स्पर्धा परीक्षा अपडेट्स

Description
MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल

चालू घडामोडी वरती विशेष भर
We recommend to visit

One Liner GK in Hindi and English


Previous Year Question

Disclaimer: For any copyright content in this channel contact @Saket_Sir

Last updated hace 1 año, 3 meses

TCS IBPS ???? बद्दल ?????? देणारे एकमेव चॅनेल

? ????? ????

? ???? ???? ??????

➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका

➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ

Admin @Sprdha_admin

Last updated hace 9 meses, 2 semanas

हार ओर जीत खेल का हिस्सा है इस जुवा के सबसे बडे ये 2 पहेलु है इनको अपना लो कभी नहीं हार सकतें

Chanle link?https://t.me/+VdyhzuHpYIg5NjU9

Username ?? @ANJLITIPS2003

https://api.whatsapp.com/send?phone=919468785171

Last updated hace 2 años, 11 meses

7 months, 3 weeks ago

⭕️ ....

काही पुण्य असेही करायचे असतात की, ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणी नसावा.

Opting out 🔥

7 months, 3 weeks ago

ऑप्टिंग ( एक्टिंग ) आऊट...!

दरवर्षी निकाल लागतो आणि तेच ते चेहरे यादीमध्ये पाहायला मिळतात, मग पोस्ट ची यादी अशी वाढत जाते की सांगता सोय नाही, त्यात त्याचा त्याला प्रचंड अभिमान...! आतापर्यंत कोणाला जे जमलं नाही ते आपण केलंय हे उंदराने मांजराच्या गळ्यात घंटे बांधल्यासारखे (बांधलेले घंटे मिरवण्याची हौस) मग हार तुरे, भाषणांचा रतीब... वडापाव पासून ऊसतोड कामगारांपर्यंत आणि मोबाईल कसा वापरत नव्हतो इथपासून तर आयुष्यात किती संघर्ष केला अशा तत्त्वज्ञानाच्या परिभाषा आपापल्या परीने सांगणारे महाभाग वास्तव्यात जरा वेगळेच वागतात...! ह्या महोदयांचे भाषण बघितले की लक्षात येते की समाज सुधारणे करता यांच्या करता बरेच काम कुणीतरी शिल्लक ठेवले आहेत परंतु वास्तव्यात यांचा आणि सुधारण्याचा काहीही संबंध नसतो. ( आणि तो नसलाही पाहिजे)

प्रक्रिया प्रचंड विस्कळीत झालेली आहे, आयोग स्वायत्त आहे यावर विश्वास नाहीच कोणाचा...! परंतु धोरणे देखील चुकीच्या पद्धतीने राबविणे या करता एम.पी.एस.सी आयोग जबाबदार आहे. जर शासकीय सेवेत असणारा एखादा पदाधिकारी पुन्हा एखाद्या पदाकरता पात्र ठरत असेल तर त्याला प्रक्रियेमध्येच विचारायला हवे की तुम्ही यापैकी कुठली जागा घेणार आहात. परंतु आयोग तसं करत नाही त्याचे कारणे त्यांनाच माहीत...!

ह्या प्रकरणाचा इतिहास जर बघितला तर 2017 पासून हा दिसतो, 2017 चा मुख्य रिझल्ट लागून नियुक्ती मिळाली नव्हती तसेच 18 चा रिझल्ट देखील लागला होता ( यावर्षी 2022 आणि 23 सारखी स्थिती होती) तत्कालीन बहाद्दरांनी 2018 च्या पोस्ट स्वीकारल्या होत्या आणि 17 च जॉइनिंग कधी येईल त्यांना त्याच्याबद्दल शंका होती, आणि 2017 चे जॉइनिंग अगोदर आलं 18 ची ही पोस्ट गमावली आणि 17 ची ही पोस्ट गमावली असेही काही नमुने होते. मग 2019 ला दादाला डी.सी व्हायचं होतं. ( दादा ची ड्रीम पोस्ट DC ) पण ह्या भानगडीत दोन्ही वर्षी आयोगाचा गलथान कारभार आयोगाच्याही लक्षात आला नाही.

आयोग तेव्हाही सुधारलं नाही आणि आताही त्यामध्ये फारसा बदल नाही, RTI अंतर्गत आलेल्या माहितीमध्ये बहुतांश अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट होत्या, त्यामध्ये काही असे बहाद्दर होते की ज्यांचा इतिहास प्रचंड हालाखीचा होता, परंतु त्यांना येणाऱ्या पिढीबद्दल कुठलीही आस्था नव्हती, समाजाचं भलं करू यापेक्षा मी माझं कसं भलं करीन यातच ही जनता गुरफटलेली.

पोस्ट होल्डर मुलगी असेल तर मग विचारता सोय नाही...! संपर्काचे सगळे महाद्वार ह्या बायांनी (सॉरी मॅडमनी) बंद करून ठेवलेले असतात, इकडून- तिकडून संपर्क झाला तरी, आमच्या घरचे पोस्ट सोडू नको म्हणतात अशी तकलादू / फालतू उत्तरे ऐकायला मिळतात, मुलगी असून देखील त्या संवेदनशील असतील असं नाही प्रचंड गुर्मी आणि प्रचंड बालिशपणा त्यात भरलेला दिसतो. ह्यात मुलीने ऑप्टिंग आऊट केले की मुलाला जागा मिळतील असं नाही. पण नाही (ना खाऊंगा... ना खाने दूंगा...) या तत्त्वाने जगणाऱ्या शासनात काम करणाऱ्या नोकरदारांना विनंती असेल, तुमच्या पाठीमागून येणाऱ्या बऱ्याचश्या भावंडांचा तुम्ही विचार करावा..
आयोग आणि शासन यांनी देखील काही नियम घालावेत, जर एखाद्या महात्म्यास सदर पोस्ट नको असेल तर त्याची प्रक्रिया अगोदरच पूर्ण करून घ्यावी त्यानंतर वेटिंग वाल्यांना ती संधी उपलब्ध करून द्यावी ( ह्या साठी स्वतंत्र आंदोलन करायची गरज नसावी) आणि थोर आत्म्यास देखील याची जाणीव असावी की आपण कितीही (ग्रेट असलो) तरी शासन फक्त एकच ठिकाणी निवड करू शकतो ( त्या नंतर तुमच्याकडे कितीही पदभार असले तरीही)

असो...
प्रिय आयोग... आपल्या ढिसाळ कारभाराचे सामान्य माणसाला कायमच भोग भोगावे लागत आहेत, तुमच्या नियोजन पद्धतीमध्ये किमान बदल करून सर्वसामावेशकता आणावी, ही सामान्य नागरिकाकडून (common man) माफक अपेक्षा...!

7 months, 3 weeks ago

**ऑप्टिंग आऊट करावे ही विनंती ?
(एका पेक्षा जास्त पोस्ट असणाऱ्यांसाठी)

१) कारण आपल्याकडे दोन पोस्ट आहेत
आणि सॅलरी घेत आहे. आपण पूर्णपणे settled झालेलो आहे आपण आपला बेरोजगार भाऊ अजून संघर्षात जगत आहे त्याचा देखील विचार करावा.

२) व्यवहारिक दृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या सारासार विचार करून नक्की ऑप्टिंग आऊट करा.

३) स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यातील सर्वात मोठे दान म्हणजेच बेरोजगारीत व्यक्तीला रोजगार मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचे खरे भागीदार तेच होऊ शकतात जे ऑप्टिंग आऊट करणार आहे. त्यामुळे... त्यांनी नक्की ऑप्टिंग आऊट करा.

४) आपण ऑप्टिंग आऊट केल्यामुळे एक एक करून हजारो घरांमध्ये आशेचा किरण देऊन... दारिद्र्य आणि बेरोजगारीत अंधार त्यांच्या घरातील आपण दूर करू शकतो आणि आपण देखील हातभार लावू शकतो.

हे जबाबदारी सोबतच कर्तव्याची जाणीव ठेवून सर्व विद्यार्थी मित्रांनी ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पोस्ट आहे त्यांनी सारासार विचार करून एक पोस्ट ऑप्टिंग आऊट करावी ही विनंती.**

10 months ago
स्पर्धा परीक्षा अपडेट्स
10 months ago
10 months ago

⭕️ सध्या राज्यसेवा GS १ चे मार्क्स ऐकून .......... ?

अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच .......

@ स्पर्धा परीक्षा अपडेट्स

https://t.me/SpardhaParikshaUpdate

10 months, 1 week ago
स्पर्धा परीक्षा अपडेट्स
10 months, 1 week ago
स्पर्धा परीक्षा अपडेट्स
10 months, 1 week ago

⭕️ काल झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ ची वैशिष्ट्ये......

  1. बरेच उमेदवार अनुपस्थित होते .एवढ्या वेळा परीक्षा पुढे जाऊन सुद्धा एवढी लक्षणीय अनुपस्थिती अनाकलनीय आहे.
    घरापासून परीक्षा केंद्र दूर असणे तसेच वेळेवर परीक्षा केंद्रावर न पोहचणे हे सुद्धा कारण आहे.
    ( भविष्यात निवडणुकीत ज्या प्रकारे अनामत रक्कम उमेदवार यांच्याकडून निवडणूक आयोग घेत असते त्या प्रकारे mpsc आयोगाने पण हा विचार करावा ? )
    मित्रांनो आयोग उमेदवार यांनी परीक्षा द्यावी यासाठी खूप खर्च करत आहे. यांचा उमेदवार यांनी विचार करावा.

२ जरी उमेदवार अनुपस्थित होते तरीसुद्धा शेवटची objective परीक्षा कारणाने बरेच जुने अधिकारी पूर्व परीक्षा देण्यास हजर होते.
त्यामध्ये वर्ग १ चे अधिकारी सुध्दा होते हे विशेष ?
( राज्यसेवा २०२२ तसेच २०२३ यांचे अजून सुद्धा प्रशिक्षण जाहीर झाले नाही तसेच PSI batch २०२१/२०२२/२०२३ हे पण उमेदवार अजून निकाल,प्रशिक्षण याबाबतीत अनभिज्ञ आहेत.
तसेच बाकी सेवेत असणारे अधिकारी सुट्टी घेऊन परीक्षा देत असतात.)

  1. पहिला पेपर विचारात घेता आयोगाने अगदी facts चुकवून उमेदवारांना बुचकळ्यात पाडले.
    तरी पण पेपर १ वरती PYQ ची छाप होती. आपण PYQ सोडून बाकी सर्व अभ्यास करत असतो.
    लवकरच आपण याचे PYQ पुरावा ग्रुप वरती देऊ.

४ . पुढे काय ?
आयोगाची उत्तरतालिका जाहीर होईपर्यंत थोडी रेस्ट घ्या.
आजपासून BMC परीक्षा चालू होत आहे त्यांना शुभेच्छा.
१ महिन्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब परीक्षा होणार आहे त्याचा पण अभ्यास चालू ठेवा.
( जे राज्यसेवा मुख्य आणि combine मध्ये कॉमन अभ्यासक्रम आहे ते उरकून घ्या.)
राज्यसेवा मुख्य साठी ५ महिने आहेत त्याप्रकारे नियोजन करा.

क्रमशः............

@ स्पर्धा परीक्षा अपडेट्स

https://t.me/SpardhaParikshaUpdate

10 months, 2 weeks ago
भारताने आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी …

भारताने आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक मैलाचा दगड साजरा केला .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी, भारतीय संविधान सभेने औपचारिकपणे संविधान स्वीकारले, जे २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आले आणि भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले.

२०१५ मध्ये, भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून औपचारिकपणे घोषित केला. भारतीय संविधान स्वीकारल्याचा सन्मान करण्यासाठी 1949. तेव्हापासून, प्रत्येक वर्षी या दिवशी, राष्ट्र संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस साजरा करतो.

75 वर्षांचे स्मरणोत्सव वर्षभर चालेल आणि उपक्रम चार स्तंभांभोवती केंद्रित असतील:
उदा. संविधानाची प्रस्तावना,
आपले संविधान जाणून घ्या,
संविधान बनवा आणि
संविधानाचा गौरव साजरा करा.

स्मरण कार्यक्रमांचा मुख्य सोहळा आज म्हणजेच २६ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसदनच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला .

We recommend to visit

One Liner GK in Hindi and English


Previous Year Question

Disclaimer: For any copyright content in this channel contact @Saket_Sir

Last updated hace 1 año, 3 meses

TCS IBPS ???? बद्दल ?????? देणारे एकमेव चॅनेल

? ????? ????

? ???? ???? ??????

➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका

➥ TCS IBPS एकूण 80,000 + MCQ

Admin @Sprdha_admin

Last updated hace 9 meses, 2 semanas

हार ओर जीत खेल का हिस्सा है इस जुवा के सबसे बडे ये 2 पहेलु है इनको अपना लो कभी नहीं हार सकतें

Chanle link?https://t.me/+VdyhzuHpYIg5NjU9

Username ?? @ANJLITIPS2003

https://api.whatsapp.com/send?phone=919468785171

Last updated hace 2 años, 11 meses