मराठी जोक्स Marathi jokes 😂

Description
मराठी/हिंदी जोक्स and mems

𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧-
@Marathi_joke_bot

कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या.
😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago

3 weeks, 6 days ago

सिगरेटची सवय

पती संध्याकाळी खूप उदास चेहरा करून घरी येतो.

पत्नी :- काय झाले?

पती :- आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग खाली कोसळली.

पत्नी :- मग तुम्ही कसे वाचले?

पती :- मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो.

पत्नी :- नशिब चांगले तुमचे. थॅन्क्स गाॅड.

थोड्या वेळाने टीव्हीवर बातमी येते की, सरकारने मरण पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला १-१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नी रागात - काय मेली ही तुमची सिगारेट ओडण्याची सवय कधी सुटणार देव जाणे.
😀😁🤣

1 month, 1 week ago

गावातल्या शाळेत...

शिक्षिकेने एका मुलाला विचारले, मला सांग 15 ऑगस्टला आपल्याल काय मिळाले...?

विद्यार्थी: मॅडम, एक बिस्कीट चा पुडा!!

😜😝😁😂

1 month, 3 weeks ago

बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले

नवरा - वाह... मग एक मार्क कुठे गेला???

बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!

🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

3 months, 2 weeks ago

35 मिनिटे पेट्रोल पंप च्या रांगेत स्कुटर घेऊन उभी राहिली होती ती...

तो अधून मधून तिच्याकडे पाहून ?? 'स्माइल' करायचा..

ती पण छानशी लाजायची.... ?

त्याला काहीतरी सांगायचे होते...?

शेवटी.....

नंबर आल्यावर तो तिच्या जवळ आला .. त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आले .. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले ..
तिच्या अंगावर रोमांच उभे राहीले ?... तो पुटपुटला .....

"तुझी स्कुटर इलेक्ट्रिक आहे! ????‍♂️??

3 months, 2 weeks ago

वीज कडाडली कि हिरॉईन घाबरून
हिरोला मिठी मारते हे मी पिक्चर मध्ये अनेकदा बघितले होते...

काल बस स्टॉपवर उभा होतो.

माझ्या दोन्ही बाजूला दोन तरुण मुली उभ्या होत्या.

आणि...

.
.
.
अचानक वीज कडाडली...!

.
.
मी मोठ्या आशेने त्यांच्याकडे चमकून बघितले...

क्षणात दोघी म्हणाल्या...

"काका, तूम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही आहोत !!"

? ??‍♂️ ?

3 months, 2 weeks ago

स्थळ पुणे

बायको नवर्याला सहज म्हणाली,

"तुम्हाला नाही वाटत का?
पावसाळा आहे आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या...गाणं गुणगुणावं.."

नवरा म्हणाला,

"पावसाळा आला की, बेडकांना असच वाटतं..!"

संपला विषय..

????

6 months, 1 week ago

सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने.  .
मग मी पण उचलला नाही.
?? ??

22) पुणेकर v/s पुणेकर
पहिला पुणेकर - तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ?

दुसरा पुणेकर - घरात एकच वाटी आहे का ??*?*????

23) कावळ्याने माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?"

माठानं फारच सुंदर उत्तर दिलं...  म्हणाला:
बाष्पीभवन, उष्णता शोषण प्रक्रिया आहे ही! त्यासाठी डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं.
माझ्या पृष्ठभागावर जी सूक्ष्म छिद्र आहेत, ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या नियमांनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो
......
कावळ्यानी मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे नको त्या चौकशा करायच्या नाहीत...

कावळा कुठला होता माहित नाही
पण..

माठ पुण्याचा होता....
??????

24) याला अपमान म्हणावं की प्रेम? ?
नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??”
बायको: “दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता!”
???

25) आजचा अजून एक शोध..     ?**

रामफळ  हे रामाचे.....!??‍♂️**

आणि

सीताफळ हे सीतेचे!! ??‍♂️**

तर .......मग.....

..... वांगे कुणाचे ......?

......भरताचे!!?‍♂️
?*????????

बसल्या बसल्या असंच काहीतरी सुचतं ??

26) रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून मुलाने विचारले : ही कोण ?
मम्मी म्हणाली : आत्या.
पप्पा म्हणाले : मावशी.
*मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले

27) सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर न वाचता काळजी घ्या ठोकून देताहेत.

मी पोस्ट टाकली होती...
कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!

माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी काळजी घ्या असा सल्ला  दिला.
???? ?

28) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर
मी एक गादी व दोन उश्या घेतल्या !*

आखीर वो भी तो
'सोने' की चीज है ..???

31) पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट च्यायला
समजतच नाहीये जमिनीवर
राहतो का समुद्रात...
??????????????????

32) तो बायकोला म्हणाला
You are my strength
बायको त्याला म्हणाली
It means other women are your weakness?
आता वाक़डयात शिरायचे म्हटल्यावर काय????

6 months, 1 week ago

थोड नाही भरपूर हासू या

? विरंगुळा
1) सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.*
__पु ल देशपांडे

मग बायको कुणाची पण असो
?*?*?

2) डॉक्टर :- हा बोला, कुठं दुखतंय..? ....
पेशंट : फी कमीकरणार असाल तर सांगतो. ... नाहीतर शोधा....
?*?????

3) पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत.......
:
येवले चहा......
:
सायबा चहा......
:
कडक चहा......

:
हरमन चहा......
:
मायेचा चहा.......
:
प्रेमाचा चहा.....
:
मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.......
:
सगळ्यात कोणता चहा चांगला ? ? ?
:
तर तो म्हणाला......
:
फुकटचा चहा......
?????

5) नवरा : मला आज पर्यंत समजलेले नाही की, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी खिचडीच का होते ????

बायको : हेल्दी आहे ते...
सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून घरात कालनिर्णयच लावतात ना...
आगदी तस्सेच असते हे सुद्धा..
??????

6) एक देशस्थ जाम वैतागला होता. त्याला विचारलं काय झालं तर म्हणतो ह्या कोकणस्थ लोकांचं एक काही धड नसतं -
रानडे कर्वे रोडवर राहतात

कर्वे फडके रस्त्यावर राहतात

फडके लेले आळीत राहतात

लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात

बापट दांडेकर पुलाजवळ राहतात

दांडेकर गोखले नगरला राहतात

गोखले भांडारकर रोड वर राहतात

आणि भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात

अरे आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी ?????

7) You can't outsmart a Punekar:-
मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो

पुणेकर: दिड दिवस !!!

मुंबईकर:किती हा चिकटपणा ??

पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???

मुंबईकर : दहा दिवस

पुणेकर :  गणपती कशाची देवता आहे ??

मुंबईकर : बुद्धीची !!!

पुणेकर : मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो.
?????

8) दुकानदार - साहेब, काय देऊ?
ग्राहक - होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या.
दुकानदार - बांधून देऊ की इथेच खाणार?
?????

9) मुंबईत समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी कृपया धोतर व टोपी घालू नये.
वादळ घुसलं तर पॅराशुट होईल!
???

10) पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी

IIअतिथि देवो भव II

परंतु देवांना नम्र विनंती आहे की
त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी...
?????

11) मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय

पुणेरी वडील - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ??
???‍♂????

12) भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हो आहे ना साहेब
पुणेकर : मग आधी ते खर्च कर. भिकारचोट कुठला.
??????

13) स्थळ :- सदाशिव पेठ
गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?”

दुकानदार :-
“वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.”

गिऱ्हाईक :-
“वीस रुपयांचे बघू.”

दुकानदार  :-
“हे घ्या...
कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा...."

गिऱ्हाईक :-
“हे कसं काम करतं?”

दुकानदार  :-
“काहीच काम करत नाही.
पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात......

पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं,
हेच एकमेव यंत्र आहे."
.?????

15) कधी विचार केला
M सरळ आणि
W उलटे का लिहितो?
कारण Men सरळ आणि
Women उलटा विचार करतात
काल ही कथा थेट माझ्यासोबत घडली ……
16) काल मी लिफ्टने वर जात होतो,
त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
"दुसरा की तिसरा"?
बाईंनी रागाने म्हटले

"आत्या आहे मी याची"
??????

17) चाळिशीचा फार त्रास होतो ...नको नकोसं होतं नुसतं..काय करावे कळत नाही, सुधरत नाही ...

तिशीत होत तेंव्हा कस बरं होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो...

विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ...

पण आता...
नको नकोस झालं आहे ...

४५ च्या आसपास काय होणार काय माहिती? पन्नाशी नंतर तर बोलूच नका।

नाही नाही,

माझ्या वयाबद्दल नाही बोलत..
तापमानाबद्दल बोलत आहे..  तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलंच  चांगलं...????

18) ??लॉक डाऊन  पर्यटन  ..
.पुण्यात पाटी लागली ☆☆☆                  
स्विगी आणि झोमॅटोचा  ड्रेस भाड्याने मिळेल!   
मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्या!!!????

19) शेजारच्या वहिनी
बायकोला म्हणाल्या...

तुमचे साहेब खूप हुशार आहेत.
माझ्या चेहऱ्यावर
मास्क असूनही मला
ओळखलं व हसले
सुद्धा...!!

आता घरातलं
लॉकडाऊन आणखी
कडक झालंय ...!!!
?*?????

20) काल एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला पण त्याने उचललाच नाही।
मग आज मी एक मेसेज पाठवला ...
आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का ??

6 months, 3 weeks ago

_एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला_

_नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला..पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं म्हणून त्याने नदीत उडी टाकली.._

_आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला._
.
.
.
.
.
.
.
.
पाण्यात मगरी आहेत..
नदीत उडी मारू नये
????????

8 months ago

# ???

" शाळेत जाण्यावरून समोरच्या घरी वाद चालू आहेत. थोड हायफाय कुटूंब आहे. सगळ संभाषण इंग्लिश मधून चालू आहे ज्याचा मला समजलेला थोडा अनुवाद खालील प्रमाणे ( parents English लै भारी आपले ? )

पाल्याला शाळेत जायचे नाही म्हणून काहितरी कारणं सांगून आज शाळेत जायचे नाही हा मुद्दा.
वडील थोडे सौम्य आहेत, फार काही जास्त न चौकशी करता ठीक आहे घरी अभ्यास कर असे म्हणतं त्यांनी पाल्याला अनुमती दिली. सगळ संभाषण इंग्लिश मधून.( अगदी माझ्या वडीलांसारखे आणि माझ्या सारखे ? )

आईला मान्य नव्हते. रोजची नाटकं आहेत ही, कधीचं एका हाकेत उठत नाहीं. शाळेत जायचं नाहीं म्हणून हे कारणं आहेत्, थोडी शाळेची वेळ टळू द्या बघा कसा उड्या मारायला जाईल ते, हाताला लागला तरं मला म्हणा. तूझ्या ( बापाला उद्देशून ) लाडाने होतेय हे सगळ. सगळ इंग्लिश मधून.
( सेम माझ्या आईसारखी आणि आता पुनमसारखी ? )

मी तू, तू मी होत शेवटी Go to hell आईच्या या वाक्याने प्रसंगाचा शेवट झाला.

हा पंक्तीप्रपंच लीहिण्यामागें कारणं हे की शेवटीं go to hell जे म्हणल्या गेले त्याहून मला माझे आठवले की असे बरेच प्रसंग माझ्या ऐतिहासिक शालेय कालखंडात घडलेले आहेत किंबहुना या आणि अश्या अजून अधिक राजक्रिडेने ( कृष्णक्रीडा ) ते व्यापलेले आहे. पण तेंव्हा go to hell इतकं सौम्य शब्दात शेवट व्हायचा नाही. जा चुलीत, काळ कुत्र उभ करणार नाही तेंव्हा कळेल वगैरे वगैरे बराच वेळ असा आवाज घुमायचा.

आजची पोरं खरचं नशीबवान आहेत... Go to hell.. अहाहा किती गोड वाटतेय. हे इतकं सौम्य माझ्या वेळी असतें तरं आज तुम्हाला मला १२ वीच्या परीक्षेसाठी शूभेच्छा द्याव्या लागल्या असत्या.

जी मजा चुलीत जा ऐकण्यात आहे ती go to hell मधे नाही राव...!"

????????????
# राजू काजे...

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago