? प्रेरणादायी मराठी विचार... ?

Description
सुंदर सुविचार, प्रेरणादायी लेख, प्रेरणादायी बोधकथा, मराठी साहित्य, नोकरीविषयक माहिती वाचण्यासाठी चॅनेल जॉईन करा.
https://t.me/PreranadayiVyaktimatva

जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 3 weeks, 6 days ago

???? ???? ?? @Puneroomadmin

? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 7 months, 3 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत

Last updated 1 year, 9 months ago

1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
**स्वतःसोबत प्रामाणिक असणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास …

स्वतःसोबत प्रामाणिक असणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार सुद्धा करू शकतं नाही कारण त्याला उत्तमरीत्या माहिती असते की आपण जसं इतरांनसोबत वागतो अगदी तसंच आपल्यासोबत घडत असते म्हणून द्यायचे झाले तर स्वतःकडून सर्वाना भरभरून आनंद देत राहा कारण दुःखं तर प्रत्येकाकडे आपलं आपलं ठेवलेलं असतें??बरोबर ना!,,,✍?*??*?

एकमन#लेखक** @Ommshelke

1 month, 2 weeks ago
? प्रेरणादायी मराठी विचार... ?
1 month, 2 weeks ago
आपण स्वाईछेने मदत करू शकता.***?***कुणालाही जबरदस्ती …

आपण स्वाईछेने मदत करू शकता.?कुणालाही जबरदस्ती नाही..

1 month, 2 weeks ago
सर्वांना नमस्कार***??*****मी वनिता वणमाला मु. Tv …

सर्वांना नमस्कार??मी वनिता वणमाला मु. Tv center छ. संभाजीनगर .सर/मॅडम मी स्पर्धा परीक्षा करतेय, माझं पुणे जेल पोलीसच ground ahe त्यामुळे मी सराव करताना पडले,आणि माझ्या पायाला मार लागला आधीच दुखापत असल्यामुळे मला hospital la जावं लागलं, डॉ. नी उपचार सांगितले. मला घरुन economic support naslyamule मी part time job karun study karty
मी आपल्या माध्यमातून मला मदत हवी होती.मला फक्त प्रत्येकानी 5 ते 10 rupee ची जरी मदत केली तरीही खूपच मदत होईल?.माझी मैदानी चाचणी आहे त्यामुळे मला लवकर बरं होणे खूप गरजेचे आहे तर मला शक्य होईल अशी मदत करावी ही नम्र विनंती..??
Phone pay no- 9075293277.

1 month, 2 weeks ago

#न**ेमकं_जगावं_कसं ?
तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं...!

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही....!

आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत... आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!

चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं....!

"पुढे चला... पुढे सरका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....!

खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...!
पण कुणावर विशेष लोभ नाही..., कोणावर राग तर मुळीच नाही..., कुणाचा द्वेष नाही..., कुणाचा तिरस्कार नाही..!
आपला संबंध फक्त तिकिटापुरता... !

कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही...
कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही...
दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं..., येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...!

मूळ ठिकाणी पोहचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते...., प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं...
आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....पण त्या गावात अडकायचं नाही...!

"आपण इथले नव्हेत" हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या "ठेसनावर" जायचं....!

"शिंगल" बेल मारली की थांबायचं... "डबल" मारली की निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....
आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!

हा शेवटचा स्टॉप आहे.... समद्यानी उतरून घ्या... असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की, "आपल्या घरी" निघून जायचं.... !

उद्या कुठे जायचं ? कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल.... ? हे ठरवणारा वेगळा असतो..!

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही... ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही...!

शाश्वत एकच आहे... तो म्हणजे प्रवास...!

आपण असू तरी आणि आपण नसू तरीही... प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... प्रवास सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!

एक आवडलेला लेख !**

1 month, 2 weeks ago
? प्रेरणादायी मराठी विचार... ?
1 month, 2 weeks ago

**लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे, प्रत्येक सेकंदाला-मिनीटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या १ लाख २५ हजार मुंबईकरांचे हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या स्कीम मध्ये कायमचे गेलेयत. मुंबईतल्या ३१ वर्षीय प्रदीप वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख या टोरेस स्कॅममध्ये गमावले आहेत.

-एकदम श्रीमंत सॉफिस्टिकेटेड नाव दिलं..
-जागोजागी, चकचकीत भुरळ पाडणारे ऑफिस उघडले
-असामान्य वाटावं असं कंपनीचं नाव ठेवलं
-चकचकीत, मोठा बिजनेस भासावा अशी वेबसाईट
-एकदम मोठ्या उद्योगाचा आपण भाग होतोय हे पटवून दिलं
- कंपनीत विश्वास बसावा म्हणून अनेक विदेशी चेहरे
-सोने, हिरे, चांदीत गुंतवणूक करत असल्याचं भासवलं
-गुंतवणूकीवर दर आठवड्याला परताव्याचं आमिष दिलं.
- ६ लाखांच्या गुंतवणूकीवर आठवड्याभरात ६ टक्के व्याज
- ६ लाखाहून अधिक गुंतवणूकीवर ११ टक्के व्याज
- म्हणजे वर्षाला ५२० टक्के. एका लाखाचे ६ लाख
- एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या (लॅब निर्मीत हिरे) पेंडंटवर 10 हजार रुपयांची सूट दिल्याचं दाखवलं.
- तसेच ज्वेलरीच्या गुंतवणुकीवर देखील 6 टक्क्यांचा परताव्याचं आमिष दिलं
- सुरुवातीला काही जणांनी पैसे गुंतवले, आठवड्याला परतावा यायला लागला. पैसे येतायत हे दिसल्यावर सगळे आपल्या नातेवाईक, मित्रांनाही पैसे टाकायला सांगू लागले.यातूनच मुंबईत जागोजागी टोरेसची चैन उभी राह्यली.

कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, ज्वेलरी डिस्काउंटमध्ये द्यायची. गुंतवणूक केलेल्या या ज्वेलरीच्या रकमेवर आठवड्याला परतावा मिळायचा. ही ज्वेलरी, खडे परदेशी आहेत, असं कंपनी सांगायचीहळू हळू आठवड्याला ६ टक्क्यांऐवजी ११ टक्के परतावा कंपनी द्यायला लागलीमग लोभापायी सामान्य माणसं आणखी पैसे टाकायला लागली. अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती.

ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा द्यायची. मग कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला . त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. म्हणून अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले.

हेच बघून वर उल्लेख केलेल्या प्रदीप कुमार वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख गुंतवले. आपल्या नातेवाईक मित्रमंडळीसह ३८ लोकांचे पैसेही त्याने यात गुंतवले.मिळालेला परतावा परत टोरेस कंपनीकडे सगळे गुंतवत होते कारण एकच ते म्हणजे आणखी लोभ, हव्यास, ग्रीड, मोह...

शेवटी याचा शेवट व्हायचा तोच झाला... एक सकाळ उजाडली आणि कंपनीने फसवणूक केल्याचं लक्षात आलं.. कंपनीने दिलेले दागिने पण नकली असल्याचं कळलं. कोट्यधीश होण्याची स्वप्न बघणारे एका रात्रीत देशोधडीला लागले.

लोकलचे धक्के खात, कपडे पिळावे इतका घाम गाळून कमवलेला पैसा मुंबईकरांनी सानपाडा, दादर,भाईंदर अश्या विविध भागातल्या ब्रांचमध्ये जात गुंतवला... कोणी घर गहाण ठेवलं, कोणी विकलं, कोणी कर्ज काढलं, कोणी पैसे उधार घेतले, कोणी दागिने विकले. श्रीमंत होण्याची स्वप्न बघत, कोणी हक्काच्या घराचं स्वप्न बघत, कोणी कर्जमुक्त होण्याचं स्वप्न बघत टोरेसमध्ये पैसे गुंतवले.. आणि आता ही स्वप्न पुर्ण होणं तर दुरच पण अनेकांची झोप सुद्धा एका चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतलीये. गरिबीच्या खाईत लोटलंय. होतं नव्हतं सगळं गेलंय....

कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून एक रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही.

बाबांनो आतातरी शहाणे व्हा. घरबसल्या झटपट पैसा मिळत नसतो. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्याईतकच तो सावधपणे जपणं देखील आवश्यक असतं. नाहीतर प्रत्येकवेळी श्रीमंतीची स्वप्न दाखवत तुम्हाला नागडं करायला आणखी एक स्कॅम येईल.

- सौरभ कोरटकर**

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 3 weeks, 6 days ago

???? ???? ?? @Puneroomadmin

? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 7 months, 3 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत

Last updated 1 year, 9 months ago