Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 месяц назад
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 год, 8 месяцев назад
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 6 дней, 11 часов назад
समाजसुधारक आणि इतर व्यक्तीविशेष | SMART CHART
राज्यसेवा मुख्य आणि इतर सर्व वस्तुनिष्ठ स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
कालानुक्रमे आणि तक्ता स्वरूपात मांडणी.
नियतकालिके, साहित्य, संस्था अशा विविध columns मध्ये केलेली मांडणी पाठांतर आणि उजळणीसाठी प्रभावी.
सुधारकांच्या प्रतिमा आणि जुने प्रश्न यांचा समावेश.
समाजसुधारक या chapter विषयी तुम्ही आधी वापरलेले source वाचताना या नोट्सच्या color print वर सर्व महत्त्वाच्या बाबी नोंदवून ठेवल्यास final revision साठी short notes बनतील.
- - - - - - - - - - - - -
Notes by Nikhil Patil
(Dy Director of Industries, Group A, State Rank 45, राज्यसेवा 2021)
वैष्णव जन तो तेने कहिये जे
पीड़ परायी जाणे रे |
पर दुख्खे उपकार करे तोये
मन अभिमान ना आणे रे ||
- संत नरसी मेहता
??
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स | SMART CHART :
- आधुनिक भारत - सत्तेचे हस्तांतरण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनक्रम - परकीय व्यापाराचे सिद्धांत - Economists | GS 4 - 64 ICAR Agri Institutions - कात्यायन Agri Notes - FYP | पंचवार्षिक योजना - Politics Timeline - Science and Technology - World Geography + Physical Geography - Human Geography | मानवी भूगोल
Human Geography |
मानवी भूगोल : SMART CHART
Notes by Nikhil Patil
(Dy Director of Industries, Group A, State Rank 45, राज्यसेवा 2021)
To watch the discussion video,
click this blue text.
Determinism, Possibilism,
Stop and Go Determinism
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 आणि 2024 साठी उपयुक्त
Telegram Channel :
Upscale Mantra - MPSC Guidance
✅ 'शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्'
अर्थात, शरीर सर्व कर्तव्यांच्या पूर्तीचे एकमात्र साधन आहे. 2-3 वर्ष केलेल्या अभ्यासाचे चीज करण्याची संधी actual परीक्षेच्या दिवशी मिळते. परीक्षेच्या काळातही शरीराने साथ दिली तरच यश मिळेल. ही साथ म्हणजे केवळ निरोगी असणं असं नव्हे, तर झोप, भूक, वगैरे निगडित बाबींचं नियोजन. कडाक्याची थंडी, टळटळीत उन किंवा बेसुमार पाऊस या ऋतुमानानुसार आरोग्याचे व्यवस्थापन. Exam hall मध्ये सर्वाधिक अलर्ट आणि फ्रेश राहणं हे देखील अभ्यासाइतकंच महत्त्वाचं आहे.
✅ समन्वय
सर्वोच्च दर्जाची कोणतीही कामगिरी (performance) करायची असेल तर शरीर, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी, आत्मा या सर्वांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. आणि या समन्वयाची सुरुवात पुढे सांगितलेल्या श्लोकामध्येही शरीरापासून होते. याच भावनेने शरीराची काळजी घ्या.
"कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्"
(3/3)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
*✍ निखिल पाटील
(DDI, Rank 45,
राज्यसेवा मुख्य 2021)*
✅ Fast vs Long
Decide how do you want to run - Fast or Long? परीक्षेच्या क्षणिक दडपणासाठी शरीराकडे दुर्लक्ष केले (कमी झोप, निकृष्ट जेवण, व्यायामाचा अभाव), तर तात्कालिक फायदा झाल्यासारखे वाटेल, Fast पुढे गेल्यासारखे वाटेल. लेकिन लंबी पारी खेलनी हैं तो Physical fitness महत्त्वाचा आहे. इथे विराट कोहली आठवा. Fitness वर काम केल्यापासून वेगळ्या लेवलवर गेलेला हार्दिक पांड्याचा गेम आठवा. शरीर संगोपनासाठी दिलेला वेळ ही Long term investment असते. प्रशासकीय सेवेत आल्यावरही कार्यक्षमपणे काम करण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्य समृद्धपणे जगण्यासाठी त्याचा फायदा होईलच.
✅ मेंदू - शरीर आणि मन यांना जोडणारा पूल
अभ्यास करताना मेंदूचा alertness सगळ्यात महत्त्वाचा आहे. आकलन, स्मरण, चिंतन या सगळ्या बौद्धिक आणि मानसिक प्रक्रिया आहेत, यांत्रिक नाहीत. प्रज्ञा (Input), मेधा (Processing) आणि प्रतिभा (Output) या तीन पातळ्यांवर मेंदूचे काम चोख व्हायचे असेल तर त्याला कणखर शरीराचं चिलखत पाहिजेच.
✅ Early 'Morning' Birds
रोज सकाळी उठल्यावर येणाऱ्या दिवसासाठी मनाला आणि शरीराला योग्य रीतीने तयार करणे आवश्यक. दुनिया अजून पूर्ण जागी होण्याआधी तुमचा दिवस सुरू होऊन काही productive केलं तर तो एक वेगळाच आनंद असतो. त्यातून मिळणारा आत्मविश्वास दिवसभर आपल्याला पळायला बळ देतो. Win your morning, you will win the day.
✅ Spillover benefits
सकाळी उठून पळायला जायला आपल्याला आवडत नाही. पण तरीही त्याची सवय लावून घेतली तर नावडीची पण महत्त्वाची गोष्ट करण्याचे conviction build होते आणि ते अभ्यास करताना कामी येते. Conviction spills over to other aspects of life.
एखादा चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह टाळून बेचव पण healthy पदार्थ खाल्ला तर आपला confidence वाढतो, you feel good about yourself.
मनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रथम इंद्रियांवर विजय मिळवावा लागतो. अशा Instant Gratification चा मोह टाळला की आपोआप मनावर ताबा यायला लागतो. आणि चंचलपणा कमी होतो.
✅ Keep it simple!
व्यायाम फक्त gym मध्येच जाऊन करायचा असं काही नसतं. घरच्या घरी, रूमवर आपण Basic warm up, सूर्य नमस्कार, Breathing Exercises करू शकतो. शारीरिक व्यायामाने ताकद, लवचिकता, संतुलन साधण्यास मदत होते. तर breathing exercises in particular helps in maintaining our composure and equanimity. परीक्षेच्या काळातही एकाग्र चित्त होण्यासाठी श्वसन नियमनाचे चांगले फायदे होतात.
✅ Right Consumption
असं म्हणतात की You become what you eat. व्यापक अर्थानं आपण असंही म्हणू शकतो की You become what you consume. या consumption मध्ये अन्नासोबतच पाणी, हवा आणि विचार हे देखील येतात.
घराबाहेर राहून अभ्यास करणारे घरचं खात नाहीत. मेसमधलं निकृष्ट जेवण पुरेसे जीवनसत्व, पोषण देत नाही. बाहेर चौरस आहार मिळत नाही. त्यामुळे immunity कमी होते. So we need to complement our meals with healthy sides - salad, dry fruits, मोडे, प्रथिने (दूध, अंडी). यामागच्या आर्थिक बाबी सांभाळून शक्य तेवढे आहारात चांगले बदल करावेत.
✓ Oxygen is called प्राणवायू for a reason. बंदिस्त खोलीत किंवा AC मध्ये अभ्यास करणाऱ्यांनी जाणीवपूर्वक दिवसातील किमान 1 तास (शक्यतो सकाळी) तरी मोकळ्या हवेत घालवावा. म्हणजे दिवसभर फ्रेश वाटेल.
✓ पाण्याला जीवन म्हणतात तेही सार्थच. दररोज निदान 4-5 लीटर पाणी प्यायला पाहिजे, मोजून. बऱ्याच शारीरिक व्याधी दूर होतात. शरीराच्या सगळ्या पेशी टवटवीत राहतात.
✓ चहा कमी प्या, शक्य असेल तर वर्ज्य करा. चहामुळे होणारा शरीरातील calories चा आणि डोक्यात वायफळ राजकीय चर्चांचा निरुपयोगी intake टळेल.
✅ Body Language
स्वेटर/हुडी घालून वावरलं की निम्मा आत्मविश्वास कमी होतो. खरंच वाजणारी थंडी ठीक आहे, पण त्यात बऱ्याचदा syllabus cover करायच्या किंवा परीक्षेच्या भीतीने भरलेली हुडहुडी mix होऊन जाते. खांदे पाडून चाललं की आत्मविश्वास कमी होतो. व्यायाम केला की देहबोली बदलते, आत्मविश्वास वाढतो. High power poses बद्दल Google करा, लक्षात येईल.
✅ Stay Fit. Stay Positive.
आपली तब्येत ठीक नसते तेव्हा नकारात्मकता आपल्या मनात सहज penetrate करते. नैराश्याचे मळभ सहजीच दाटून येतात. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात नकारात्मकता तर विक्रमच्या पाठीवरील वेताळासारखी आपला पिच्छा सोडत नसते. त्यामुळे fit राहण्याचे महत्त्व अजून वाढते. एक अरेबिक म्हण आहे,
"He who has health, has hope;
and he who has hope, has everything."
(2/3)
?? Mens sana in corpore sano ??
✅ आपल्या मनाचे खेळ स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचे असतात. त्या खेळातल्या यशापयशावर परीक्षेतील यश अवलंबून असते. मनाच्या घ्यावयाच्या काळजीबद्दल आपण नेहमीच बोलतो. परंतु त्याच प्रक्रियेतील एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित भाग म्हणजे शरीराची घ्यावयाची काळजी. शीर्षकात नमूद लॅटिन उक्तीच्या अर्थाप्रमाणे "निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असते".
✅ अभ्यास करताना आपण आपल्या शरीराची किती काळजी घेतो, त्यावर किती investment करतो, आपण आपल्या शरीराला किती चांगल्या पद्धतीने जाणतो, ऐन परीक्षेच्या वेळी शरीराने बेस्ट परफॉर्मन्स द्यावा यासाठी त्याला कसे प्रशिक्षित करतो, हे कटाक्षाने सांभाळण्याचे मुद्दे आहेत. विशेषतः अभ्यास नुकताच सुरू करणाऱ्या aspirants नी याकडे आवर्जून लक्ष द्या.
✅ Know yourself!
एखादं घर किती नीटनेटके आहे, त्यावरून त्या घरात राहणारे किती नीटनेटके आहेत याचा अंदाज येतो. त्यानुसार असं म्हणता येतं, की If you can maintain your body, you can also maintain your mind. आपल्या रोजच्या routine मध्ये जेवढी शिस्त, predictability असेल, आपली उत्पादकता तितकीच अधिक असते. आपण आपल्या शरीराच्या सवयी, प्रतिसाद याविषयी जागरूक असू तर त्याचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकू. उदा. आंबट दही खाल्ल्याने आपला घसा बिघडत असेल तर ते खाण्याचे टाळावे. यासाठी मनावर नियंत्रण तर हवेच, पण त्याआधी तशा जुन्या patterns वरून स्वतःच्या शरीराला जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. Better you know your body, better you know your mind.
✅ झोपेचे व्यवस्थापन
अभ्यास करताना productivity मोजताना सगळ्यात कळीचा मुद्दा आहे झोपेचे व्यवस्थापन. झोप चांगली होणं हे एक प्रकारचं वरदान आहे. चांगली झोप होऊन सकाळी उठणं म्हणजे एक प्रकारचा पुनर्जन्मच असतो. कालच्या विवंचना, tensions मागे पडून नवीन उत्साहाने दिवस सुरू होतो. रात्रीची चांगली झोप न होणं आणि दिवसा अभ्यास करताना हटकून झोप येणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
बरेच जण बोलताना ही तक्रार सांगतात की अभ्यास करताना हमखास झोप येते. दोन पातळीवर याला tackle करायला हवं, एकतर अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून प्रयत्न करायला हवेत. आणि दुसरं, त्यातून आलीच तर काय करायला पाहिजे याचा विचार करून ठेवायला हवा.
✓ पहिलं, आपल्याला हवी तेव्हा झोप आली पाहिजे, नको तेव्हा नाही आली पाहिजे. त्यासाठी आपापले पॅटर्न ओळखा, काय खाल्ल्यावर झोप येते, दिवसातील कुठल्या वेळी झोप येते. त्यानुसार अभ्यासाच्या आणि झोपेच्या वेळापत्रकात बदल करा. रात्रीची ६-७ तासांची चांगली झोप होणं याला पर्याय नाही. त्यात तडजोड केली तर त्याचे विविधांगी दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे Long term मध्ये तब्येतीसोबत अभ्यासही compromise होतो.
✓ नको तेव्हा झोप येऊ नये म्हणून - पुरेशी झोप घ्या. तेलकट/heavy नाश्ता टाळा. डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी screen time regulate करा. अंधारात मोबाईल पाहण्याची सवय नको.
✓ तरीही झोप आल्यावर - Surrender, don't fight. Power nap घ्या. शक्यतो डेस्कवर डोके ठेवून झोपा. रूमवर जाऊन गादीवर झोपलात तर २ तास झोपूनही फ्रेश वाटणार नाही. चहा-कॉफीने झोप पुढे जाईल, टळणार नाही. चहासोबतच्या गप्पात वेळ जाईल तो वेगळाच.
✅ शारिरीक उत्पादकता
किती वेळ अभ्यास केला यापेक्षा किती चांगला केला हे महत्त्वाचं. ओढूनताणून १२ तास करण्याची गरज नाही, प्रभावीपणे ८ तास झाला तरी पुरे. सलगपणे अभ्यासाला बसण्याची आपापली natural capacity ओळखा, organically वाढवा.
शरीराकडे दुर्लक्ष करून अभ्यास करणं म्हणजे कुऱ्हाडीला धार न लावता जंगल कापायला निघणं.
✅ Waste नाही, Invest!
शरीराकडे लक्ष देण्यासाठी दिलेला वेळ वाया जातो असा विचार नको. असा वेळ smartly वापरा. सूर्यनमस्कार घालताना audio lectures ऐका. बागेत वॉकिंग करताना दिवसभर वाचलेल्या घटकांची मोबाईलमध्ये काढून ठेवलेल्या फोटोच्या आधारे उजळणी करा. पूर्व आणि मुख्यच्या आधीही व्यायाम करताना मी Interview ची तयारी करतो आहे असे स्वतःला बजावायचो, त्यामुळे वेळ वाया जातो आहे असं वाटायचं नाही. Interview मध्ये तुम्ही fit आणि fresh दिसायला व्यायाम नक्कीच उपयोगाला येतो. सम्यक अन्न, सम्यक व्यायाम, सम्यक निद्रा - या शारीरिक आरोग्याच्या त्रिसूत्रीसाठी केलेली investment चांगला परतावा देईल यात शंका नसावी.
(1/3)
अपेक्षित निबंधाचा विषय - राजकीय आरक्षण आणि महिला सबलीकरण.
Loksatta
अग्रलेख : दुर्गा हो गं गौरी..
cabinet approves women reservation bill reservation
Keep moving. ??♀??
Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 месяц назад
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 год, 8 месяцев назад
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 6 дней, 11 часов назад