𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
जगाच्या भितीने मनातील दिवे आपण जोपर्यंत विझवत जातो, तोपर्यंत आपल्या आयुष्यातील खऱ्या दीपोत्सवाला आपण मुकलेलोच असतो.
🌿🌿🌿🌿
दिव्याचं देवपण तो जळत असेपर्यंत असतं. त्याला बाह्य शत्रुंपासून सुरक्षित ठेवण्याचं काम असतं त्या काचेचं'. एका संरक्षका प्रमाणे ती काच ह्या 'तेज' यज्ञात आपलं काम सलोखीने करत असते.
अगदी त्याचप्रमाणे स्वतःचं घरदार सोडून राष्ट्रासाठी रक्ताचा अभिषेक करणारे तेव्हाचे मावळे असोत किंवा आत्ताचे सैनिक आपलं काम चोख बजावत आहेत 🫡
कंदिलाच्या काचेप्रमाणे त्या दिव्याचं देवपण तेवत ठेवत आहेत. आजवर राष्ट्रहितासाठी रयतसाठी तेजाच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या तमाम वीरांना दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा 😇🔥🎉
वासुबारस, ज्याला "गोवत्स द्वादशी" असेही म्हणतात, हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वसुबारस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करणारा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गाई आणि वासराचे पूजन केले जाते आणि त्यांचे पावित्र्य मानले जाते.
वासुबारसचे महत्व
गोमातेचे पूजन: वासुबारस दिवशी गाईचे पूजन केले जाते कारण गायीला माता मानले जाते. गायीच्या उपकारांमुळे ती हिंदू संस्कृतीत पवित्र मानली गेली आहे.
गोकुळातील स्मरण: वासुबारस हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या काळाची आठवण करून देतो. गोकुळातील गाई आणि वासरांचे संरक्षण आणि पालन श्रीकृष्णाने केल्याची कहाणी या दिवसाशी जोडलेली आहे.
पर्यावरणीय संतुलन: गायीला भारतात पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण ती शेती आणि दुध उत्पादनामध्ये खूप उपयुक्त आहे. त्यामुळे गाईचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
कुटुंबातील समृद्धी: वासुबारसच्या पूजेनंतर समृद्धीचे प्रतीक म्हणून कुटुंबातील आनंद आणि धनसंपदा वाढवण्याची कामना केली जाते.
परंपरा आणि संस्कृतीचे जतन: हा सण साजरा करणे हे आपल्या पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करण्याचे एक साधन आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांना त्याचे महत्त्व समजावे.
वासुबारस साजरी करण्याची पद्धत
- गाईला सजवणे: गाई आणि वासराला विशेषरित्या सजवले जाते, फुलांच्या माळा आणि रंगांनी त्यांना सजवले जाते.
- पूजन विधी: गाईला स्नान घालून तिच्या शिंगांना रंग लावले जातात आणि तिला विशेष खाऊ दिला जातो.
- आरती आणि प्रार्थना: गाईची आरती केली जाते आणि तिच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते.
- गोड पदार्थ बनवणे: या दिवशी विशेष गोड पदार्थ तयार करून प्रसाद म्हणून वितरण केला जातो.
वासुबारसचा सण आपल्या संस्कृतीतील एक आदर्श उदाहरण आहे ज्यामध्ये गाईच्या प्रति आदर व्यक्त करून पर्यावरण आणि पशु संरक्षणाचा संदेश दिला जातो.
_?? नमन तुज मातृभूमी..._
_नमन तुज पुत्रा...?_
_२६ जुलै ? ⚔️??_
_एक ऐतिहासिक दिवस.._
_या दिवशी पाक विरुद्ध कारगिल युद्धात विजय मिळवत भारताने 'ऑपरेशन विजय' मोहीम यशस्वी केली._
_भारत एक सार्वभौम.. स्वतंत्र.. शांतताप्रीय.. विश्वासार्ह, अध्यात्मवादी देश._
_जगत कल्याणासाठी सदैव योगदान देणारा. पण दुर्दैवाने भारताची प्रगती खुपणारे शेजारी वारंवार कुरापत काढतातच._
_आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करत.._
_जगाला अंधारात ठेवून. मानवतेला काळिमा फासत पाकने शांतताप्रिय भारतावर आक्रमण केले._
_पाकने सीमेजवळ अत्यंत छुप्या पद्धतीने युद्धाची जोरदार तयारी केली आणि कारगिल क्षेत्रातील उंच शिखरे ताब्यात घेतली.._
_आपले सैन्य शिखरांच्या पायथ्याशी होते तेव्हा वरच्या बाजूने पाक सैन्य तोफांचा भडीमार करत आपल्या अनेक सरंक्षक चौक्या ताब्यात घेतल्या होत्या.._
_जागोजागी रस्त्यावर त्यांनी भूसुरुंगही पेरले होते. अश्या खडतर परिस्थितीत पहाडावर चढाई करत मुकाबला करणे अवघड होते._
_युद्धाच्या इतिहासात सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले पण तरीही पहाड उतारावरील भारतीय सैन्याने मोठ्या धैर्याने छातीवर गोळ्या झेलत.._
_अतुलनीय शौर्य गाजवून.. प्राणाची बाजी लावून ही शिखरे पुन्हा ताब्यात घेत विजय मिळवला._
_या मर्यादित युद्धाला इतरत्र पसरू दिले नाही. या विजयासाठीच्या अत्यंत बिकट परिस्थितीत दुर्गम शिखरावर लढलेल्या ह्या मोहिमेला 'ऑपरेशन विजय' नाव होते._
_युद्धानंतर पाकमधील लोकशाही सरकार जात लष्करी राजवट आली. तर भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित केले._
_भारताच्या सामर्थ्याने शत्रूला धडकी भरते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लढणाऱ्या आमच्या तिरंग्यासाठी प्राणाची बाजी लावून दगाबाज पाकला अद्दल घडवून.._
__
भारत देश सदैव 'अजिंक्य' आहे हे सिद्ध करणाऱ्या भारतीय शूरवीर सैनिकांना शतशः नमन. ?? जयहिंद ??
?? वंदे मातरम् ??
------------------------------------------
?गुरूपौर्णिमा शुभेच्छा गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम .. गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा .. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य .. गुरु म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती ... गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य ... गुरु म्हणजे आदर्श ... गुरु म्हणजे प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक
राम कृष्ण हरी
ती मुक्त झाली......
सूर्य डोईवर आला आणि तिला जाग आली. तिला आश्चर्य वाटले,'हे काय दिवस उजाडला तरीही तिला आज कोणी उठवलं नाही, कसला गोंधळ नाही, कसला कोणाचा राग नाही, मार नाही, कसली धावपळ नाही ,नक्की घडतंय तरी काय? तिला प्रश्न पडला.
ती उठली, पाहिलं तर घरात कोणीच नव्हतं. तिला आश्चर्य वाटलं. तेवढ्यात, तिची नजर घराच्या बाहेर अंगणात पडली. "हा काय गोंधळ आहे, एवढी गर्दी माझ्या घराच्या अंगणात नक्की झाले तरी काय?"ती तशीच चालत बाहेर आली तिथे पाहिले दारात कोणाचं तरी शव होतं,पण नक्की कोणाचा असेल? ती जरा
भीत-भीतच समोर गेली समोर जाताच "आ....." मटकन खाली बसली समोर पडलेल्या स्वतःच्या देहाला पाहून तिला हुंदका फुटला, पण फक्त एकाच क्षणासाठी.....
तिने एका कोपऱ्यात पाहिलं सासू डोळ्यात खोटे आसू आणून रडत होती. नवरा एका बाजूला रडायचं नाटक करत होता.अचानक तिला आठवलं कालच्या रात्री सासूने नवऱ्याला सांगून त्याच्या हातून तिला मार बसवला होता. तिने समोर पाहिले एका सौभाग्यवतीचा शृंगार तिच्यावर चढवला होता. त्यामुळे काल रात्रीचे पडलेले डाग झाकून गेले होते.पुढे जाऊन त्या देहाला हात लावला, शरीर थंडगार पडलं होतं.तिला मनोमन आनंद झाला. नवरा रडत होता, सासू रडत होती, शेजारी, नातेवाईक, सगळे रडत होते. पण, ती एकटीच हसत होती.कारण, ती आता मोकळी झाली होती.आता कसलीच बंधन नव्हती. कोणी मारणार नव्हतं. आता देहाबरोबरच मनाची सुद्धा सुटका झाली होती.त्या जाचातून मुक्तता झाली होती. ती हसत होती. नाचत होती. आनंद व्यक्त करत होती. स्वतःच्या मृत्यूचा आनंद नव्हे,..... स्वतःच्या स्वातंत्र्याचा आनंद, गुलामीच्या बेड्यातून सुटल्याचा आनंद, ती मनोमन आभार मानत होती, त्या संपलेल्या श्वासांचे,ती धन्यवाद देत होती,त्या थंड पडलेल्या देहाला,ती पुढे निघून गेली.
मोकळ्या आकाशात ती स्वतंत्र झाली. जबरदस्तीच्या नात्यातून आणि त्या गुलामीच्या जाचातून ती मुक्त झाली.
वैभवी कु. आ. सातपुते ✍
परभणी GKD ISAD ❤️
आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.@suvichar_marathi
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago