मनातील भावना..✍?

Description
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।।

तुमच्या ही भावना आम्हाला पाठवत जा.?
@Ganesh5463
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago

2 months, 3 weeks ago
*तुझ्या अपार कष्टानं। बहरते सारी भुई।।*

तुझ्या अपार कष्टानं। बहरते सारी भुई।।
एका दिवसाच्या पूजेनं। होऊ कसा उतराई।।
कृषी संस्कृतीचे प्रतिक असणारा, वर्षभर खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सदभावना व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा सणाच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!

2 months, 3 weeks ago
2 months, 3 weeks ago
***असं म्हणतात की जे आपल्या नशिबात …

असं म्हणतात की जे आपल्या नशिबात लिहिले असतं तेचं आपल्या सोबत घडत असतं।मात्र आपल्या कर्मात एवढी मोठी ताकद असते की आपलं पूर्ण भविष्य बदलण्याची क्षमता ठेवते।फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे।कारण आताची वेळ जरी आपली खराब असली तरी।उद्याचा दिवस आपलाच असतो।माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं की जीवन जगणं खूपच सोपं होऊन बसतं!,,,✍?**
एकमन#लेखक
@Ommshelke

2 months, 4 weeks ago

प्रेम परीक्षेचा विषय नाही..?
तर
संयमाचा विषय आहे..!
♥️
# श्री कृष्णजन्माष्टमी
✍?शब्दांगण

2 months, 4 weeks ago

(आजच्या युगातले वासतव्य मांडायचा प्रयत्न केला आहे ,नक्की वाचा स्वमत आहे सर्वांना लागू पडेल असे नाही,कडू आहे पण सत्य आहे)आपली कळत नकळत होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसांना,जवळच्या माणसांना ignore करणे होय.जेव्हा पुढच्या माणसाला मदतीची किंवा आधारची गरज असते म्हणून तो आपले समजून बोलत असतो कॉल,मॅसेज करत असतो परंतु काही लोक समोरच्या व्यक्तीला आधार द्यायचे तर दूरच साधा ते प्रतिसाद पण देत नाही असे वागून त्यांना काय मिळते माहित नाही,पण असे वागणे माणूस म्हणून तर अयोग्य आहे.जर कोणी ओळखीचा नसेल, किँवा पुढील व्यक्ती खूपच खराब आहे ह्याचा अनुभव असेल तेव्हा दुर्लक्षित करणे ठीक आहे समजून घेवू शकतो,किंवा कामात असल्यामुळे आपण मदत करण्यास,बोलण्यास हतबल असलो तर काम झाल्यास मी बोलेल असे सांगणारे,परत कॉल करणारे खूप कमी असतात.असे केल्यामुळे होत काही नाही परंतु तुमच्यासाठी असणारी प्रतिमा कमी होते.
आपले लोक आपल्याच माणसांना हाताने दूर करतात मग वेळ गेल्यास पच्याताप करतात. वेळ गेल्यास सुधारण्यापेक्षा वेळेत सुधरलेल कधीही चांगलं.कोणी आपल्या जवळचा व्यक्ती आपणास हक्काने बोलत असेल कॉल मेसेज करून मनमोकळेपणाने बोलत असेल तर त्याला पण तुम्ही उशिरा का होईना प्रतिसाद दावा.नशीबवान असतात ती माणसं जे विश्वासाने मिळालेली असतात ती गमावू नका.
............???............
शब्दांकन -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍?

3 months ago
3 months ago
शरीरासोबत नोचून खाऊन टाकतात मला,

शरीरासोबत नोचून खाऊन टाकतात मला,
तरीही मी आवाज देते, ऐकण्यासाठी.
कोणी नसतं, कोणीही मला न्याय देत नाही,
न्याय देण्यासाठी मी या जगात राहत नाही.
मी रडते आणि मग शांतपणे सहन करते.
किती दिवस चालणार आहे हा खेळ शरीरांचा?
आज मी आहे, उद्या माझ्या जागी कोणी तरी दुसरी असेल...!
*✍️महाले अक्षय
नाशिक
*

3 months ago

आईची सावली,
बहिणीची माया
अशी ही छाया नशिबी
नाही प्रत्येकाच्या...!
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
✍?शब्दांगण

3 months, 1 week ago
हल्ली प्रेम या विषयावर खूप चर्चा …

हल्ली प्रेम या विषयावर खूप चर्चा होतं आहे म्हणजेचं हा विषय सर्वांचा आवडता आहे। मात्र प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक झालेल्या आहे। होय मला मान्य आहे की प्रत्येकाचा अनुभव वेगळा  असतो एका व्यक्तीसाठी सर्वच व्यक्तीला दोष नाही देऊ शकत ना आपण। कारण कधी कधी हे नातं तुटायला समोरच्या व्यक्तीघी परिस्थिती कारणीभूत असते। असं म्हणतात की प्रेम हे फक्त पैसा पद प्रतिष्ठा असणारा व्यक्तीचं मिळवू शकतं। मला वाटते हे पाहून जर कोणी नातं जोडत असेल तर ते प्रेम नाही तो होतो फक्त व्यवहार। कारण प्रेम ही शुद्ध भावना आहे ती एका मनातून दुसऱ्या मनात कळतं नकळत पोचलेली असते। उगाच तिला थोड्या लोकांसाठी बदलाम करू नका ना plz??,,,✍?

माझं काही चुकलं असेल तर माफ करा??मी लेखक म्हणून खूप लहान आहे✍?
एकमन#लेखक
@Ommshelke

3 months, 2 weeks ago

Cp
Sex Education | स्त्रिया लैंगिक जीवनात समाधानी नसण्याची महत्त्वाची कारणे जाणून घ्या
पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक संबंध (Physical Relationships) महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु, लैंगिक संबंधांच्या (Sex Relations) बाबतीत थोडासा निष्काळजीपणा कौटुंबिक तणावाची परिस्थिती निर्माण करत असल्याचे अनेकवेळा दिसून येते. काही प्रकरणांमध्ये, वाद इतका वाढतो की तो घटस्फोटापर्यंत पोहोचतो.

जर आपण महिलांच्या शारीरिक समाधानाबद्दल (Physical Satisfaction) बोललो, तर काही महत्त्वाची कारणे आहेत, ज्यांचा विचार केला पाहिजे आणि जोडीदाराने या गोष्टींची काळजी घेतल्यास स्त्री लैंगिकदृष्ट्या समाधानी राहू शकते आणि कौटुंबिक तणावही कमी होऊ शकतो. चला जाणून घेऊया अशा पाच कारणांबद्दल.

*प्रेम आणि स्नेह-
आवश्यक महिला लैंगिक संबंधांपेक्षा स्नेह आणि प्रेमळ नातेसंबंधांना अधिक महत्त्व देतात. अशा परिस्थितीत, जोपर्यंत जोडीदार स्त्रीशी प्रेमळ संबंध प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत ती स्त्री तिच्या जोडीदाराशी आसक्ती आणि आपुलकी प्रस्थापित करणार नाही. अशा परिस्थितीत ती उघडपणे शारीरिक संबंधांबद्दल बोलणार नाही. त्यामुळे महिलांना शारिरीक समाधान देण्यासाठी सर्वप्रथम स्नेहपूर्ण नातेसंबंधांना अधिक प्राधान्य द्यायला हवे.

खूप कामाचा दबाव-
आजकाल महिला घराव्यतिरिक्त ऑफिसमध्ये काम करतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर सतत कामाचा ताण असतो. काहीवेळा काही महिलांना स्वत:चा विचार करण्यासाठी आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वेळ काढता येत नाही. अशा परिस्थितीत पती-पत्नीचे नातेही ताणले जाऊ शकते. नोकरदार महिलांना कधीकधी जास्त मानसिक ताण येतो. अशा परिस्थितीत त्यांच्याशी जवळीक साधणे खूप कठीण होऊन बसते.

सतत कंटाळवाणा सेक्स -
महिलांमध्ये लैंगिक संबंधांबाबत समाधान न होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सतत तेच कंटाळवाणे लैंगिक संबंध असू शकतात. घाईघाईने आणि तत्सम स्थितीत स्थापित केलेले शारीरिक संबंध देखील महिलांना त्यांच्या जोडीदारापासून भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या दूर करू शकतात. अशा स्थितीत पत्नीसोबत त्याच्या आवडीबद्दल बोलणे आणि स्त्रीच्या आवडीनुसार शारीरिक संबंध प्रस्थापित करणे ही जोडीदाराची जबाबदारी असते.

अनेक वेळा महिलांना काही लैंगिक समस्या येतात. परंतु, लाजेमुळे त्या उघडपणे सांगू शकत नाहीत किंवा अज्ञानामुळे त्यांना उपचार घेता येत नाहीत. ही परिस्थिती समजून घेणे आणि त्यावर तोडगा काढणे ही जोडीदाराची जबाबदारी आहे. महिलांच्या सौंदर्याची प्रशंसा करत नाही सर्वसाधारणपणे, बहुतेक महिलांना स्वतःला अधिकाधिक सुंदर दिसणे आवडते.

अशा परिस्थितीत जोडीदाराने स्तुती केली नाही तर महिलेचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शरीराचे वजन वाढणे किंवा जोडीदाराचे आकर्षण न व्यक्त करणे यामुळे स्त्रियांमध्ये न्यूनगंड भरून येतो. या परिस्थितीत, ती लैंगिक संबंधांमध्ये स्वारस्य दाखवणे देखील कमी करू शकते. सेक्स हार्मोन टेस्ट म्हणजे काय? कोणती लक्षणे दिसल्यास करावी चाचणी? महिलांना त्यांची इच्छा सांगता येत नाही

बहुतेक स्त्रियांना सेक्स दरम्यान आपल्या पार्टनरला काय आवडते आणि काय आवडत नाही हे सांगण्यास संकोच वाटतो. या कारणास्तव, त्यांच्या लैंगिक संबंधात चूक होऊ शकते. यामुळे महिला हळूहळू शारीरिक संबंधांमध्ये रस दाखवणे बंद करतात. महिलांना त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्यास नात्यातील गोडवा अनेक पटींनी वाढू शकतो.
Dr Geetashri paranjape

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago