Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
Success Story : इंदापूर तालुक्यातील माथाडी कामगाराची मुलगी झाली अधिकारी : कु. पूजा गलांडेचे एमपीएससी परीक्षेत मोठे यश..
'पुस्तकप्रेमी कट्टा' स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने 'पुस्तकप्रेमी कट्टा' या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. पुस्तकप्रेमी कट्टा या उपक्रमाचे स्वरूप... 1)दर 15 दिवसांमध्ये एक पुस्तक…
विनम्र अभिवादन..💜☘
विनम्र अभिवादन💜☘
देवस्थानाच्या कुणा पुजाऱ्याच्या स्वप्नात शनिदेव येऊन ' इथून पुढे मला ब्रँडेड तेलाचाच अभिषेक हवाय' अशी सूचना केलेली दिसतेय. आता गोरगरिबांची तेलासह भक्तीही महागली. ब्रँडेड ऐवजी सुटे तेल ओतणाऱ्याच्या आयुष्यात शनिदेव ठाम मांडून बसण्याच्या शक्यतेलाही इथे वाव आहे.. आहे..#गरीब_देशा_भक्तांच्या_देशा..💜☘🙃
फक्त शैक्षणिक आणि आरोग्यविषयक माहिती साठी -
चुंबन केल्याचे किती फायदे आहे हे जाणून घेतल्यावर आपण कधीच आपल्या पार्टनरला चुंबनासाठी नकार देणार नाही. अनेकदा सकाळच्या घाई गडबडीत राग एवढा चढत जातो की पूर्ण दिवस मूड विस्कटतो. अशात सकाळी उठल्यावर एक चुंबन घेतल्याने राग घालवता येईल. आपल्याला विश्वास बसत नसेल तर जाणून घ्या चुंबन घेण्याचे किती फायदे आहेत ते -
आनंदी मन
--------------
असे क्षण आनंद देऊन जातात. खुशी देणारे हार्मोन रिलीज झाले की ताण कमी होतो आणि उत्साह वाढतो.
ताण कमी होतो
-------------------
चुंबन घेतल्याने ऑक्सीटोसिन हार्मोन रिलीज होतं ज्याने अस्वस्थता कमी होते आणि आपल्याला फील गुड व्हायला लागतं. अशाने ताण आपोआप कमी होतं.
बीपी वर नियंत्रण
----------------------
चुंबन घेताना हार्ट रेट वाढून रक्त वाहिन्या रुंद होऊन विस्तार झाल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतं. ज्याने रक्त दाब नियंत्रित राहतं.
डोकेदुखी पासून मुक्ती
--------------------------
आता डोकेदुखी होत असल्या एक कप चहा किंवा औषध घेण्याऐवजी चुंबन घ्या. याने रिलीज होणारे हार्मोन रक्त वाहिन्यांना मोकळं करून रक्तदाबाचे स्तर कमी करतं. हाय ब्लड प्रेशर आणि ताण हे डोकेदुखीचे प्रमुख कारण असून चुंबन केल्याने यावर नियंत्रण राहतं आणि डोकेदुखी गायब होतं.
कोलेस्ट्रॉल नियंत्रण
-------------------------
चुंबन घेतल्याने अनहेल्दी कॅलरीज बर्न होते ज्यामुळे चुंबन कोलेस्ट्रॉलचे स्तर सुधारते.
इम्यून सिस्टम सुरळीत करतं
-----------------------------------
चुंबन घेताना सलाईवा एक्सचेंज होतात. सलाईवाद्वारे पार्टनरचे कीटाणु आपल्यात आल्याने इम्यून सिस्टम सक्रिय होत आणि यांच्याशी लढण्यासाठी स्वत:ला तयार करतं. परिणामस्वरूप इम्यून सिस्टम मजबूत होतं.
ओरल हेल्थ
----------------
चुंबन सलाईवरी ग्लॅड्सचे कार्य सुरळीत करतं ज्याने दात आणि तोंडात कमी कॅव्हिटी पैदा होते. हे ग्लॅड्स अधिक प्रमाणात सलाईवा पैदा करतात ज्यामुळे दात आणि तोंडात अडकलेले अन्न कण निघून जातात. याने प्लाक किंवा ओरल कॅव्हिटीचा धोका कमी होतो.
#चुंबनदिनशुभेच्छा
🖋राजेश कदम
👇👇
स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत आर्थिक स्थिरता खूप महत्त्वाची वाटते. ज्या पुरुषांकडे आर्थिक स्थिरता असेल अशांना अर्थातच बहुसंख्य स्त्रियांची पसंती असते. पण त्याच बरोबर समाजात मान-सन्मान असणेही महत्त्वाचे असते. प्रेमात जाण्यापूर्वी मुली जेव्हा विचार करत असतात तेव्हा अशी क्षमता ज्याच्यात आहे त्यालाही त्या पसंती देतात. मग त्यावेळी त्याची आर्थिक स्थिरता कदाचित नसेलही. पण क्षमता मात्र हवी. पूर्वीच्या काळी एका राजाच्या असंख्य राण्या असणे ही त्या प्रत्येकाला हवी असलेली आर्थिक स्थिरता व मानसन्मान निवडण्यातून बनलेली गोष्ट होती. आज त्याचे स्वरूप बदलले असले तरी मूळ मुद्दा कायम आहे. सत्तावान, ताकदवान असणे हे स्त्रीला संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे असते. कारण त्यातून उत्तम उदरनिर्वाह, उत्तम आरोग्य पोषण आणि संपत्तीचे मालक होणे साधता येते. मान-सन्मानाची आजची परिभाषा, उत्तम नोकरी किंवा सर्वोच्च चांगला धंदा या भाषेतून व्यक्त होते. बहुसंख्य स्त्रिया आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या किंवा कमी श्रीमंतीच्या पुरुषांवर फुली मारतात. थोडक्यात आपल्या लायकीचा पुरुष त्या निवडतात.
वय हा घटकही प्रेमात पडताना महत्त्वाचा ठरतो. स्त्रीला आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेला पुरुष हवा असतो. जगभरातील स्त्रियांचा विचार केला तर सरासरीने आपल्यापेक्षा तीन ते साडेतीन वर्षापर्यंत मोठा असलेला पुरुष त्यांना हवा असतो. यात स्त्रीला असे वाटते की, वयाने मोठा असणारा पुरुष हा जास्त समजूतदार असतो, भावनिकदृष्ट्या तो शहाणा असतो. दुसरे म्हणजे असा पुरुष तिच्यावर अवलंबून राहातो. ज्यामुळे तिला तो आपल्याबरोबरच राहील याची खात्री वाटते.
महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या उद्योगी रहाणाऱ्या पुरुषांना स्त्रिया पसंती देतात. जे समरसून काम करतात, जे कमाईला महत्त्व देतात, जे सतत पुढे जाण्याचा ध्यास ठेवतात अशा पुरुषांचे स्त्रीला आकर्षण असते.
याहून अत्यंत महत्त्वाच्या घटकाची आपण आता चर्चा करणार आहोत. तो म्हणजे देखणेपणा, मर्दानी शरीरयष्टी. दिसायला सुंदर आणि निरोगी शरीरयष्टी, कमावलेली असेल तर उत्तमच, हा निकष आज खूपच प्रभावी बनला आहे. सिनेमे आणि ‘गॉसिप्स' यातून हा घटक वेगाने पसरतो आहे. निरोगी शरीरयष्टी म्हणजे उत्साह, सळसळलेपणा, आनंदी देहबोली. ही सारी शरीरातून व्यक्त होणारी गोष्ट आहे. हा घटक तसा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. पूर्वीच्या काळात स्त्रियांच्या आवडी-निवडींवर पुरुषसत्ताक मतांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यावेळच्या स्त्रिया ते व्यक्त करू शकत नसत. आज खुल्या वातावरणात स्त्रियांना ते खुलेपणाने व्यक्त करता येते इतकेच. सिनेमात 'चॉकलेट' हिरोची प्रतिमा ही खूपच उत्तम दाखविली जाते. आपसुकच मग उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे देखणा चेहरा असे भ्रामक समीकरण रुजते. पण हे झाले वातावरणाच्या परिणामाबाबत. याहूनही एक प्रभावी घटक या समीकरणात आहे जो स्त्रीच्या मेंदूत उत्क्रांतीतून घट्ट रुतून बसलेला आहे. देखणे व्यक्तिमत्व म्हणजे पुढे जन्मणारे अपत्यही देखणे = निरोगी उपजेल अशी धारणा. याला तसा वैज्ञानिक आधार काही नसला तरी समजूत मात्र पक्की आहे.
म्हणजे श्रीमंत आणि देखणा हा निकष अग्रक्रमावर घेऊन प्रेमाकडे वाटचाल सुरू होते. जर स्त्री ही सर्वसाधारण असेल तर तिला सर्व घटकांचा पुरुष मिळणे अवघड बनते. मग अग्रक्रम बदलतात. त्यामुळे एखादीला बुद्धिमान असणे महत्वाचे वाटते, दुसरीला मस्त बॉडी असलेला आवडतो तर तिसरीला पैसा महत्त्वाचा वाटतो. अग्रक्रमांची उतरंड वेगवेगळी बनल्याने निवडी बदलतात. आवड ही अग्रक्रमांच्या रचनेवरून तयार होते.
'शब्द पाळणाऱ्याासच'
प्रथम पसंती त्या देतातच शिवाय
स्त्रियांना प्रेमातील
वचनबद्धता, मनमिळाऊपणा आणि प्रामाणिकपणा हे तीन घटक खूप महत्त्वाचे वाटतात. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डेव्हीड बस यांच्या एका सर्वेक्षणातून असे पुढे आले की, स्त्रिया 'शब्द पाळणाऱ्यासच' प्रथम पसंती देतात. पुरुषांनाही वचनबद्धता हवी असतेच. त्याचा संबंध आर्थिक जबाबदारी घेणे, मुले सांभाळणे आणि सेक्स मध्ये इमान राखणे यांच्याशी असल्याचे आढळले आहे.
हे सारे खरे असले तरी, केवळ श्रीमंत- देखणा-बलदंड शरीर किंवा अन्य घटकांपेक्षा सर्वात महत्त्वाचा घटक आहे स्वभाव. प्रेमात पडताना या घटकांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. काही मुली तर 'त्याचे डोळे मला खूप आवडले म्हणून मी प्रेमात पडले' एवढ्या गौण निकषांपर्यंतही जातात! त्यामुळे प्रेमाची गंभीरता हरवते. प्रेम हे एकमेकांच्या स्वभावावर जमते- टिकते-वाढते. स्वभाव हा देखणेपणावर वा श्रीमंतीवर अवलंबून नसतो. स्वभाव घडणे-बिघडणे याचे घटक वेगळे असतात. त्याविषयी जर स्त्रियांनी मनावर घेतले तर प्रेमाची त्यांची निवड अचूक बनेल.
मग त्या ज्याला निवडतात त्याला काय हवे असते ?
🖋डॉ. प्रदीप पाटील
तिला काय हवे असते ?
प्रेमात पडताना स्त्री कोणता विचार करत असते हा कुतूहलाचा विषय आहे.
पुरुषांना तर तो एक मोठा प्रश्नच असतो.
याचा विचार करताना आपल्याला स्त्री- पुरुषांच्या संबंधांचा हजारो वर्षांपूर्वीपासूनचा मागोवा घ्यावा लागेल.
इतर बहुसंख्य प्राण्यांप्रमाणेच, माद्यांप्रमाणेच मानवातही स्त्रीला कुठल्याही पुरुषांबरोबर नाते निर्माण करताना खूप विचार करावा लागतो. त्याचे कारण तिच्या पोटात दडलेले सत्य होय.
प्रेमात पडल्यावर निर्माण होणाऱ्या शरीरसंबंधांतून स्त्री गर्भवती होण्याचा संभव खूप असतो. स्त्री गर्भवती होणे ही घटना स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाची असते. स्त्रीचे गर्भारपण हे वेगवेगळ्या बंधनात अडकत जाते. समाजमान्यता मिळणे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तिच्या गर्भारपणाबाबतीत तिला पडतो. प्रेमात पडताना तिला याची जाणीव असते. जिला जाणीव नसते ती 'बिनधास्त पणे प्रेमात डुंबून जाते. पण त्यानंतर मात्र तिला वेगाने भानावर येऊन संघर्ष करावा लागतो. असा विचार ती का करते ?
स्त्रीला दर महिन्याला पाळी येते. दर महिन्याचे हे चक्र पाळी थांबेपर्यंतच्या वयापर्यंत अव्याहतपणे चालू असते. दर महिन्यात तिच्या शरीरातील एक स्त्री बीजांड पक्व होत असते. पुरुष वीर्याच्या एका थेंबात हजारो-लाखो पुरुषबीजे असतात. त्यांना शुक्राणू म्हटले जाते. जेव्हा शरीरसंबंध येतो तेव्हा केवळ एक शुक्राणू स्त्रीच्या बीजास फलीत करू शकतो. आणि जर स्त्री बीज जर फलित झाले तर पुढे सुरू होते मातेच्या शक्तीची गुंतवणूक. म्हणजे पुढे नऊ महिने त्या स्त्रीला स्वत:ची सर्व ऊर्जा वापरून त्या गर्भाचे पालनपोषण करावे लागते. ही कथा इथेच संपत नाही. मूल जन्माला आल्यावर तिला मुलासाठी स्तनपान देऊन आणखी ऊर्जा सतत खर्च करावी लागते. पुढे हा काळ ३ ते ५ वर्षांपर्यंत जातो. म्हणजे इथे मानसिक व शारीरिक शक्ती खर्च करण्याची पाळी येते स्त्रीवर, पुरुषावर नव्हे. आणि प्रेम केल्यावर पुढील टप्प्यावर स्त्रीला मोजावी लागणारी ही किंमत तिच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. कारण त्यात दोन धोके दडले आहेत.
जर प्रेम व नंतर शरीरसंबंध करून पुरुषाने सोडून दिले आणि जर ती गर्भवती असेल तर कुमारी मातेचा ठपका समाज ठेवतो. त्यातून सामाजिक संघर्षाची किंमत तिला मोजावी लागते. हे सर्व सस्तन प्राण्यात घडते. सुमारे ४ हजार प्रजातींच्या
सस्तन प्राण्यांतील सर्व सस्तन माद्यांना हे सहन करावे लागते. दुसरे असे की, प्रेम-संबंध-लग्न/सहवास-मूल या साखळीतून एकत्र राहायची पाळी आली तर दुसरा धोका असतो. जर नराने किंवा पुरुषाने योग्य ती काळजी गर्भारपणात व त्यानंतर घेतली नाही तर स्त्रीचे खच्चीकरण होते. तिचे स्वातंत्र्य नाहीसे होते. ती अनेक प्रकारच्या रोगांना बळी पडते. तिचे शोषणही होऊ शकते.
या दोन जबरदस्त धोक्यांमुळे स्त्री सतत सावध असते. त्यामुळे ती असाच पुरुष निवडण्याच्या प्रयत्नात राहते की जो हे धोके कमीत कमी ठेवेल. आजच्या काळात ७२ तासांच्या गोळ्या, निरोध व अन्य साधनांमुळे हा धोका कमी झाला आहे. पण हजारो वर्षे घडत - बनत आलेली मानसिकता मात्र कमी झालेली नाही.
त्यामुळेच स्त्रीच्या निवडीत प्रत्येकीच्या परिस्थितीनुसार आणि आवडीनुसार आडाखे बांधले जातात. आणि त्यानुसार ती त्याला निवडते.
प्रेमात पडण्यापूर्वी अशी निवड ठरवून करणारे बरेच स्त्री-पुरुष असतात.
जगभरातील स्त्रियांना नाते यशस्वी होऊन टिकून राहण्यासाठी 'प्रेम' असणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. आफ्रिकेतील दक्षिणेच्या टोकाला राहणाऱ्या 'झूलू' जमातीपासून ते उत्तरेकडील अलास्कामधील एस्किमो पर्यंतच्या सर्व स्त्रियांना प्रेम हवेच हवे असते. मानववंशशास्त्रज्ञ विल्यियम जँकोविएक यांना असे आढळले की, जगातील १६८ संस्कृतींमध्ये जवळपास ९०% जणांनी 'प्रेम' हवेच असे सांगितले आहे. अलिकडच्या एका पाहणीत, समाजशास्त्रज्ञ स्यू ख्रिचरला दिसून आले की, ६१% रशियन पुरुष आणि ७३ टक्के रशियन स्त्रिया प्रेमात पडलेले होते. जपानमध्ये हे प्रमाण ४१ : ६३ तर अमेरिकेत ५३:६३ असे होते.
पण बऱ्याच जणींना 'उसे देखने के बाद घंटी बजी' तरच निवडायचे असे वाटते. ही घंटी म्हणजे काय असते ? तर जो पुरुष हवा असेल त्याच्याविषयीचे अंदाज तिच्या मनात अंतर्गत पातळीवर तयार होत असतात. ती मग काही आडाखे बांधते. या आडाख्यानुसार जर 'तो' सापडला की 'घंटी' वाजते! बघितल्या बघितल्या प्रेमात पडणे हा प्रकार ‘निवड' होण्यासाठी उपयुक्त असला तरी तो दीर्घकाळाच्या सहजीवनासाठी धोकादायक ठरू शकतो. कारण जे निकष जोडीदार निवडीसाठी असतात ते वैयक्तिक असतात. त्यांना सारासार विचारांचा पाया असतोच असे नाही. त्यामुळे पाहिल्या पाहिल्या प्रेमात पडलेल्यांची नंतर फसगत होऊ शकते. वर जे धोके आहेत ते मुळाशी असतातच. त्यामुळे आपण वाऱ्यावर सोडले जाऊ नये किंवा पुढील आयुष्यात धोके निर्माण होऊ नयेत. यासाठी तिचे आडाखे जे तयार होतात, ते कोणकोणते ते बघू.
👇👇
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago