Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

Description
मित्र-मैत्रिणींनो बोलते व्हा...आपल्याही भावना आमच्यापर्यंत पोहचवत जा.....

........तुमच्याकडे असणारी पुस्तके, व आपल्याला सुचलेली वाक्ये,विचार,कविता,चारोळ्या आम्हाला पाठवत जा ........

@timiratunitejakade4141

- अ.ल.खाडे (राज्य कर सहायक)
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month, 3 weeks ago

..आपल्याकडे देशाला,समाजाला देण्यासाठी काही वेळ आहे का.?🇮🇳 🌿 💖(देशासाठी काही वेळ काढून शेवटपर्यंत नक्की वाचा)..😇🇮🇳

आपण परंपरेनुसार चालत आलेले सणउत्सव साजरे करत असतो,परंतु आपल्याला त्यापाठी मागचा इतिहास खरा उद्देश काय असतो ते माहित आहे का..?आपण त्या दिवसापुरता ते सण साजरे करतो आणि दुसऱ्या दिवशी होते तसे हे योग्य आहे का?हे तर असे झाले सकाळी भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा म्हणायची आणि रात्री बाजूच्या घरात कचरा टाकायचा.खरच आपण जसे सणउत्सवात राहतो मिळून मिसळून तसे वर्षभर का राहत नाही..?
मकर संक्रात आली की आपण म्हणतो तीळ गूळ घ्या गोड गोड बोला आपण जर वर्षभर सर्वांशी प्रेमाने वागलो तर खर त्याचे महत्व. काही लोकांनी तर हा सण ह्या लोकांचा तो त्या लोकांचा असे भेदभाव केल्याचे जाणवते.हा भेदभाव केव्हा संपेल..?दिवाळी दिवे लावून आपण साजरी करतो पण जे लोक अनाथ आहेत,गरीब आहेत त्यांचा घराला आधार देऊन,प्रेमाचे दोन शब्द बोलुन त्यांचे जीवन दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे उजलावे,हे आपणास केव्हा कळेल?कुठपर्यंत एकमेकांबद्दल मनामध्ये द्वेष,राग ठेवणार अरे शेवटी जाताना काय घेवून जाणार आहेत सोबत,त्यात हे जीवन क्षणभंगुर.?मग माणूस आयुष्भर कष्यचा गर्व करतो.
आपले सैनिक,पोलीस व इतर कर्मचारी तिकडे कोणताही ऋतू असुदे कितीही वारा पाऊस असुदे आपल्या देश्याची सेवा करतात.विद्यार्थी पुढे जाऊन प्रशासकीय सेवेमध्ये येऊन समाजकार्य करण्यासाठी घरापासून लांब राहून शिकतात.त्या सर्वांना वाटत नसतील का सण साजरे करावे आणि आपण काय करतो गावागावामध्ये, गल्लिगली मध्ये माणसामाणसात भेदभाव,द्वेष.आपण पूर्ण गावात एक सार्वजनिक होळी,गणेशोत्सव साजरी करतो का.?आपण एकत्र सणउत्सव केले तर लोक एकत्र येतील व प्रदूषण कमी होण्यास हातभार लाभेल.
दसऱ्याला रावणचे दहन करतो परंतु स्वतः मधील असणाऱ्या अहंकाराचे आपण केव्हा दहन करणार?होळीच्या निमित्त नकारात्मक गुण किंवा वाईट सवयींचे दहन आपण करतो का?आपल्या देशांमधून गणपती विसर्जन प्रमाणे असत्याचे,भ्रष्टाचाराचे, अन्यायाचे केव्हा विसर्जन होणार.आपण शिवजयंती साजरी करतो पण छ.महाराजांचे विचार अंगी बाळगतो का?आपण दरवर्षी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करतो परंतु त्या महामानवांचे विचार अंगी बाळगतो का?हे आता कुठेतरी विचार करायला हवे आणि ती आता काळाची गरज आहे नाहीतर खऱ्या सणाचे उद्देश बाजूलाच राहतील आजकाल तर लोकांना सणउत्सवाच्या शुभेच्छा पण दययला वेळ नाही.आपली राष्ट्रीय सणांची देशभक्ती फक्त २६ जानेवारी,१५ ऑगस्ट व भारतपाकिस्तान मॅच पुरतीच मर्यादित असते.हीच राष्ट्रभक्ती रोज का रहात नाही.वेळेत टॅक्स भरणे,कचरा कुंडीत टाकणे ही राष्ट्रीय सणांची शिकवण आपण का विसरतो.आपल्यामुळे कोणालाही त्रास नको असे जरी वागलो तर ह्या देशात शांतता का नाही टिकणार?आपले सण आपली संस्कृती,इतिहास,वारसा जपायला हवी.स्वतःपासून सुरवात करा मीच का या पेक्षा मी का नाही हा प्रश्न विचारत चला सवतःला.नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहोत..?लिखाण आवडले असेल तर नक्की लेखकाचे नाव कट न करता राष्ट्रसाठी,समाजासाठी शेअर करा.
..............🦋🌺😇💞..............
..शब्दांकन -B.S Kendre(Student)
Contact-7218160575 (WhatsApp only)
Telegram -@Bskendre5
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा...🌹❤️🎊

2 months, 2 weeks ago

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
वेळ काढून नक्की एकदा वाचावेत असे विचार मांडलेले आहेत.

तेच पाऊले खरे सुंदर,जे ध्येय प्राप्तीच्या दिशेने चालत जातात.🔸
तेच खांदे श्रेष्ठ,जे कधीच कोणाला खाली नाही ओढत..
तेच डोळे देखणे,जे कधी वाईट नजरेने पाहत नाहीत.
तोच चेहरा आकर्षक,जो इतरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवतो...💖 🌿

तीच बोटे खरे पवित्र,जे कधी दानधर्म करायला माघार घेत नाहीत.
तीच देहकाया खरी रूपवान,जी कधी कोणाला अपाय करत नाही..
तीच जीभ खरी प्रमाणशीर,जे कधी चुकीच्या गोष्टींची चव घेत नाही.
मन त्याचेच रेखीव असते,जे कधी कोणाचा द्वेष करत नाही...💖 🌿

तीच नासिका नेटकी,जी कधी निकृष्ट गोष्टींचा श्वास घेत नाही.💫
तेच मुख रेखीव,जे कधी चुकीच्या शब्दांचा वापर नाही करत.
तीच मान उंच उभा राहते,जे कधी कुणाला कमीपणा दाखवत नाही.
तेच कान बांदेसुद,जे कधी असत्याचे श्रवण नाही करत...💖 🌿

तेच खरे आपले सारथी,जे आपल्या नेहमी सोबत असतात.🎗
तीच मैत्री सत्यनिष्ठ,जे आपल्या वाईट काळात भागीदारी घेते..
तेच मस्तक योग्य,जे कधी चुकीच्या लोकांपुढे नतमस्तक होत नसते.
तीच नजर देखणी,ज्या नजरेतून प्रेम व्यक्त होते...💖 🌿

तेच साथीदार शुद्ध,जे कधी कुणाला फसवत नाहीत.
तेच नाते खरे,जे कधी स्वार्थीपणा साधत नाही..
तेच लोक मोठे होतात,जे मातीशी आपली नाळ जोडून ठेवतात.
आणि तीच व्यक्ती खरी सुंदर,ज्याचे विचार आणि स्वभाव सुंदर...💖 🌿
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा....🌹❤️🎊

2 months, 2 weeks ago

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात. आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्याततिचा एक पाय चिणला गेला आहे.

त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली?

जे जवळ जवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरश.. थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याला दीसले की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.

कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता ! एक पाली सारखा
नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन नजाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.
तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं,विश्वास) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.....
🔹नाती जपण्यात मजा आहे
🔸बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
🔹जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
🔸येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔹नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
🔸येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं
🔹याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं.

🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹

3 months, 1 week ago
आज - बेधडक महाराष्ट्र... ***😊******🙏***

आज - बेधडक महाराष्ट्र... 😊🙏

🍁 प्रकाशाच्या वाटा  🍁

3 months, 1 week ago
प्रवास लेखकाचा - प्रकाशाच्या वाटा

प्रवास लेखकाचा - प्रकाशाच्या वाटा

3 months, 1 week ago
आजची आपली प्रसिध्द वर्तमानपत्र

आजची आपली प्रसिध्द वर्तमानपत्र
मराठवाडा साथीला बातमी...  😊🙏

🍁 प्रकाशाच्या वाटा  🍁

5 months, 1 week ago
तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈
5 months, 1 week ago
तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈
5 months, 2 weeks ago
आपल्या स्त्री शक्ती फाऊंडेशन चा पुढचा …

आपल्या स्त्री शक्ती फाऊंडेशन चा पुढचा अधिकृत उपक्रम...

गरजूपर्यंत अवश्य पोहोच करा. इतरांना शेअर करा. आपण ही सहभागी व्हा. येणाऱ्या सोमवारी भेटुयात रात्री नऊ वाजता.

लिंक -
https://meet.google.com/avj-bmjo-rsc

5 months, 3 weeks ago

ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खुश असेल हे माझं यश बघून.
कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय.
आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय.
ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.

असो
सर,
तुम्ही का वाईट वाटून घेता ?
तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ?
सर,
तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.

त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती.
चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.
सर तोंड गोड करा.

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.
भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.

सर,
मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.
त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो.
आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो......
न सांगता.

खरा देव तर कधीच नाही दिसला पण,
मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ....

देव पाहिला....

🙏 धन्यवाद !! 🙏

हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं..
म्हणून मी शेअर करतोय.....

कारण मलाही कळले माणसातच देव आहे🙏

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago