Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
ती’ वयात येताना…
15 वर्षांच्या नेहाच्या दप्तरात तिच्या बाबांना एका मुलाचे प्रेम पत्र सापडते.. नेहाचे बाबा अत्यंत काळजीत.. त्या अवस्थेत ती चिठ्ठी ते नेहाच्या आईला दाखवितात.. आई थोडी गंभीर होते परंतु ही चिठ्ठी आपल्याला सापडली आहे हे नेहाला न कळून देण्याबाबत व तिच्याशी रोजच्या प्रमाणे वागण्याबद्दल नेहाच्या बाबांना विनंती करते… दुसऱ्या दिवशी सकाळी, आई नेहाला आवडणाऱ्या गरमा गरम पोह्यांची डिश घेऊन तिच्या खोलीत जाते.
अभ्यास करत बसलेल्या नेहाला म्हणते; नेहा अभ्यास जरा बाजूला ठेव बरं आणि हे गरमगरम पोहे खात माझ्याशी मस्त गप्पा मार. नेहाशी गप्पा मारता मारता आई म्हणते. अगं नेहा; आता आपण दोघी मैत्रिणी झालोत. नेहा थोडी बावचळते. अगं तू मोठी झालीस ना आता.आज तुझी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. नेहाच्या चेहऱ्यावर थोडे प्रश्नार्थक भाव उमटतात.
“नेहा, ज्याप्रमाणे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक बदलही सुरु होतात. छोट्याछोट्या गोष्टींचा राग यायला लागतो, आपली चीडचीड वाढते, कधी कधी खूप उदास वाटतं, एकटं वाटतं आणि खूप रडू येतं तर कधी कारण नसतानाही उगीच हसू येतं, आणि हो कधी कधी माझा आणि बाबाचाही राग येऊ शकतो हं तुला.. या सगळ्या बदलांबरोबरच वयात येताना अजून एक निसर्गतः मोठा बदल आपल्यात होत असतो तो म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं; एखादी व्यक्ती इतकी आवडू लागते की आपण त्या आकर्षणलाच प्रेम समजून बसतो, पण बाळा या वयात जे होतं ते आकर्षण असतं.. प्रेम नसतं.. जसं एखाद्या मॉल मध्ये गेल्यावर आपल्याला चटकिनी एखादा ड्रेस आवडून जातो अगदी त्याचप्रमाणे एखादा मुलगा या वयातील मुलींना आवडू शकतो.
कोणाला त्याचं दिसणं, आवाज, डोळे तर कोणाला त्याची स्टाईल, त्याचं बोलणं आवडतं आणि मुलांच्या बाबतीतही अगदी असंच होतं असतं. थोडक्यात हे बाह्य आकर्षण असतं. या वयातील मुलामुलींचं शरीर व मन अजून परिपक्व झालेलं नसतं. कोणावर प्रेम करण्याइतकी प्रगल्भता अजून त्यांच्यात आलेली नसते. आज एक, तर उद्या कोणी दुसरीच व्यक्ती आवडू लागते.. या वयात मनही थोडं अस्थिर आणि चंचल झालेलं असतं.. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं तेच कळत नसतं.
थोडक्यात सांगायचं तर; जसं जेवणाच्या ताटात विविध पदार्थांचा समावेश असतो; अगदी तसंच आपलं आयुष्य म्हणजे जेवणाचं ताट आणि त्यातील पदार्थ म्हणजे आपले आई-वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शाळा, आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती, हे सगळे! हे सर्व आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत ते म्हणजे आयुष्य नाही. परंतु ज्यावेळी आपण कोणा एका व्यक्तीलाच आयुष्य समजायला लागतो त्यावेळी अडचण निर्माण होते.
हे वय खूप नाजूक असतं गं बाळा. सगळं जग या वयात सुंदर दिसत असतं पण त्या सुंदरतेमागचं भयाण रूप मात्र दिसत नसतं.. या साठी सतत सावधान राहून या वयातील मुलांनी प्रवास केला पाहिजे, आकर्षणचा कितीही मोठा खड्डा या प्रवासात आला तरी तो चुकवून पुढे जाणंच फायद्याचं असतं. आकर्षणात अडकणं हा आपल्या ध्येयामधील खूप मोठा अडथळा असतो.
तो अडथळा आपल्या मार्गात येऊ नं देता आपण मार्गक्रमण करणं गरजेचं असतं. आपल्या आईचं हे सगळं बोलणं ऐकून नेहाला रडू अवरत नाही. ती उठून आईला कडकडून मीठी मारते आणि आतून आपल्या दप्तरातून ती चिठ्ठी आणून आईला दाखवत म्हणते; आई मी ही या खड्ड्यात पडणार होते गं; पण तू वाचवलंस मला.. आता कितीही मोठे खड्डे आले तरी मी ते सहज पार करू शकेन ही आता खात्री वाटते कारण आता या प्रवासात मी एकटी नाही तू ही आहेस माझ्याबरोबर..आई ही तिला जवळ घेऊन; आपण तिच्या बरोबर असल्याचा विश्वास तिला स्पर्शाने देते.
वयात आलेल्या प्रत्येक मुलांच्या पालकांचा त्यांच्याशी अत्यंत मोकळेपणाचा संवाद असणे गरजेचे असते.. या संवादाच्या अभावामुळेच बहुतांशी वयात आलेली मुले ही चुकीच्या दिशेने वाहवत जाण्याची शक्यता असते.. अनेक शंका, उत्सुकता यांनी त्यांना घेरून टाकलेले असते त्यामुळे त्यांच्या शकांचे निरसन व दमन झालेल्या उत्सुकतांचे शमन हे पालकांमार्फत योग्य पद्धतीने झाल्यास मुले त्यांचा टीन एजमधील प्रवास नक्कीच हसत खेळत पार करू शकतील..
– सायकॉलॉजिस्ट
#LooksChallenge #sandeshacreations #loveislove #प्रेम_काय_आहे #mastiviral #मनातील_आवाज #स्त्रीत्व #mastiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii #cycology #Cycopath #cycologycal #cyco
म्हातारीजवळ विषय काढला तो पर्यंत ती बर्यापैकी सावरली होती म्हणाली काय तो प्रकार माझ्या लक्षात आलाय. माझ्या एकुलत्याएका मुलानी बायकोच्या सांगण्यावरूनमला घराबाहेर फेकली..
हे म्हणाले घरचा पत्ता सांगा आम्ही तुम्हाला घरी नेतो आजी म्हणाली त्यापेक्षा मी पंढरपूरला जाते.जिथेमाझी गरज नाही.जिथे माझी अडचण होते तिथे जाण्यापेक्षा मी पंढरपूरला जाईन तिथे माझं माहेर आहे माझा भाऊ तिथला वतनदार आहे .ती म्हणाली त्याचा पत्ता सांगा आपण त्याच्याशी संपर्क साधू.. आजी हासत म्हणाली अगं माझ्या भावाचा पत्ता त्रिभुवनात सगळ्याना माहीत आहे विठोबाचा पत्ता विचारतेस? या वयात निराधार झालेल्या बाईला एकादगडाच्या मुर्तीबद्दल इतका भरवसा? तो ही पोटच्या पोराने असा दगा दिल्यावर?
दोघाना अष्चर्य वाटलं आणि पून्हा म्हणून या बाईला जा असं सांगायचं नाही असं दोघानी ठरवलं. त्या बाईचा पायगूण म्हणा नाहीतर दोघांच्या चांगूलपणाचं फळ म्हणा त्या घराला बरकत येत गेली तो ज्यांचा व्यवसाय बघत होता त्यांच्या मुलाने इंटरेस्ट नाही सांगितल्यावर त्या मालकाने सगळा व्यवसाय याच्याच हवाली केला जिथे तो नोकर होता तिथला तो मालक झाला म्हातारीच्या आग्रहावरून दोघानी चांस घेतला आणि त्याना गोड गोंडस मुलगी झाली म्हातारीच्या सांगण्यावरून तिचं नाव साधना ठेवलं
शेवटी सूखीची भीती वाटायला लागते तसं त्या म्हातारीचं झालं म्हणाली तुम्ही जा म्हणायच्या आधीच मी माझा मुक्काम हलवते.
पण आम्ही तुम्हाला जा म्हणू असं तुम्हाला का वाटलं? दोघानी कळवळून विचारलं.म्हातारी म्हणाली पोटच्या पोरानं बोचकं उचलावं तसं मला उचलून इथे आणून पटकलं. मग तुमच्या कडून तरी मी जास्त अपेक्षा का करू? तुम्ही मला का ठेऊन घेतलत?
ती म्हणाली माहीत नाही. साईनी ठरवल्याप्रमाणे आम्ही इथे आलो हे घर घेणं आमच्या अवाक्याबाहेरचं होतं पण साई इथे येऊन बसले आणि बोटाला धरून आम्हाला घेऊन आले तुमच्या चालाख मुलानी आम्हाला हेरलं आणि खडा टाकून बघितला तो फिट बसला असं त्याला वाटलं पण तुमची सोय ही साईनीच केली तुम्ही होतात म्हणून मी आई व्हायचं धाडस केलं , नाहीतर या निर्जन परिसरात मी काय करू शकले असते ?
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निदान तुमचा भाऊ तरी पंढरपूरचा वतनदार आहे पण आम्हा दोघाना कोणीच नाही तुम्हला तुमच्या मुलानी टाकलं याला त्याच्या आईने.... तो चार वर्षांचा असताना याची आई याला यादोंकी बारात दाखवायला घेऊन गेली आणि टाँकीजच्या अंधारा्चा फायदा घेऊन ती पळून गेली. शेजारच्या सीट्वर एक वाण्याचं कुटूंब होतं त्यानी सांभाळलं याला... त्यांची मुलं मोठी झाल्यावर हा तिथून बाहेर काढला गेला. चाचा असे पर्यंत आम्ही भेटायला जात होतो आणि माझं म्हणाल तर मी अनाथ आश्रमातच वाढले समाजाच्या मदतीवर
हे आपलं घर असं आहे आपण तिघं वेगवेगळ्या दिशेने आलो आणि साईनी आपल्याला या एका छता खाली ठेवलं कारण आपण खेळ मांडायच्या आधीपासून तो आपली वाट बघत इथे तिष्ठ्त बसून होता....साधना खरी आपल्या गोष्टीची सुरुवात आहे जी तुमच्यामुळे शक्य झाली.आजी आपल्याला जमली नाही ती परतफेड पुढे साधना करेल....
@चंद्रशेखर गोखले.......
@चंद्रशेखर गोखले.......
त्या दोघांच नवं घर. नवकोरं म्हणता येणार नाही कारण आधी कोणीतरी तिथे राहयचं, पण तरी घराचं नवेपण टिकून होतं.तसं साधं घर, चार प्रशस्त खोल्या वर गच्ची. गच्चीत जायला बाहेरून काढलेला गोल गोल जिना...नंतर ती तो आत घेणार होती आणि तो हो म्हणाला होता
सध्या दिवस असे की ती म्हणेल त्याला तो बिनादिक्कत हो म्हणायचा. त्याला कारणच तसं होतं तिने हट्ट केला म्हणून हे घर झालं असं त्याला वाटायचं
त्या दोघांचं नवं घर. कानेकोपरे ओळखीचे व्हायचे होते पण दारं खिडक्या सरावाची झालेली....घरा भोवती चौफेर तारेचं कूंपण होतं त्याला ती लक्षमण रेषा समजायची. तो दिवस भर कामा निमित्त घराबाहेर असायचा आणि ती दिवसभर घराभोवती गोल गोल फिरायची. भीती अशी कधी वाटलीच नाही त्याला कारणही होतं आधीचे घर सोडून जाताना साईबाबांची भली मोठी तसवीर विसरून किंवा ठेऊन गेले होते तिला त्यांची सोबत वाटायची
हे घर घेताना होतं नव्हतं ते सगळं कामी आलं होतं , आधी होतच काय म्हणा..पण जे होतं ते ही तिच्या साठी त्याने पणाला लावलं आणि शहरापासून लांब, निर्जन सुनसान प्रदेशात हे एक्कलकोंड घर घेतलं
इथे आल्यापासनं मुगाच्याखिचडी शिवाय दुसरं काही दोघं जेवले नव्हते चहा सुद्धा दोनदाच पण घरात जे काही शिजेल ते ती भक्तीभावाने साईंसमोर ठेवायची म्हणायची अत्ता हे गोड मानून घ्या तुमच्या आशिर्वादाने घर भरलं की ताट्भरून नैवेद्य दाखवेन. तो हसायचा म्हणायचा इतका लळा नको लाऊस ही तसबीर आपली नाहीये. आज ना उद्या कोणी न्यायला येईल आणि आपल्याला ती द्यावी लागेल इतकी सूंदर तस्बीर उगाच कोण सोडेल? आणि अशीच तसबीर आणायचा हट्ट अत्ताच धरू नकोस घराचा हप्ता जाऊन दोनशे तीनशे तसबीरीवर घालणं सध्या शक्य नाही
त्याच्या कष्टाची तिला कल्प्ना नव्हती असं नाही. आणि मुळात ती खूप शहाणी आहे या वर त्याचा विश्वास होता. खरतर तिच्या वरचा विश्वास एव्हढीच त्याच्या आयुष्याची मिळकत होती आधार होता. तो मनोमन प्रार्थना करायचा आता एक दीड महिना होऊन गेला आता कोणी ती तसबीर मागायला येऊ नये
दिवसभर ती एकटीच असते तिला तेव्हढीच सोबत
तो परिसर असा की गच्चीत उभं राहिलं की थेट जेमतेम नजरेच्या टप्प्यात येणारं स्टेशन दिसायचं. तुरळक माणसं उतरायची आणि त्यातूनच घराकडे येणारा तो दिसायचा ही लगेच साईना वर्दी द्यायची हे आले हो... साईना ती कधी कधी मामंजी म्हणायची त्याला ते आवडायचं नाही आज ना उद्या कोणीतरी ही तसबीर न्यायला येणार याची त्याला खात्री होती
हल्ली तिची भीड जराचेपली होती घर साईंच्या हवाले सोडून खुशाल ती अवती भवती फिरायची पण त्यामुळे तोंडल्याचे, कच्च्या करवंदाचे, घोसावळ्याचे बेवारशी वेल तिला सापडले आणि खिचडी मधे ते डोकावायला लागले. दोघे असे त्या घरात रुळत असतानाच एक दिवस लांब स्टेशनापाशी ट्रेन थांबली आणि तुरळक गर्दीतून तो घराकडे येताना तिला दिसला ती खाली जायला वळणार तेव्हढ्यात त्याच्या मागून एक इसम तिला त्याच वाटेवरून येताना दिसला. हा घरात शिरला तसा तो ही घरापाशी घुटमळला....दोघानी विचारपूस केली तो जरा अवघडूनच घरात आला .
तो उगाच हसत म्हणला कसं वाटतय इथे? आम्ही पण छान रमलो होतो पण येणं जाणं जिकरीचं व्हायला लागलं ....त्याने ओळखलं हा साईंची तसबीरच मागायला आलाय.तरी आलेला इसम काहीबाही बोलत राहिला तिने लिंबूसरबत दिलं आणि त्याने येण्याचं कारण विचारलं
तो अवघडत म्हणाला माझ्या आईचा जीव अडकलाय इथे... साईंची तसबीरना?.. असं काहीतरी तो बोलणार तेव्हढ्यात तो अजीजी करत म्हणाला माझी एक विनंती आहे..... दोन दिवस माझ्या आजारी आईला ठेऊन घ्याल क? म्हणाला तशी आजारी आहे ती या घाराचा ध्यास घेतलाय, जाण्याआधी दोन दिवस राहीली तर शांतपणे डोळे मिटेल.. ती वेळच तशी होती की तिला नं सांगता घर विकावं लागलं. अत्ताचं घरही छान आहे भर वस्तीत आहे पण ग्लानीत असलेल्या आईला हेच घर आठवत राहतं....ही म्हणाली दोन दिवस ठेऊन बघा त्याना बरं वाटेल दोघानी एकमेकांकडे बघितलं दोघांच्या डोळ्यात होकारच होता दोघं हो म्हणाले
आणि दुसर्य़ाच दिवशी तो आणि त्याची बायको आजारी आईला ्घेऊन घरी आले. आई ग्लानीत होती पण ती दोघं आवर्जून गच्चीत गेली. मागच्या अंगणात गेली तिथेअंगणात लावलेली तुळस जगली नाही म्हणून ती हळहळली.त्यांचा पाय निघता निघत नव्हता..जाताना म्हातीरीची औषधं, केस पेपर पथ्यपाणी सांगून ती दोघं निघाली त्याने त्याचा मोबाईल नंबर दिला नव्या घराचा पत्ता सांगितला पण साईंच्या तसबीरीची आठवण कुणलाच झाली नाही. रात्री त्याचा फोन आला म्हातारी ग्लानीतच होती
म्हातारी जरा सावध झाल्यावर तिने तिला गरम गरम दुध पाजलं, मग पेज दिली. दोन दिवसात येणारा तो आठवडा झाला तरी आईला न्यायला फिरकला नाही.त्याचा फोनही बंद, दिलेला पत्ता खोटा मग ज्याच्या कडून घर घेतलं त्या एजंट कडे चौकशी केली तो म्हणाला ते दोन्ही भाऊच होते आई नव्हतीच. ही सगळी चौकशी आजीच्या नकळत चाललेली. मग कळून चुकलं आपण फसवले गेलो.
जसं घडलं तसं :“वानोळा म्हणजे काय ग.. आई “
माझे वडील बालभारती मध्ये वाहन चालक म्हणून नोकरीला होते. त्यामुळे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरायचे त्यानिमित्ताने वारिष्ठ अधिकारी तसेच सोबतचे कर्मचारी यांचे गावी जाण्या येण्याचा बरेचदा प्रसंग येत असे.
एके दिवशी दादा रत्नागिरीहुन घरी आले येताना त्यांनी भले मोठे बाचके बांधून आणले होते. आम्ही भावंडे लहान लहान असल्याने कुतूहलाने ते बाचके खोलून पहिले असता त्यात हापूस, पायरी तोतापुरी आंबे ओले काजू, कोकम, नारळ व तांदूळ होते.
आम्ही भावांडाने मस्तपैकी आठवडाभर ताव मारला होता.
दादा बाहेरगावी गेले की आमच्यासाठी काही ना घेऊन यायचेच.
रविवारी सुट्टी असल्याने रात्रीचे जेवण करीत असताना दादा आईला म्हणाले उद्या सकाळी लवकर डबा करून दे नागपूरला जायचं आहे
आईने विचारले पुस्तके घेऊन जाणार आहात का? तर दादा म्हणाले नाही आमच्या मोठ्या साहेबाची बदली झाली आहे. त्यांचे घर सामान शिफ्ट करायच आहे. दुसऱ्या दिवशी दादा आम्ही झोपेत असतानाच नागपूरला निघून गेले.
चौथ्या दिवशी दादा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या हातात भली मोठी पिशवी होती मी लगबगिने ती हातात घेतली व घरात घेऊन गेलो पिशवीतून छान सुगंध येत होता. आम्ही तिन्ही भावंडे पिशवीत काय आहे बर? अश्या प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहत होतो
आम्ही पिशवी ओढू लागलो तसें दादा ओरडले अरे सावकाश घ्या तसा माझ्या हातात एक बॉक्स लागला ज्यातून मस्त सुगंध येत होता. मी तो बॉक्स उघडला तर त्या मध्ये जगप्रसिद्ध हल्दीरामची संत्रा बर्फी होती. बहिणीच्या हाताला हल्दीराम फरसाण लागला होता. आमचा आनंद गगनात मावेना. वडिलांनी सांगितले की हल्दीराम हा ब्रँड जगविख्यात आहे. तशी आई म्हणाली पण ती खूप महाग असेल ना? हो पण मी ज्या साहेबांची शिफ्टिंग केले होते ना त्यांनीच हा वानोळा दिला आहे. त्यांची खूप मोठी संत्राची बाग नागपूरला आहे.त्या संत्र्याच्या बर्फीची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे.
तेव्हा वानोळा म्हणजे काय हे माहित नव्हते पण असा वेग वेगळा वानोळा आम्हांला नेहमीच येत असे.
असेच एकदा दादा कोकणात गुहागरला महाडिक साहेबांच्या गावी गेले होते त्यावेळी महाडिक काकांनी इंद्रायणी तांदूळ, नाचणी, सोडे (खारवालेली कोळंबी ) काळे वाटाणे तसेच सुकट बोंबील दिले होते. ज्याची चव आम्ही बरेच दिवस चाखत होतो.
नेहमीच कानावर पडणारा शब्द म्हणजे वानोळा तर हा वानोळा म्हणजे नेमका काय आहे हे मी आईला विचारले असता तेव्हा तिने फार सुंदर वर्णन वानोळ्याचे केले तिने सांगितलं की…
वानोळा म्हणजे प्रेम
वानोळा म्हणजे आपुलकी
वानोळा म्हणजे आपलेपणा
वानोळा म्हणजे जाती पातीच्या पलीकडच नातं
वानोळा म्हणजे माणुसकीचा निर्मळ वाहता झरा
वानोळा म्हणजे एकमेकांना दिलेल्या सदिच्छा
वानोळा हा संस्कार आहे देण्याचा
वानोळा हा संस्कार आहे वाटून खाण्याचा
दूर असलो तरी मनात घर करून राहण्याचा
आमच्या आईचे ते उत्तर त्या वेळी खरोखर लागू पडत होत.
पुण्यात राहायला असताना हा वानोळा आम्ही पदोपदी अनुभवला होता शेजारी काही वेगळा पदार्थ बनवला की तो न चुकता आमच्या घरी येत असे कोंबडीवडे असो उकडीचे मोदक असो काळ्या वाटाण्याची आमटी असो म्हवरा (मासे )असो मटण असो
दिवाळीचा फराळ असो ते बिनदिक्कत वानोळयच्या रूपाने ताटात येत असे त्याला कोणतीही भिंत आडवी येत नसे आमचेही काळ्या मसाल्याची झणझणीत मटणाची भाजी शेजारी वानोळा म्हणून जात असे.
आम्ही पुण्यावरून औरंगाबाद ला शिफ्ट झालो शेवटचा वानोळा हा आमची अतेबहीण जी वढखा या गावी राहते तिचे शेत रस्त्यावरच आहे. तिथे गेलो असता बाजीराव साबळे दाजी यांनी शेतातील टमाटे, कांदे, वांगे, मका, अद्रक आणि लसूण असा भलामोठा वानोळा दिला होता त्याला आता 7 वर्ष झाले त्यानंतर आजतगायत कोठूनही वानोळा आलेला नाही…
आजच्या घडीला मुक्तपणे वानोळा देणाऱ्याचे हात महागाईने आखाडते झाले आहेत. वानोळा घेणाऱ्याच्या खिशात पैसा खुळखुळतो आहे.शेतकरी त्रस्त आहेत उत्पादन कमी होत आहे
माणसाची माणुसकी लोप पावत चालली आहे जो तो आप आपला विचार करण्यात गुंतला आहे. वानोळा तर दूरच आज बोलायला माणसाकडे वेळ नाही चहा पाणी विचारायला फुरसत नाही….
आजकाल वानोळ्याची लाज वाटू लागली नी माणसं दुरावत चालली……वानोळा लोप पावत चालला
शब्दरूपी वानोळा तुमच्या नातेवाईकांना मित्रांना वाटा याला पैसे लागणार नाहीत वानोळा कसा वाटला कळवाजास्तीत जास्त शेयर करा..,.. वानोळा
...स्री..एक सिस्टिम...
बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?
भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार,रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी - भाजी,वरण-भात,कोशिंबीर - चटणी,उसळ वगैरे वगैरे,आणि लाडू - चिवडे,मिठाया - पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?
फोडणीला तेल किती घेऊ,मोहरी किती,हिंग किती,हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?
गॅस किती मोठा,किती लहान, केव्हा कमी - जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा,उलथनं की डाव,का झारा? कढई का पातेलं?
पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?
एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?
ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?
प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा,खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?
दूध तापत असताना,कुकर शिजत असताना,तेल गरम होत असताना,आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे,एखादी यादी करणे,एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?
मीठ,तिखट,साखर किती घालायचं?
पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?
उरलेल्या अन्नाचं काय करायचं?
वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?
किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?
मग लक्षात आलं की,आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाक घराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे.
बुद्धिमत्ता,हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे involvement.
उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो,स्वयंपाकघर चालत नसतं.
गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं,प्रसंगी पूर्ण अशिक्षित असुन स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकाच्या हुशारीला आपण दाद कितीवेळा देतो?
निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण डिग्री,मार्क,इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो.
एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी.
किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं.
खाण्यापूर्वी,दिवसातुन एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.
सर्वच महिलांना समर्पित.
काॅपी पेस्ट पोस्ट: वाघ(नाना)
आज काही ही करून नवऱ्याशी मनातलं बोलायच असा पक्का निर्धार मनाशी करून ती मनात विचार करत होती..... कारण धावपळी च्या चक्रात त्यांना बरेच दिवस एकांत मिळाला नव्हता.... आज तो तिला भेटला होता.... घरातील सगळे लग्ना निम्मीत बाहेर गेलेले.... त्यामुळे मनाशी विचार करूनच होती ती..... ठरल्या प्रमाणे तिच्या मनाशी तिने पतीशी बोलायला सुरुवात केली..... त्याला म्हणाली का कुणास ठाऊक पण आज तूझ्या मांडीवर डोक ठेऊन झोपावंस वाटतंय..... त्यानेही लगेच आपली मांडी तिला दिली.... त्याच्या मांडीवर डोक ठेवताच तिच्या अश्रूंचा बांद फूटला .... आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागला..... मांडीवर त्याच्या पडलेला तिच्या अश्रूचा थेंब त्याला जाणवला..... आणि त्याने त्याची नजर तिच्याकडे वळवली... आणि विचारू लागला.... काय झाल.... तसे तिचे अश्रू अनावर झाले... दाठलेल्या कंठाने तिने त्याला मिठ्ठी मारली....
आणि लहान लेकरासारखी हुसासे देऊन रडू लागली..... मायेने तिला त्याने विचारलं .... सांग काय झाल आणि ती अश्रू सावरत म्हणाली..... सगळी सुख तू माझ्या पायाशी आणून देत आहेस.... मी मागेल ती गोष्ट तू पुरवत आहेस.... अगदी सगळा हट्ट पुरवत आहेस..... कसलीच सुखा बाबत कमी नाही...... पण तुझा वेळ मात्र मला मिळत नाही..... माहागड्या साड्या दागदागिन पैसा आडका बंगला गाडी.... ही वरवरची सुख आहेत..... त्यात मला फक्त तातपुरता आनंद मिळतो.... पण तुझी कमतरता त्यापेक्षा जास्त जाणवते.... रोज महागड्या साड्या नेसून दागदागिने घालून मिरवूण फक्त मैत्रीणीत शान वाढते..... पण मनाला तुझ्या स्पर्शाची जास्त गरज असते..... गाडीतून फिरून भौवतीक आनंद मिळतोय..... पण त्यापेक्षा तुझ्याशी गप्पा माराव्या तू जवळ असावं असं आठवून मन रडतंय .... मला तुझा थोडा वेळ दे माझ्याशी प्रेमाने बोल जरा जवळ बसून .... मला वरवरचे समाधान नको .... तुझ्या कुशीत शिरून हितगुज करावं तुझ्याशी प्रेमानं बोलावं हस्सी मज्जाक करून मनमोकळं वागावं यात माझा आनंद आहे... मानसिक समाधान आहे.... तुझ्या धावपळीतून जास्त नाही निदान थोडा वेळ फक्त आणि फक्त माझ्या नावावर कर..... आणि तुझ्यात जगणारी मी मला माझ्यासाठी तुझा वेळ दे.... भौतिक सुखात जगण्यापेक्षा अपण थोड अपल्या दोघासाठी ही जगूया ऐकमेकांना वेळ देऊन.... अपल नातं जेवढ जबाबदारी सांभळण्यासाठी आहे . तेवढच अपल्या प्रती जगण्यासाठी ही असलं पाहिजे... म्हणून तुझा वेळ थोडा फक्त मला दे ....
प्रत्येकांनी अपल्या जोडीदारासाठी थोडा वेळ नक्कीच दिला पाहिजे... जेणेकरून दोघानाही त्यात जगण्याचा आनंद घेता येईल....
Vanita Bansode ✍️ copyright ©️ Vanita Bansode
#मायलेक
१५ वर्षांपूर्वी मी प्रेग्नन्ट असताना बरेच महिने
मला बेडरेस्ट सांगितली होती. त्याच सुमारास माझी आजी ( आईची आई ) कॅन्सरमुळे खूपच आजारी होती.साधारणपणे सगळ्या पहिलटकरणींप्रमाणेच मलाही आई जवळ असावी असंच वाटायचं.ती जवळ असली की एक निश्चितता असायची.आई माझ्याजवळ असली की तिचं मन आजीकडे धाव घ्यायचं,तर आजीपाशी असली की माझ्याजवळ.खूप धावपळ होत होती तिची.एकीकडे तिला जिने जन्म दिला ती अशी आजारी तर दुसरीकडे तिने जिला जन्म दिला ती नवीन जीवाला जन्म देणार होती.
एकीकडे माझे दिवस भरत आले , तसतशी माझ्या आजीची तब्बेत खूपच खालावली होती. आजी एवढी आजारी होती तरीही तिला तिच्या मुलीची जास्त काळजी होती.तिची होणारी धावपळ तिला बघवत नव्हती.शेवटी काही झालं तरीही आईचं हृदय होतं ते. मला नववा महिना लागताच आजी देवाघरी गेली.१५ दिवसातच माझी डिलिव्हरी झाली.स्वतःची आई गेल्याचं दुःख विसरुन माझी आई माझ्या आनंदात सामील झाली.लेकीच्या प्रेमापेक्षा आईच्या प्रेमाचं पारडं जास्त जड होतं.
हे आठवायचं कारण म्हणजे बरोबर १ वर्षांपूर्वी माझ्या आईचं दोन्ही गुढग्यांचं ऑपरेशन झालं.तेव्हासुद्धा तारीख ठरवताना माझ्या लेकाची परीक्षा वगैरे बघून तिने तारीख ठरवली.मी आईकडे गेले तेव्हा स्वयंपाकघरातली तिची पूर्वतयारीच एवढी होती की जेणेकरुन मी स्वयंपाक करीन तेव्हा मला जास्त त्रास होऊ नये. स्वतःला एवढा त्रास होत असताना देखील लेकीची काळजी .
माझा लेकही प्रथमच एवढे दिवस मला सोडून राहिला होता.ती सुट्टीला एकटा आजीआजोबांकडे राहायचा ते वेगळं पण सगळं रुटीन सुरु असताना मी बरेच दिवस घरी नाही असं प्रथमच झालं होतं.काही दिवस गेल्यावर माझा लेक सतत बाबाला ," कसं तरीच होतंय " म्हणत होता. या कसंतरी चं औषध ' आई ' होतं खरंतर. त्यामुळे माझंही मन लेकाकडे धाव घेऊ लागलं होतं.एकीकडे आईची काळजीही होती.१५ दिवसातच माझी आई ," तू जा बिनधास्त .काही काळजी करु नको म्हणू लागली " .मी सुद्धा तिचं थोडंफार रुटीन लागल्यावर लेकाच्या ओढीने परत आले. परत एकदा आईच्या प्रेमाचं पारडं जड ठरलं होतं .
आईच्या डोळ्यात पाणी बघून म्हणावसं वाटलं ,
" डोळ्यात तुझ्या पाणी का गं आई ??
आठवली का गं तुला तुझी आई ??
ये माझ्या मांडीवर डोके ठेव जराशी
होऊदेत मला तुझी आई थोडीशी "
सायली वझे पानसे
नारळाच्या कवट्या आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण याच नारळाच्या कवट्या रिसायकल करून केरळच्या एका तरुणीने लाखोंचा बिझनेस उभा केला आहे.
मारिया कुरियोकोस ही केरळच्या त्रिशुर येथिल. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती स्पेनला शिकायला गेली. 2017 मध्ये तीला जॉब लागला. पण 2019 मध्ये तिने तो सोडून दिला.
तिला स्वतःच अस काहीतरी करायचं होत. थोडा रिसर्च केल्यावर तिला समजल की लोक नारळाच्या कवट्या फेकून देतात. पण त्यापासून अनेक उपयोगी वस्तू बनू शकतात.
मग तिने नारळाच्या कवट्या रिसायकल करायला सुरुवात केली. आणि त्यापासून सजावटी सामान बनवले.
2019 मध्ये मारियाने Thenga Coco नावाने व्यवसाय सुरू केला. ती नारळाच्या कवट्या रिसायकल करून त्यापासून बाऊल, कँडल होल्डर तसेच प्लांट हँगर्स अशा विविध वस्तू बनवते.
सुरूवातीला तिने 150 किचन बाऊल बनवले. ते एका इव्हेंट मध्ये तसेच मित्रपरिवाराला विकले. 60 रुपयाला एक बाऊल विकला. त्यातून तिला 9000 रुपये मिळाले.
मग तिने 1500 रुपयांची ड्रिलिंग मशीन घेतली. एकूण 4000 गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केल्याचं ती सांगते.
आता तिच्याकडे 12 महिला कामाला आहेत ज्या तिला हे प्रॉडक्ट्स बनवायला मदत करतात. कोविड -19 मध्ये तिने तिचा व्यवसाय ऑनलाईन नेला तेव्हा तिच्या व्यवसायाला खरी प्रसिद्धी मिळाली.
त्यांचे जास्त कस्टमर हे मुंबई, दिल्ली आणि बंगलोर सारख्या शहरातून आहेत जिथे लोकं एको फ्रेंडली प्रॉडक्ट्स बद्दल जास्त जागरूक आहेत.
तसेच ती आता युरोप, अमेरिकेत सुध्दा आपले प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करते. तिला विदेशातून अनेक ऑर्डर्स मिळतात.
पहिल्या वर्षी त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर 20 लाख रुपये होता तर दुसऱ्या वर्षी तो 50 लाख रुपये इतका झाला.
मागच्या आर्थिक वर्षात त्यांचा टर्न ओव्हर 1 कोटींपेक्षा जास्त झाला आहे.
अशाच स्टोरीज रोज सकाळी १० वाजता तुमच्या व्हॉट्सॲप वर मिळवा. आताच Bio (प्रोफाईल) मधील लिंकवरून ग्रुप जॉईन करा.
अशाच पोस्टसाठी फॉलो करा @tarunudyojak
स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर नि:सकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतकं देणार, की मागायला काहीच उरणार नाही.
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago