Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

वपु काळे साहित्य ™

Description
व पु काळे यांची पुस्तके, विचार आणि बरच काही...
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 месяц, 1 неделя назад
वपु काळे साहित्य ™
1 месяц, 1 неделя назад
वपु काळे साहित्य ™
2 месяца назад

व.पुं.च्या विचारांचे तसं म्हटलं तर आपण सगळेच चाहते आहोत, अगदी " वपु प्रेमी " आहोत. पण आज मी त्यांच्या मला भावलेल्या काही विचारां विषयी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. चुकभूल द्यावी घ्यावी. माणूस हा तसं म्हटलं तर समाधानी असतो पण आणि नसतो पण. याचं कारण, परिस्थिती. परिस्थिती ही काही निर्णय मनाविरुद्ध सुद्धा घ्यायला भाग पाडते. अशा वेळी करावी लागते ती तडजोड. कारण, अशा वेळी व.पुं.चा मला भावलेला विचार आठवतो, " आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण, आवडलेलं कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्विकारता येत नाही.." नवरा बायको म्हणजे " तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना.." आयुष्यभरासाठी त्यांनी एकमेकांना निवडलेलं असतं. मग त्यात गुण दोष देखील आले. पण त्यांच्यात प्रेम निर्माण होते ते सहवासामुळे. कितीही भांडणं झाली,वाद झाले तरी परत एकत्र होतात त्याला कारण प्रेम. आणि म्हणूनच म्हणतात, प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे. यात जेव्हा सहवासाची, विश्वासाची भर पडते तेव्हा ते नाते अधिकच दृढ होते. मग आपले व.पु. लिहितात ते तंतोतंत पटते, " सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.."
असं म्हणतात, बोलून प्रश्न सुटतात. बोलणं म्हणजे काय हो? तर मनात चालू असलेली घुसमट किंवा एखादे गुपित व्यक्त करणे. पण या साठी संवादाची भूक असावीच लागते. कारण, आपण जे काही बोलतोय त्याचा समोरच्या व्यक्तीवर किती परिणाम होतो हे समजते. परिणाम झाला तर संवाद जिंकतो, नाही झाला तर विसंवाद निर्माण होतो. मग मला सांगा, व.पु. जर म्हणत असतील, " बोलायला कुणीच नसणं या पेक्षा, आपण बोललेलं समोरच्या पर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.." काय चुकीचं आहे? स्त्री किंवा पुरुष, कितीही शिकले तरी आयुष्याच्या एका वळणावर जोडीदाराची अर्थात पार्टनरची गरज भासते. मनात काहीवेळा विचारांचे द्वंद्व सुरू असते, कधी आनंद साजरा करायचा असतो, अशा वेळी हा प्रवास किती वर्ष एकट्याने करणार? मी एका चित्रपटातील डायलॉग ऐकला होता, " दिवस कसाही निघून जातो पण रात्र झाली की रिकामा flat अंगावर येतो.." ते एकाकीपण खायला उठते. यावर आधारित जो विचार व.पुं.नी मांडला आहे तो मला प्रचंड आवडतोच पण त्याहीपेक्षा जोडीदाराची सोबत का असावी याचं मार्गदर्शन करतो, " अंधाऱ्यातील प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो, आणि असाच आपला हात कुणाला तरी हवा असतो.."
व.पुं.नी लिहिलेले जितके विचार आहेत हे अप्रतिम तर आहेतच पण आयुष्याचं सार सांगणारे आहेत. लेखक हा अनुभव तर मांडतोच पण त्या पेक्षा लिहिलेले विचार वाचकांना कसे आपले वाटतील अशा पद्धतीने लिहिण्याचे कौशल्य खूप कमी लेखकांकडे असते, त्यातलेच एक लेखक म्हणजे आपले सर्वांचे लाडके व.पु. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनीच लिहिलेला हा विचार त्यांचे महत्त्व अधोरेखित करतो, " ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.." शेवट इतकेच लिहावेसे वाटते,
" अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती.."
...

3 месяца, 1 неделя назад
3 месяца, 1 неделя назад

जंक्शन
घर हरवलेली माणसं
व.पु. काळे.

तिन पातळांची पसंती झाल्यवर चौथं पातळ रेवतीनं मला पसंद करायला सांगीतल. एका पाठोपाठ एक असा तिचा पातळं निवडण्याचा सपाटा पाहून मी चकित झालो होतो. किंमतीत घासाघीस नाही. रंगात,पोताच्या बाबतीत, कशाकशात चर्चा न करता तीनं पाच पातळं खरेदी केली. माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहायला तिला सवड नव्हती. पाच पातळांची किंमत दुकानदारानं एकशे दोन रूपये सांगितल्यावर ती शांतपणे म्हणाली, 'मी फक्त पंच्याण्णव रूपये देणार आहे'
'माझी खरेदीची पद्धत तुला कशी काय वाटली ?'
'चकित करण्यासारखी आहे.'
'तू' चकित झालास ?'
'छे-छे, दुकानदार चकित झाला!'
'चल !'
'खोटं नाही. त्यानं उगीचच सात रूपये कमी केले वाटतं ? शंभर पातळ पाहायची, रंगाला नावं ठेवायची, पोत वाईट म्हणून कुरकुर करायची, किंमत दहा-दहा वेळा विचारायची आणि शेवटी काहीच घ्यायचं नाही, अशा बायका पहाण्याची त्याला सवय झालेली. हे सगळ टाळून तू त्याचा वेळ व डोकेदुखी वाचवलीस म्हणून त्यानं सात रूपये कमी केले.'
रेवती मनापासून हसली.
'बरं तुला काही ड्रिंक वगैरे घ्यायचंय ?'
हातातलं पातळांचं बोचकं वर धरत मी विचारलं, 'टिप म्हणून की हमाली म्हणून ?'
'असं म्हणणार असलास तर पुन्हा फोन करते बघ.'
'मला वाटलं होतं की माझा वेळ मजेत गेल्याबद्दल एन्टरटेनमेंट टॅक्स म्हणून तूच माझ्याकडून काही तरी वसूल करशील.
'आज चेष्टा बस. खरं सांग काही हवंय का ?' .. 'आज नको. पुन्हा केव्हातरी साठी आजचे पैसे रिझर्व ठेव.'
तिला तो करार पटला. बसमध्ये बसल्यावर मीच तीला विचारलं,
'ही एवढी पातळं कुणासाठी ?'
'मलाच.'
'एवढी ?'
'हो ! सबंधवर्षाची बेगमी आणि गेल्या वर्षाचा सूड !'
'स्पष्टीकरणाची गरज आहे.'
'काय करणार आहेस तू स्पष्टीकरण ऐकून ?'
'अर्ध बोलून तू काय मिळवणार आहेस ?'
'जाऊ दे रे ! मिळवत्या बायकांची दुःखं नाही कुणाला कळायची.'
'आता सगळं सांगावं लागेल.'
'बायका मिळवायल्या लागल्या की नवरे-लोक त्यांच्या कपडयांची विचारपूससुद्धा करत नाहीत. सासूबाई तसल्याच. घरात वन्संसाठी पातळं आणून झाली. स्वतःसाठी झाली. एक-दोघांना आहेर झाले मोठाले. त्यांनाही पातळं झाली. माझी चौकशी सुद्धा नाही.आम्हीच आमचे कपडे आणायचे. गेल्या सबंध वर्षात आपण होऊन कुणी चौकशी केली नाही. आता मीही कुणाची पर्वा करायची नाही असं ठरवलं आहे.'
'तुझ्या रागात मी भर घालतो असं समजू नकोस. पण मला एक सांग, तू नोकरी किती वर्ष करीत आहेस ?'
'हे आठव वर्ष.'
'मग ह्या गोष्टीची जाणीव तुला आजच झाली ?'
'अन्यायाची जाणीव तुलना करायला मिळाली म्हणजे होते. गेले चार महिने वन्संही नोकरी करीत आहेत. गेले चार महिने सतत कौतूक चाललं आहे-नोकरी करते, बिचारी दमते ! मी काय गेली आठ वर्ष रमी खेळायला जाते आॅफिसात ? तिच्यासाठी न सांगता पातळं आणली. एवढी वागण्यात तफावत लेकीसुनेमध्ये ?'
'आता तू पंच्याण्णव रूपये कमी दिल्यावर काय होईल ?'
'घरात हायड्रोजन बाॅम्ब पडेल.'
'असं ?'
'होय. ह्या स्टेप्स घेण्याची माझी इच्छा नव्हती. ह्याच लोकांनी माझ्यवर तशी पाळी आणली.'
'तुला ती भलतीच गोष्ट लागलेली दिसते
आणि लागणं स्वाभाविक आहे म्हणा.'
'ही एकच गोष्ट लागलेली नाही. रोज लागण्यासारख्या गोष्टीअसंख्य होतात दुर्लक्ष मीच करते. आता मी बंड करणार आहे. एकत्र कुटूंबपद्धतीचे गोडवे गायचे एकीकडे आणि मग पिळवणूक करायची दुसरीकडे ! स्वतःची मुलगी कामावरून परतली की तिला सक्तीनं अर्धा-पाऊण तास विश्रांती. आणि मला कपडे बदलायला, तोंड धुवायला दहा मिनिटं जरी उशीर झाला तरी त्यांच्या कपाळावर आठी.
चहाचा आयता कप तर गेल्या आठ वर्षात मला एकदाही मिळालेला नाही.
ऐकणाऱ्याला ह्या गोष्टी बारीकसारीक आणि क्षुल्लक वाटतील. सांगणाऱ्या माणसालाच ह्या बाबतीत कमी लेखलं जाईलं. पण नुसती कल्पना कर, कामावरून माणूस अगदी दमून यावं, एकच कप चहाची तल्लफ यावी-आणि स्वतः केल्याशिवाय चहा मिळू नये, सांग काय वाटेल अशावेळी ?'

रविवारी राजा सकाळचाच आला.
'केव्हा आलास ?'
'कालच आलो. रेवतीची तार आली होती.'
'राजा, तू एवढा शांत कसा ?'
'हे सारं अपेक्षित होतं.'
'तू ते होऊन देऊ नकोस. रेवतीला परावृत्त कर.'मी अस्वस्थ होत म्हणालो 'मी आत्ताच तिकीटं रिझर्व करून आलो.'
'राजा....'
'त्याला इलाज नाही. केव्हा तरी होणार होतं हे. मला ह्यात नवीन नाही. घरातल्या बाईनं आपलं क्षेत्र बदललं की त्यापोटी दुसरं काय होणार ? संसार कशासाठी करायचा ? संसार म्हणजे काय याच्या व्याख्या जिथं बदलायला लागल्या तिथं एकमेकांच्या नात्याबद्दलचा प्रश्न उद़्भवतोच कुठं ? जेवढ्या जिद्दीनं रेवती नोकरी करते, तेवढी जिद्द तिनं घरात वापरली असती आणि मिळवला तर चांगुलपणा ह्याच लोकांकडून मिळवून दाखवीन असं म्हटलं असतं तर ती तेवढीच कर्तबगार ठरली असती.'

4 месяца, 1 неделя назад
5 месяцев, 3 недели назад

***आज संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने जाणून घेऊया अष्टविनायकांबद्दल थोडक्यात माहिती.

💥💥अष्टविनायक दर्शन 💥💥

👇👇👇***https://www.marathisahitya.in/2023/09/ashtavinayaka-mahiti-in-marathi-by.html

मराठी साहित्य

अष्टविनायक माहिती | ashtavinayaka mahiti in Marathi by Marathisahitya.in

***आज संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने जाणून घेऊया अष्टविनायकांबद्दल थोडक्यात माहिती.
5 месяцев, 3 недели назад
*****🚩******✨******✨*** अभंगवाणी ***✨******✨******🚩***

*🚩*✨ अभंगवाणी 🚩

१) सुखाचे ते सुख - संत नामदेव -http://www.marathisahitya.in/2023/11/sukhache-te-sukh-sant-namdev.html २) तो अज्ञान गा पांडवा - संत ज्ञानेश्वर -http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post_29.html ३) जलाविन मासा - संत बहीणाबाई -http://www.marathisahitya.in/2023/11/jalavin-masa-sant-bahenabai.html ४) अखंड - महात्मा फुले - http://www.marathisahitya.in/2023/09/blog-post_30.html ५) तू ये रे बा विठ्ठला - संत जनाबाई -http://www.marathisahitya.in/2023/11/tu-ye-re-ba-vitthala-sant-janabai.html ६) सांगितली खूण मने माझ्या - संत नामदेव -http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post.html ७) जोडोनिया धन - संत तुकाराम -http://www.marathisahitya.in/2023/11/jodoniya-dhan-sant-tukaram-maharaj.html ८) ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ - संत बहीणाबाई - http://www.marathisahitya.in/2023/11/dyan-sarvanhuni-shreshtha-sant-bahenabai.html ९) विंचू (भारूड) - संत एकनाथ -**http://www.marathisahitya.in/2023/09/vinchu-bharud-by-sant-eknath.html

5 месяцев, 3 недели назад

***वाचा संत बहिणाबाई यांचा सुंदर अभंग -

📚 ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ 📚
👇🏻👇🏻*** https://www.marathisahitya.in/2023/11/dyan-sarvanhuni-shreshtha-sant-bahenabai.html?m=1

मराठी साहित्य

अभंग - ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ - संत बहिणाबाई | Dyan sarvanhuni shreshtha - sant bahenabai

***वाचा संत बहिणाबाई यांचा सुंदर अभंग -
5 месяцев, 4 недели назад
***🙇‍♂️******🙇******🙇‍♀️******🙇‍♂️******🙇******🙇‍♀️******🙇‍♂️******🙇******🙇‍♀️******🙇‍♂️******🙇******🙇‍♀️******🙇‍♂️******🙇******🙇‍♀️***

🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️

कार्तिकीवारी निमित्त आता घरबसल्या विठ्ठल रुक्मिणी चे मोफत लाइव्ह दर्शन घ्या.
👇*👇*** https://www.marathisahitya.in/2022/07/vitthal-rukmini-live-darshan.html?m=1

🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago