Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 1 week ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 10 months ago
नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇
डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309
https://wa.me/+919552847290
Last updated 2 months, 1 week ago
आपला धर्म आपला समूह संभाळूनही एकजुटीने राहता येते हे शिवकाळ शिकवतो पण दुर्दैवाने ही शिकवण सर्व धर्मीय आचरणात न आणल्याने एकमेकांवर कुरघोडी, प्रभाव , विस्तार हेच नेहमी या आधुनिक जगात युद्धाचे आणि द्वेषाचे पडसाद घडवून आणतात हेही दुर्दैव पाचवीलाच पुजलेले आहे.
आजकाल काही लोक कसल्या तरी लालसेला बळी पडून हिंदू धर्म सोडतात किंवा कोणीतरी त्यांना येऊन मानसिक आधार देतात म्हणून ते तिकडे परावर्तित होतात. अशा मुर्खाना " सनातन धर्माने माणसाने कसे जगावे याची ग्रंथातून दिलेली शिकवण " आठवत नाही. " सनातन धर्माची तत्वे , व्यापकता , संत सज्जनांचे उपदेश , माणुसकीने आदर्शवत जगण्याचे सूत्र " या गोष्टी जाणून घ्यायचे नसतात म्हणून इतरांच्या सहज प्रभावात येऊन ते असे पाऊल उचलतात. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते आणि अशा अध्यात्म , ध्यान, योग , प्रार्थना, वेद लाखो मनुष्यहीताच्या संकल्पना जगाला देणारा, संपन्न असणारा जगातील प्राचीन धर्म म्हणून सनातन धर्माची खरी ओळख आहे. जो इंग्रजांनी इतिहासातून पुसून टाकला. आमचे तत्वज्ञान जाळून टाकण्यात आले. आम्हाला आमच्या महान धर्मापासून वंचित करण्याचा घाट घातला गेला तो उगीच नाही ? कारण तो तेवढा शक्तिशाली होता. आजही आहे. आपली ती मानसिक कुवत नाही आपला तो अभ्यास नाही की तो धर्म आपण खोलात जाऊन समजून घ्यावा अशी परिस्थिती अनेकांची आहे हा स्वदोष आहे धर्मदोष नाही कटू आहे पण सत्य आहे. असा हा सनातन धर्म ( हिंदू धर्म ) रक्षणासाठी त्याचा अस्तित्वासाठी कित्येक विरांनी बलिदान दिले ते काय उगाच का ? त्यामागे नक्कीच तथ्य होते म्हणूनच ते तथ्य आपण जाणून घ्यावे आपल्या धर्माचा छातीठोक अभिमान बाळगावा हेच या बलिदानातून शिकायला मिळते ... चित्रपटात शेवटी औरंगजेब मजेत विचारतो कुठे आहे स्वराज्य आता तर ते संपून जाईल तुझ्यासोबतच तेव्हा संभाजीराजे म्हणतात की, " लाखो मावळ्यांच्या नसानसात आहे स्वराज्य , सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आहे स्वराज्य " अर्थात मी जातो आहे पण माझ्या मागे हजारोंच्या हृदयात हे बलिदान प्रेरणा देत राहील असे महाराज सुचवू इच्छित आहेत आणि त्यांचा हा आदेश आपण प्राणपणाने जपला पाहिजे. त्यांचा तो स्वाभिमान पाहून त्याच क्षणी मनात विचार आला " अरे जोपर्यंत श्वास आहे ना तोपर्यंत सनातन धर्माच्या गोष्टी करू , अभिमानाने मिरवू - जग त्या दिशेला झालं तरी धर्मासाठी उभे राहू. हे केवळ मी धर्म धर्म म्हणून म्हणत नाहीये तर धर्मातील सत्यता शोधून अभ्यास करून बोलतो आहे याचे मला वैयक्तिक स्तरावर भान आहे. शेवटी सत्य सनातन इतिहास कितीही केलं तरी पुसला जात नाही. किती सत्ता या मातीत आल्या धुळीस मिळाल्या आजही कित्येकजण काहीतरी विधाने करून सनातन इतिहासावर गरळ ओकण्याचे धंदे करत असले तरीही ही सनातन भूमी आहे. या भूमीसाठी भूमिपुत्रांनी दिलेले बलिदान हेच सत्य आहे. तेच पुन्हा एकदा सर्वांसमोर या चित्रपटाच्या निमित्ताने आले याचा आनंद आहे. आज मनसोक्तपणे स्वातंत्र्य बाळगणाऱ्या लोकांनी मात्र याची जाणीव सदैव हृदयी बाळगावी कारण तो काळ असा होता कधी मृत्यू येईल ही भीती घेऊन लोक रहायचे त्या तुलनेत आपण आज खूप मनसोक्त जगतो आहोत. यामागे ज्यांचा हात आहे त्यांचा चरणांशी नेहमीच मुजरा झडत रहावा त्यात संकोच बाळगू नये.मुजरा राजे मुजरा !
तुमचा एक निष्ठावंत सेवक
तुमचा एक मावळा
एक सनातन हिंदू
-- आदेश 🔱
जगात प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य इस्लामिक आक्रमक सक्तीने हिरावून घेत होते आणि तेच या हिंदू रयतेला अर्थात स्वराज्यातील रयतेला नको होते. त्यांना त्यांचाच संस्कृतीला जपून जगायचे होते आणि हेच त्यांचे जीवन त्यांना त्यांचा धर्माप्रमाणे जगता यावे यासाठीच हा स्वराज्य संग्राम होता. स्वराज्य म्हणजे इतर धर्मियांना तुम्ही हिंदू व्हा असा सक्तीचा लढा कधीही नव्हता पण हिंदूंना हिंदू म्हणून राहण्याची इच्छा असताना त्यांच्यावर बळजबरीने होणारे अत्याचार तुम्ही करत असाल तर आम्ही विरोध करू असा तो लढा होता. ( आम्ही इतर धर्मांचा आदर करतो तुम्ही तुमच्या धर्मात रहा आम्ही आमच्या धर्मात राहतो पण जर तुम्ही विनाकारण आम्हाला डिवचत असाल तर आम्ही हिंदू शांत राहणार नाही ) हे हिंदुत्व आजही कित्येकांना कळत नाही. आजकाल अनेकांच्या हिंदुत्वाच्या व्याख्या एकतर सरसकट हिंदू करा किंवा हिंदू धर्मच सोडा अशा आहेत. हा लढा राज्यातील लोकानी त्यांना सुखाने समाधानाने जगता यावे यासाठी होता ! तो काळ रणसंग्रामाचा होता युद्ध हा दररोजचाच भाग झाला होता. हिंदुस्थान काबीज करण्यासाठी मुघलांची कोणत्याही थराला जाण्याची अविरत धडपड सुरू होती आणि छत्रपतींची धडपड या आपल्या लोकांना या रयतेला या परकीय आक्रमकांपासून वाचवण्यासाठी सुरू होती. ज्यांना शौर्यगाथा आणि सत्य इतिहासावर आधारित गोष्टी पहायला आवडतात त्यांनी नक्कीच हे शौर्य/त्याग/बलिदान/स्वराज्य छावाच्या माध्यमातून पहावे.
जागतिक स्तरावर येशू सारख्या व्यक्तीचे बलिदान ऐकिवात होते. सांगण्यात येत होते. शिवाय जगभरात ख्रिश्चन धर्मीय मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे ही कथा सहजपणे सर्वाना माहीत असावी अशी होती पण " छावा " चित्रपटाच्या निर्मितीमुळे जागतिक स्तरावर आणखी एक स्व धर्मासाठीचे , स्व भूमीसाठी, स्वराज्यासाठी दिलेला बलिदान लोकांना ठाऊक झाले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान ! भारत नावाचा जो देश आहे त्यातील बहुसंखीय हिंदू आजही या राष्ट्रात होते - आहेत आणि राहतील या अस्तित्वामागे जर कोणाचे महत्त्व असेल तर शंभुराजेंच्या त्यागाचे, बलिदानाचे, शौर्याचे याची कल्पना याची ओळख समस्त जगाला यानिमित्ताने होणार आहे काय किंबहुना झाली सुद्धा ! असं म्हणतात सत्य कधीही लपवलं जात नाही मागच्या काही शतकात ऐतिहासिक पुरावे अभ्यास यापासून वंचित असल्याने सुरवातीला काही लोकांनी हवे तसे संभाजी महाराज साकारण्याचे प्रयत्न केले काही दीड दमडीच्यानी तर त्यांचे चारित्र्य हनन करण्यापर्यंत मजल मारली पण सत्य हे प्रखर असते अनेक इतिहासकारांनी अभ्यास करून छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या महान राजाचे एक एक पैलू उजेडात आणले त्यावर मोठ्या प्रमाणात लिखाण झाले आणि शंभू महाराज लाखो मराठी माणसांच्या मनात आदराने स्थिरावले. हे आपण सगळे जाणताच त्यामुळे या चित्रपटाने का होईना हेच शंभूराजे एक महान राजा म्हणून कोटी भरतवासीयांच्या मनातही स्थिरवणार यात शंका नाही.
हे सर्व पाहिल्यानंतर लक्षात येते की, आजच्या काळात जे जात - पात यावरून लोकांमध्ये रणकंदन माजले आहे. जो तो स्वतःला श्रेष्ठ करण्याचा मूर्ख भूमिकेत दिसत आहे. असला प्रकार त्या काळी नव्हता त्यावेळी मुघल सैन्य ज्यावेळी हल्ले करायचे ते कोणालाही तू कोणत्या जातीचा म्हणून छळत नव्हते तर सरसकट हिंदू म्हणून एक दक्खनेचा भाग म्हणून ते गावे जाळत, अब्रू लुटत, लोकांना गुलाम बनवत, सक्तीने धर्मांतर करण्याचा घाट घालत, देवदेवळे उध्वस्त करत आशा अमानुष अत्याचार करण्याचे त्यांचे धोरण असल्याने त्यावेळी या जाचातून " आपण सुटलो जीव वाचला तरी फार " या विचाराने अठरा पगड जातीचे लोक केवळ ' स्वराज्य ' या शब्दाखाली एकत्र होते. आज ते नाहीत कारण इंग्रजांनी जात जात करून आपापसात विभागणी केली त्यामागे लोक विभागावेत हीच त्यांची इच्छा होती. आजही ते गेले परंतु त्यांचा हेतू जिवंत आहे हे दुर्दैव ! पुढे ' जात ' हा एवढा प्रमुख घटक झाला की, संविधान बनतानाही त्यात ढीग जातींवर आधारित निकष बनवण्यात आले आणि जातीनिहाय विभागणी ही कायमचीच न संपणारी गोष्ट बनली. त्यामुळे ही जात आता जाता जात नाही अशी परिस्थिती आहे. भारतीय लोक शेकडो जमातीत विभागले गेले आहेत आणि जे राष्ट्र एकजूट नसते ते दुभंगायला भविष्यात वेळ लागत नाही. शिवाय त्याकाळी जीव वाचला आपण जगलो हेच फार अशीही परिस्थिती आज नसल्याने कोणतेही जीवावर बेतणारे संकट नाही त्यामुळे आयते स्वातंत्र्य मिळालेले हे समस्त लोक जात पात यावरून रणकंदन माजवण्यात त्यावर चर्चा करण्यात फार रुळलेले दिसतात. हे दुर्दैवच ! Social media वर असले उद्योग जोमाने सुरू आहेत. एकमेकांना कमी जास्त दाखवण्यात त्यांना धन्यता वाटते.
खरंतर चित्रपटात दाखवला त्याहुनही अधिक छळ महाराजांचा झाला आहे याच्या नोंदी आहेत पण जे दाखवले त्यातच माणूस रडत आहे त्यामुळे आणखीन किती दाखवावे असे निर्मात्याला वाटले असावे किंवा तीन तासात सर्व काही बसवायचे असते म्हणून त्यांनी ते अधिक लांबवले नसावे असेही असेल. शिवाय शौर्यपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळापूर येथे छावणी असताना महाराजांचा शेवटचा श्वास गेला. त्यानंतर त्यांचे तुकडे तिथेच नदीकाठी फेकण्यात आले पुढे वढू येथील ग्रामस्थांनी ते जमा करून वढू बुद्रुक या गावात कवी कलश आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे अंतिम संस्कार करण्यात आले. आजच्या घडीला ते अंत्यसंस्कार कोणी केले यावरूनही पुरावे सोडून वाद निर्माण करणारे दोन गट आहेत असे जाणून आहे. त्यामुळे कदाचित त्या वादात उडी नको म्हणून दिगदर्शकाने शेवटचे अंतिम क्षण दाखवणे टाळले आणि ते योग्यच केले. कोणत्याही वादाला विरोधाला सामोरे न जाता तसेच सेन्सर बोर्डाकडून चित्रपटाला कात्री बसणार नाही याची काळजी उतेकर यांनी पुरेपूर घेत जे न बोलता दाखवायचे ते एकदम बरोबर ठसवण्यात छावाची टीम यशस्वी झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. चित्रीकरण शूट म्हणून म्हणाल तर पाचपैकी 4.3 ठीक आहेत आणि व्यक्तिरेखा म्हणून म्हणाल तर 4.8 ठीक राहतील. असा हा छावा चित्रपट सर्वांनी पहावा. सत्य डोकावून पहावे कारण सत्य कधीच मिटत नाही आणि छावा या भारताचा धगधगता इतिहास आहे 🔥
_________
Social media वर कंमेंट्स करत बरळायला काहीही अक्कल लागत नाही. त्याप्रमाणे हा चित्रपट आला आणि आपल्याच काही मराठी मुर्खानी अजय अतुलचं गाणं हवं , हिरोईन ही हवी , अमुक हवं तमुक हवं असे पाढे सुरू केले आहेत. स्वतःच्या आयुष्यात स्वतःला काय हवं ? कसं हवं ? हे न उमजणाऱ्या या महाभागांना इतरांना सल्ले देण्यात मजा येते आणि हे घडते ते केवळ अल्पबुद्धितूनच ! अशा विकृत औलादी महाराष्ट्राला नवीन नाहीत ! चित्रपट पाहून त्यात काहीही मला गैर वाटले नाही ! चित्रपटात कोणाला घ्यावे कोणाला नाही हा दिगदर्शकाचा अधिकार आहे - त्याच्याही काही बाजू असतात. अगदी ज्याप्रमाणे तुम्हाला जो कलाकार हवा तो त्यांना होकार देईल असे नसतेच. शिवाय चित्रपट बनवण्यात किती मोठा खर्च आहे - वेळ आहे - जोखीमही आहेच इत्यादी अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे दिगदर्शकाने त्यावर अभ्यास करून, वेळ घेऊन, जाणत्यांची मते घेऊनच चित्रपट बनवला आहे. तो काही एका रात्रीत बनवला गेलेलो नसतो. जरा या दृष्टीनेही पहायला हवं. उगाच आईबापने काढलेली विकृत औलाद म्हणून एकदम टिकलीच गोल का लावली ? चंद्रकोर का नाही लावली ? अशा सुष्म चूका काढणाऱ्या औलादी दिसतात तेव्हा दुर्दैव वाटते.. एवढा मोठा चित्रपट बनवताना अशा सुष्म गोष्टी राहू शकतात समजून घेण्याची गोष्ट आहे. मराठी माणसाने तर आपला इतिहास जागतिक स्तरावर पोहचतो आहे याचा अभिमान बाळगायला हवा. शिवाय जे काही बदल अपेक्षित होते तेसुद्धा दिग्दर्शक उतेकर यांनी सन्मानाने दुरुस्त करून टाकले ( जसे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ) हे बदल रास्त होते. त्यामुळे योग्य ते बदल सुचवणे ठीक पण नुसता स्वतःला वाटेल तसं हवं या विचाराने फक्त विरोधच करून बदल करण्याची यादीच वाचणे म्हणजे मूर्खपणा आहे. बाकी या चित्रपटासाठी सर्व टीमचे मनापासून आभार ! असे आणखीन चित्रपट येत राहो जेणेकरून हा मातृभूमीचा सत्य इतिहास या भारतीयांना नेहमी स्मरणात राहील. तानाजी, बाजीराव, पद्मावत, छावा, पावनखिंड, सुभेदार, सरसेनापती हंबीरराव मोहिते इत्यादी अशा ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातून इतिहास पुन्हा जिवंत होत आहे. आपण आपल्या इतिहासाप्रति नक्कीच प्रेम दाखवले पाहिजे, निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अशाच उत्कृष्ट निर्मतीसाठी आम्ही नेहमी आपल्या सोबत आहोत एवढेच सांगणे 💯
______
छावा पाहिल्यानंतर .....
आजपर्यंत फक्त छावा - छावा हे बिरुद ऐकून होतो. संभाजी राजांनी सिंहाचा जबडा फाडला म्हणून छावा म्हणत असावेत इथपर्यंतच जाणून होतो पण छावा चित्रपट पाहताना प्रत्येक क्षणी पाहणाऱ्याला कळते की, हो हाच आहे तो छावा आणि का आहे छावा याची अनुभूती येत राहते. " शौर्य कभी कम पड जाये तो मराठा साम्राज्य पढ लेना " हे अगदी खरं आहे. किती तो मोठा शौर्याचा पराक्रमाचा वारसा या साम्राज्याने या भारतभूमीला दिला आहे. कित्येकदा हे योध्ये स्व भूमीच्या रक्षणासाठी जीवावर उदार होऊन लढले आहेत. धर्मासाठी लढले असा उल्लेख चित्रपटात टाळला असला तरी गोष्ट धर्मापाशी येऊन थांबते. ती अशी की, स्वराज्यातील रयतेला त्यांच्या संस्कृती प्रमाणे, त्यांच्या पद्धतीने जगू दिले जात नव्हते. शेवटी ही संस्कृती हे जगणे आले कुठून तर सनातन धर्मातून मग याच दैनंदिन जीवनासहित जर त्यांना जगता येत नसेल तर ते हतबल होणारच.
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 1 week ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 10 months ago
नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇
डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309
https://wa.me/+919552847290
Last updated 2 months, 1 week ago