Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

Himanshu Tembhekar AIR 738 official Channel

Description
ज्ञानमार्गे ध्येयपूर्ती !!

Run by Himanshu Tembhekar
UPSC CSE AIR 738
Marathi Medium Topper
UPSC 2020 Interview appeared
GS2,GS3,GS 4, Essay all India Topper

UPSC च्या पॅटर्न प्रमाणे राज्यसेवा यश प्राप्तीसाठी !
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

6 days, 13 hours ago
6 days, 13 hours ago
Himanshu Tembhekar AIR 738 official Channel
6 days, 13 hours ago

Empathy #ethics #upsc

4 months ago

All the best for mains

And congrats to all who have got ranks in MPSC result !

Keep calm and study hard !

Load gheu naka

Niwant paper dya

You have given everything which is required !

7 months, 3 weeks ago

Kase ahat sagle ?

Apan mahila arakshanavar lavkar ek lefture gheu !

It will be live lecture where you need to note down the points.

8 months, 2 weeks ago

{1} राज्यसेवा इंग्रजी निबंधासाठी Content {2} इंग्रजी निबंधाचा शेवट कसा करावा ? {3} Indian Space Policy - Expected English Essay {4} Essay Value additions {5} शिवराय म्हणजे कोण ? {6} IT कंपन्यांत महिलांचं प्रमाण {7} रामराज्य

Contact For राज्यसेवा Essay Batch - @amindhealer

Telegram

MPSC Swadhyay (स्वाध्याय)

English निबंधासाठी Content ***👆******👆*** Mpsc Essay Crash Course By Himanshu Tembhekar (All India Essay Topper -2020) Contact - @amindhealer , 9404586596 अधिक माहितीसाठी - Click Here

8 months, 2 weeks ago
Himanshu Tembhekar AIR 738 official Channel
8 months, 2 weeks ago

*💫*💫मराठी English Themed Essay💫💫

🏆राज्यसेवा final result मध्ये descriptive मधील  १-१ मार्क तुम्हाला class २ वरून class १ आणि merit list मध्ये आणू शकतो

👌👌 विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादानंतर आणि नोट्स मधील विषय परीक्षेत आल्यानंतर सलग तिसरी बॅच !

🌷बॅचची वैशिष्ट्ये :

👉 Quality notes

👉 Detailed bilingual discussion on probable topics

👉Audio Recorded स्वरूपात उपलब्ध

👉5 dynamic topic notes and 7 static topic notes along with precise and translation

👉 Dynamic topic live discussion

👉 कमी दिवसात English vocabulary, writing सुधारण्यासाठी Tips

👉कोर्स फीज - रूपये 750

👌सवलत शुल्क - रूपये 499

👉त्वरा करा मर्यादित प्रवेश

Run by

👤Himanshu Tembhekar
UPSC 2020 Interview appearedAmong GS2,GS3,Essay all India Topper
500+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अनुभव

We will have demo and discussion session on Sunday at 9 am

Join group for more details

📞Contact For Admissions :@amindhealer प्रवेश प्रक्रिया :9404586596 वर  phonepay/gpay करून त्याचा screenshot @amindhealer वर पाठवा.

जॉईन https://t.me/mpscswadhyay and @essaykatta for useful articles,quotes, सुभाषित

👉 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.**https://wa.me/919404586596

Telegram

MPSC Swadhyay (स्वाध्याय)

ज्ञानमार्गे ध्येयपूर्ती !! Run by Himanshu Tembhekar UPSC 2020 Interview appeared Among GS2,GS3,Essay all India Topper (Marathi Medium) UPSC च्या पॅटर्न प्रमाणे राज्यसेवा यश प्राप्तीसाठी !

*****💫******💫***मराठी English Themed Essay***💫******💫***
9 months, 1 week ago

मध्यपूर्वेतील इस्लामी संस्कृतीतल्या गणिताचा पाया हा भारतीय व ग्रीक गणिती ज्ञानावर आधारित होता. मात्र या दोन्ही संस्कृतींतल्या गणिती संकल्पना अधिक विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. नववे शतक ते पंधरावे शतक हा काळ इस्लामी गणिताचे सुवर्णयुग मानला जातो. अल् ख्म्वारिझ्मी या इस्लामी गणितज्ञाला बीजगणिताचा जनक म्हणून ओळखले जाते. त्याने नवव्या शतकात लिहिलेल्या बीजगणितावरील पुस्तकात समीकरणे सोडवण्यासाठी भूमितीवर आधारलेल्या पद्धती दिल्या आहेत. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवरील समान पदे रद्द करणे, ऋण संख्या समीकरणाच्या विरुद्ध बाजूला नेऊन समीकरण सुटसुटित व समतुल्य (बॅलन्स) करणे, वर्ग पूर्ण करून द्विघाती (क्वाड्रॅटिक) समीकरणाची उकल करणे, या सर्व आज वापरात असलेल्या पद्धती अल् ख्म्वारिझ्मी याने प्रथम हाताळल्या. अल् ख्म्वारिझ्मी याच्या बीजगणितात चिन्हांकित भाषा वापरली नव्हती, तर त्याऐवजी शाब्दिक वर्णने वापरली होती. अल् ख्म्वारिझ्मी याच्या नावाच्या लॅटिन स्वरूपावरूनच आज्ञावलीसाठी ‘अल्गोरिदम’ हा शब्द प्रचलित झाला. अलजिब्रा हा शब्दसुद्धा अल् ख्म्वारिझ्मी याच्या पुस्तकाच्या शीर्षकातील ‘अल् गाब्र’ या शब्दांवरून वापरात आला आहे.
इस्लामी गणितज्ञांनी त्रिघाती (क्युबिक) समीकरण सोडवण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धती विकसित केल्या. आपल्या रुबायतींद्वारे कवी म्हणून प्रसिद्ध झालेल्या, उमर खय्याम या गणितज्ञाने अकराव्या शतकात त्रिघाती समीकरणांवर संशोधन केले. या समीकरणांना एकाहून अधिक उकली असू शकतात, हे स्पष्ट केले. काही विशिष्ट प्रकारच्या त्रिघाती समीकरणांची उकल भूमितीद्वारे करताना त्याने शंकूंच्छेदाचा (कोनिक सेक्शन) वापर केला. बाराव्या शतकात होऊन गेलेल्या अल् तुसी या गणितज्ञाने हे संशोधन अधिक पुढे नेले. अल् तुसी याच्या संशोधनातून बजिक भूमिती ही स्वतंत्र गणिती शाखाही विकसित झाली.

9 months, 1 week ago

• बाळंतपण अथवा इतर कारणांमुळे नोकरीत खंड पडल्यानंतर पुन्हा नोकरीत परतताना आवश्यक प्रशिक्षण देण्याची तयारीही कंपन्या दाखवत आहेत. महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी त्याचाही उपयोग होत आहे. या प्रशिक्षणात केवळ शैक्षणिक भाग नसून, एकूण व्यक्तिमत्त्व विकासाचाही समावेश कंपन्यांनी केला आहे.
• शैक्षणिक आघाडीवर काय चित्र आहे? कॅम्पस मुलाखतींतून आयटी कंपन्यांनी मुलींना भरती करून घेण्याचं प्रमाण कसं आहे, असा प्रश्न आम्ही ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकाऱ्यांच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरॲक्शन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांना विचारला. त्यांनी याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
• आयटी कंपन्या केवळ ‘कॅम्पस’वरच नाही, तर विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र भरती प्रक्रियाही राबवत आहेत. विशेष म्हणजे मुली आणि मुलग्यांच्या पॅकेजमध्ये समानता आहे. ‘ॲक्सेन्चुअर’नं पुण्यात केवळ महिला कर्मचारी भरती करण्यासाठी नुकताच एक मेळावा आयोजित केला, ज्यामध्ये देशभरातून २५०० विद्यार्थिनी आणि महिला सहभागी झाल्या होत्या.
• ‘आयटी’तील मुलींचा टक्का वाढण्यास मुळात उच्च शिक्षणात वाढलेला मुलींचा टक्काही कारणीभूत आहे. मुलींना असलेल्या राखीव जागा, स्वयंसेवी संस्थांकडून गुणवंत; परंतु आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थिनींना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या, प्रसंगी त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी यामुळे मुलींचं उच्च शिक्षण सुकर होत असून, अशा गुणवंत मुली नोकरीतही सामावल्या जात आहेत.
• पर्सिस्टंट किरण गर्ल्स फाउंडेशन, लीला पूनावाला फाउंडेशन, कॅटॅलिस्ट आदी संस्था मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्त्या देणं; तसंच फी भरण्यापासून नोकरीत खंड पडल्यानंतर पुन्हा परतण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यापर्यंत सर्व उपक्रम राबवत आहेत.
• शिक्षण हक्क कायद्यामुळे वंचित वर्गातल्या अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणं शक्य झालं आहे. त्याचा परिणाम उच्च शिक्षणातील पटनोंदणी अर्थात ‘जीईआर’ वाढण्यावर; तसंच नोकरभरतीतील प्रमाण वाढण्यावरही झालेला दिसतो. कार्यसंस्कृतीत महिला कर्मचाऱ्यांचे महत्त्व महिला कर्मचाऱ्यांमुळे अनेक आयटी कंपन्यांच्या कार्यसंस्कृतीत फरक पडल्याचं निरीक्षण आहे. याबाबत ‘बीबीएनजीओ’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कजरी मित्रा यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी या मुद्द्याची उकल केली.
• कंपन्यांना मानवी चेहरा प्रदान करण्यासाठी महिलांची पुरेशी संख्या असणं आवश्यक असल्याचं आता मान्य होऊ लागलं आहे. मुळात केवळ नफा आणि आकडेमोड एवढ्यापुरतंच कंपनीचं कामकाज मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांचा संवेदनशीलपणे विचार करणं, कंपनीतील मानवी संबंध सुदृढ ठेवणं यासाठी महिला कर्मचारी असणं कंपन्यांना गरजेचं वाटत आहे.
• महिलांकडे अंगभूत असलेली सहकंपा कंपनीतील मानवी संबंध सुधारण्यासाठी आवश्यक ठरते आहे. कंपनीसाठी निर्णय घेताना याचा विशेष विचार करण्याची गरज असल्यानं अनेक मुख्य पदांवरही महिलांना स्थान मिळत आहे.
• महिला अधिक सर्जनशीलपणे विचार करू शकत असल्यानंही निर्णयप्रक्रियेत त्यांचं स्थान महत्त्वाचं मानलं जात आहे.
• काही कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व रजा देण्याच्या जोडीनं पुरुष कर्मचाऱ्यांनाही पितृत्व रजा देऊन पुरुषांमध्येही सहकंपा निर्माण होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हा धोरणात्मक बदल महिला कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येनंतरच अमलात येऊ लागला आहे. अजूनही पुरेशा प्रतिनिधित्वाची प्रतीक्षा आयटीतील महिलांचं प्रमाण वाढत असल्याचं आकडेवारी दाखवत असली, तरी पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला कर्माचाऱ्यांची संख्या अद्याप कमीच आहे. देशातील सर्वांत मोठी आयटी कंपनी असलेल्या ‘टीसीएस’मध्ये जूनअखेर एकूण कर्मचाऱ्यांत महिलांचं प्रमाण ३८ टक्के होतं. ‘इन्फोसिस’ आणि ‘विप्रो’ या कंपन्यांमध्येही महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ३६ टक्क्यांहून अधिक आहे. ‘सध्या आमच्याकडील कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण २९ टक्के आहे. ते दिवसेंदिवस वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असं ‘एचसीएलटेक’च्या प्रवक्त्यानं सांगितलं, तर ‘आमच्याकडील कर्मचाऱ्यांत महिलांचं प्रमाण सध्या ३६.३ टक्के आहे. समावेशक दृष्टिकोनाद्वारे हे प्रमाण आणखी वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे,’ असं ‘विप्रो’च्या प्रवक्त्यानं नमूद केलं

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago