Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
##चिर निद्रा
© अपर्णा देशपांडे
मध्यरात्री अचानक माधवीला दचकून जाग आली . घड्याळात अडीच वाजले होते . तिने डोळ्यावर पाणी मारले , आणि ऍप्रन चढवला . आपल्या रेस्ट रुम मधून बाहेर येऊन सिस्टर च्या टेबल वरील रजिस्टर मध्ये वेळेची नोंद केली , आणि वॉर्ड क्र .3 कडे गेली . डॉ . विश्वास नुकतेच राउंड घेऊन गेले होते . आज हॉस्पिटलमध्ये जरा शांत वाटत होतं .
कुणी इमर्जन्सी पेशंट दाखल झालेला नव्हता . अन्यथा डुलकी घेणे काय , खुर्चीत बसणे पण शक्य नसते . स्टोअर रूम मध्ये स्टॉक बघायला म्हणून ती आत गेली , आणि मागून कुणीतरी येतंय असा भास झाल्याने झट्कन वळून बघितलं . मागे तर कुणीच नव्हतं , पण तिला भास झाला होता नक्की ! स्टोअर मध्ये आत अजून एक छोटी खोली होती , जिथे नामदेव ची ड्युटी असते . आज मात्र स्टोअर रिकामं होतं .तिला आश्चर्य वाटलं . तिने नामदेव , इंगळे , यांना हाका मारल्या . उत्तरादाखल आतून खोल खोल यावा तसा आवाज आला . कुठून आला आवाज म्हणून ती पुढे गेली . इतक्यात लाईट्स ऑफ होऊन अचानक काळोख झाला , आणि धाडकन आवाज होऊन स्टोअर चं दार लागल्या गेलं . आता मात्र माधवी चा थरकाप झाला . आपल्याला झालेला भास खोटा नव्हता ह्याची जाणीव झाली . तिच्या कपाळावर घाम जमा झाला . पटकन एका टेबलाचा आधार घेऊन ती आधी खाली बसली . धडधडत्या हृदयाला शांत होऊ दिलं . तिने कान एकवटून कानोसा घेतला , पण तिथे कुणी असल्याची कोणतीच चाहुल नव्हती . गुढग्यावर सरकत सरकत पुढे गेल्यावर तिथे खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या .
" मॅडम , तुम्ही स्टॉक चेक करायला येता न , तेव्हढ्या पूरतच ठेवा . इकडच्या दरवाज्यापाशी नका जात जाऊ " तिला आठवलं ..नामदेव म्हणाला होता एकदा . काय आहे तिकडे ? असं का म्हणाला नामदेव ? म्हणत
तिच्याही नकळत तिने ते दार ढकललं . आत खाली जाणाऱ्या पायऱ्या होत्या बहुतेक . तिने आपला मोबाईल चा लाईट ऑन केला , आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली . खालून कुठूनसा मंद उजेड येत होता . शेवटच्या पायरीवर ती आली , आणि मोबाईल लाईट आपोआप बंद झाला . वातावरण अतिशय गूढ...कमालिव्हि शांतता ....एक विचित्र दर्प सगळीकडे भरलेला ...अशा अवस्थेतही ती न घाबरता पुढे सरकत होती . ह्या प्रकरणाचा छडा लावायचाच ह्या निर्धाराने .
चाचपडत गेल्यावर तिच्या हाताला काहीतरी ओलसर लागलं . मोबाईल ऑन करावा की नाही हा विचार ती करत असतानाच खुसफुसल्या सारखा आवाज झाला .
तीने पडद्यामागे स्वतःला लपवलं .
कुणीतरी नक्कीच होतं तिथे . तिने कान एकवटले ..
"कुणी बघितलं तर नाही न ?" एक आवाज.
" नाही , हा रस्ता कुणाला माहिती नाहीये ." हा दुसरा आवाज ओळखीचा वाटला .
"किती मुडदे आणलेस ?"
" दोन मुडदे आणि एक जिवंत आहे . लवकर करावं लागेल ." हा आवाज ऐकून
ती अंदाज लावत होती . हा आवाज ...डॉ.विश्वास ?...नो !! डॉ.विश्वास हे असं काम ??? इतक्या थंडीतही तिला घाम फुटला .
आता आपण बाहेर यावे की पोलिसांना फोन करावा ..ह्या विचारात असतांनाच अचानक लाईट लागले . सगळं लख्ख दिसू लागलं ...
मोठं ऑपरेशन थिएटर... तीन टेबलावर तीन देह ..डॉ .विश्वास , आणि सोबत इंगळे , स्टोअर किपर !
ती पुढे सरकली ..आत्ताच काय ते करणं आवश्यक होतं ...मग वेळ निघून जाईल...एक जबरदस्त
झटापट... गळा आवळल्याचा आवाज ..जीव गुदमरला ....
मग सगळं शांत शांत.
आणखी दोन मृतदेह तिथे निपचित पडले होते . चिर निद्रा घेत .
आता पुन्हा कधीच कोणाच्या देहाची चिरफाड तिथे होणार नव्हती !
ती शांत आणि निर्विकार पणे पुन्हा पायऱ्या चढत होती . आपले उलटे झालेले पाय नीट सरळ करून , डॉ. च्या वेशात !
©अपर्णा देशपांडे
स्त्रियांचा कल्ला ऐकून सागरने लगेच करकचून ब्रेक लावत ऑटो रस्त्याच्या एका कडेला थांबावला. ऑटो थांबताच त्या दोघी तावातावात ऑटोतून उतरल्या.
स्त्रिया (वीस रुपये समोर करत):- "हे घ्या तुमचं भाडं आणि निघा इथून. लाज कशी नाही वाटत हो तुमच्या सारख्या पुरुषांना. आता आम्ही दोघी वाटल्यास पायी जाऊ कौलखेडला पण तुमच्या सारख्या नालायक माणसाच्या ऑटोत बसणार नाही. त्या दोघींनाही सोबत पायी घेऊन जाऊ कौलखेडला".
सागर :- "काय???????? त्या दोघींना....????? अन सोबत घेऊन जासान.......????? अर्रर्रर्रर्रर्र जीव प्यारा हाय न व तुम्हाले तुमचा ¿? ¿?????
स्त्रिया (अचंभीत होऊन):- "म्हणजे...म्हणायचं काय तुम्हाला?... त्या दोघींच्या हातात पिस्तूल गिस्तूल पाहिलंत की काय तुम्ही?....... की त्या दोघींचे पाय उलटे होते ते ? जे पाहून तुम्ही पळत सुटलात.....!!!!!""
सागर (थरथरत):- "एकदम बरोबर बोलला ताई तुम्ही.... मी इंजिनचा दांडा ओढण्यासाठी जवा खाली वाकलो तवा पायतो तर काय ! त्या दोघींचे बी पाय उलटे होते. म्हणून मी जीव मुठीत धरून ऑटो पळवला."
स्त्रिया (जोरजोरात खळखळून हसत):- "दादा तुम्ही ना आम्हाला आधी शातीर अपराधी असावेत असं वाटलं होतं. पण आता कळलंय की तुम्ही ना पूर्ण मूर्ख आहात ते"
असं म्हणतं त्या दोघी त्या सुनसान रस्त्यावर एकमेकांना टाळी देत जोरजोरात हसत होत्या. त्यांचं ते हसणं पाहून मात्र सागर गोंधळला होता व घाबरलाही.
सागर :- "ताई मी समजलो नाही...मी...अन... मूर्ख? कशापाई?"
स्त्रिया :- "अहो दादा... तुम्ही काय म्हणालात त्या दोन बायांचे पाय उलटे होते ते. ....बरोबर.?
सागर :- "हाव बरोबर...!"
स्त्रिया (आणखी जोरजोरात हसत):- "... मग सागर दादा! अहो आमचेच पाय कुठे सरळ आहेत हो!
आपल्या राक्षसी हास्याने रात्रीची शांतता चिरणाऱ्या त्या दोघींच्या पायाकडे जेव्हा सागर ने पाहिलं तेव्हा त्यांचे पाय खरोखर उलटे होते. याआधी की सागर मान वर करून त्या दोघींच्या चेहऱ्याकडे पाहणार त्या दोघींचे मस्तकं गगनाला भिडलेले होते. उंच धीप्पाड त्या हडळी आता सागरच्या अंगावर पाय घालणार इतक्यात सागरने गळ्यातलं श्री शिर्डीच्या साई बाबांचं लॉकेट शर्टच्या बाहेर काढलं अन एका फुंकर मध्ये मेणबत्ती विझावी अश्या त्या क्षणार्धात अदृश्य झाल्या.
पण त्या स्त्रियांचा धसका घेतल्याने सागर सहा महिने घराबाहेर पडला नाही.
... श्रीकांत अंबेरे
ऑटोवाल्याची "दंतकथा (?)"
सन 2000 ते 2005 या काळातली ही घटना असावी. आम्ही कॉलेजला असतांना बऱ्याच लोकांकडून ऐकली होती.
कुणी म्हणायचं ही घटना अकोल्याची आहे. काहींनी हा किस्सा नागपूरचा असल्याचं म्हंटल होतं. तर काही आजही ही घटना अमरावतीला घडली होती असं सांगतात. पण ही नेमकी कुठे घडली यापेक्षा कशी घडली यातच आम्हाला जास्त रस होता.
तसेच ही एक सत्य घटना होती की दंतकथा याबद्दल सुद्धा पक्की अशी माहिती नाही.
परंतू प्रत्येकाच्या तोंडून ऐकलेल्या या घटनाक्रमात बऱ्याच अंशी साम्य होते हे मात्र नक्की.
त्यामुळेच एका सामान्य ऑटोवाल्यासोबत घडलेला हा प्रकार आजही मला असामान्य वाटतो.
.....,.........>>>>>>>>>>
ती डिसेंबर महिन्यातली बोचरी थंडीची रात्र होती. त्यात अमावस्याही होती. पण सागर ना भित्रा होता ना आळशी. रात्री 2 वाजताही आपल्याला सवारी मिळू शकते या आशेने तो सामान्य गतीने रिकामी ऑटो चालवत घरी परतत होता.
रेल्वे स्टेशन गेल्यावर पुढे काही अंतरावर सागरला एका चौकाच्या कडेला अंधारात दोन स्त्रिया उभ्या दिसल्या. त्यांना पाहून सागर ऑटो थांबवणारच होता. पण त्याआधीच त्या स्त्रियांनी अंधारतून बाहेर येत सागरला हात दाखवला. सागरनेही हळूच अगदी अदबीने ब्रेक लावत त्यांच्याजवळ ऑटो थांबवला.
सागर :- "हा बोला....ताई...!"
स्त्रिया :- "दादा! आम्हाला कौलखेडला जायचं होतं".
त्या दोन बायांचा पेहराव आणि त्यांची शुद्ध भाषा यावरनं त्या चांगल्या घरच्या असतील असं सागरला वाटलं.
सागर :- "बरं बसा..की मग"
स्त्रिया "पण सवारी काय घ्याल भाऊ ?.. आम्ही दहा दहा रुपये देऊ. सांगा? चालेल ना?"
सागर :-"हाव बसा ना. कायले काळजी करता. देतो ना सोडून तुमाले. काय तुमी बी दहा - वीस ले पायताय एवड्या रात्री. तसा बी मी रिकामाच जात होतो घरला. आपलं बी घर तिकडेच हाय. या बसा".
सागरचं बोलणं ऐकून त्या दोघी झटकन सागरच्या ऑटोत बसल्या. सागरनेही ताकद लावून दांडा ओढला आणि ऑटो स्टार्ट केली. पुढे काही आपल्याला सवारी मिळणार नाही या विचाराने सागर आता ऑटो सुसाट पळवत होता.
धावत्या ऑटोत थंड हवा घुसताच सागरला जास्तच थंडी वाजायला लागली. मागे बसलेल्या स्त्रियांना सुद्धा थंडी वाजत असेल या विचाराने सागरने ऑटोला खालच्या गियरवर आणत ऑटोचा वेग आवरता घेतला.
स्त्रिया (ऑटोचा वेग कमी होताच):- "भाऊ ऑटो चालू द्या तुमच्या स्पीडणं. आमची काही हरकत नाही. तसंही आपल्या ठिकाणी लवकर पोहोचलेलं बरं"
सागर (पुन्हा वरचा गियर टाकत):- "असं का.. बरं हे घ्या मग..."
असं म्हणत सागरने पुन्हा वेग वाढवला. पुढे काही वेळानंतर मुख्य बस स्थानकाबाहेर पुन्हा दोन स्त्रिया उभ्या असलेल्या सागरने पाहिल्या. यंदा मात्र त्यांना पाहून सागर ऑटो थांबवीण्याच्या मूड मध्ये नव्हता. मात्र त्यांनीही रस्त्यावर समोर येत हात दाखवून सागरला थांबण्यास बाध्य केले.
सागर :- "अर्र.... र......काय करून राहिल्या ताई. हे कोणती पद्दत असते का. ऑटोसमोर भस्कन आल्या ना तुम्ही. तुमाले उडवलं असतं म्हणजे...!"
एवढं बोलून सुद्धा बाया स्तब्ध उभ्या होत्या. यावर त्या काहीही बोलल्या नाही. त्यांचे उतरलेले चेहरे पाहून सागरने विषय बदलत स्वतःच विचारले:
सागर :- "बरं कुठं जायचं तुमाले ?"
स्त्रिया (हळू व मंद आवाजात):- "कुठलोक चाल्ले तुमी"
सागर :- "कौलखेड...कौलखेड लोक."
स्त्रिया :- "बरं आम्हाले बी तिथेच सोडा.."
असं म्हणत त्या दोघी ऑटोमध्ये बसण्यासाठी आता सरसावणारच होत्या इतक्यात सागरने क्षणाचाही विलंब न करता खाडकन इंजिनचा दांडा ओढला व ऑटो सुसाट पळवली.
मागे ऑटोत बसलेल्या स्त्रियांना सागरचं असं वागणं अजिबात आवडलं नाही. त्या लगेच सागरवर खेकसल्या.
स्त्रिया :- "अरे दादा हे काय केलंत तुम्ही. कुणाची अशी चेष्टा करणं बरोबर नाही. तुम्ही ग्राहकांसोबत त्यातल्या त्यात स्त्रियांसोबत असेच वागता का?. त्या दोघींना जर ऑटो मध्ये बसूच द्यायचं नव्हतं तर मग ऑटो का थांबवली."
मागे बसलेल्या संतप्त स्त्रियांचे शब्द सागर च्या कानावर पडत होते खरे पण तो त्यांना उत्तर देण्याच्या मनस्तिथीत नव्हता. कारण भीतीने त्याचा थरकाप उडालेला होता. ऐन थंडीत घामाने त्याचा चेहरा ओलाचिंब झालेला होता.
स्त्रिया :- "काय निगरगट्ट आहात हो तुम्ही. आमच्या समोर त्या दोन स्त्रियांचा एवढा अपमान केला वरून गप्प बसलात खुशाल. आता आम्हालाही कुठे सुनसान ठिकाणी सोडणार आहात की काय? काही बोलणार नसाल तर ऑटो इथेच थांबवा."
सागर :- "अहो ताई. कसं सांगू मी तुम्हाले . कसं समजावू. कौलखेड आलंच हाय की जवळ. आलं की लगेच थांबवतो मी ऑटो."
स्त्रिया (चिडून):- "ते काही नाही. तुम्ही खरं कारण सांगत नसाल तर आधी ऑटो थांबवा. आम्हांला इथेच उतारायचं आहे. तुमच्यावर आम्हाला भरवसा नाही. ऑटो थांबवा लगेच. नाहीतर आम्ही ओरडून ओरडून धिंगाणा घालू."
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago