Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

प्रेरणादायी सुविचार

Description
🚩तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे विचार नक्कीच नवीन पुन्हा लढण्याची इच्छा आणि बळ देतील हीच अपेक्षा . ह्या समूहातील सर्वच गोष्टी नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

🧡जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम 🧡

🚩निर्माते :- @dyspyo07
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago

2 days, 22 hours ago

राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए,
प्रहार चाहे एक हो भरपूर होना चाहिए,
सिर्फ इतना ही नहीं वो हार अपनी मान ले,
वो हमारे सामने मजबूर होना चाहिए.

https://t.me/marathisuvichar2023

3 days, 12 hours ago

#भगवदगीता #BhagavadGita *💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟* श्लोक ७

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः । यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥

अर्थ

करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥ २-७ ॥

भगवद्गीतेचा हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा पहिल्यांदा अर्जुन, जो श्री कृष्णाचा सर्वात चांगला मित्र आणि चुलत भाऊ होता, त्याने भगवान श्रीकृष्णांना आपला गुरु बनण्याची विनंती केली. अर्जुनाने कृष्णाला कबूल केले की त्याच्यावर 'कर्पण्यदोषाने' मात झाली आहे किंवा त्याचे वागणे भित्र्यासारखे झाले आहे आणि म्हणून तो भगवान कृष्णाला त्याचे गुरु बनण्याची आणि त्याला नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यास शिकवण्याची विनंती करतो.

तद्विज्ञानार्थम् सा गुरुमेवभिगच्चेत् समितपानिः श्रोत्रियं ब्राह्मणिष्ठम् ।

(मुंडकोपनिषद-1.2.12)

"अंतिम सत्य जाणण्यासाठी, शास्त्रात ज्ञानी असलेल्या आणि व्यावहारिकदृष्ट्या परमात्म्यात स्थापित झालेल्या गुरुचा शोध घ्यावा लागतो."

या श्लोकात, अर्जुन एक शिष्य म्हणून भगवान कृष्णासमोर आत्मसमर्पण करतो, त्याला आपला गुरु म्हणून स्वीकारतो आणि त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्याला ज्ञान देण्याची विनंती करतो.**

🚩संकलन  :- कल्पेश

https://t.me/marathisuvichar2023

3 days, 19 hours ago

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते...😊*https://t.me/marathisuvichar2023 😍*😍 शुभरात्री😍😍**

1 week, 6 days ago

*⭕️*☑️🚩THE POWER OF SUBCONCIOUS MIND BOOK PDF.

⚠️Copyright मुळे delete केले जाईल telegram वर उपलब्ध आहे तरी दक्षता म्हणून संध्याकाळी delete करेन saved करून घ्या मी म्हणतोय म्हणून वाचा फायदा नक्की समजेल.#MUST PRINT कराच🧡😊**https://t.me/marathisuvichar2023

1 week, 6 days ago

#भगवदगीता #BhagavadGita *💫अध्याय पहिला
🌟* श्लोक ४२-४३

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥

अर्थ

वर्णसंकर कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥ १-४२ ॥

नको असलेली मुले वाढल्यामुळे कुटुंब आणि कौटुंबिक परंपरा नष्ट करणाऱ्यांचे जीवन नक्कीच नरकमय होते. पाण्यापासून वंचित राहिल्यामुळे आणि पिंडदानाच्या विधीमुळे अशा पतित कुळांचे पूर्वजही क्षीण होतात.

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥

अर्थ

या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म व कुळधर्म उध्वस्त होतात. ॥ १-४३ ॥

युद्धात कुळाचा नाश झाल्यामुळे कुळांसह आलेले कुळ धर्मही नष्ट होतात. कौटुंबिक धर्माचा नाश झाल्याने कुटुंबात अधर्म वाढतो. अधर्म वाढल्याने स्त्रिया प्रदूषित होतात. स्त्रियांच्या दूषिततेमुळे, संकरित जन्माला येतात. अशा रीतीने संकर निर्माण करणाऱ्या दोषांमुळे कुळाचा नाश करणाऱ्यांचा वर्णधर्म नष्ट होतो.**

🚩संकलन  :- कल्पेश

https://t.me/marathisuvichar2023

2 weeks ago

प्रत्येकाच्या जखमा वेगळ्या. त्या जखमा करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या, प्रसंग वेगळे. त्यापैकी खपली धरलेल्या किती आणि सतत वाहणाऱ्या किती, हे कसं सांगायचं ? अश्रुपात आवरता न आल्याने त्यातल्या काही दिसतात. अन्यथा समजत नाही तर त्या फक्त प्रगट होतात. पण काही माणसांजवळ हळुवार जागी वार झाला तरीही त्यावर हास्याचा बुरखा चढवण्याचं सामर्थ्य असतं अशा माणसांच्या जखमा शेवटपर्यंत समजत नाही.https://t.me/marathisuvichar2023

2 weeks, 6 days ago

तुम्हारा हर फैसला सही नहीं होगा, तुम्हें हर इंसान सही नहीं मिलेगा, हर सौदे में तुम्हें फायदा भी नहीं होगा, ना ही हर राह रोशनी की तरफ जाएगी,  और यह भी जरूरी नहीं कि हर लहर तुम्हारी नाव को आगे बढ़ायेगी।
मगर, तुम्हें फैसले लेने होंगे, लोगों का साथ चुनना होगा। लहरों में उतरना होगा क्योंकि जिंदगी किनारे पर खड़े होकर बस दूसरों की कहानी देखने का नाम नहीं है...!
https://t.me/marathisuvichar2023 *😍*😍 शुभसकाळ😍😍**

2 weeks, 6 days ago

#भगवदगीता #BhagavadGita *💫अध्याय पहिला
🌟* श्लोक ३२

न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥

अर्थ

हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? ॥ १-३२ ॥

स्वकियांशी लढण्याच्या विचारांनी गळून गेलेला अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे वळला, श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी म्हणून युद्धात सहभागी झाले असले तरी ते पांडवांचे सल्लागार आणि मार्गदर्शक होते, द्विधा परिस्थिती मध्ये अडकलेला अर्जुन श्रीकृष्ण यांना उद्देशून आपली स्थिती सांगतो, तो म्हणतो की स्वकियांनाच मारून राज्य मिळवायचे असेल तर असे राज्य काय कामाचे, मला लाभ - भोग नको मला विजयाची इच्छा नाही.

आपण कोणताही निर्णय का घेत आहोत हे सुरुवातीला आपल्याला स्पष्ट असतं, आपण त्यादिशेने आपली वाटचाल देखील सुरू करतो पण काही वेळा अश्या अडचणी समोर येतात ज्यांनी आपण द्विधा मनःस्थितीत अडकतो, आपण करतोय ते योग्य की अयोग्य हे ठरवणं कठीण होऊन बसतं. निर्णय घेताना आपल्या भावना आपल्या प्रबळ इच्छाशक्तीवर देखील मात करू लागतात, अश्या वेळी भावनांना बांध घालून योग्य सल्ला घेणे कधीही योग्य आणि हेच करताना अर्जुन इथे आपल्याला दिसत आहे.**

🚩संकलन  :- कल्पेश

https://t.me/marathisuvichar2023

2 weeks, 6 days ago

हा जो प्रवास आहे तो तुमचा एकट्याचा आहे...
इतर कदाचित आपल्याबरोबर चालू शकतात,
परंतु कोणीही तुमच्यासाठी, तुमच्या वाटणीचं चालू शकत नाही...
😊*https://t.me/marathisuvichar2023 😍*😍 शुभरात्री😍😍**

4 weeks ago

#भगवदगीता #BhagavadGita *💫अध्याय पहिला
🌟* श्लोक १५

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५ ॥

अर्थ:

श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥

श्रीकृष्णांनी पंचजन नावाच्या शंखाच्या रूपात राक्षसाचा वध करून त्याला शंख रूपात सोबत घेतले होते असे म्हटले जाते म्हणून या शंखाचे नाव 'पांचजन्य' पडले.

राजसूय यज्ञात अर्जुनाने अनेक राजांवर विजय मिळवला होता आणि भरपूर संपत्ती जमा केली होती. त्यामुळे अर्जुनाला 'धनंजय' हे नाव पडले निवात्कवाचासारख्या राक्षसांशी लढताना इंद्राने अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख दिला. या शंखाचा आवाज एवढा मोठा होता की ज्यामुळे शत्रू सैन्य थरथरत असे. आणि हाच शंख अर्जुनाने वाजवला होता.

भीमाला भिमकर्मा हे नाव पडले होते कारण त्याने हिडिंबासुर, बकासुर, जटासुर यांसारख्या राक्षसांना आणि कीचक आणि जरासंध सारख्या बलवान वीरांचा वध केला. त्याच्या पोटात पोटाच्या आगीबरोबरच 'व्रक' नावाची विशेष आग होती, ज्यामुळे भरपूर अन्न तो पचवायचा, त्यामुळेच अशी भयानक काम करणारा असा उल्लेख करत त्याला 'वृकोदर' हे नाव पडले. असा भीमकर्मा वृकोदरा भीमसेन 'पौंद्र' नावाचा खूप मोठा शंख वाजवत होता.#मराठी** #म

🚩संकलन  :- कल्पेश

https://t.me/marathisuvichar2023

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 5 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 8 hours ago

Last updated 1 week, 4 days ago