक्ती असतो.
मार्गदर्शक म्हणजे कोण?
मार्गदर्शन, सोप्या भाषेत म्हणजे-निर्देशित करणे किंवा साह्य प्रदान करणे. ज्याला मदतीची गरज आहे. समुपदेशन म्हणजे, प्रदान केलेल्या व्यावसायिक सेवांचा संदर्भ होय. समुपदेशन हा मार्गदर्शनाचा अविभाज्य आणि मध्यवर्ती भाग मानला जातो. स्पर्धा परीक्षेत हवे ते यश मिळत नसल्याने आपण जेव्हा निष्क्रिय बनतो तेव्हा हाच मार्गदर्शक आपल्या पाठीवर हात ठेवतो, प्रसंगी आपला कान पिळतो आणि परत एकदा अभ्यासाच्या वाटेवर यायला मदत करतो.
मग हा मार्गदर्शक फक्त आपल्याला शिकवणाराच व्यक्ती असतो का? तर निश्चितच नाही! हा मार्गदर्शक तुमच्या अभ्यासिकेत बसणारा एखादा दादा असू शकेल, हा मार्गदर्शक तुमच्या आजूबाजूला असून, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आंतर्बाह्य अनुभव घेतलेली एखादी व्यक्ती असू शकेल किंवा कोणतीही परीक्षा पास न झालेली एखादी व्यक्तीसुद्धा असू शकेल.
यांपैकी कोणाकडूनही मार्गदर्शन घेण्यात कोणताही कमीपणा नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण पास झालेली माणसे काय करावे? हे सांगतात, परंतु नापास झालेली माणसे काय करू नये? हे सांगतात. त्यामुळे दोघांचेही मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रकाश दाखवणारे दिवे-
एखाद्या गाडीमध्ये आपण प्रवास करत असतो आणि अंधार पडतो, तेव्हा त्या गाडीला वेग देणाऱ्या चाकांपेक्षा त्या गाडीला प्रकाश दाखवणारे दोन दिवे सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात. दिवे नसतील तर अपघात ठरलेलाच असतो. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या पायांचा वेग आणि कामाची तत्परता कितीही असली, तरी प्रकाश दाखवणारा मार्गदर्शक तुम्हाला योग्य ध्येयापर्यंत लवकर पोहोचवू शकतो.
आज स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये गल्लोगल्ली तज्ज्ञ आणि स्वयंघोषित मार्गदर्शकांचा सुळसुळाट झाला आहे, हे मला मान्य आहे. परंतु, त्यातही सुयोग्य मार्गदर्शक निवडताना मनाचा कल आणि आपल्याला ज्याचं मार्गदर्शन आवडतं अशा व्यक्तीची निवड होणे गरजेचे आहे.
पिढ्या घडवणारा गुरू-
एकदा तुमचा मार्गदर्शक ठरला आणि त्याने आखून दिलेल्या पद्धतीवर तुम्ही चालायला सुरुवात केली की, यश मिळणे ही फक्त औपचारिकता शिल्लक राहते. डॉ. ए. पी. जे. कलाम हे पुस्तकांना गुरू मानत असत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आयुष्य घडवले. अगदी तद्वतच आपणही मार्गदर्शकाच्या सान्निध्यात आणि पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवला, तर नोकरी मिळेलच आणि आयुष्यही समृद्ध झाल्यावाचून राहणार नाही.
एक इंजिनियर चांगलं काम करत नसेल, तर त्यामुळे रस्ते, पूल बिघडून देश दहा वर्षे मागे जाऊ शकतो. एक डॉक्टर चांगलं काम करत नसेल, तर लोकांचं आरोग्य बिघडून समाज शंभर वर्ष मागे जाऊ शकेल, परंतु जर एक शिक्षक चांगलं काम करत नसेल, तर अनेक पिढ्या उद्ध्वस्त होऊन संबंधित देश व समाज हजारो वर्षे मागे जात असतो. त्यामुळेच ज्ञान आणि कौशल्याने आपलं आयुष्य सजवताना मार्गदर्शकाचा हात त्यामागे असणं अत्यंत आवश्यक ठरतं.
सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा???
अविनाश शितोळे,
स्पर्धा परीक्षा लेखक - द लॉजिक बूस्टर, द ॲनालिस्ट
#avinashanalyst
मित्रहो बरेच विद्यार्थी मित्र आपल्या
*? राज्यसेवा मुख्य 2024 साठी
?कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र बॅच*
बाबत विचारणा करत आहेत..तुम्ही दाखविलेल्या या विश्वासा बद्दल खूप आभार...
सध्या 2023 च्या मेन्स ची बॅच आपल्या Step Up MPSC app वर available आहे...
ज्या विद्यार्थी मित्रांना करायची असेल ते ही बॅच करू शकतात..
लिंक
https://bfwyu.on-app.in/app/oc/374117/bfwyu
नवीन बॅच चे सध्या नियोजन नाही...
तरीही पूर्व परीक्षेचे नियोजन फारच लांबणीवर पडले तरच prelims आधी नवीन बॅच येईल..अन्यथा नवीन बॅच 2024 prelims नंतर येईल...
(आता बॅच घेणाऱ्या मित्रांसाठी नवीन बॅच मधे discount अथवा नवीन add झालेला data जर validity संपली नसेल तर याबाबत नियोजन करता येईल, काळजी नसावी)
सर्वांना शुभेच्छा??
सोबत आहोत, सोबत राहू ✌️?
*?*SSP 2024- Prediction series 26
?जग आणि भारतातील महत्वाच्या हिमनद्या...!
राज्यसेवा पूर्व 2021 मध्ये आयोगाने भारतातील हिमनद्या आणि राज्य यांच्या जोड्या विचारल्या होत्या...
यावेळी layer 2 साठी जगातील महत्वाच्या हिमनद्या माहित असणे गरजेचे आहे...!
टिपून ठेवा !**@Premrajchavan
**आजचा UPSC पूर्व परीक्षा 2024
GS चा पेपर....
? प्रश्नांचे वर्गीकरण
➡️ भूगोल - 18
पर्यावरण- 13
➡️ Polity - 20
➡️ International Relations - 14
➡️अर्थव्यवस्था- 11
➡️Science & Technology - 11
➡️प्राचीन, मध्ययुगीन इतिहास- 4
कला आणि संस्कृती - 3
आधुनिक इतिहास - १
➡️इतर- 5 (सैन्य, पुस्तके, संरक्षण)
राज्यसेवा पूर्व वाले सर्वजण....
एकदा पाहून घ्या....!**@PremrajChavan
?SR 2023 ची मुले opt out करत नाही अशी STI 2023 ची तक्रार होती ?आता तीच मूले ASO 2023 वाल्या सोबत तशीच वागत आहेत. 2 दिवसात एक पण opt out नाही.. Genuinely घेणार असेल तर अडचण नाही पण 1,2 महिन्याच्या पगारासाठी जागा अडवू नका ?जुन्या Post holders नी opt out करावे…
आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी.....?*?*
आपले भारताचे भूगोलाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती...
तद्नंतर एकाच वर्षात पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या...
तिसऱ्या आवृत्ती ची Reprint कालच प्रिंटिंग ला गेलीय... तीही 2 दिवसात मार्केट मधे available होईल....!
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार....!
सोबत आहोत सोबत राहू....!
आपलाच,
प्रेमराज चव्हाण...!**
@PremrajChavan
5643 (3).pdf
राज्यसेवा पूर्व 2022 GS 1 paper
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago