✍मराठी कथा, कादंबरी, ईबुक्स, जोक्स✍

Description
सर्व काही एकाच ठिकाणी
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

11 months ago

आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये आणि आपली कोणाला अडगळं वाटू नये म्हणून बाबा अलिकडे एकटे एकटेच रहात होते.मनांत आलं की आपली जुनी बॅग उघडून बसायचे आणि त्यातील प्रत्येक कागद आणि वस्तू पुन्हा पुन्हा पहात,हाताळत परत आपल्या थरथरत्या हातानी बॅगेत ठेवायचे.का कुणास ठाउक पण ते कशाचीतरी बांधाबांध करताहेत असं वाटायचं.

आता लक्षात येेतय बाप होण सोप असतं पण बाप निभावण खूप कठीण असतं.आता बाबांच्या भुमिकेत मी आहे पण त्यांच्या आसपास जाणही मला शक्य होईल का नाही या बद्दल साशंक आहे.

उन्ह,वारा,वादळ आणि धुुवाधार पावसात सगळ्या कुुटुंंबासाठी गोवर्धन पर्वताच छत्र बनणाऱ्या बाबांच्या डोक्यावर कसलही छत्र नव्हतं हे कधी ध्यानातही आल नव्हतं.

कुटुंब व्यवस्थेत एका ठराविक अंतरावरच्या परिघावर बंदिस्त असणारा एक शिस्तबद्ध,कठोर,मनात खूप काही ठेवणारा,नेहमी संयम, सबुरीचा सल्ला देणारा पण कुटुंबा साठी शक्य ते सार काही करणारा एक कर्तव्य निष्ठूर माणूस याच चौकटीत अडकलेल्या बाबांची दुसरी बाजू नेहमी उपेक्षितच राहिली होती.

कुटुंबासाठी जगत असताना स्वतःच्या गरजा, आवडी- निवडी बाजूला ठेवताना त्यांच्या मनाचा किती कोंडमारा झाला असेल हे स्वतः बाप झाल्याशिवाय अनुभवता येत नाही हे खरंच आहे.

काॅलरवर विरलेला शर्ट आणि आल्टर केलेली पॅन्ट घालताना त्यांना कधीच काही वाटल नसेल काय?

वीकेंडला औटींगला जावं.सुट्टीत अगदी फाॅरेनला नाही पण उटी, महाबळेश्वरला तरी जावं.कधीही व्यक्त न होणाऱ्या बायकोला तिच्या मनातला दागिना घडवावा आणि तिच्या केसात गजरा माळता माळता पोटातल ओठात आणाव असं त्यांना वाटलं नसेल काय?

सिनेमा,नाटक,क्रिकेट,मैफली एन्जॉय करण्याचा मोह त्याना कधीच झाला नसावा का?

गळ्यात सोन्याची चेन,बोटात अंगठ्या,हातात मस्तपैकी घड्याळ आणि तलम शर्टावर उंची सेंट मारून मिरवाव अस त्यांना कधीच वाटलं नसेल काय?

सुरवातीला सायकल आणि रिटायर होताना स्कुटर घेणाऱ्या बाबांना चारचाकीची दिवास्वप्न कधीच पडली नसतील काय?

आजवर आईवर भरभरून कविता लिहल्या पण माझा बाप गद्यातही उपेक्षितच राहिला.आईला खूपदा मिठी मारली पण दोन्ही हातानी बाबांना मिठी मारायची राहून गेली होती.

नकळत गाडीच्या स्टेअरिंगवर असणाऱ्या माझ्या दोन्ही हातावर सरसरून काटा आला.तसा मी बाबांच्या आठवणीतून बाहेर आलो.

समोरच गावची वेस दिसत होती तसा गाडीचा वेग कमी करत गाडी घरासमोर थांबवली आणि घरा भोवतालची लोकांची गर्दी पाहून छातीत धस्सं झालं.

स्वतःला सावरत दगडा सारखा तिथचं थिजून उभा राहिलो.कुणीतरी धरून मला आत नेलं.सगळा जीव डोळ्यात आणून बाबा दरवाज्याकडेचं पहात होते.मी दिसल्या बरोबर ते हसले.धावतच जाऊन मी बाबाचा हात हातात घेतला.कितीतरी वेळ असाच निघून गेला अगदी निशब्द...
आणि अचानक ताई माझ्या गळ्यात पडून ओरडली "दादा,असं कसं झालं रे...बाबा तुला मलां पोरकं करून सोडून गेले रे..."

तेराव्या दिवसी नदीच्या संगमावर अस्थी विसर्जन करत असतानाच हेड ऑफिसचा मेल आला.आता मलाही परत नोकरीच्या ठिकाणी जाणं भाग होतं.म्हणूनचं मनं थोडसं घट्ट केलं.बरेच दिवस एकाच ठिकाणी असलेली गाडी बाहेर काढली.तर समोर बायको तिच्या सासूची म्हणजे माझ्या आईची भरलेली बॅग घेवून उभी होती तर माझा लेक आपल्या आजीचा हात हातात घेऊन तिला गाडीत बसवत होता.आणि माझ्या बाबांचे संस्कार माझ्या मुला पर्यत झिरपत असलेचं पाहून माझ्या दोन्ही डोळ्यांच्या कडा भरून आल्या.

सहजच मनांच्या गाभाऱ्यात डोकावलं तर तिथे बाबाचं होते नेहमी सारखे...
हसतमुख...डोळेभरून आपली बायको,मुलगा,सून आणि नातू या गोतावळ्याकडे पहाता पहाता भरभरून आशिर्वाद देत होते...आणि त्यांनी आजपर्यत जपलेली सगळी वडिलोपार्जित संस्काराची प्रॉपर्टी माझ्या नांवावर करत होते...
- राजन पोळ
7588264328
(कृपया सदरचा लेख शेयर केल्यास नावांसहीत शेयर करावा ही नम्र विनंती)
Repost

11 months ago

रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा.सायकल किंवा पोहायला शिकवताना "हो जमतयं जमतयं..." असं म्हणत कॉन्फिडन्स वाढवतं हळूच हात सोडणारा.

शाळेच्या पहिल्या दिवसी मी कितीही रडत असलो तरी माझा हात पकडून मला बळेबळेच वर्गात बसवणारा.पण शाळा सुटेपर्यंत बाहेर थांबणारा आणि येताना आईस्क्रीमची कांडी देणारा बाबाच होता.

आपल्या कुटुंबासाठी सदैव दरवाज्याच्या बाहेर बुलेटप्रूफ जॅकेट घालून उभा असणारा आणि घराबाहेरची वादळं बाहेरच थोपवणारा बाबाच होता.

प्रत्येक संकटात तुम्ही काही काळजी करू नका,अजून मी खंबीर आहे अस सांगताना त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून घरातला प्रत्येकजण विशाल आधार वडाच्या छायेत निश्चिंत होवून जायचा.

माझ्या पहिल्या पगारातून त्यांना घेतलेला रेडीमेड शर्ट साऱ्या जगाला भाबडेपणाने दाखवत कौतुक करताना न थकणारा बाबाच होता.

स्क्रॅचेच पडून पिवळसर झालेला चष्मा वापरणारे आणि बाटाचा जुना बुट पुन्हा पुन्हा पॉलिश करून वापरणारे बाबा,कॉलेजची भरमसाठ फी भरून येताना खरेदी केलेला लॅपटॉप माझ्या हातावर ठेवत म्हणायचे...
"खूप खूप अभ्यास करा,मोठं व्हा, प्रसंगी टाकीचे घाव सोसा,घराच नांव काढा,स्वाभिमानानं जगा पण सर्वात महत्वाचं केवळ स्वतःसाठी जगू नका आणि चांगला माणूस म्हणून उभं रहा.आपल्या मुलांच्या उद्यासाठी स्वतःचा " आज " सॅक्रिफाईज करणाऱ्या बाबांच्या बोलण्यात खूप खूप आशिर्वादा बरोबरच तळमळ असायची.

आईची तब्येत बरी नसली की,आज ऑफिसमध्ये कुणाचातरी वाढदिवस आहे असं खोटचं सागून डबा न नेता उपाशी राहणारे बाबा ताईनं केलेली बेचव भाजी मिटक्या मारत खात.पण जेवताना भांड्यातली संपत आलेली भाजी दिसली की मस्त पैकी ढेकर देत.

ऑफिसात बॉस बनून ऑर्डर सोडणारे बाबा शाळेच्या वर्गशिक्षिकेने सांगितलेल्या इंस्ट्रक्शन्स अज्ञाधारकपणे नोट करून घेतं.खरंतर बाबा आपल्या नोकरीवर मनापासून प्रेम करायचे.नोकरीला ते आयुष्याची भाकरी मानायचे.पण त्याच बरोबर आजारी असलेल्या आजीसाठी आणि आमच्या शिक्षणासाठी आलेली प्रमोशनची संधी घालवली तरी नाराज व्हायचे नाहीत कारण घरच्यांच्या सुखातचं त्यांना समाधान मिळायचं.

आपल्या मुलांसाठी सुपरमॅन असणारे बाबा ताईच्या तोंडातून निघालेली कोणतीही गोष्ट पटकन जादूने काढायचे.नेहमी नशीबा पेक्षा कर्तुत्वावर बोलणारे बाबा माझ्या नोकरीसाठी आणि ताईच्या लग्नासाठी देवापुढे मनापासून प्रार्थना करायचे.

आपल्या परीसारख्या मुलीसाठी राजकुमार शोधता शोधता झिजलेल्या चप्पलांकडे त्यांच कधीच लक्ष गेलं नाही.ताईच्या लग्न सोहळ्यात गुपचुप कोपर्‍यात उभं राहून मनातल्या मनांत ढसाढसा रडत "काही चुकलं तर पोरीला संभाळुन घ्या"असं दोन्ही हात जोडुन सांगणारे बाबा मिळालेल्या जावयाला देवदूत समजून गावभर मिरवत रहायचे.

आपण केलेल्या चुका मुलांच्या हातून घडू नयेत म्हणून लहानपणी कान पकडून आणि मोठेपणी ज्यास्तीत ज्यास्त मृदूभाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न बाबा करत असतं.

असचं एकदा मी चांगल्या संधीबरोबरच पगारही वाढून मिळतोय म्हणून पहिली नोकरी सोडायची ठरवलं तेंव्हा आयुष्यभर एकाच संस्थेशी एकनिष्ठ रहात काम करणाऱ्या बाबाना थोडसं वेगळं वाटलं.मग मीही थोडीसी बंडखोरी करत बाबाना सांगितलं...
"बाबा तुमचा काळ वेगळा होता पण आता काळ खूप पुढे गेलेला आहे. तुम्ही सिन्सिअर होता,हार्ड वर्कर होता कबुल पण आम्ही स्मार्ट वर्कर आणि ब्रॉड मान्डेड आहोत. तुम्हाला आत्ताच्यातलं काही कळणार नाही".
माझं बोलणं बाबांच्या लक्षात यायच नाही पण काळ बदलतो आहे आणि जेनेरेशन मधला गॅपही वाढत चालला आहे याची त्यांना जाणीव असायची म्हणूनच माझ्या या तारूण्य सुलभ सोईस्कर भूमिकेवर बाबा काहीच न बोलता माघार घ्यायचे.खरंतर मलाही अशा वेळी चुकल्या सारखं वाटायचं आणि मी मनांतल्या मनांत त्यांची माफी मागायचो.

बाबा रिटायर झाले आणि नेमक्या त्याच वर्षी माझं प्रमोशन होवून हैदराबादला पोस्टींग झालं.खरं तर हा चांगला योगायोग घडून आला होता.म्हणूनच मी आई-बाबांना कायमच्यासाठी हैदराबादला नेण्यासाठी आग्रह करत होतो.माझं मनं राखण्या साठी बाबा माझ्या बरोबर आलेही पण केवळ आठवडाभरचं राहिले.मात्र जाताना बजाऊन गेले "पुढच्या वेळी माझ्या बरोबर खेळायला एक छोटासा नातू असला तरच कायमचा रहायला येईन".तसे बाबा अधूनमधून यायचे,आपल्या नातवाकडून स्मार्ट फोनची फीचर्स शिकता शिकता खूप दंगामस्ती करायचे.गुडघ्यात वेदना होत असतानाही घोडा घोडा करायचे आणि नातवाशी खोटी खोटी फायटींग करत त्याच्या नाजूक चापटीने गडाबडा लोळायचे.

मागच्या दिवाळीत घरी गेलो होतो तेंव्हाच बाबांची तब्बेत खालावलेली दिसली पण त्यांना वाईट वाटेल म्हणून काहीच बोललो नाही.

11 months ago

बाप
आज जूून मधला तिसरा रविवार Father's day अर्थातच
बाप दिन
या निमित्तानं वात्सल्य,मातृप्रेम,ममता या वजनदार शब्दांच्या ओझ्याखाली नेहमीच दुर्लक्षित राहीलेल्या पण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे ‍पार पाडणार्‍या बापाच्या प्रेमस्वरूप सागराचा तळ शोधण्याचा प्रयत्न करतोय...
पण खरं सांगू?...
कितीही खोलात गेल तरी हा तळ सापडणं तस कठीणचं कारण...
"बाप हा शेवटी बापचं असतो"
खरं ना........?

बाप

ऑफिसला जाता जाता उंबरा ओलांडतानाच मोबाईलची रिंग वाजली...
"हॅलो...ऽऽऽ मी बोलतोय...
पलिकडून फक्त खोकण्याचा आवाज आला.तशी हातातली बॅग परत टीपॉय वर ठेवत कानाशी मोबाईल घट्ट पकडत आणि स्वतःलाच धीर देत विचारले...
"बाबा खोकला झालायं...?तब्बेत ठीक आहे ना?"

"अरे मला काय धाड भरलीयं,तुझं सगळं ठीक चाललयं ना? फोन असाच सहजच...".
पुन्हा खोकल्याची उबळ आणि फोन कट...

पाठोपाठ ताईचा फोन"हॅलो दादा, बाबांची तब्बेत पुन्हा बिघडलीय,मी आत्ताच ह्यांच्या बरोबर गावाला आलीए..."
घाईघाईनं ताईही फोन बंद करते. ताईला पुन्हा फोन करायच माझं धाडस होत नाही पण झरझरणार्‍या काळजात चर्र...होवून जातं.

आता माझी गाडी गावाच्या दिशेनं चाललेली असते. शेजारीच बायको आणि मुलगा बसलेला असतो.नकळत गाडीचा वेग वाढत रहातो आणि आठवणीचं एकएक पान पलटत रहातं...

समोर बाबांचा चेहरा दिसतो उभ्या आयुष्यात खूप काही सोसलेला तरीही न थकलेला.चेहर्‍यावरच्या सुरकुत्या मध्ये हार-जीत, मान-अपमान, जखमा-घाव,आसू-हसू सारं काही गुंडाळलेला.खूप पावसाळे पाहिलेला. अनुभवाने रापलेला,तरीही शांत,समाधानी आणि कृतार्थ.

लहानपणी मला प्रश्न पडायचा,खरचं कुठूनं आलो मी...?त्यावेळी आजी मला जवळ घ्यायची आणि माझ्या जन्माची गोष्ट सांगायची...
"बाई गं ! त्यावेळी रात्र वैऱ्याचीच होती.काळयाकुट्टं अंधारात वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं. आभाळातल्या ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट पोटात भीतीचा गोळा उठवतं होता आणि घरात पोटातल्या वेदनेनं तुझी आई जमीनीवर तळमळत होती.आख्ख्या गावात एकमेव असणाऱ्या टेम्पोचं चाक नेमकं त्याच दिवसी फुटलं होतं. वीस पंचवीस मैलावर असणाऱ्या तालुक्याच्या थोरल्या दवाखान्यात पोहचायचं कसं? हा मोठा प्रश्न होता.पण तुझा बाबा डगमगला नाही. विनवणी करून त्यानं शेजारच्याची बैलगाडी मिळवली त्यात अलगत आईला उचलून ठेवली.माळ्यावरची जुनी पत्र्याची पानं गाडीच्या दोन्ही दांडक्यावर आडवी टाकून तारेनं करकचून बांधली. पुढून आणि पाठीमागून प्लॅस्टिकच्या कागदाचे तुकडे लावले आणि स्वतः भिजत आईला घेऊन तालुक्याला पोहचला. पाच दिवस दवाखान्याच्या बाहेर बाकड्यावरचं झोपला आणि येताना तू आणि तुझ्या आईला घेऊन आला.सारं जग जिंकून आलेल्या राजा सारखा थाटात वाजत...गाजत...".

खरं तर बाबाचं माझ्यावर खूप प्रेम होतं पण त्याची खोली कधीच लक्षात आली नाही.कदाचित आईच्या मायेत या गोष्टीकडे कधी लक्षच गेलं नव्हतं. अर्थात आई आणि मुलांतील प्रेमाच्या रेसमध्ये बाबा कधीच नव्हते.

लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून जत्रेतल्या गर्दीतून देवदर्शन घेताना बाबांची तोल सांभाळत धडपडणारी पाऊलं कधीच दिसली नव्हती आणि देवाचं दर्शन घेताना आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय हे ध्यानातचं आलं नव्हतं.

आता मागे वळून पहाताना प्रत्येक गोष्टीचा नव्यानंच अर्थ लागतं होता.मी १२ वीला गेलो तेंव्हा बाबांनी फंडा वरचं कर्ज काढून टेरेसवर छोटीसी स्टडीरूम बांधली.अभ्यास करताना बाबांची सोबत असावी असं वाटायचं म्हणून समोरच्या भिंतीवर मीही बाबांचा फोटो लावला होता. माझ्या लग्नानंतर त्याच स्टडीरूमचं बेडरूम झालं.एकदा सहजच भिंतीकडे लक्ष गेल तेंव्हा तिथे बाबांचा फोटो दिसला नाही तेंव्हा त्याबद्दल आईला विचारलं तर ती म्हणाली "परवा खोलीची सफाई करताना बाबांच्याच हातून खाली पडून तो फोटो फुटला म्हणून त्यांनी तो काढून टाकला".

लग्नावेळचीच गोष्ट काही कारणामुळे नवीनच असणाऱ्या आमच्या नवरा-बायकोत वादावादी झाली आणि बायको माहेरी निघून गेली तेंव्हा माझ्या नकळत बाबा तिच्या घरी गेले. आपल्या सुनेची समजूत घालून तिच्या वडिलांना "काळजी करु नका,आता ती माझी लेक आहे"असं भरभरुन आश्वासन देवून आपल्या सुनेला परत घेवून आले.

आपल्या सुनेत ते कायम आपल्या चिमणपरीला शोधत. मुलगी असो की मुलगा,सुन असो की जावई या सगळ्यां साठी बाबांच्या मनात एकाच ठिकाणी जागा होती. बहिणीचा भाऊ कसा असावा.भाच्याचा मामा कसा असावा.आत्या,काका,मावशी यांच्याशी आदराचं आणि जिव्हाळ्याचं नातं कसं ठेवावं हे सारे प्रेमाचे संस्कार बाबांच्या चालण्यात,बोलण्यात आणि वागण्यात दिसायचे.

परीक्षेच्या आदल्या दिवसी गाढ झोपेत असताना कुणाचा तरी डोक्यावरुन हात फिरायचा तेंव्हा झोपेतचं कुशी बदलत समोर पाहायचो तर बाबाचं असायचे आणि न बोलताही त्यांच्या डोळ्यात लिहलेलं "ऑल दि बेस्ट" स्पष्ट दिसायचं.

1 year, 6 months ago

जास्त रागवला होता.लग्नात त्याचे तांबरलेले डोळे अजून सुरजच्या नजरेसमोरुन जात नव्हते.असा प्रेमभंग झालेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकत होता...

whatsapp वर त्याला एक पेंडींग मॅसेज दिसला.तो अजयचा होता,लग्नात केलेल्या गैरवर्तनुकीचा त्याला पश्चाताप झाला होता.मॅसेजमध्ये त्याने सुरजची माफी मागितली होती.दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.सुरज त्याला रिप्लाय देऊन धन्यवाद म्हणाला..जे घडले त्यात अजयचा हात नव्हता... तरीही सुरजवर करणी कोणी केली हा प्रश्न होताच.

त्या सकाळी त्याला अजयचा फोन आला...तो प्रचंड घाबरलेला होता...
"अरे सुरज तुला कळल का..!आपला विनायक गेला.रक्ताची ऊलटी होऊन त्याचा मृत्यू झाला... "

#समाप्त
(काल्पनिक..)
अमित राऊत

1 year, 6 months ago

त्याने भात खायला घेतला.एक घास ऊचलताच तो जोरात किंचाळला.समोरच ताट त्याने पायान लाथाडल.वरुन पांढरा असलेला भात त्याला आतून लाल दिसत होता.त्या भातातून रक्तासारखा लाल द्रव निघत होता.घरातील सगळे धावत आले,सुरज आपले डोके भिंतीवर दणादण आपटत होता.एक मोठ टेंगूळ त्याच्या कपाळावर आल होत.संगीता त्याच्या या अवताराने घाबरली.भावाने त्याला पकडल तोपर्यंत तो बेशुध्द पडला होता.

ती रात्र सर्वांनी जागूण काढली,अर्धवट झोपेत सुरज काहीबाही बडबडत होता.नजरेसमोर त्याचे लग्न...लग्नात अचानक आलेला अजय... त्याचे तांबरलेले डोळे येत होते.वडीलांनी ओळखीचे डॉक्टर बोलवले,त्यांनी दिलेल्या इंजेक्शनने तो झोपी गेला.बाकी सगळ्यांची झोप ऊडाली होती.त्याच्या आजाराचे निदान होत नव्हते,ऊजेड सहण होत नसल्यामुळे तो अंधारातच बसायचा.मधेच रुममधील हालचालींचा कानोसा घ्यायचा,आपल्या आसपास कोणीतरी आहे असे नेहमी त्याला वाटायचे.चार दिवसात त्याने अन्नाचा एकही घास खाल्ला नव्हता.त्याला ताटात अन्नाऐवजी लहान किडे,वळवळणार्या अळ्याच दिसायच्या.जेवण सोडल्यामुळे त्याची तब्येत खालावली.छातीचा पिंजरा दिसू लागला,गालाची हाड वर आली,डोळे खोल जाऊन चेहरा निस्तेज बनला.तो संपल्यात जमा होता,जेवण न केल्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा परिणाम होत नव्हता.जरा डोळा लागला कि त्याला भयानक स्वप्न पडायची आणि तो दचकून जागा व्हायचा.त्याच्या हाताला लावलेली सलाईन डॉक्टरांनी काढली तेव्हा सगळ्यांनी हंबरडा फोडला.सर्वांत वाईट अवस्था संगीताची होती.तिचे लग्न होऊन एक महिनाही झाला नव्हता.

त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांची रिघ लागली होती.मृत्यूपंथाला लागलेला तरुण मुलगा पाहूण सगळेच हळहळत होते.सुरजचा जवळचा मित्र विनायक त्याला भेटून गेला.त्याने संगीताचे सांत्वन करुन तिला धीर दिला.संगीताच्या माहेरची माणस सुरजला भेटायला आली.तिच्या आईवडीलांसह एक जवळचा नातेवाईक आला होता.वडीलांनी त्याला मुद्दाम आपल्यासोबत आणले होते.सत्तरीकडे झुकलेला तो वयस्कर माणूस अंगाने अजून मजबूत होता.अनेक ऊन्हाळे पावसाळे त्याने बघितले होते.या घरात पाऊल टाकताच त्याला वेगळे काहीतरी जाणवले.तो या घरात पाणी सुध्दा पिला नाही.एखाद्या डॉक्टराप्रमाणे तो सुरजंच्या डोळ्यातील बाहुली पाहत होता.त्याच्या हद्याचे वाढलेले ठोके,नाडीची अनियमित गती पाहूण त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला.खिशातून काढलेला लिंबू त्याने सुरजवरुन तीन वेळा ऊतरवून काढला.घराच्या बाहेर आल्यावर तो दगडाने ठेचला.तो लिंबू आतून लाल पडला होता.
"बाहेरची बाधा आहे..."त्यांच्या मागे आलेल्या संगीताच्या वडीलांकडे पाहत तो म्हणाला.

"वाटलच मला सुरजसारखा धडधाकट मुलगा असा सहजासहजी आजारी पडणार नाही... आता काय कराव लागेल आप्पा... "

"सगळ्यांना घेऊन निर्मनुष्य ठिकाणी जाव लागेल... "

"शहराबाहेर अशी जागा आहे... "

"मग आज रात्रीच या...मी तयारी करुन तिकडेच येतो..."अस म्हणत आप्पा निघून जातात.

संगीताचे वडील सुरजला झालेल्या बाधेची सर्वांना कल्पना देतात.त्या शिकलेल्या लोकांना यावर विश्वास बसत नव्हता.पण त्यांनी रात्री शहराबाहेर येण्याच मान्य केल.

रात्री त्या निर्मनुष्य जागी सुरजला घेऊन सगळे जमा झाले.आप्पा काळी वस्त्र घालून अगोदरच तिथे पोहोचलेले असतात.त्यांच्या हातात एक मोरपिसांचा झाडू असतो.सर्वांच्या हातात ते एक काळा धागा बांधतात.सर्वांना खाली बसवून ते एक मंत्र म्हणू लागतात.एक हजार वेळा तो मंत्र म्हणून झाल्यावर सुरजच्या हातात एक काळा धागा बांधतात.हातात असलेला मोरपिसांचा झाडू त्याच्या शरीरावर फिरवतात.लिंबू,मिरची अडकवलेली एक काळी बाहूली त्याच्या वडीलांकडे देऊन घराच्या दर्शनी भागात ती अडकवायला सांगतात.त्यांना वाटेत कुठेही न थांबता सरळ घरी जायला सांगतात...

दुसर्या दिवशी सुरजला वाजणारी थंडी गायब होते.लाल झालेले डोले पहिल्यासारखे होऊ लागतात.जेवणाची चव व्यवस्थित समजू लागते.कोणत्याही औषधाशिवाय तो बरा होऊ लागतो.सर्वांना हा एक प्रकारचा चमत्कार वाटत होता.संगीता फोन करुन आप्पांचे आभार मानते.दोन दिवसातच सुरज बरा होऊन घरातल्या घरात फिरु लागतो.आप्पांनी त्याला काही दिवस घरातच थांबायला सांगितले होते.बाहेरचे जेवण पूर्णपणे बंद करायला सांगितले होते.वडीलांकडून संगीताला असे समजते कि सुरजवर कोणीतरी करणी केली होती.यात त्याचा जीव जाणार होता.विशेष म्हणजे संगीताला मिळवण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केले होते.म्हणून सुरजची अशी अवस्था झाली होती.आप्पांनी ती करणी आपल्या विद्येच्या जोरावर त्याच्यावरच ऊलटवली.सुरजवर करणी करणारा आता त्याचे परिणाम भोगत असेल.त्याची अवस्था सुरजपेक्षा भयानक होणार होती.रक्ताची ऊलटी करुन तो मरणार होता.सुरजला हे समजले तेव्हा तो सुन्न झाला,संगीतावर एकतर्फी प्रेम करणार्यांची संख्या जास्त होती.हे काम कोणी केले ते समजायला मार्ग नव्हता.सुरजच्या नजरेसमोर अजयचे नाव येत होते.हे काम अजयने केले असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती.त्याचे लग्न ठरले तेव्हा अजय

1 year, 6 months ago

बाधा

सुरज आणि संगीताचा प्रेमविवाह होता.दोघे ऊच्चशिक्षित आणि कॉलेज जीवनापासून एकमेकांना ओळखत होते.संगीता दिसायला सुंदर होती,कॉलेजमध्ये तिच्या चाहत्यांची संख्या भरपूर होती.एकतर्फी प्रेम करणारे अनेक जण तिच्या भोवती घिरट्या घालत असायचे.काहींनी तिला लग्नाची मागणी घातली होती.या व्यतिरीक्त अनेक चांगली स्थळ स्वत:हून तिच्या घरापर्यंत येत होती.या सगळ्यांना ती कंटाळली होती.शिक्षण संपेपर्यंत लग्न न करण्याचा तिने निर्णय घेतला होता.

अशातच एका घरगुती कार्यक्रमात तिची सुरजशी ओळख झाली.घराच्या पुजेचे आमंत्रण तिने विनायक नावाच्या एका जवळच्या मित्राला दिले होते.तो सुरजला आपल्यासोबत घेऊन आला होता.विनायक आणि सुरज रुम पार्टनर होते.त्याने दोघांची ओळख करुन दिली,सुरज अतिशय लाजरा होता.एखाद्या मुलीशी बोलायची त्याची ही पहिलीच वेळ होती.संगीताला तो चांगला मुलगा वाटला.कॉलेजला जाता येता नेहमी दोघांचे बोलने होऊ लागले.तिच्याशी बोलताना सुरजची तारांबळ ऊडायची.तो ईतर मुलांपेक्षा वेगळा होता.दोघे एकमेकात गुंतत गेले,कॉलेजमध्ये संगीताची नजर सुरजलाच शोधत असायची.एक दिवस जरी भेट झाली नाही तरी ती बैचेन व्हायची.सुरजची अवस्था तिच्यापेक्षा वेगळी नव्हती.सुरजने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा संगीताने कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला.

कॉलेजचे दिवस संपत चालले होते.तिने सुरजबद्दल आपल्या घरी सांगितले.तिच्या घरातून नकार येण्याचा प्रश्नच नव्हता.संगीताला योग्य जोडीदार मिळाला याचे सर्वांना समाधान वाटले.फायनल ईयरचे पेपर झाले कि दोन्ही घरची मंडळी बैठक घेणार होती.कॉलेजमध्ये ही बातमी पसरली सगळे सुरजचे अभिनंदन करु लागले.पण बर्याच मुलांच्या नजरेत तिरस्कार होता.एकजण तर त्याला खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होता.त्या नजरेने सुरज विलक्षण घाबरला होता.संगीतावर एकतर्फी प्रेम करणार्या त्या मुलाच नाव अजय होत.संगीताच्या चाहत्यांच्या यादीत त्याचे नाव सर्वांत वर होते.

फायनल ईयर संपले महिणाभराने दोघांचे थाटात लग्न झाले.कॉलेजमधील सर्व मित्र मैत्रीणी लग्नाला ऊपस्थित होते.विनायकच्या खांद्यावर विशेष जवाबदारी होती.संगीतावर एकतर्फी प्रेम करणारा अजय अचानक मंडपात आला.त्याचे तांबरलेले डोळे पाहूण सुरजच्या काळजात धस्स झाले.अभिनंदना साठी त्याने सुरजचा हात हातात घेतला.त्याने तो एवढा जोरात दाबला कि त्याची नख सुरजच्या तळव्यात रुतली.तळहाताची चामडी आणि मांस ओरबाडून अजयने त्याचा हात सोडला.वेदनेने सुरजच्या डोळ्यात पाणी आले.सर्वांदेखत हा प्रकार घडला होता.विनायकने अजयला मागे ओढले त्याला ढकलून तो मंडपातून बाहेर पडला.या घटनेची चर्चा लग्न संपेपर्यंत चालू होती.लग्न पार पाडले पण सुरजची ती जखम लवकर भरुन आली नाही.जखम चिघळली त्यात रक्त पू जमा झाले.

लग्न होऊन दोन आठवडे ऊलटले.आतापर्यंत सर्व व्यवस्थित चालले होते.संगीता नवीन घरात चांगली रुळली होती.सुरजचे नोकरीसाठी प्रयत्न चालू होते.एका कंपनीत त्याने मुलाखत दिली होती.कामावर रुजू राहण्याबाबत कधीही कॉल येणार होता.सुरजचे कुटूंब मोठे होते,आईवडील,आजी आजोबा,भाऊ असे सगळे एकत्र राहायचे.त्या रात्री सर्वजण जेवायला बसले.संगीता आणि सुरज शेजारी बसले होते.अचानक सुरजला गरगरल्या सारखे झाले.क्षणभर त्याची दृष्टी गेली डोळ्यासमोर अंधारात पसरला.त्याने पहिला घास खाल्ला तसा त्याला जोरात ठसका लागला.संगीताने दिलेल्या ग्लासातील पाण्याचा ऊग्र वास आला.त्याला ऊलटीच व्हायची बाकि होती,एखाद्या नाल्यातून यावी अशी दुर्गंधी त्या पाण्याला येत होती.ताटातील अन्नाची चव कडवट आणि शिसारी आणणारी होती.बाकिचे गप्पा मारत जेवत होते.सुरजला मात्र एक घास सुध्दा गिळवत नव्हता.ताटात भाताच्या जागी वळवळ करणार्या अळ्या दिसू लागल्या.लहान लहान घास तो बळेच पोटात ढकलत होता.अगदीच कमी जेवण करुन त्याने हात धुतला.छातीत जळजळ चालू झाली,रात्री त्याला क्षणभर सुध्दा झोप लागली नाही.सकाळी त्याचे डोके विलक्षण ठणकू लागले.अंगावर जागोजागी लहान फोड ऊठले.भर ऊन्हाळ्यातही थंडी वाजू लागली.दुपारी तो भावासोबत दवाखान्यात गेला,बाहेरील प्रकाशाचा त्याच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला.तपासणीत डॉक्टरांना विशेष काही जाणवले नाही.दोन दिवसाची औषध त्यांनी लिहून दिली.बरे वाटेपर्यंत आराम करायला सांगितला.घरी येईपर्यंत त्याचे डोळे एकदम लालभडक झाले.ही एका भयानक प्रकाराची सुरुवात होती.

त्या रात्री तो जेवायला आलाच नाही,आपल्या रुममध्ये अंगाभोवती चादर लपेटून बसला.डोळ्यांना त्रास होतो म्हणून त्याने लाईट लावली नव्हती.त्याचे शरीर थंडीने कापत होते,दातावर दात वाजत होते.त्याचा "कट..कट.."आवाज घुमत होता.मधेच त्याची दातखिळ बसायची.एक प्रकारच्या अनामिक भितीने त्याच्या मनाचा ताबा घेतला.आपल्या आसपास कोणीतरी आहे असे त्याला वाटू लागले.संगीता त्याचे जेवण घेऊन आली.पण त्याने जेवण करण्यास साफ नकार दिला.कारण जेवण तर त्याला जाणारच नव्हते.काही खाल्ल तरी लगेच ऊलटून पडत होत.तिने आग्रह केला तेव्हा

1 year, 6 months ago

तिची आईच तिला म्हणाली,"रेप झाल्यावर आता दिवसही राहिलेत कोण स्वीकारतील तुला,..?हे लग्न कर म्हणजे तू सुखी आणि आम्ही सुखी,.."आपली आईच असं म्हणते म्हंटल्यावर पाठिंबा आता कोणी देणार नाही तिने निर्णय घेतला आणि ती घरातून पळाली स्टेशन गाठलं,..मिळेल त्या रेल्वेने नव्या शहरात आली,..रेल्वेच्या खिडकीत बसून आयुष्याच्या फ्लॅशबॅक परत उजळणी करून घेतला,..तिला आपल्या नात्यातले बरेच जण आठवले जे लेकरू व्हावं म्हणून नवस,ट्रीटमेंट सगळं करतात,..आणि आपल्याला का ही शिक्षा,..खिडकीतून उदास होऊन ती सगळं आठवत होती,..पण हीच खिडकी तिला नवं आकाश,नवे किनारे दाखवत होती,..रेल्वेत आलेले अपंग,आंधळे तिला संघर्ष असून जगण्याची आस बाळगून कस जगावं हे शिकवत होते,..तिने ठरवलं,..नव्या शहरात मोठ्या घरांसमोर पोळ्याची कामे मागितली दिवसात वीस तीस घर फिरली तेंव्हा कुठे दोन काम मिळाले,..हळूहळू जम बसला नंतर दहा घरच्या पोळ्या करते शिवाय शिक्षण पूर्ण केलंय,.."
माने म्हणाले...मावशीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी म्हणालो मावशीला हिम्मत करून,.."माझ्यासोबत लग्न करशील का विचार तिला,..?"
माझ्या प्रश्नावर मावशीने आ केला,..अरे जात पात माहीत नाही आणि रेप झालाय तिच्यावर हे ऐकलं ना तू,..?मी उदास हसत म्हणालो,"माझी पहिली बायको जातीतली,रेप न झालेली होती पण पवित्र बंधातून जन्म दिलेल्या माझ्या मुलाला सांभाळलं नाही,..हिने वाईट कृत्यातून झालेलं मुल आईच्या मायेने सांभाळलं ना,..हिच्या मनाची खिडकी मजबूत आहे,..मावशी तू विचार तिला मी तिच्या मुलीसह स्वीकारतो तिला,.."
मावशीने विचारलं ती भेटायचं म्हणाली,..भेटीत एवढंच म्हणाली,..."मी स्वीकारेल तुमच्या मुलाला पण हा नवा संघर्ष मला पेलवेल अस नाही तुमची साथ लागेल,..मी चटकन म्हणालो,"माझी साथ तर असणारच,.."ती हसून म्हणाली,.."एक वेगळी साथ,..आयुष्याच्या प्रवासात मला रेल्वेच्या खिडकीत बसून मनाच्या आतली खिडकी उघडता आली,.. आपल्या ह्या संसारात मी कधी उबगले तर मला आवडेल त्या खिडकीत बसून एक असा प्रवास करायला जो परत मला माझ्यातली मी शोधून देईल..."तिच्या वाक्यावर मी म्हंटल आणि तू हे सगळं सोडून दूर कुठे निघून गेलीस तर,..ती खळखळ हसत म्हणाली,..अहो नाही जाणार मनाची खिडकी एक चौकट बाळगून असते आपल्या भोवती,..ती असते जबाबदारीची त्या जबाबदारीचा कधीतरी शीण आला की अश्या प्रवासाच्या खिडकीतून त्या चौकटीला बघायचं मग ती आपल्याला तो निसर्ग दाखवते जो सतत संघर्ष करत जगत असतो,..ते अवकाश दाखवते जे आपल्यावर आशीर्वादाची शिंपण करत असत,..फक्त गरज असते नवं होऊन त्या खिडकीत जाऊन डोकावण्याची,..जबाबदाऱ्या टाळायच्या नसतात फक्त त्या स्वीकारायला आपली ताकद अश्या प्रवासाने वाढवायची असते,..मला हा प्रवास कुठलंही कारण न विचारता तुम्ही करू देणार आहात का माने मग मी तयार आहे,..तुमच्या आयुष्याच्या खिडकीत माझ्या लेकीसह येण्यासाठी,.."
कॉफी संपली होती,..मानेची love स्टोरी सम्पली,.. पाटणकर आश्चर्याने बघत होता,...असंही जगतात माणस,..?त्याच्या प्रश्नावर हसत माने म्हणाले,"आम्ही तर जगतोय,..आता तूच विचार कर,..स्वतःवर झालेला अत्याचार,त्यातून झालेलं लेकरू,त्यात माझं मतिमंद मुल ,माझे आई बाबा,..हे सगळं ती आता समर्थपणे पेलते,..अशीच कधीतरी चिडते,उबगते आणि मग तास,दोन तास सगळं सोडून निघून जाते आज गेली तशी,..त्यावर पाटणकर म्हणाला,"मग घरी सगळे विचारात पडत असतील ना,..?"
माने म्हणाले नाही तिने सगळ्यांना अश्या खिडक्या शोधायला शिकवलं आहे,..माझा मुलगा चित्रात अश्या खिडक्या शोधत बसतो,..मुलगी गाण्यात शोधते,.. आई बाबा घराच्याच खिडकीतून त्यांच्या विचारांची खिडकी शोधतात,.. आणि त्यांना सगळ्यांना हिची खिडकी माहीत आहे,त्यामुळे तेवढा वेळ सगळे ऍडजस्ट करतात,..पाटणकर म्हणाला,"आणि माने तुमची खिडकी,..?"माने हसत म्हणाले ,"अरे ही माझी बायकोच माझी खिडकी आहे,..,..तिने तिचं माझं नातं इतकं छान जोपासलय की मला तिच्या डोळ्यात माझी खिडकी सापडते,.. अरे तुटून गेलेली स्त्री जर एवढया ताकदीने जगते तर आपण काय,..अस म्हणत माने निघाले,... काही वेळात परतीच्या ट्रेनने मिसेस माने उतरल्या,..खरंच दोघांचं बॉंडिंग जबरदस्त होतं,.. दोघांनी फक्त डोळ्यात बघितलं,..त्यांनी हात पुढे केला तिने तो पकडला,.. तिकडे ट्रेन निघाली इकडे ही जोडी निघाली,...पाटणकर मनोमन म्हणत राहिला,..मनाच्या खिडक्या योग्य मिळाल्या की रेल्वेच्या सुखकर प्रवासासारखा आयुष्याचा प्रवास सुखकर होत असेल.
वाचकहो अश्याच कथांचे नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे,.."टांगा"हवे असल्यास 9822875780 ह्या no वर व्हाट्सप करा,..किंमत 150 रु आणि टपालखर्च,..

©स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)औरंगाबाद

1 year, 6 months ago

#खिडकी
©स्वप्ना...
रिक्षावाल्याने बरोबर स्टेशनच्या दारासमोर रिक्षा उभी केली..त्याला हातात चुरगाळत घेतलेल्या नोटांपैकी एक नोट देत पळतच ती तिकीट खिडकीकडे पळाली,..आता कोणती ट्रेन उभी आहे,..?तिचा प्रश्न ऐकून आपल्या नाकावरच्या चष्म्यातून बघत तो म्हणाला,.."तासाभराच्या प्रवासाची ह्या पुढचा ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे,...मला ना प्रवासाला जायचंय,.. मला द्या ह्याच ट्रेनच तिकीट,..
त्याने हसत पिसीवर टायपिंग केली,..मॅडम हीच ट्रेन परतीची आहे तासाभरात ते पण देऊ का,..?त्याच्या ह्या प्रश्नावर ती म्हणाली,"म्हणजे परत येऊच का,..?तिथून पुढे दूर निघून जाणारी ट्रेन असेल ना,..तो हसला,.."किती दूर जाता मॅडम,..कुठेही जा पळसाला पान तीनच,.."
ती आणखीनच चिडली,"कुठे तरी सापडेल एक पानाचं पळस,.."
तो म्हणाला,"काय कामाचं ते एक पानाचं पळस,.. एखादा दिवस आवडेल तुम्हाला,..परत वाटेल नकोच आपलं साधंच बरं नेहमीच,.."एवढं बोलत त्याने तिकीट तिच्या हातात दिलं,.. म्हणाला,"खास विंडो सीट येता जाता,..अशी खिडकी जी बाहेर डोकवता डोकवता आतही डोकवायला लावते,..प्रवासातली खिडकी,.."
त्याच्या बोलण्यावर डोळ्याच्या कोपऱ्यातून रागाचा कटाक्ष टाकत ती पाळली,..दादरा चढताना ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे बघतच होता,..त्याने बदमाशपणाने अभिमान मधल्या अमिताभसारखं बोट ओठाजवळ नेत तिला डोळ्याने खुणावलं,.. तशी ती चिडून हात उगरत पळाली.
हे सगळं बघणारा शेजारचा पाटणकर उठून त्याच्या जवळ आला,..त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाला,"काय हो ओळखीची आहे का,..?"
हसत चष्मा नाकावर सरकवत तो म्हणाला,"शी इज मिसेस माने,.."
पाटणकर आ करून बघत राहिला,..अरे तेच म्हणतो मी तू त्यांना नाव न विचारता तिकीट दिलं,.. तेंव्हाच वाटलं,..पण अरे त्या गेल्या कुठे,..?
खिडकीशी भेटायला,..असं माने म्हणताच पाटणकर ओरडला,..what काय म्हणाला,..खिडकीला भेटायला,..?म्हणजे काय,..?
चल कॉफी घेऊ आपण,..ए जोशी जरा काऊंटरवर लक्ष दे आम्ही आलोच,.. तसंही आता तुम्ही तिघे आहात...
माने आणि पाटणकर कॉफी घेण्यासाठी आले,..माने म्हणाले,.."कस आहे ना दोस्ता, आपण ह्या आयुष्याच्या प्रवासात पळत असतो,...जे वाट्याला आलं ते आपल्या परीने रडत,कुढत, स्वीकारत,चिडत आयुष्य जगत असतो,..खरंतर प्रत्येकाला गरज असते,..रेल्वेची खिडकी पकडून मागे पळणाऱ्या झाडासोबत आपलं आयुष्य मागेही कसं होतं हे कधीतरी बघण्याची,...म्हणजे त्या खिडकीत बसून आपल्या मनाच्या आतल्या खिडकीत डोकावण्याची,..कधीतरी असं वाटलं की हे असं करायचं,..मग ती जरा रिलॅक्स होते,.. मुळात तिला आयुष्याने फार त्रास दिला आहे,.. तरीही मनाला सावरत ती आज इथपर्यंत आहे,..मला साथ देते मग मलाही तिला अश्या प्रवासाला जाऊ द्यावं वाटतं,.. म्हणजे आम्हीच हा मार्ग शोधलाय आमच्या जगण्यात,..कारण दुःखाची तीव्र किनार आहे आयुष्याला,..मग त्यासाठी स्वतःला खम्बीर करत राहायचं,..डोकवायच शांत होऊन आतल्या आत,.."
हे सगळं बोलताना नकळत पाणी आलं मानेच्या डोळ्यात त्याने ते पुसण्यासाठी चष्मा काढला,..रुमालाने डोळे पुसताना तो म्हणाला,"तुला माहीत आहे ना हे माझं दुसरं लग्न,..पहिल्या बायकोपासून मला मुल झालं पण ते मतिमंद जन्माला आलं आणि तिने चक्क मला घटस्फोट दिला,..असलं मुल असलं आयुष्य मी जगूच शकत नाही म्हणत तिने त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली,..शेवटी मी तिला मोकळं केलं,..आता फार मोठा प्रश्न माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांचा होता,..तो मतिमंद नातू,घटस्फोटित मुलगा सगळंच त्यांच्या इझी गोईंग आयुष्याच्या विरुद्ध होतं,.. त्यांना हे सगळं वेगळंच वाटू लागलं त्यामुळे ताण घेऊन त्यांना आलेले अटॅक,.. त्यांची उतारवयात वेगळीच परीक्षा,..पहिल्यांदा मला जाणवलं फक्त पैसा असून उपयोगाचा नाही,..खम्बीर साथ आवश्यक आहे जगण्यात,..पण लग्नाच्या बाजारात आता माझ्याशी, माझ्या पैश्याशी,नोकरीशी लग्न करायला बरेच जण तयार होते पण ह्या मतिमंद मुलाच्या बापाशी कोणाला लग्न करायचं नव्हतं,..मला आता फक्त मला सुख देणारी बायको नाही तर माझ्या आई वडिलांची आणि माझ्या मुलाची आई होईल अशी जोडीदारीण हवी होती,.. माझी ही अपेक्षा अवास्तव होती,..पण मन कुठेतरी शोधत होतच कारण हे सगळं आयुष्य एकट्याने जगण्याची हिम्मतच नव्हती माझ्यात,..
मध्ये असाच माझ्या मावशीकडे कार्यक्रमात गेलो होतो,.. तिथे ही भेटली,..मनाने उगाच कौल दिला हीच जिला आपण शोधतोय,.. मावशीकडे पोळ्या करायला येत होती,..सहज चौकशी केली तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली,..तिच्यावर रेप झाला होता.. कॉलेजमधल्याच मुलांचं कृत्य,..प्रेम म्हणत फसलेली ती,..रेप झाला म्हणताच घरच्यांनी गदारोळ केला,..लगेच जख्खड म्हाताऱ्यासोबत लग्न ठरवलं,.. तो पैसे देणार होता म्हणून घरच्यांनी तिला विचारलं नाही,..

1 year, 6 months ago

'पण असा विचार करून आपण फटाके फोडले तर प्रदूषण होणारच ना? आणि फटाके उडवून काय मिळतं?'- मेहुलने तोंड वाकडं करत उत्तर दिलं.

'एरव्ही डायट पाळताना मध्येच एखादा चमचमीत पदार्थ आपल्या समोर यावा आणि आपण तो खावा त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? क्षणिक आनंद? जीवनाचा तो क्षण जगल्याचे समाधान? बरोबर? आणि ती चिटिंग पचवायला आपण पुढे जोमाने व्यायाम करून जास्तीच्या कॅलरी कमी करतो. बरोबर?'

'हो. पण त्याच इकडे काय?'

'दिवाळीचे दिवस तीन. तीन दिवसांत चिटिंग म्हणून फटाके फोडायचे आणि उरलेले दिवस व्यायाम समजून जास्तीची झाडं लावायची, वर्षभर जगवायची.'

'इतकी झाडं लावायला जागा कुठे आहे?'

'मग व्यायाम बदलायचा. जमेल तितकी झाडे लावायची. गरज असतील तितकीच इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरायची. शक्य असेल तेव्हा तेव्हा सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. प्लॅस्टिकचा वापर टाळावा. एवढं केलं तरी प्रदूषण थांबेल ना?'- बाब्या अगदी निर्विकार चेहऱ्याने प्रश्न विचारत होता.

'हम्म. हो. पण हे सांगायला इथे आणायची काय गरज?'

'मी तुम्हाला तिथे चाळीत सांगितलं असतं तर तुम्ही मला धुडकावून लावलं असतात. पण इथल्या गरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमच्या मनाची झालेली घालमेल तुम्हाला समजवताना कामी आली. असं सणाच्या दिवशी घरच्यांना वाईट वाटेल असं बोलू नये दादा. तुम्हाला किमान कुटुंब आहे. त्याला जपा.'- बाब्या डोळे पुसत बोलत होता.

'तुम्ही इथेच उभे रहा, मी आलोच एक पाच मिनिटांत.'- एवढं बोलून मागे वळून घराकडे धावत सुटला होता. बाब्या तिथेच उभा राहून मुलांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता.

पुढच्या पंधरा मिनिटांत अख्ख परब कुटुंब तिथे आले होते. सोहमच्या हाती परब काकांनी आणलेले फटाके होते. मेहुलने आवाज देत झोपडपट्टीवाल्या मुलांना जवळ बोलवले होते. प्रत्येकाच्या हाती काही फटाके देऊन त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे फटाके उडवण्याचा आनंद घेतला होता. सारेजण खुश होते. परब काका आणि काकू कित्येक वेळा बाब्याजवळ येऊन त्याला धन्यवाद देऊन गेले होते.

मुलांचा आनंद पाहून मेहुल अधिक फटाके आणायला निघाला तसे बाब्याने त्याला अडवले होते.

'बस झालं दादा. आता अजून नको. जगली ती पोरं. आता अजून आनंद दिलात तर अतिरेक होईल. आणि अतिरेक झाला तर त्यांचा विवेक संपेल.'- बाब्या कसल्याशा दुःखद आठवणीने कळवळून बोलत होता.

'बाब्या, तुला एवढं सगळं समजतं. मग तू इथे?'

'माझं पण कुटुंब होतं दादा. अशाच दिवाळीच्या वेळी मी बाहेर होतो. वस्तीतल्या पोरांनी फटाक्यांचा हैदोस मांडला होता. रॉकेट कसेही उडवत होते. अशाच एका दुर्देवी वेळेला एक रॉकेट घुसले ते थेट आमच्या घराच्या केरोसीन कॅनवर आदळले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. मी घरी पोहचेपर्यंत ऐन दिवाळीत माझ्या आयुष्याचं मातेरे झालं होतं. संपलं होतं सगळं.'- बाब्या आता हुंदके देत रडू लागला होता.

'तरीही तुम्ही, फटाके?'

'मी म्हटलं ना, अतिरेक वाईट. गोडाची शरीराला गरज असते पण अतिगोड म्हणजे मधुमेह तसंच काहीसं.'- बाब्या एखाद्या योग्याप्रमाणे बोलत होता.

शेवटी सर्वांना त्याच बोलणं पटलं तसं, मेहुलने वस्तीतल्या मुलांना दुकानातून चॉकलेट्स घेऊन देऊन निरोप दिला होता.

परब कुटुंबीय परतले तरी बाब्या मात्र तिथेच घुटमळत होता. अजून एका मेहुलच्या शोधात..

-समाप्त
©® मयुरेश तांबे.

1 year, 6 months ago

#बाब्या

देसाई चाळ आज दिपावली निमित्ताने छान सजली होती. दरवर्षीप्रमाणे चाळीत सर्वांनी सारखेच आकाशकंदील लावले होते त्यामुळे चाळीची शान अजूनच खुलून दिसत होती. राण्यांची लेक आणि सून रांगोळी काढण्यात सराईत होत्या त्यामुळे आज पहिला दिवस म्हणून चाळीतल्या पंधरा खोल्यांची त्यांच्याकडून रांगोळी काढून घेण्यासाठी चढाओढ सुरू होती अन विशेष म्हणजे त्या दोघीही न कुरकुरता आपली कला मुक्तदिलाने सगळीकडे समान मांडत होत्या. त्यांच्या रांगोळ्या पाहून कुण्या आजीची बोटे आपसूक कडकडा मोडली जायची आणि कोणाच्या तोंडून कौतुकाची दाद बाहेर पडत होती.

'व्वा! मस्त रांगोळी आहे ओ'- खांद्यावर विरलेला शर्ट आणि जागोजागी ठिगळं लावलेली हाल्फ पॅन्ट घातलेला बाब्या चाळीत प्रवेश करता करताच बोलला.

ऐन सणाला बाब्याला तसं पाहून राणे कुटुंब तोंड वाकडे करत दरवाजाआड गेलं होतं. त्यांच्या दुर्लक्ष करण्याचा विषाद वाटून न घेता बाब्या चाळीतल्या घरांना केलेली रोषणाई डोळ्यांत साठवत पुढे पुढे सरकत, परबांच्या दारी पोहचला होता.

'गे परबीन माय!'- बाब्याने नेहमीच्या टोनमध्ये परबकाकूंना आवाज दिला.

चाळीआजूबाजूच्याच झोपडपट्टीमध्ये राहणारा बाब्या कधीकाळी भीक मागत मागत एकदा देसाई चाळीत शिरला होता. त्याचा अवतार पाहून काहींनी अक्षरशः हकलवून लावलं तर काहींनी नाक मुरडत एक-दोन रुपये त्याच्या हाती टेकवले होते. फक्त परब काकूनीं त्याला घरातल्या गरमागरम चपात्या आणि भाजी खाऊ घातली होती आणि तेही दरवाजाजवळ खुर्चीत बसवून. त्या दिवसापासून बाब्या आणि परब कुटुंबियांचे चांगले जमले होते. परबांची काही कामे असतील जसे की दुकानातून वाण-सामान आणणे, दळण आणणे अशी कामे बाब्याला हक्काने सांगितली जात आणि त्याबदल्यात बाब्याला कधी खाण्याचे जिन्नस तर कधी पैसे दिले जात होते.

'परबीन माय.'- बाब्याच्या तिसऱ्या हाकेलाही उत्तर आले नाही तसा बाब्या मनोमन खजील झाला आणि परत जाण्यासाठी मागे वळलाच होता की दरवाजा उघडला गेला होता आणि दारात परबकाकू उभ्या होत्या. पाणावलेल्या डोळ्यांनी अन दुखावलेल्या चेहऱ्यांनी.

'बाबा, पण तुम्ही कशाला उगीच फटाके आणलेत? गरजच काय होती? अहो, मी इकडे सोशल मीडियावर फटाके टाळा, प्रदूषण टाळाच्या पोस्ट करतोय आणि तुम्ही सोहमला थेट फटाके आणून दिलेत? अहो, माझी ऐपत नव्हती का त्याला फटाके आणून द्यायची?'- परबकाकूंचा मुलगा वडिलांशी तावातावाने बोलत होता.

परब काकूनीं हातानेच बाब्याला दरवाजात थांबवलं आणि त्या घरून फराळ घेऊन आल्या. त्या येईपर्यंत बाब्याला झाला प्रकार लक्षात आला होता. तोही निमूटपणे फराळ घेऊन माघारी परतला होता.

संध्याकाळ होत आली तसे आसमंतात फटाक्यांचे आवाज उमटू लागले होते. छोटे-मोठे सारेजण रस्त्यावर होते. देसाईचाळीच्या मैदानातही चाळीतले लोक फटाके फोडत होतेच. अशावेळी अचानक बाब्या तिथे आला आणि थेट परबांच्या घरी जाऊन धडकला होता.

'मेहुल दादा. गे परबीन माय, मेहुल दादा आहे का?'- बाब्याने आज पहिल्यांदाच परबकाकू सोडून दुसऱ्या कुण्याची विचारपूस केलेली पाहून परब कुटुंबीय चपापले होते.

'हा, बोला काय काम आहे?'- मेहुलने बाहेर येत विचारले.

'दादा, थोडं अर्जंट काम होतं. माझ्यासोबत मोजून पंचवीस पाऊलं याल का? काहीतरी महत्वाचं दाखवायचं आहे.'

'मला नाही वेळ. आणि मला काय दाखवायचं आहे?'

'दादा, नाही म्हणू नका प्लिज. तुमच्या नजरेतून खूप जणांना दाखवायचं आहे. प्लिज. मी.. मी पुढचे दहा खेप तुमची काम विनामोबदला करेल. पण आता चला.'- बाब्या हात जोडून आर्जव करू लागला तसे नाईलाजाने मेहुल त्याच्या पाठोपाठ निघाला होता.

काही अंतर चालताच एक झोपडपट्टी सुरू झाली होती. त्याआधी असलेल्या मैदानात आजूबाजूच्या परिसरातील मुले फटाके फोडत होती. झोपडपट्टीमधली बारकी-मोठी मुले बाजूलाच एका कोपऱ्यातून ते फटाके पाहत होते. एखादं रॉकेट उंचावर गेल्यावर, फुटल्यावर रंगाची उधळण करायचे आणि ते पाहून एखादा बारका आनंदाने उड्या मारत टाळ्या पिटायचा आणि मग बाकीचे मुले त्याला दरडावून शांत करायचे. फटाके उडवून मुले दमली की काही वेळ विश्रांतीसाठी घरी जाऊन येत. त्या वेळेत झोपडपट्टीमधील मुले मैदानात धाव घेऊन लगबगीने शोध घ्यायची. न फुटलेल्या फटाक्यांचा आणि उसन्या आनंदाचा. असे फटाके गोळा करून ते मग फोडायचे आणि त्यात समाधान मानायचं. मघासचा बारका आता वात पेटवण्यासाठी हट्ट करायचा मग छोट्यातला छोटा फटाका त्याला देऊन शांत केलं जात होतं. मेहुल एका कोपऱ्यात उभं राहून हे सारं पाहत होता. समोर चालू आहे ते चूक की बरोबर याच द्वंद्व त्याच्या मनात सुरू झालं होतं.

'दादा,आजच्या घडीला निव्वळ भारतात १६ मेट्रिक टन इतका ई-कचरा तयार होतो. ई-कचरा म्हणजे जुने मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे. मग प्रदूषण फक्त फटक्यांनीच होत असेल का?'- बाब्याने शांतता भंग केला होता.

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago