आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Description
Channel cum Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही..
पुनवेच्या शब्दशलाका✨💫🌟
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago

1 month, 3 weeks ago

“नोकरी वगैरे
गेल्या दोन आठवड्यात सारखेच कोणते ना कोणते निकाल लागताय…लोकांचे गुलालाचे स्टेटस संपता संपेना…अर्थात संपूही नये…”नोकरी” नावाच बहुप्रतिक्षीत लांबलेलं प्रकरण संपायला आल्याचा सुस्कारा…थोडा विचार केला ..काय घेऊन येते ही नोकरी नावाची गोष्ट आपल्या आयुष्यात ..? यावर विचार करतांना मला माझा बाप आठवतो ..स्वप्नं वगैरे मोठी असावीत नक्की पण स्वप्नांचा नाद तेव्हाच करता येतो जेव्हा जीवनात नोकरी नावाचं स्थैर्य आहे ..बापाच्या नोकरीमुळे मला ते स्वप्न पाहण्यास सक्षम केलं..जर बाप नोकरीला नसता तर कदाचित गोष्टी अवघड गेल्या असत्या नक्कीच..जगाशी प्रत्येक संधीसाठी भांडावं लागलं असतं (तुमच्यापैकी अनेक जण हे करत असतील ना आता?) कोणत्या एका पिढीने नोकरीची सोय करायची असते मग पुढच्या पिढ्या स्वप्नांचा नाद करु शकता..याचा अर्थ बिलकूल नाही स्वप्नं पाहणं कुण्या एका पिढीची मक्तेदारी आहे असं ..पण सर्वसामान्य कुटुंबांचा इतिहास
बघता कुटुंबाची सामाजिक ,आर्थिक प्रगती करण्याचं सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे नोकरी …अर्थात किती सोप्पा ,किती अवघड हे ज्याच्या त्याच्या संघर्षावर अवलंबून असतं ..”स्वतः” ला सिध्द करु इच्छिणार्या सर्व धडपडणार्या माणसांचा जिव्हाळ्याचा विषय नोकरी …आपली नोकरी आपली ओळख असते,तिच्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण खूप चांगल्या पध्दतीने होऊ शकते ,आईवडलांना मुलांच्या सेटलमेंटची जी चिंता वाटत असते ना ती दूर करता येते,आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य Secure करता येत आणि संसार नावाची जबाबदारी अंगावर पडण्याआधी मनसोक्त जगता येतं ती नोकरी कारण आधी आर्थिक फार चिमटे सोसलेले असता ..मुलींसाठी तर नक्की सांगेल,”आपण नक्की सासरचे की माहेरचे ? , या प्रश्नाचं एक चांगल उत्तर “आपण आपल्या नोकरीचे” कुणी असो नसो तुझी नोकरी तुझी
असते *“ जगण्याच्या कक्षा रुंदावतात,चार भिंतीच्या पलीकडचं जग जाणता येतं ,नोकरीच्या माध्यमातून कुठल्यातरी क्षेत्रात भरीव योगदान देण्याची संधी मिळते ..
शून्यातून विश्व नक्की निर्माण करता येतं पण सगळ्यांना ते शक्य नाही ,आपली नोकरी म्हणजे शून्यातून आपला एक तरी उभारुच शकतो ..इति नोकरीचा महिमा सुफळ संपन्💯*
_सहज_सुचलं_ते_लिहिलं

1 month, 3 weeks ago
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
1 month, 3 weeks ago

आयुष्याच्या प्रश्नांपुढे परीक्षेचे प्रश्न खूप छोटे असतात.आयुष्याचे प्रश्न हीच परीक्षेचे प्रश्न सोडवण्याची सर्वात मोठी मोटिव्हेशन असू शकते ..कुणाचे काय प्रश्न असतील सांगू शकत नाही पण या प्रश्नांतून मनात पेटलेली चिंगारी स्वस्थ बसू देत नाही आणि मग अभ्यासच होत नाही ,मन लागत नाही ,मोबाईल वगैरे वगैरे सगळं थिल्लर शौक वाटतात…कारण आतून आलेली मोटिवेशन फार जालीम उपाय आहे सगळ्या प्रश्नांवर..💯
_संघर्षकहाण्यी_ऐकाव्या_तेवढ्या_कमी

1 month, 4 weeks ago

आयुष्यात काही प्रश्न अनुत्तरितच बरी असतात..उत्तर शोधायला गेलं की त्रास होतो..नशीब आणि कर्म याचा ताळमेळ लागता लागत नाही त्यामुळे सगळेच हिशोब मांडत बसायचे नसता..आयुष्यात काही बाबतीत “पदरी पडलं पवित्र “ झालं अस म्हणत पुढे जात राहायचं..न सापडणारी उत्तरं कितीही नाकारलं तरी आयुष्याच पार्ट आणि पार्सल असतात..जेवढ्या लवकर हे स्वीकारू तेवढं जगणं सुकर ..💯
_observation_based

1 month, 4 weeks ago
2 months ago

महिलादिनानिमित्त सेशन घ्यायचं आहे का? कुणी त्याबद्दल बोलायला तयार असेल तर घेऊया ..कविता,अनुभव हेही शेअर करु शकता …!

2 months ago

कधीतरी गर्वहरणही व्हावं…
खुप चांगला अभ्यास सुरु असतो आपला…अगदी सगळं रुटीनप्रमाणे ..वेळच्या वेळी रिव्हीजन ,मागच्या प्रश्नपत्रिका बघणं,टेस्टसिरिज सोडवणं,अभ्यासात सातत्य असणं वगैरे वगैरे….अचानक एखादी वेगळी टेस्ट सोडवून बघतो आणि गडबडतो,नक्की अभ्यास करतोय ना आपण असा प्रश्न पडतो,एखादा टॅापिक खुपवेळा वाचूनही ब्लॅंक होतो आपण…
होतं ना असं??
व्हायलाच पाहिजे..
परीक्षेत छान परफॅार्म करायचं असेल तर परीक्षेच्या आधी हे व्हावं…मी याला गर्वहरण म्हणते…आपलं खुप चांगल सुरु आहे या गुडी गुडी फिलिॅगला कधीतरी तडाखे बसावे.. तरच आपण स्वतःचा कस लावून स्वतःला सिध्द करण्यासाठी झटतो..आत्मसन्मान थोडा दुखावला की प्रत्येक ओळ अजून सजगतेने वाचतो…महाभारतातील भीमाचं मारुतीरायाने केलेले गर्वहरण ही गोष्ट आठवते का? युध्दात गर्वहरण होण्यापेक्षा युध्दाच्या आधी कैकदा गर्वहरण होऊन युध्दासाठी सज्ज कधीही किफायतशीरआयुष्याच्या परीक्षेतही जमिनीवर राहायला गर्वहरणाचे तडाखे आवश्यकच..#Relatable_in_Life_And_Exam_Both**💐**

2 months ago

MPSC तून ड्रीम पोस्ट मिळवल्यानंतर २०२३ या वर्षात “ठरवून” वाचलेली पुस्तके..दर महिन्याला दोन पु्स्तकं वाचण्याचा संकल्प सिध्दीस नेल्याचा आनंद मिळाला..
१.एका दिशेचा शोध- संदीप वासलेकर
२.प्रकाशवाटा- प्रकाश आमटे
३.समिधा- साधना आमटे
४.गोष्ट छोटी डोंगराएवढी - अरविंद जगताप
५.टिश्यूपेपर - रमेश रावळकर
६.पिढीजात- श्रीकांत देशमुख
७.पत्रास कारण की- अरविंद जगताप
८. अधिकतमाहून अधिकतर- महात्रया रा
९. बाकी शुन्य- कमलेश वालावलकर
१०. वाट तुडवताना- उत्तम कांबळे
११. डियर तुकोबा- विनायक होगाडे
१२. एका तहसीलदाराची कहाणी- जी.कुलकर्णी
१३.मी अल्बर्ट एलिस - डॅा.अंजली जोशी
१४ आई समजून घेताना - उत्तम कांबळे
१५. माती ,पंख,आकाश- ज्ञानेश्वर मुळे
१६ . ॲनिमल फार्म - जॅार्ज ॲार्वेल
१७.सामान्यांतले असामान्य - सुधा मूर्ती
१८. माझ्या आयुष्याची पानं - मीरा चढ्ढा बोरवणकर
१९ नवी स्त्री - वि.स.खांडेकर
२०. अश्रू - वि.स.खांडेकर
२१ वपुर्झा - व पु काळे
२२ पितृऋण - सुधा मुर्ती
२३ Men are from Mars, Women are from venus - John Grey
२४ शीतू - गो नी दांडेकर
२५ नाच ग घुमा - माधवी देसाई
२६ कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
२७ शिदोरी - डॅा शाळिग्राम भंडारी

2 months ago

Previous reference.!

2 months ago
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago