Marathi Suvichaar - सुविचार

Description
दररोज सुविचार...
@MarathiSuvichaar @marathilekhan
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago

1 month, 1 week ago
1 month, 1 week ago

जी व्यक्ति आपल्या आयुष्यात जितकी महत्वाची आहे. त्या व्यक्तीच्या ही आयुष्यात आपण ही तितकेच महत्वाचे आहोत का... हे समजुण घेणे तितकच महत्वाचे असते.

1 month, 3 weeks ago

हे कायम लक्षात ठेवावे की आपण बाळगलेला राग, वैर व अहंकार हे आपल्याला सदैव हरवत असतात.
आणि...
हे जो पर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कशाने हरलो हेच आयुष्यभर कळत नाही.
*🙏शुभ सकाळ 🙏*

6 months, 4 weeks ago
6 months, 4 weeks ago

लेखक – प्रफुल्ल वानखेडे

समीक्षक – अक्षय सतीश गुधाटे

प्रकाशन – सकाळ प्रकाशन

पृष्ठसंख्या – १८३

मुल्यांकन – ४.९ | ५

मला कोणी विचारलं.. मी कोणती दोन पुस्तकं वाचू ज्याने सगळं आयुष्य सुरळीत होऊ शकेल, तर मी सांगेल साने गुरुजी यांचं “श्यामची आई” आणि प्रफुल्ल वानखेडे यांचं “गोष्ट पैशापाण्याची”. एक पुस्तक तुम्हाला प्रेम आणि करुणा शिकवेल आणि दुसरं तुम्हाला कष्ट आणि पैसा. याहून आयुष्यात सफल होण्यासाठी मला अधिक आवश्यक गोष्टीच वाटतं नाहीत.

मी हे पुस्तक हातात घेतलं आणि वाचत सुटलो. आवघ्या दोन तासात पुस्तक संपवूनच उठलो. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मुद्द्यांवरून नजर फिरवली आणि थक्क व्हायला झालं. प्रत्येक मुद्दा आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाने अनुभवलाच असेल, किंवा नसेल तर, अनुभवतीलच. जर मला हे पुस्तक आधी ५-१० वर्ष आधी वाचायाला मिळालं असतं तर कितीतरी अधिक पटीने, पैशाबाबतच्या कित्येक गोष्टी आधिच स्पष्ट झाल्या असत्या अस वाटून गेलं.
पुस्तक सुंदरच आहे.. सुरवात मुखपृष्ठावरूनच झाली आहे. जितकं साधं, तितकंच बोलकं. आपला पैसा, आपली मूल्ये आणि त्याच्याशी संलग्न असलेली आपली कृती. यातून आपलं साकार होणारं भविष्यच या पुस्तकात आहे, अस मला वाटतं. अनेक लहान-मोठ्या अनुभवसंपन्न कथांमधून लेखकाने पैशाबद्दल असणाऱ्या सर्व बाबी नमूद केल्या आहेत. मराठी लिखाणात सर्वात कमी हाताळलेला हा विषय.. पैसे, व्यवहार, व्यवसाय.. नफा, तोटा, माणुसकी.. आणि त्यात आपली कृती नक्की कशी असावी आणि कोणत्या वेळी कशी नसावी हे दोन्ही या पुस्तकात एकदम साध्या शब्दात नमूद केले आहे. एकूण ३१ अनुभव लेख यात आहेत. त्या प्रत्येक लेखागणीक पैशांबद्दलची एक नवीन बाजू आपल्यासमोर मांडली आहे.

आयुष्याच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर, आपण कोणत्या गोष्टी चुकू शकतो आणि कधी कोणत्या दुर्लक्षित करतो.. त्याचे परिणाम.. दुष्परिणाम.. आणि ती परिस्थिती सुधारता कधी येऊ शकली असती याची देखील इत्यंभूत माहिती आणि विशेष म्हणजे त्याला असणारी माणुसकीची जोड, या पुस्तकाला विशेष उंचीवर नेऊन ठेवते. “प्रत्येक वेळी व्यवसाय करताना, पैसे कमवताना कोणाला फसवायलाच हवे अस नाही, प्रेमाने, माणुसकी जपत.. किंबहुना याला अधिक प्राधान्य देऊन आपण सर्वच लवकर आर्थिक सबळ होऊ शकू.” हीच या पुस्तकाची खास बाब आहे. आर्थिक साक्षरता, पुस्तक वाचन.. अजून किती.. नी काय-काय आहे या पुस्तकात. अक्षरशः लिहीत राहावं वाटतं आहे. इतकं सुंदर पुस्तक मला वाचायला मिळाल्याबद्दल लेखकाचे मनस्वी आभार!

7 months, 1 week ago

माणूस हा स्वभावाने रोज बदलत असतो. आज जसा आहे, तसा उद्या असणार नाही. प्रत्येक दिवशी त्याचे एक नवीन व्हर्जन लाँच होत असते.
मानवी मन आणि मानवी वर्तन याचा अंदाज बांधणे फार कठीण असते. अचूक अंदाज तर केवळ अशक्यच.
कालपर्यंत माझ्याशी नीट बोलणारी व्यक्ती उद्या फटकून वागू लागली की मी समजून जातो, हा काल जसा होता तसा आज राहिलेला नाही. माझ्याबाबतही अनेकांना तसे अनुभव येतच असतील. आपण सारे एकाच नावेचे प्रवासी आहोत.
म्हणून मानवी मन, मानवी वर्तन, भोवतालातील घटनांवर आपण देत असलेल्या प्रतिक्रिया यांबाबत केलेले लेखन बहुतेक सर्वांनाच Relate करत असते, त्यामुळेच ते 'आमच्या मनातले लिहिलेस' अशी प्रतिक्रिया देतात.
#randomthoughts

10 months ago

पेपर टाकायला एक मुलगा
रोज यायचा घरी
थांबायचा नाही अजिबात
हाक मारली जरी

बघावं तेव्हा त्याला घाई असायची
गठ्ठा घेऊन पळताना ती बालमुर्ती दिसायची

शाळेचा गणवेष त्याच्या वर
अगदी खुलून दिसायचा
कधी नजरा नजर झाली तर
तो दिलखुलास हसायचा

संवाद सुरू व्हायला
वेळ लागला जरा
शेवटी प्रत्येक गोष्टीला
योग यावा लागतो खरा

एकदा असं झालं
पेपर यायला झाला उशीर
अन त्या पोराच्या काळजी ने
मी झाले अधीर

खूप वाट पाहून शेवटी
फोन लावला मालकाला
तो म्हणाला काळजी करू नका
मी पाठवतो दुस-या बालकाला

त्याला वाटलं मला
रोजचं वर्तमान पत्र हवंय
खरं तर आवर्जून वाचत बसण्याची मला नाही सवय

शेवटी मी त्याना विचारलं
तो रोजचा मुलगा नाही आला?
मालक म्हणाला काय सांगू
त्याचा अपघात झाला

बातमी देऊन मालकाने
फोन ठेवून दिला
आणि अस्वस्थ होऊन मी
त्यांना परत फोन केला

म्हंटलं त्याचं नाव काय
अन तो कुठे राहतो
मालक म्हणाला थांबा
कुणाला विचारून पाहतो

त्याचा पत्ता मिळे पर्यंत
माझा निघत नव्हता धीर
त्याला डोळ्या समोर पहायला
मी झाले होते अधीर

एक दोन फोन केल्यावर
त्याचा पत्ता मिळवला
आणि मी निघायच्या तयारीत आणि कोणी हाॅस्पिटल चा पत्ता कळवला

तशीच धावले कोण जाणे
कुठून आलं पायात इतकं बळ
रणरणतं ऊन असून
लागली नाही झळ

रूंग्णालयात पोहचले तेव्हा
तो पडला होता एकटा
अंगात तसाच होता
त्याचा टी शर्ट फाटका

त्याला शुद्ध नव्हती
पण जाणीव होती थोडी
मी हात धरल्यावर त्याला
थर थर सुटली थोडी

त्याच्या कानाशी जाऊन म्हंटलं
काळजी करू नकोस
मी आहे तुझ्या जवळ
एवढे शब्द त्याच्या
कानी पडले केवळ

अन जादू व्हावी तशी
त्याने उघडले डोळे
उघडायच्या आधीच ते
भरून वाहीले खुळे

तसं माझ्या ही डोळ्यात तेव्हा
जमा झालं पाणी
आपण याच्या आई का?
विचारत होतं कोणी

कोण विचारतय न बघता
मी होकार देऊन टाकला
अन त्याने आपला चेहरा
दोन्ही हाताने झाकला

तो पूर्ण बरा झाल्यावर
माझ्या पाया पडायला वाकला
आणि भाकर तुकडा त्याच्या वरून
मी ओवाळून टाकला

असेच गेले दिवस
आणि अशीच गेली वर्ष
आमच्यातला संवाद म्हणजे
ममतेचा स्पर्श

तो बोलत नाही फार
पण त्याला न सांगता कळत
कोण म्हणतं वळणाचं पाणी
शेवटी वळणाला वळतं?

आता त्याच्या शिवाय माझं
हलत नाही पान
आणि त्याचा पायावर तो
अगदी उभा आहे छान

आता खरा मला
त्याचा आधार लागतो
तो मला आई म्हणत नाही
पण पोटच्या मुला सारखं वागतो

परवा डाॅक्टर म्हणाले थांबा
तुमचा मुलगा येतोय न्यायला
मला भरूनच आलं
डाॅक्टरानी पाणी दिलं प्यायला

पेला ओठाशी लावला
पण पाणी पिता येईना
अन भरल्या डोळ्यातलं पाणी
माघारी जाईना

इतक्यात तो आला म्हणाला
काय झालं बाई?
बुचकळ्यात पडत डाॅक्टर म्हणाले
बाई काय म्हणतोस?ही आहे ना तुझी आई?

क्षणाचाही विचार न करता
त्याने होकार देऊन टाकला
अन तेव्हा मी माझा चेहरा
दोन्ही हाताने झाकला ...

चंद्रशेखर गोखले.

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago