लैंगिक शिक्षण Sex Education

Description
लैंगिक शिक्षणाविषयी
माहिती मिळवण्यासाठी चॅनेल जॉईन करा
मला संपर्क करण्यासाठी येथे मेसेज करा👉👉👉👉👉 @exeducationbot
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago

10 months, 4 weeks ago

माझे नवऱ्याकडून शारीरीक समाधान होत नाही काय करु?

मोठी बिकट समस्या आहे. स्रीयांकडून सहसा असले विचार प्रगट केले जात नाहीत. आहे त्यात समाधान मानून जीवन जगतात. खाजवायचं तर रक्त काढून चालत नाही. तुम्हाला रक्त येईपर्यंत खाजवायचे आहे तर वस्तु तशीच टणक लागेल.
संसार करायचा नसतो तो होत असतो. तसेच नवरा बायकोत विवाह झाल्यानंतर सेक्स सर्वकाही असत नाही निव्वळ सहवास सुद्धा सुखकारक असतो. तरीसुद्धा तुम्हाला समाधान हवे असेल तर खालील गोष्टींवर विचार करा.

1 नवऱ्याला विश्वासात घेऊन ही गोष्ट लक्षात आणून द्या.

2 सांगताना तो नाराज होणार नाही याची दक्षता घ्या आणि याच्यावर काय उपाय योजना करता येईल का ? असे हसत खेळत विचारा. त्याच्या पौरुषत्वावर घाला घालू नये.

3 स्वतः किंवा नवरयाने हस्त मैथुन करून मग शेवटी समागम करून इच्छापूर्ती करावी.

4 सेक्स अगोदर लपंडाव खेळत दमछाक झाली की सेक्स करावा.

5 विचारात बदल करावा, संसारात लक्ष घालावे.

6 लवकर मुले होतील असे काही उपाय योजावेत मग मुलं झाल्यानंतर कामवासना कमी होऊन आयुष्य सुखाने जगता येईल.

7 सेक्स चे विचार करू नयेत. पारमार्थिक बना.

8 गरम आहार घेऊ नका, कांदा लसूण, मांसाहार, शेवग्याच्या शेंगा खाऊ नका , सात्विक आहार घ्या.

8 स्मार्टफोन वर क्लिप बघू नका , चांगल्या स्रीयांचया संगतीत रहा.

9 आहे त्यात समाधान माना.

10 शेवटी जोडीदार महत्वाचा आहे . सेक्स ही कालांतराने कमी होणारी बाब आहे. त्यासाठी आयुष्य बरबाद करू नये.

Sainath Patil

11 months, 1 week ago

मेंस्ट्रुअल कप काय असते आणि त्याचा वापर कसा करावा?
पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, टॅम्पोन्स वापरले जातात तसेच मेन्स्ट्रल कप वापरतात.पाळीचे रक्त जिथून बाहेर येते तिथे हा बसवायचा असतो. या कपमध्ये रक्त जमा होते आणि मग कप काढून ते रक्त फेकून द्यायचे असते.

सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पोन्समध्ये जसे रक्त शोषल्या जाते तसे कपमध्ये होत नाही. ते फक्त रक्त साठवते.

मेन्स्ट्रल कप वापरण्याचे फायदे:

  1. हा कप एकदा घेतला कि ५-१० वर्ष वापरता येतो. अर्थात हे पॅड्स, टॅम्पोन्सपेक्षा खूप स्वस्त पडते.

  2. हा पर्यावरणासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.

  3. कप सिलिकॉनपासून बनवलेला असतो जे त्वचेसोबत रिऍक्ट करत नाही. अजून कोणते केमिकल्स नसल्याने पॅड्स किंवा टॅम्पोन्सपेक्षा उत्तम पर्याय. (हे एक महत्वाचे कारण)

  4. कप वापरत असताना अक्षरशः पाळी सुरु आहे हे विसरून जायला होते. कोणतेही पाळीसाठी योग्य असे आतले कपडे घालायची गरज नाही. एरवी जे कपडे घालता ते बिनधास्त घालू शकता.

  5. एरवी करता त्या सर्व गोष्टी (व्यायाम, स्विमिंग, ट्रेकिंग) सगळं काही करू शकता.

  6. झोपेत कपड्याना डाग पडायचे टेन्शन नाही. हवे तसे वाकडे तिकडे झोपता येते.

कपची सवय होण्यास १-२ महिने लागतात पण तो सगळ्यात उत्तम पर्याय आहे.

कप कसा बसवायचा, त्याची स्वच्छता या गोष्टींसाठी youtube वर भरपूर व्हिडिओ आहेत ते बघू शकता.

मेन्स्ट्रल कपचे मार्केटिंग जास्त होत नाही आणि होणारही नाही कारण पॅड्स, टॅम्पॉन्स बनवणाऱ्यांसाठी ते वाईट आहे. पण हा शरीरासाठी, पर्यावरणासाठी आणि खिशासाठी उत्तम पर्याय आहे.

1 year ago

मुली सोबत 6/7 महिने सभोग केला आणि पुन्हा बंद केला तर ती मुलगी किती दिवस सभोग न करता राहू शेकते?

मुलीची लैंगिक इच्छा किती आहे त्यावर अवलंबून असते. कुणाला इच्छा अजून असेल तर ती हस्तमैथुन करेल, इच्छा दाबून ठेवेल किंवा सेक्स करेल. प्रत्येकाला सेक्स करायला मिळतेच असे नाही. संशयी स्वभाव असलेले पुरुष, मित्र असे बऱ्याचदा विचार करतात. तसेच मुलगा/पुरुष करतात. सेक्स चे प्रमाण , आवड , ईच्छा यावर लोक सेक्स करतात. दुसऱ्याशी स्वतःच्या सेक्स जीवनाची तुलना करू नये. सेक्स नाही केला म्हणजे जीवाला धोका असतो असं नाही .

1 year, 4 months ago

स्त्रीच्या कामजीवनात वैयक्तिक फरक खूप प्रमाणात आढळतो. पुरुषाचा कामआनंद वयाच्या18 ते 28 वर्षांदरम्यान शिगेला पोचतो; तर स्त्री कामआनंदाची परिसीमा वयाच्या तिशीनंतर गाठत असते. पतीशी भावनिक नाते जुळणे, कामउद्दीपना व कामपूर्ती यांचा अनुभव घेणे यातून तिची संवेदनक्षमता वाढत असते.
योनिमार्ग शुष्क असल्यामुळे स्त्रीला संभोग वेदनादायक होतो. तिच्या स्त्रीबीजग्रंथीतील इस्ट्रोजेन संप्रेरक कमी होत जाते, तसतसे तिच्या अधिवृक्क ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन संप्रेरक स्रवू लागते. या संप्रेरकामुळे तिच्या ओठावर मिशी व हनुवटीवर दाढी येते. याच संप्रेरकामुळे तिची कामइच्छा वाढते. परंतु मुळातच तिची कामइच्छा पुरुषाहून खूप कमी असल्यामुळे ही किंचित वाढ नगण्य ठरते. शिवाय संभोग वेदनामय असल्यामुळे ती संभोगाचे प्रसंग टाळते.
संभोग काम हा पुरुषाच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो, तर स्त्रीला तो एक ऐच्छिक विषय असतो; परंतु काळ पुरुषाची कामवासना पोखरून काढतो व स्त्रीची कामवासना अबाधित राखतो. पुरुषाच्या कामइच्छेला ओहोटी लागते.

तशी स्त्रीच्या कामइच्छेला ओहोटी लागत नाही (मुळात तिला कामइच्छा फार कमी असते). तरीही दोन मुले झाली, चाळिशी उलटली किंवा गर्भाशय काढून टाकला तर ‘आता यापुढे सेक्स बंद’ असा ती हुकूम सोडते. समाजाचीही तशी अपेक्षा असते. संभोगाशिवाय वर्षानुवर्षे ती आनंदाने जगू शकते. पुरुष मात्र पूर्वीपेक्षा कामइच्छा कमी झालेली असली तरी तो अस्वस्थ होतो.
अधून मधून संभोग अनुभवावा असे मनापासून त्याला वाटत असते. पण जागेच्या अडचणीमुळे किंवा पत्नीच्या नकारामुळे संभोगाची संधीच त्याला मिळत नाही. तो हिरमुसतो. दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून हस्तमैथुनाद्वारे कामतृप्ती अनुभवतो.
जी दांपत्ये चाळिशीनंतर कामजीवन अनुभवत नाहीत, त्यांच्या जननेंद्रियांची कार्यक्षमता कमी होत जाते. पुरुषाची लिंग-ताठरता कमी होते व स्त्रीचा योनिमार्ग कोरडा होत जातो. ‘वापरा नाही तर गमवा’ हा निसर्गाचा नियम असतो.
जी दांपत्ये चाळिशीनंतर (रजोनिवृत्तीनंतरही) आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शरीरसंबंध ठेवतात, त्यांना कामउद्दीपन व्यवस्थितपणे होते, दोघांतही कामसलिलनिर्मिती होते व काम आनंदही लाभू शकतो.
सर्वांचेच शरीरसंबंधाचे प्रमाण सारखे असेल असे नाही. कुणी पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एकदा शरीरसंबंध ठेवतो. पण मूळ बाब अशी की जीवनाच्या अखेरपर्यंत स्त्री-पुरुष दोघांचीही संभोगक्षमता टिकून राहते.

दोघांतील प्रेमाचे रेशमी बंध जोडणारेही साधन
चाळिशी उलटली म्हणून कुणी कामजीवन टाळावे असे निसर्ग सांगत नाही. कामजीवन हे प्रजोत्पादनाचे एकमेव साधन आहे हे खरे, पण त्याचबरोबर दोघांतील प्रेमाचे रेशमी बंध जोडणारेही साधन आहे. जवळीक निर्माण करणारे आहे, तसे ताणमुक्त करणारे आहे. प्रीती व्यक्त करणारे आहे. तसे तृप्ती देणारे आहे. शिवाय मनोरंजनाचे साधनही आहेच.
वयस्कर दांपत्याने कामजीवनाबाबतीत टाईमटेबल बनवू नये. दोघांचे शरीर सुदृढ असले, मने प्रसन्न असली तर निसर्ग खुणावत असतो.
जवळीक निर्माण होणे फार महत्वाचे हा आनंद अनुभवायचा असेल तर मानसिक ताण नसावा, शरीर सुदृढ ठेवावे.
हिल स्टेशनवर किंवा ट्रिपला जावे, पति-पत्नीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी दोघांनीही प्रयत्न करावा. भांडणे टाळावीत, एकमेकांचे कौतुक, भेटवस्तूंची देवघेव यामुळे जवळीक निर्माण होते.
पुरुषाने मद्यसेवन व धूम्रपान टाळावे. शरीर संबंधा वेळी कामसलिल कमी प्रमाणात असल्यास के वाय जेली, मुखरस, पाणी किंवा जॉन्सन बेबी ऑईल वापरावे. संगीता तील खयाला प्रमाणे एकेक सूर वाढवीत जेवढी उंची गाठता येईल तेवढी गाठून त्यावर तृप्त असावे.
तरुणांनी काही बाबी नक्की लक्षात घ्यावे
तरुणांनी चाळिशी ओलांडलेल्या दांपत्यांना एकांताची संधी द्यावी. रविवारी संध्याकाळी तरुण दांपत्याने मुलांसकट फिरायला गेल्यास घरातील ज्येष्ठ दांपत्यास संधी मिळू शकते.
तसेच स्त्रीने सहकार्य द्यावे. पतीला नाउमेद करू नये. कारण पती हा ‘आपलं’ माणूस असतो. बाबांना बाल्कनीत व आईला स्वयंपाकघरात झोपायला सांगून त्यांची ताटातूट करणे हा ज्येष्ठ दांपत्यावर अन्याय असतो.

1 year, 4 months ago

चाळिशी नंतरचे कामजीवन..

आपण आजच्या लेखात वाचणार आहोत चाळिशी नंतरचे कामजीवन कसे असते?...आता यापुढे सेक्स बंद करायचे का ?...याला म्हातारचळ म्हणायचे का ?.. स्त्रीच्या कामजीवनातील बदल कसे असते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे लेख मोठा होईल पण सविस्तर वाचा.
वयाच्या चाळिशीनंतर स्त्रीपुरुषांना कामजीवनाचे फारसे आकर्षण नसते असा तरुणांमध्ये एक गैरसमज असतो. घर छोटे असले, वन बेडरूम फ्लॅट असला तर शयनगृह नवविवाहित दांपत्यासाठी असते. स्वयंपाकघरात आईने झोपायचे आणि बाल्कनीत बाबांनी झोपायचे. रात्रभर आई-बाबांची ताटातूट!
इतरही अनेक गैरसमज अस्तिवात आहेत. उदा. कामजीवन फक्त पुनरुत्पत्तीसाठी असते, कामजीवन फक्त तरुण-तरुणींसाठी असते, दोन मुले झाली की कामजीवन बंद वगैरे.

वस्तुस्थिती अशी की कामजीवन जीवनाच्या अखेरपर्यंत साथ देत असते. वयानुसार व वृत्तीनुसार कामजीवनात फरक पडत जातो. कोणत्याही दोन व्यक्तींचे कामजीवन समान नसते. स्त्री व पुरुष याच्या कामजीवनातही फरक पडतो.

कामजीवन ही इतर अनेक सहजप्रवृत्तींप्रमाणे (इन्स्टिंट) एक सहजप्रवृत्ती आहे. या सहज प्रवृत्तीचे वैशिष्ट्य असे की, इतर सहजप्रवृत्तींचा त्याग केला तर माणूस मरतो (उदा. तहान, भूक वगैरे); पण कामजीवनाचा त्याग केला तर माणूस मरत नाही. दुसरे असे की कामजीवन आपल्या अधीन नसते.
लोणचे पाहिले की तोंडात लाळ येते, त्याप्रमाणे श्रृंगार, प्रणय अनुभवला की शरीर कामप्रतिसाद देते; म्हणजे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स) असते. मोक्ष प्राप्तीसाठी कामजीवनाचे बलिदान द्यायचे की निसर्गाची योजना समजून घेऊन त्याप्रमाणे वागायचे, हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो.
पुरुषाच्या कामजीवनातील बदल पुरुषाचा कामप्रतिसाद जीवनाच्या अखेरपर्यंत टिकून राहतो. मात्र त्याचा दर्जा बदलतो. कामसंवेदना टिपणा-या पेशींची संख्या कमी होऊ लागते. या पेशी शिश्नमुंडावर असतात. मेसनर व क्रॉस या संशोधकांच्या नावाने या पेशी ओळखल्या जातात.
पेशींची संख्या घटल्यामुळे कामउद्दीपित व्हायला पुरुषाला वेळ लागतो. एकदा कामउद्दीपन झाले तर ते बराच काळ टिकते. म्हणजे संभोग दीर्घकाळ चालतो; पण संभोगाची रुची कमी कमी होत जाते.

दोन संभोगातील कालमर्यादा वाढते. त्यामुळे एक संभोगानंतर दीर्घकाळ विश्रांती घेतल्याशिवाय पुन्हा कामउद्दीपन होत नाही. शरीरातील टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी कमी कमी व्हायला लागते. केवळ लैंगिक संबंधातच आनंद सामावला न जाता आता स्त्रीचे सर्वांगीण आकर्षण वाटू लागते.
आता पूर्वी सारख होत नाही

कामपूर्तीचे (ऑरगॅझम) महत्त्व कमी होऊ लागते. वीर्यस्खलनावेळी वीर्याची पिचकारी लांबवर जात नाही. वीर्य थेंब थेंब गळते. वीर्यातील शुक्राणूची संख्या घटते, पण इतके शुक्राणू प्रजोत्पादनासाठी पुरेसे असतात वीर्याचे प्रमाणही कमी होऊ लागते.

पूर्वी मनात शृंगारिक विचार आले तरी कामउद्दीपन आपोआप व्हायचे, तसे आता होत नाही. उद्दीपनासाठी स्त्रीचे सहकार्य आवश्यक असते. प्रणय, श्रृंगार, स्पर्शाने पुरुषाला तिने कामउद्दीपित करावे लागते. शिश्न ताठ होण्यास बराच वेळ लागतो. मात्र जीवनाच्या अखेरपर्यंत ही क्षमता टिकून राहते.
पुरुषाच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण सावकाश कमी होत असल्यामुळे पुरुषाच्या कामजीवनातील बदलही संथ गतीने होत जातात.
स्त्रीला रजोनिवृत्ती (मेनोपॉज) होते तसा पुरुषाला ‘अॅन्ड्रोपॉज’ होऊ शकतो. त्याला लिंगताठरता कमी प्रमाणात येते. शांत झोप लागत नाही. औदासीन्य येते. केस गळायला लागतात. कमरेभोवती चरबीचा थर साठतो. हाडे ठिसूळ होतात. थकवा येतो. स्वभाव चिडचिडा होतो.
यावर उपाय म्हणजे जसे स्त्रियांना काही गोळ्या देतात तसे पुरुषांना टेस्टोस्टेरॉन देतात. पुरुषनां पण काही गोळ्या देतात ती 6 आठवडे ते 6 महिने पण तत्पूर्वी रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी, रक्ताची पीएस्ए चाचणी व पुरःस्थ ग्रंथीची तपासणी करणे आवश्यक असते.
स्त्रीच्या कामजीवनातील बदल स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीजग्रंथीत इस्ट्रोजन हे संप्रेरक निर्माण होते. स्त्रीच्या कामजीवनात या संप्रेरकाला फार महत्व आहे. वयाच्या पंचेचाळीस वर्षांदरम्यान स्त्रीबीजग्रंथीतून स्त्रीबीजनिर्मिती व इस्ट्रोजेननिर्मिती एकाएकी थांबते. त्यामुळे स्त्रीच्या कामजीवनातील बदल झटकन घडून येतात.
चाळिशी उलटली तरी पुरुषाप्रमाणे स्त्रीचाही कामप्रतिसाद टिकून राहतो. जीवनाच्या अखेरपर्यंत स्त्री संभोगक्षम राहू शकते. मात्र पूर्वीप्रमाणे तिलाही कामउद्दीपना सावकाश येते. योनिमार्गाची प्रसरणशीलता कमी होते. कामपूर्तीवेळी होणारे फरक आता कमी होतात. कामपूर्तीत पूर्वीसारखा आनंद मिळत नाही. योनिमार्ग शुष्क होतो. त्याची लवचीकता कमी होते. त्याची लांबीरुंदीही घटते. कामसलिलनिर्मिती पूर्वीइतकी होत नाही.

1 year, 4 months ago

दिग्दर्शकानं या चित्रपटातून बारीकसारीक प्रसंगामधून अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सासरच्या घरात पाऊल टाकल्यावर जयाला भिंतीवरची सासऱ्याचा फोटो असलेली फोटोफ्रेम, टीपॉयवरची काच, शोकेसची काच अशा प्रत्येक गोष्टीला तडा गेलेला दिसतो. या सगळय़ा निरस वातावरणात ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करते.

एका क्षणी मात्र ‘फक्त रडून उपयोग नाही, इतर कुणावर अवलंबून राहूनही उपयोग नाही. आपल्यालाच यातून मार्ग काढावा लागेल,’ हे जयाला उमगतं. ती स्वत:च्या संरक्षणाचा मार्ग शोधते. इतकंच नाही, तर स्वावलंबीही होते. तिचा हा प्रवास फार रोचक, मनोरंजक आणि उद्बोधक आहे. अतिशय विचारपूर्वक योजना आखून आणि साळसूदपणे जया नवऱ्याला त्याच्याच वागणुकीची चव चाखायला देते. पण हे लक्षात आल्यावर नवरा पलटवार करण्याची नवी योजना आखतो. स्त्रीनं फार बंड करू नये यासाठी चतुराईनं जे उपाय काढले जातात, त्यात तिच्या पदरात एक-दोन मुलं पडली की ती संसारात अडकली जाईल आणि नवऱ्यावर अवलंबून राहून संसाराचा गाडा निमूटपणे ओढत बसेल, हाही एक विचार असतो. माहेर आणि सासर, दोन्हीकडून पािठबा नाकारण्यात आलेली, लग्नापायी शिक्षण अर्धवट राहिलेली, स्वत:चं अर्थार्जन न करणारी स्त्री जाईल तरी कुठे? या समाजाच्या रीतीचा बेमालूम फायदा जयाचा नवरा उठवू पाहतो. या विश्वासघातकी वागण्यानं मात्र जयाला जबरदस्त हादरा बसतो. घडलेल्या घटनांनी हताश झालेली, पण आत्मसन्मान जागा असलेली जया पडत, धडपडत कशी उभी राहते हे बघण्यासारखं आहे. संसाराची संपूर्ण जबाबदारी स्त्रीवरच आहे हे ठामपणे मानणारा समाज सत्य दिसत असूनही स्त्रीच कशी दोषी आहे याकडे कसं बोट दाखवतो, हे वास्तव जयाच्या वाटचालीच्या निमित्तानं चित्रपटात मार्मिकपणे दाखवलं आहे.

जयाच्या भूमिकेत दर्शना राजेंद्रन् आणि नवरा- राजेशच्या भूमिकेत बेसिल जोसेफ यांनी बहार उडवली आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेली मंजू पिल्लई ही अभिनेत्रीही आपला खास ठसा उमटवते. लग्नात विनाकारण रीत म्हणून रडणारे नातेवाईक आणि त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघणारी, रडू न येणारी जया, हा प्रसंग फारच मजेशीर आणि माणसांच्या नाटकीपणाचं दर्शन घडवणारा. जयाविरुद्ध कट रचण्यात मदत करणाऱ्या राजेशच्या भावाला २०० वेळा न्याय, समता आणि स्वातंत्र्य हे तीन शब्द लिहून आणायला पाठवणारी न्यायाधीश, हा न्यायालयातला प्रसंगही धमाल आणणारा. जया स्वत:च्या पायांवर उभी राहते त्यानंतर नवऱ्याला शेवटच्या प्रसंगात भेटतानाही तिच्यातला मूळचा खेळकर स्वभाव आणि त्याला असलेली आत्मविश्वासाची झळाळी स्पष्ट दिसते.

हा चित्रपट सरळसोटपणे सादर केला असता तर कदाचित तो बघावासा वाटला नसता. पण दिग्दर्शक विपीन दास यांनी चित्रपटाला दिलेली व्यंगात्मक ट्रीटमेंट इतकी छान आहे, की प्रत्येक प्रसंगी प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं आणि त्याच वेळी तो अंतर्मुखही होतो. हा चित्रपट स्त्री-सक्षमीकरणावर भाष्य करतोच, पण त्याचबरोबर आजही जुनाट विचारांना चिकटून असलेल्या बहुतांश घरांतल्या स्त्रियांची स्थिती काय आहे, हे दाखवतो. पती-पत्नीच्या नात्यावर नेमकं बोट ठेवतो. केवळ शारीरिक ताकदीला जे पुरुष मर्दानगी/ पौरुष समजतात, त्यांना सणसणीत चपराक या चित्रपटानं दिली आहे.
सिमॉन द बोव्हाचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणते, ‘तिचे पंख छाटले जातात आणि तिला उडता येत नाही असा आरोप तिच्यावर केला जातो!’ लहानपणापासून सद्गुणी स्त्रीची आणि त्यातही चांगल्या सुनेची ‘समाजमान्य’ लक्षणं काय, हे मुलींना सांगितलं जातं. ती सुशील हवी, शांत हवी, घरातल्या सर्व जबाबदाऱ्या निभावणारी हवी. इतरांच्या सुखात तिनं आपलं सुख शोधायला हवं. त्यांच्या अस्तित्वात तिचं अस्तित्व असायला हवं. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून तिचे केस लांब असावेत, नाही तर लग्नाच्या बाजारात तिचं मूल्य कमी होऊ शकतं! ही मानसिकता आपल्या ‘पुढारलेल्या’ समाजातही लपलेली दिसते.

मल्याळम् चित्रपटांचे विषय आणि त्या कथांना त्यांनी दिलेली ट्रीटमेंट अनोखी असते, हे आपण अनेक चित्रपटांत पाहिलं आहे. त्यांचे चित्रपट भडक नसतात. अगदी चित्रपटातल्या पात्रांचा मेकअप, वेशभूषासुद्धा इतकी सहजस्वाभाविक असते, की ती पात्रं आपल्या आसपास वावरत आहेत असाच भास होतो.

केवळ स्त्रीची दयनीय अवस्था दाखवणाऱ्या रडतराऊ चित्रपटांसमोर ‘जया जया जया जया हे’ आपलं वेगळेपण दाखवतो. ‘आहे त्या परिस्थितीत राहा’ हे सांगण्याऐवजी एक स्त्री काय करू शकते याचं अवास्तव वर्णन न करता अतिशय संयमितपणे मार्ग काढतो. स्वत्व, स्वाभिमान अबाधित ठेवणाऱ्या आजच्या स्त्रीची खुसखुशीत गोष्ट म्हणून तो पाहायलाच हवा. हा चित्रपट सध्या ‘डिस्ने हॉटस्टार’वर उपलब्ध आहे.

1 year, 4 months ago

पाहायलाच हवेत: स्त्रीच्या ‘स्वातंत्र्य’प्राप्तीची खुसखुशीत गोष्ट!

Written by लोकसत्ता टीम

दिपा देशमुख

लग्नानंतर स्त्रीवर बेमालूम घातली जाणारी बंधनं, त्यातून होणारा कोंडमारा, नवऱ्याची मर्जी सांभाळायचा ताण आणि अनेकींना सहन करावी लागणारी कौटुंबिक हिंसा, हे चित्र आपल्या समाजाला नवं नाही. खूप चित्रपटांत आपण ते पाहिलं आहे. ‘जया जया जया जया हे’ या मल्याळम् चित्रपटाची नायिका मात्र केवळ ही परिस्थिती पालटत नाही, तर नवऱ्याला त्याच्याच वागणुकीची चव चाखायला देते. स्त्रीच्या बाबतीत समाजात ठासून भरलेल्या दुटप्पीपणाला आरसा दाखवणारा हा खुसखुशीत चित्रपट पाहायलाच हवा.

जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई यांसारख्या अनेक कर्तृत्ववान आणि पराक्रमी स्त्रियांनी स्त्रीला तिच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थानं जाणीव करून दिली. प्रतिकूल परिस्थितीत, संघर्षमय वातावरणात, चिवटपणे, चिकाटीनं मार्ग काढत कसं पुढे जात राहायचं, हे या कणखर स्त्रियांनी दाखवलं. त्यांची चरित्रं वाचताना, त्यांचं काम आणि आयुष्य यांचा पट उलगडून बघताना स्वातंत्र्य मागून मिळत नसतं, तर ते स्वत: अथक प्रयत्नांतून मिळवावं लागतं, याची जाणीव होते. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये स्त्रीचं दुय्यमत्व असलेलं रूप आपण पडद्यावर पाहिलं आहे. पण काही चित्रपट मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधन करत, समाजातल्या या दुटप्पीपणावर कठोरपणे भाष्य करणारेही झाले. स्त्रीनं कष्टानं मिळवलेल्या स्वातंत्र्याची रंजक गोष्ट सांगणारा अलीकडचा मल्याळम् चित्रपट म्हणजे ‘जया जया जया जया हे’.

आज मुली स्वकर्तृत्वानं प्रत्येक क्षेत्रात चमकताहेत असं आपण म्हणतो, तरी भारतातल्या बहुतांश कुटुंबांतल्या मुलीची कहाणी जवळपास सारखीच असते. अनेक कुटुंबांत मुलीचा जन्म झाल्यावर, ‘पहिली बेटी धनाची पेटी’ म्हणत आनंद साजरा केला जातो, पण दुसऱ्या खेपेस मात्र ‘आता मुलगा झाला पाहिजे’ या भावनेनं घरातला प्रत्येक सदस्य वंशाच्या दिव्याची वाट बघू लागतो. बालवयात मुलगा असो की मुलगी, त्यांच्या बाललीलांचं कोडकौतुक होतं. मुलीचा आवेश पाहून तिला झाशीची राणी, इंदिरा गांधी, वगैरे विशेषणं बहाल केली जातात! तीच मुलगी वयात येते, तेव्हा मात्र तिनं काय करावं, यापेक्षा काय करू नये, याची एक मोठी यादी तिची प्रतीक्षा करत असते. तिनं काय कपडे घालावेत, काय घालू नयेत, किती मोठय़ाने बोलावं-हसावं किंवा दात दाखवत हसू नये, किती वेळ बाहेर राहावं किंवा ‘सातच्या आत घरात’ असावं, याविषयी अलिखित नियम तयार केले जातात आणि त्यातून त्या मुलीनं बंडखोरपणा केला किंवा काही घरांत जरी तिच्या पालकांनीच तिला पुरेशी अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली, तरी लग्न झाल्यानंतर अनेकींच्या बाबतीत ‘पहिले पाढे पंचावन्न’ असं चित्र निर्माण होतं. ‘या घरात हे चालणार नाही’ असा पाढा तिच्यासमोर वाचला जातो आणि पुष्कळ कुटुंबांत तिला ती स्त्री आहे, दुय्यम आहे, याची जाणीवही वारंवार करून दिली जाते.

‘जया जया जया जया हे’ या चित्रपटाची नायिका- जयाभारती- ‘जया’ ही अशा एका मध्यमवर्गीय, कर्मठ कुटुंबातली मुलगी. मुलाच्या पाठीवर तिचा जन्म झाल्यानं घरात आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं, पण लहानपणी कौतुकानं ‘इंदिरा गांधी’ असं विशेषण बहाल करणारे पालक ती वयात येताच तिच्यावर बंधनं घालायला सुरुवात करतात. लग्नाच्या बाजारात काय काय आवश्यक आहे, याची काळजी घेत तिला शिकवलं जातं. तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेली जया एका तरुण प्राध्यापकाच्या प्रेमात पडते. कार्यकर्ता असलेला हा प्राध्यापक कामगार, कष्टकरी स्त्रियांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत असतो. समानतेच्या, स्त्री-स्वातंत्र्याच्या, समान वेतनाच्या गप्पा मारत असतो. मात्र जयाच्या बाबतीत तिनं सोशल मीडियावरचा तिचा फोटो का बदलला? कॉलेजला ती अमुक एका पोशाखात का आली? ती कुणाशी बोलली, यावरून मालकीहक्क गाजवू पाहतो. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली जया त्याच्या या दांभिक वागण्यानं संभ्रमात पडते आणि त्याच्याशी नातं तोडते.

जयाच्या घरात तिच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच ते तिचं लग्न ठरवायच्या मागे लागतात. शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहणारी जया लग्नास विरोध दर्शवते, पण तिचं मत आणि स्वप्नं विचारात न घेता तिचं लग्न करून देण्यात येतं. संसार सुरू होताच, घरातल्या पुरुषाचं महत्त्व, त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं, त्याच्या विक्षिप्त स्वभावाला, अहंकाराला जपणं, अशी कसरत करत जया दिवस काढू लागते. असह्य झाल्यावर माहेरी आपलं मन मोकळं करते. पण ‘आता तेच तुझं माहेर आणि तेच तुझं सासर’ म्हणत तिच्यासाठी माहेरचे दरवाजे बंद असल्याचं सूचित केलं जातं. नव्याचे नऊ दिवस संपताच, लहानसहान कारणांवरून नवऱ्याची जयाला रोजची मारहाण सुरू होते. सासू आणि नणंद यासुद्धा तिला समजावताना म्हणतात, ‘‘संसारात भांडय़ाला भांडं लागतंच, तूच तडजोड कर.’’ हळूहळू जया कोमेजून जायला लागते.

1 year, 4 months ago

सेक्ससाठी कदाचित तुम्हाला वेगवेगळी आसनं शोधावी लागतील. एकमेकांना नव्याने शोधण्याची, एकत्र प्रयोग करण्याची ही वेळ असू शकते असं एनएचएस सांगतं.

गरोदरपणात सेक्स करताना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी एनएचएसने महिलांना काही उपाय सांगितले आहेत.

एनएचएसच्या माहितीनुसार, 'अशा स्थितीत तुम्ही एका अंगावर झोपणं योग्य. एकमेकासमोर तोंड करुन किंवा दुसरीकडे तोंड करुन. आरामदायक अनुभवासाठी उशीचा वापर करावा.'

'पत्नीच्या गरोदरपणात व बाळंतपणात एक नवीन जवळीक निर्माण करण्याची संधी प्रत्येक जोडप्याला मिळत असते. ही संधी दवडू नये. या काळात पती-पत्नी एका वेगळ्या प्रकारे एकमेकांच्या जवळ येऊ शकतात व ही नवीन जवळीक, हा नवा जिव्हाळा, हे नवे प्रेम भावी आयुष्यात फार मोलाची कामगिरी बजावतं.'

लेखन -

? डॉ. बाबासाहेब रेणुशे. M.D (Ayu)

प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्‍नागिरी

1 year, 4 months ago

पत्नी गरोदर असताना तिच्याशी संभोग करणे योग्य असते का? याचा बाळाच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का?

पाळीदरम्यान तसेच गरोदर असताना सेक्स करावे का? कोणत्या महिन्यात करावे अशा प्रकारचे प्रश्न अनेकदा विचारले जातात.

याबाबत वेगवेगळी मतंही मांडली जातात. त्यामुळे बहुतांशवेळा लोकांचा गोंधळ उडतो.

गर्भधारणा झाल्यानंतर महिलेच्या केवळ शरीरातच नव्हे तर मानसिक स्थितीतही मोठा बदल झालेला असतो. मातृत्वाची चाहूल आणि शारीरिक बदलांचे मनावर होणारे पडसाद यामुळे तिची मानसिक अवस्था पूर्णपणे बदलून गेलेली असते.

बदललेली भावनिक गरज, तिची पूर्तता न होणे याचा तिच्यावर आणि गर्भावरही परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र असे कोणतेही नैसर्गिक बदल पुरुषामध्ये होत नसतात.

त्याच्या लैंगिक इच्छेत बदल होत नाही. दोघांच्या मानसिक अवस्थेतील आणि लैंगिक इच्छेतील बदल यामुळे जोडप्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

'गरोदरपणात स्त्रीमधली संभोगाची प्रेरणा जरी कमी झालेली असली तरी हळुवार अशी शारीरिक जवळीक करणं, प्रणय करणं, हे तिला हवं असतं. म्हणूनच या काळात पती-पत्नीने अवश्य प्रणय करावा, प्रणय करता करता जर दोघांच्या इच्छा प्रबळ होत गेल्या तर संभोग करायलासुद्धा हरकत नाही. आपण पत्नीवर संभोग लादत तर नाही याचं भान ठेवणं मात्र गरजेचं असतं.'

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये आणि शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सेक्स करू नये असा सल्ला बहुतांश डॉक्टर देतात.

संसर्गाचा धोका

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे सेक्स टाळावे असं सांगितलं जातं.

"तर शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सेक्स केल्यामुळे रक्तस्राव होण्याची तसेच मुदतीआधी प्रसुती होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा सल्ला दिला जातो," डॉ. रेणुशे सर सांगतात.

मधल्या तीन महिन्यांध्येही सेक्स कधी करायचं याचा निर्णय दोघांवरही अवलंबून आहे असं डॉ. रेणुशे सांगतात.

मधल्या तिमाहीत सेक्स करण्याचा निर्णय जोडप्याने विचार करुनच घेतला पाहिजे असं ते सांगतात.

"गरोदरकाळात पहिल्या तीन महिन्यात गर्भधारणा नुकतीच झाली असल्याने सर्व बदल पूर्णपणे झालेले नसतात, त्या अवस्थेत सेक्स केल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. गर्भपाताची वेळही येऊ शकते. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सेक्स केल्यामुळे मुदतपूर्व प्रसुतीचा धोका असतो."

गरोदरपणात सेक्स करताना दोघांनी योग्य स्थिती, आसनाचा विचार करुनच संबंध ठेवले पाहिजेत, जेणेकरुन पोटावर ताण येणार नाही असं डॉ. रेणुशे सांगतात.

याबाबत युनायटेड किंग्डमची आरोग्यसेवा नॅशनल हेल्थ सर्विसनं काही मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये काय म्हटले आहे ते पाहू

एनएचएसच्या (NHS) मते

तुमचे डॉक्टर किंवा तुमची काळजी घेणाऱ्या दाईने सांगितले नसेल तर गरोदरपणात सेक्स करायला काही हरकत नाही.

सेक्समुळे तुमच्या बाळाला दुखापत होणार नाही, याची काळजी घ्यावी.

अर्थात या गरोदरपणाच्या काळात तुमची सेक्स करण्याची इच्छा बदलू शकते, यात काळजी करण्याची गरज नाही परंतु त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी बोलणं गरजेचं आहे.

कधी गरोदरपणात सेक्स करणं अत्यंत आनंदाचं वाटू शकत तर कधी ते करावेसे वाटणार नाही. प्रेम व्यक्त करण्याचे तुम्हाला दुसरे मार्ग शोधून काढावे लागतील. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलणं आवश्यक आहे.

जर तुमचं गरोदरपण सामान्य (नॉर्मल प्रेग्नन्सी) असेल आणि कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नसेल तर सेक्स, भावनोत्कट होणं (ऑर्ग्याजम) यामुळे गर्भपात होणं, प्रसुती लवकर होणं अशा गोष्टी होत नाहीत.

गरोदरपणाच्या उत्तरार्धात गर्भाजवळील स्नायू ताठर होण्याची प्रक्रिया म्हणजेच ब्रॅक्ट्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन होण्याची शक्यता असते. ते स्नायू पुन्हा योग्य अवस्थेत येण्यासाठी फक्त झोपून राहिले तरी उपयोग होतो.

गरोदरपणात सेक्स कधी टाळावे?

गरोदरपणात कधी सेक्स टाळावं याबाबतही एनएचएसने काही सूचना केल्या आहेत.

एनएचएसच्या माहितीनुसार जर तुम्हाला गरोदरपणात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असेल तर सेक्स कधी टाळावं याबद्दल तुमचे डॉक्टर किंवा काळजी घेणाऱ्या दाई मार्गदर्शन करू शकतील.

लो प्लॅसेंटा असेल किंवा तेथे रक्तसंचय होत असेल तर अशा स्थितीत सेक्समुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. असं एनएचएसने स्पष्ट केलं आहे.

गरोदरपणाच्या कोणत्या स्थितीत सेक्स टाळावं असं एनएचएस सांगतं-

जर गर्भजल बाहेर पडत असेल तर. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. (याबाबत तुमचे डॉक्टर आणि दाईचे मार्गदर्शन घ्या)

गर्भाशयाच्या मुखाजवळ काही समस्या उद्भवली असेल तर प्रसुती लवकर होण्याची शक्यता असते.

गरोदरपणाचा उत्तरार्ध सुरू असेल, तुम्हाला जुळे होणार असेल, आधीची प्रसुती मुदतपूर्व झाली असेल तर सेक्स करू नये.

एनएचएसच्यामते बहुतांश लोकांमध्ये गरदोरपणाच्या काळात सेक्स करणं सुरक्षित असतं परंतु ते म्हणावं तितकं सोपं नसतं.

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago