Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

Marathi Suvichaar - सुविचार

Description
दररोज सुविचार...
@MarathiSuvichaar @marathilekhan
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

2 months, 3 weeks ago

पेपर टाकायला एक मुलगा
रोज यायचा घरी
थांबायचा नाही अजिबात
हाक मारली जरी

बघावं तेव्हा त्याला घाई असायची
गठ्ठा घेऊन पळताना ती बालमुर्ती दिसायची

शाळेचा गणवेष त्याच्या वर
अगदी खुलून दिसायचा
कधी नजरा नजर झाली तर
तो दिलखुलास हसायचा

संवाद सुरू व्हायला
वेळ लागला जरा
शेवटी प्रत्येक गोष्टीला
योग यावा लागतो खरा

एकदा असं झालं
पेपर यायला झाला उशीर
अन त्या पोराच्या काळजी ने
मी झाले अधीर

खूप वाट पाहून शेवटी
फोन लावला मालकाला
तो म्हणाला काळजी करू नका
मी पाठवतो दुस-या बालकाला

त्याला वाटलं मला
रोजचं वर्तमान पत्र हवंय
खरं तर आवर्जून वाचत बसण्याची मला नाही सवय

शेवटी मी त्याना विचारलं
तो रोजचा मुलगा नाही आला?
मालक म्हणाला काय सांगू
त्याचा अपघात झाला

बातमी देऊन मालकाने
फोन ठेवून दिला
आणि अस्वस्थ होऊन मी
त्यांना परत फोन केला

म्हंटलं त्याचं नाव काय
अन तो कुठे राहतो
मालक म्हणाला थांबा
कुणाला विचारून पाहतो

त्याचा पत्ता मिळे पर्यंत
माझा निघत नव्हता धीर
त्याला डोळ्या समोर पहायला
मी झाले होते अधीर

एक दोन फोन केल्यावर
त्याचा पत्ता मिळवला
आणि मी निघायच्या तयारीत आणि कोणी हाॅस्पिटल चा पत्ता कळवला

तशीच धावले कोण जाणे
कुठून आलं पायात इतकं बळ
रणरणतं ऊन असून
लागली नाही झळ

रूंग्णालयात पोहचले तेव्हा
तो पडला होता एकटा
अंगात तसाच होता
त्याचा टी शर्ट फाटका

त्याला शुद्ध नव्हती
पण जाणीव होती थोडी
मी हात धरल्यावर त्याला
थर थर सुटली थोडी

त्याच्या कानाशी जाऊन म्हंटलं
काळजी करू नकोस
मी आहे तुझ्या जवळ
एवढे शब्द त्याच्या
कानी पडले केवळ

अन जादू व्हावी तशी
त्याने उघडले डोळे
उघडायच्या आधीच ते
भरून वाहीले खुळे

तसं माझ्या ही डोळ्यात तेव्हा
जमा झालं पाणी
आपण याच्या आई का?
विचारत होतं कोणी

कोण विचारतय न बघता
मी होकार देऊन टाकला
अन त्याने आपला चेहरा
दोन्ही हाताने झाकला

तो पूर्ण बरा झाल्यावर
माझ्या पाया पडायला वाकला
आणि भाकर तुकडा त्याच्या वरून
मी ओवाळून टाकला

असेच गेले दिवस
आणि अशीच गेली वर्ष
आमच्यातला संवाद म्हणजे
ममतेचा स्पर्श

तो बोलत नाही फार
पण त्याला न सांगता कळत
कोण म्हणतं वळणाचं पाणी
शेवटी वळणाला वळतं?

आता त्याच्या शिवाय माझं
हलत नाही पान
आणि त्याचा पायावर तो
अगदी उभा आहे छान

आता खरा मला
त्याचा आधार लागतो
तो मला आई म्हणत नाही
पण पोटच्या मुला सारखं वागतो

परवा डाॅक्टर म्हणाले थांबा
तुमचा मुलगा येतोय न्यायला
मला भरूनच आलं
डाॅक्टरानी पाणी दिलं प्यायला

पेला ओठाशी लावला
पण पाणी पिता येईना
अन भरल्या डोळ्यातलं पाणी
माघारी जाईना

इतक्यात तो आला म्हणाला
काय झालं बाई?
बुचकळ्यात पडत डाॅक्टर म्हणाले
बाई काय म्हणतोस?ही आहे ना तुझी आई?

क्षणाचाही विचार न करता
त्याने होकार देऊन टाकला
अन तेव्हा मी माझा चेहरा
दोन्ही हाताने झाकला ...

चंद्रशेखर गोखले.

3 months, 1 week ago

🌸💐💐🌸💐💐🌸💐💐🌸
जगण्याचा दर्जा

आपल्या विचारांवर अवलंबून असतो

परिस्थिती वर नाही..

!! आदिम सकाळ !!

3 months, 1 week ago

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका

कारण सुंदर काच तुटली ;

तर त्या काचेचे रुपांतर ; ‎

धारदार हत्यारामध्ये होत असते....☜
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

*😴*🌹🌹शुभ रात्री🌹🌹😴**

3 months, 2 weeks ago

🥰🥰😍😍😘😘😘🤔🤔🤔🤔🤔🤔👍🏻👍🏻👍🏻👍🏻
*आठवण त्यांचीच येते, ज्यांना
मनापासून बघांव..बोलावं आणि
भेटावसं वाटत...!
*मगं ते कितीही दूर असले तरी ... चालेल
****

*💕*❤शुभ रात्री 💞**

3 months, 2 weeks ago

✍🏻🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼

चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचं सोन करतो....!

☘️🌹 Good Morning 🌹☘️
🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼

3 months, 2 weeks ago

🌷🌴🌷🌴🌷🌴🌴🌷
स्वतःला असं घडवा कि तुमच्याबद्दल
दुसऱ्यांना कोणी वाईट सांगितल
तरी त्यावर कोणीच
विश्वास नाही ठेवला पाहिजे..

*😘*🍫 Good night 🍫😘
🌹*🌹*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

5 months, 2 weeks ago

"आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे."

*👍🏻*😍शुभ सकाळ😍👍🏻**

5 months, 2 weeks ago

🌹 देह सर्वांचा सारखाच। फरक फक्त विचारांचा।
या छोटयाशा आयुष्यात एवढे नाव कमवा की,
लोक तुमच्या कड़े "पर्याय"म्हणून नाही,
"एकमेव उपाय" म्हणुन पाहतील. 🌹🌹

*💐 🌹*❤शुभ सकाळ **

5 months, 2 weeks ago

वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत......
वास्तवात तोच मोठा असतो,
* ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम,स्नेह व आदर असतो......
☀️गुड मॉर्निंग☀️***

5 months, 3 weeks ago

वाचनानुभवातून लेखन आणि स्वानुभवातून लेखन या दोन्ही प्रकारच्या अनुभवांत प्रचंड फरक आहे. वाचनानुभवाला तुम्ही जे वाचन केले आहे, त्याला जरा कल्पनेची जोड देऊन लिखाण करू शकता. परंतु स्वानुभवातून जे लेखन केले जाईल त्यात लेखकाच्या स्वानुभवाचा गंध हा येणारच. अभ्यासु वाचकाला वाचताक्षणी हे लक्षात येऊ शकते.

#लेखक #वाचक #अनुभव #विचार

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago