𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago
Location
20 मिनिटात पोहोचतोय ?
3D❤️**
1)Dream
2)Direction
3)Dedication
प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांचे सूत्र...3D शिवाय पर्याय नाही...फक्त 3D ला सांभाळा बाकी वेगळं काही करावं लागणार नाही..!!?**
सध्याच्या काळात तू खूप सहन करत आहेस हे मला कळतंय.. कधी कधी तुझा विचार करून मिसुद्धा खूप शांत होतो आणि मलाही प्रचंड वाईट वाटतं बघ पण मला हेही माहिती आहे की हे सर्व सहन केलंस तरचं तू येणाऱ्या काळात हिरा म्हणून नावारूपाला येणार आहेस...तरीही तुझ्या वाईट काळात आधार होण्याचा थोडाफार प्रयत्न मी नक्की करत असतो...अधिकारी होण्यासाठी तू गाव सोडलंस ना?? मग कशासाठी आत्ता मेहनतीत कमी पडत आहेस?? तुझ्याकडे खूप क्षमता आहे रे मला माहिती आहे, उगीच कोणीही या क्षेत्राकडे येत नसतं फक्त तुझ्या मनाची तयारी कमी पडत आहे बघ..तू ठरवलंस तर काहीही करू शकतो याची कल्पना तुलाही आहे आणि मलाही मग पास व्हायला इतका वेळ का लागतो तुला तर तू तुझे 100% द्यायला कमी पडत आहेस एवढं मात्र नक्की... यावेळी फक्त तुझे 100% देऊन अभ्यास कर आणि मग बघ तुला तुझी खरी क्षमता कळेल...पुढच्या दोन-तीन महिन्यात पूर्व परीक्षेचा पेपर होईल तुझा आणि किमान आत्तातरी आहे ती सर्व ताकद लाव आणि मुख्य परीक्षेला पात्र हो.. बघ पास झाल्यावर काय आनंद होतो तुला... स्वप्नाचा एक एक टप्पा पार होताना बघणं हे स्वर्गापेक्षा कमी नाही..आणि हो पास होईल की नाही याचा विचार करुन घाबरू नको, जे होईल ते आपण बघू पण तू आधी आत्मविश्वासाने चालायला सुरवात तरी कर..मला आजही खूप विश्वास आहे की तू जर अडखळला नाहीस ना तर अधिकारी होऊनचं परत येशील एवढी क्षमता आहे तुझ्यात.. आणि तरीही ज्यावेळी तुला आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटेल त्यावेळी थोडं बाजूला बघ मी ठामपणे तुझ्या बाजूला उभा असेन?*❤️*
@रेवण..**
जीव ओतून अभ्यास करतोय पण काही केलं तरी स्कोर 40-45 मध्येच अडकतोय... नेमकी कारणं काय?? ?**
1) सगळ्यात महत्वाचं की तुमची अभ्यास करण्याची पद्धत चुकत असावी जसं की प्रश्नांची प्रॅक्टिस न करता फक्त एकामागे पुस्तकं वाचण्याचं काम तुम्ही करत असाल...
2) परीक्षेमध्ये आयोग नेमकं कोणत्या घटकावर प्रश्न विचारतं? कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं?? आणि कोणत्या विषयातलं नेमकं काय वाचायचं या गोष्टी अनेकांना माहितीचं नसतात आणि यामुळे निकाल यायला 5-6 वर्ष लागून जातात..
3) दिवसभरात कोणत्या वेळेत काय वाचायचं?? दिवसभरात प्रश्नांची प्रॅक्टिस किती आणि कशी करायची?एखादा विषय किती दिवसात संपवायचा?? दिवसभरात नाष्ट्यासाठी, जेवणासाठी,आणि मोबाईलवर किती वेळ घालवणार आहात हेसुद्धा ठरलेलं असावं...या गोष्टींचं नियोजन नसलं की निकाल मनासारखा येतं नाही.
4) बरेचदा एखादा विषय दोनवेळा वाचला की तिसऱ्यांदा वाचताना अनेकांना कंटाळा यायला लागतो, त्यामुळे वाचताना Serious पणा कमी होतो आणि शेवटी त्या विषयात Perfection नसल्याने प्रश्न सोपे असताना देखील सोडवताना त्यात Confusion होतं व प्रश्न चुकतात..
5) कोणतीही परीक्षा पास व्हायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Maximum Revision करणं पण बरेचदा होतं असं की अभ्यासाचं नियोजन नसल्यामुळे Syllabus पूर्ण व्हायलाचं खूप वेळ लागतो आणि त्यामुळे Revision ला वेळचं भेटत नाही.. पास होण्याची सर्वात महत्वाची key ही Revision आहे हे विसरून चालणार नाही..
6) Combine पूर्व परीक्षेत 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे असतात आणि हे management व्यवस्थित व्हायचं असेल तर Revision शिवाय पर्याय नसतो.. Revision व्यवस्थित असेल तर प्रश्न वाचला की लगेच उत्तर आठवतं..
7) कमी मार्क्स येण्याचं अजून एक महत्वाचे कारण म्हणजे प्रश्नांची प्रॅक्टिस खूप कमी असणं.. आयोगाचे प्रश्न तर तुम्ही कोळून पिलेले असायला हवेत सोबतचं टेस्ट पेपर जास्तीत जास्त सोडवा जेणेकरून स्वतःच्या चुका कळतील आणि आपल्याला अजून किती तयारी करावी लागेल याची जाणीव होईल... प्रश्नांची प्रॅक्टिस नसेल आणि तुमचा कितीही चांगला अभ्यास असला तरी पास होणं शक्य नाही..
8) अजून तुमच्या हातात वेळ आहे तोपर्यंत पास होण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा आणि आमचा जो अट्टाहास सुरु आहे तो फक्त तुम्ही पास व्हावं याचंसाठी सुरु आहे, त्यामुळे परीक्षा वेळेवर होतं नाही ही संधी समजा आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास सुरु राहूद्या..!!?
@रेवण..**
स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात तयारी करणारी दोन प्रकारची मुलं आहेत एक म्हणजे तयारी करणारे आणि दुसरं म्हणजे वेड्यासारखी तयारी करणारे... स्पर्धापरीक्षेचा इतिहास जर बघितला तर वेड्यासारखी तयारी करणारी मुलं सातत्याने विविध निकालात दिसतात आणि कमी वेळात पोस्ट घेऊन निघून जात आहेत...वेड्यासारखी तयारी करणं म्हणजे नेमकं काय हो?? तर अभ्यासाव्यतिरिक्त दुसरी कोणतीचं गोष्ट न दिसणं... भौतिक सुखांपासून लांब राहणं... अभ्यासासाठी आनंद देणाऱ्या आणि वेळ घालवणाऱ्या खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करणं... मित्रांचे वाढदिवस, लग्न,घरचे कार्यक्रम, सण-उत्सव या सर्व गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवणं... मला वाटतं की या सगळ्यात तुम्ही कुठं आहात हे बघितलं पाहिचे...जगावेगळं काहीतरी हवं असेल तर त्यासाठी वेडं व्हावं लागतं हे खरं...इथं सहज काहीही मिळत नसतं... स्वतःकडे लक्ष दया,अभ्यासात कुठे कमी पडत असाल तर त्यात सुधारणा करा..स्वतःच्या कामात वेडं असणाऱ्यांनीचं आजपर्यंत खूप नाव कमवलंय आणि ज्यावेळी निकालात येणाऱ्या मुलांचा प्रवास मी ऐकतो तेव्हा एका गोष्टीवरचा विश्वास अजून वाढतो ती म्हणजे "वेडेचं इतिहास घडवतात..!!"?**
@रेवण..**
मैं अपने घर की उम्मीद का इकलौता सितारा हूं, मैं तूट नहीं सकता क्योंकि मेरा चमकना बहुत जरुरी हैं..!!#आवडलेलं...
आज खऱ्या अर्थाने फोटो सुंदर दिसतोय..❤️****
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago