Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
🌹🙏🏻 जय हरी विठ्ठल🙏🏻🌹
गाढवाचे घोडे !
आम्ही करू दृष्टीपुढे !!
चघळी वाहाणा !
माघारिया बांडा सुना !!
सोंगसंपादनी !
तरि करू शुद्ध वाणी !!
तुका म्हणे खळ !
करू समयी निर्मळ !!
🌹🙏🏻 विठ्ठल विठ्ठल🙏🏻🌹
गाढवाचे घोडे म्हणजे इंद्रियांचा दास असलेल्या मनुष्याला देखील आम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे जसा साधू बुद्धिवान असतो त्याप्रमाणे आम्ही त्याला करू. म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू.
असा मनुष्य वारंवार वाहणा चघळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा नीच कर्म करतो.
जरी असा मनुष्य ढोंगी पाणाने वागत असला तरी त्याची वाणी सुद्धा आम्ही शुध्द करू.
तुकाराम महाराज म्हणतात जरी कोणी दुष्ट असला, खळ पुरुष असला तरी त्याला आम्ही शुद्ध करू.
🌹🙏🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
स्वामी म्हणतात - जिव्हाळायाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही.?
संकटातून वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किमंत समजत नाही.?*
मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत.*
?!!श्री स्वामी समर्थ!!?**
https://www.instagram.com/reel/C8xXd8hOxiy/?igsh=MTNycjZ2eHMzNjZ4Yg==
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ??? माझी आई स्वामी माऊली ??
https://www.instagram.com/reel/C66Rux6M3Ym/?igsh=MTVkbGtzbndidjY4Ng==
??? श्री स्वामी समर्थ ??*? भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही.नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल. ते नाम तुम्ही सर्वांनी निःशंकपणे घ्या. त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका. ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका. तुम्ही नाम घ्यायला लागा, भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अगदी सतत निश्चयाने नाम घ्या.... श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ??
◆■◆■◆
https://www.instagram.com/reel/CyyCBhEI-T2/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
??? श्री स्वामी समर्थ ???
?? १७ जानेवारी - नाम व इतर साधने. ??
नवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण इत्यादि क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की शिकायला सुरूवात करतो ती श्रवणापासूनच. मुके लोक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्याकारणानेच त्यांना बोलता येत नाही. मनुष्यप्राणी ज्या देशात जन्माला येतो त्या देशाची भाषा बोलतो. म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे; आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो.
नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात. त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याचे कारण नाही.
एका इसमाला दुसर्या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला. पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला. अशा वेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही, त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरणभक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तींचे फळ मिळते.
भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण कसे आहे ? बाकी सगळया गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली तर भगवंताचे स्मरण हा प्राण आहे. बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा; मुखामध्ये राम असू द्या.
भक्ताने उपाधी बेताची, म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी. भगवंताचे अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी. तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे. ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही. नामात प्रेम येणे जरूर आहे, याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल.
नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तर्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे.
भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.
तुम्हीच तारणहार हा
विश्वास ठाम आहे
तुमच्यासाठी जीवन माझे
समर्पित आहे
तुमच्या चरणांवरी वाहिल्या
मी माझ्या निष्ठा
तुम्ही प्रसन्न होण्या करीन
प्रयत्नांची पराकाष्ठा
तुम्हीच माझे माय बाप गुरु
सर्वस्व तुम्ही माझे
नकळे किती काळचे
ऋणानुबंध तुमचे माझे
तुम्हीच केले धन्य मला
पाठिशी राहुनी
तुमचाच एक आधार मला
माझ्या जीवनीं
श्री मिलिंद द करमरकर
०४-०७-२०२२
.
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago