Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

Description
विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇
ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद @ashucpthoughts
Admin
वैष्णवी खलसे @VKhalse_6850
ओम शेळके @Ommshelke
सुनंदा पोखरकर @Mukta323
विशाखा इंगोले @VSI22
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

3 weeks, 1 day ago

मला हवंय एक बी
पुस्तकांच्या झाडाचे
त्याच्या अंकुरात असतील पानच पान...
जगण्याचं होईल गाणं...
त्यांच्या फांदया वर
फुटतील असंख्य ग्रंथालये
अन वाचकांचे थवे
विसांवतील त्यांच्या छायेत...
त्यांची फुले... गीते अन कविता
अन त्या खाली लिहिल्या जातील
कित्येक संहिता...
खरंच
एक पुस्तकांच झाड
लावायला हवे...
उद्याच्या अंगणात
उद्या साठी.
शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ

3 weeks, 1 day ago

✍️ निर्णय....!!@@

काळ कधी कोणासाठी थांबत नसतो... उद्या, आज आणि काल ठरलेला असतो... गेलेली वेळ पुन्हा येत नसते.. गेलेली व्यक्ती पुन्हा येत नसते... गेलेले दिवस पुन्हा येत नसतात... एकदा घेतलेले निर्णय पुन्हा घेता येत नसतात, अनेकदा, निर्णय चुकतात... अनेकदा, निर्णय फसतात..... मात्र कधी कधी नियती, गेलेला निर्णय नव्याने घेण्याची संधी पुन्हा देते.. अशा. वेळी मात्र ती ओळखून... तिचे सोने करता आले पाहिजे..!!@@
सुप्रभात..!!@@🙏

🌹🌹 @@!!..."स्पर्श"...!!@@ 🌹🌹

3 weeks, 2 days ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहून पूर्ण केलं तेव्हा त्यांनी एक गोष्ट आर्वजून सांगितली होती की मी संविधान जरी खूप उंच दर्जाचं लीहल , परंतु त्याला चालविणारे शासनकर्ते जर योग्य नसतील तर त्या संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा काहीच उपयोग होणार नाही . म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत तुम्ही एक शासन करती जमात बना . कारण देशाचा भविष्याचा विचार करत असताना त्यांनी सांगितलं होत की तुमचं एक मत या देशाचं उद्याच भविष्य ठरवत असत .
म्हणुन प्रत्येकाने आपल्या मताचा योग्य उपयोग करा . आज जरी तुम्हाला त्या ऐका मताची किंमत 500 ते 1000 रुपय मिळत असेल परंतु येणारे 5 वर्ष तुम्हाला त्या 500 किंव्हा 1000 हजाराची किंमत मोजावी लागते . मतदान करणे हे भारतातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रतेक व्यक्तीचा अधिकार आहे आणि हा अधिकार तुमच्या पासून कोणीच हिराऊ शकत नाही . भारतातील लोकसभेच्या चालू झालेल्या निवडणुकी द्वारे आपल्या देशाचे येणाऱ्या 5 वर्षाचे भविष्य ठरवले जाणार आहे . म्हणुन नागरिकांनो आज तुम्ही तुमचाच नाही तर संपूर्ण देशाच्या उज्वल भविष्याचा विचार करून मतदान करा .

दिव्या आत्माराम सोनोने......🙏

4 weeks, 1 day ago

मैत्री,दोस्ती हे असे नाते आहे ज्या ठिकाणी  दोन वेगवेगळ्या जमिनीच्या प्रदेशाला जोडणाऱ्या मजबूत रस्त्यासारखी असते.जी विश्वास,समज आणि आपुलकी ह्या बाबींवर तिची रचना होते. हे एक रक्तच्या नात्यापलीकडचं बंधन आहे जे जीवनाच्या प्रवासाला एक वेगळाच आकार देत असते.
    आपले खरे मित्र ते नव्हे जे फक्त सुखाच्या,भरभराटीच्या क्षणी जवळ असतात,खरे मित्र ते असतात जे अडचणीच्या,दुःखाच्या आणि आधाराच्या क्षणांचे भागीदार असतात.खरी मैत्री ही एक दुर्मिळ रत्न आहे,जी मिळवणे,कमवणे ह्या काळात कठीण आहे.खरे मित्र ते असतात जे आपल्यापासून दूर जरी असले तरीही नेहमी जवळच असतात,जशी जेवणाला मीठा शिवाय चव येत नाही,तसे जीवन मित्रांशिवाय पूर्णच होत नाही.जीवनात अनेक नवीन नवीन मी दोस्त मिळत जातात,पण सर्वांमध्ये काहीतरी खास असतं हे नक्की.कृष्ण सुदामा,छ.शंभूराजे व कवी कलश,श्री राम व सुग्रीव,कर्ण व दुर्योधन,धोनी कोहली ह्या सारखे अनेक निष्ठावंत मैत्रीचे उदाहरणे इतिहासात प्रसिद्ध आहेत.
    परंतु आजकाल खऱ्या मैत्रीचा उद्देश बदलत जात आहे,आजच्या काळातील मैत्री म्हणजे पैश्याची गरज पडल्यास पटकन मदत करणारा,मोबाईल च रिचार्ज संपल्यास 1GB च इंटरनेटपॅक टाकणारा,चहा पाजवणारा म्हणजे आपली खरी मैत्री इथपर्यंतच आपण मैत्रीच्या सीमा मर्यादित करत आहोत,खरी मैत्री ही ह्या पलिकडची असते.ह्या जगात रक्तपलिकडच सर्वात पवित्र नात म्हणजे मैत्री अश्या मैत्रीत स्वार्थ नसावा,मोह नसावा,पारदर्शकता हवी.आपण बाहेर असलो आणि आपल्या आईला दवाखाण्यात ने म्हणून सांगणे लागत नाही म्हणजे ती खरी मैत्री.चेहरा,राज्य,गाव, पैसे,स्वार्थ पाहून केलेली मैत्री कधीच जास्त काळ टिकत नाही.मित्रांची quantity पेक्षा qualtily महत्वाची असते.खरा मित्र तुमच्यासोबत नेहमी रबरसारखा असतो जो तुमच्या चुकांना सुधारत असतो.तुमचा आनंद ज्याचात आहे,तिथेच त्याचा आनंद समजतो.आपले यश पण तो साजरे करतो.
   खऱ्या मैत्रीची किंमत तेव्हा कळते जेव्हा जेव्हा आपले जुने मित्र शिक्षणानुसर,वेळेनुसार दूर दूर जातात.जेव्हा अश्या जुन्या मित्रांशी खूप दिवसाने अनवधानाने संवाद होतो त्या क्षणांचा आनंद व्यक्त करणे शक्य नाही.असे काही मित्र,माणसे असतात ज्यांची किंमत जवळ असताना कळतं नाही जेव्हा अशे मित्र खूप दूर जातात तेव्हा त्यांची किंमत काय होती त्याची उणीव भाजते.प्रसंगानुसार मित्र बदलू नका,वाद जरी होत असतिल तर माघार घ्ययला शिका,आणि मनापासून मैत्री जपा.
"आयुष्यात लाख मित्र बनतील,पण त्या लाखात जुने मित्र नसतील"
.............
🦋*🌺*😇💞..............
शब्दांकन -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...✍🏻😇**

4 weeks, 1 day ago

खूप दूरवर पाहण्याच्या नादात,
चांगल्या
गोष्टी अगदी जवळून निघून जातात,
त्यामुळे
जे तुमच्या जवळ आहे,
तेच प्रेमाने सांभाळा
मग त्या वस्तू असो किंवा माणसं...
😊

4 weeks, 1 day ago

**😘 शिंक आली तर लोकांना SORRY नाही, देवाला THANKS म्हणा!🥴⚜️🔥

होय न सांगता येणारी न थांबवता येणारी शिंक, ही शिंक आरोग्यास फारच उपयुक्त आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे!

१). शिंकेमुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो या दाबामुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने झटका देऊन ढकलला जातो. याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहिन्या चांगल्याप्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.

२). पुर्वी लोक शिंका येण्यासाठी नाकात तपकीर ओढून कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.

३). आता शिंक येणे चुकीचे समजून लोक 'साॅरी' म्हणतात पण ती नैसर्गिक क्रीया आहे.

४). दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी आहे, कारण स्त्रिया स्वपांक करतेवेळी किंवा घराची साफ सफाई करतेवेळी, शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे त्यांची तब्येत अकारण स्थूल होते. शिंकेमुळे पोटावर प्रचंड दाब येतो व पोटाचे स्नायू आकुंचित केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पूर्ण होतो.

५). नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येण्यासाठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते.

६). कृत्रिम शिंका येणेसाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात ह्यासाठी तपकीर वापरणेची गरज नाही.

७). शिंकेमुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये ह्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धतीमध्ये ही क्रिया दिलेली आहे.

८). अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते.

९). शिंकामुळे चेहरा थोडासा लालसर होतो व डोळ्यात पाणी येते हे सुध्दा आरोग्यवर्धक आहे. चेहरा उजळतो व डोळे स्वच्छ होतात.

१०). शिंकेमुळे डोक्यातील विचार चक्र खंडित होते व पुन्हा नविन विचारचक्र सुरू होतांना मेंदुला नवचैतन्य निर्माण होते.

११). सतत सर्दी होत असेल तर ती शिंकांमुळे. काही काळाने अशी सततची सर्दी थांबते.

अशा अनेक उपयुक्त बाबींशी शिंकांचा संबध आहे. अचानक येणारी व थांबवता न येणारी शिंक ही सजीवास ईश्वरी देणगीच आहे
🙏🌹🙏🌹🙏💐🙏💐🙏💐

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

(कॉपी पेस्ट)**

1 month ago
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
1 month ago
✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)
1 month ago
1 month, 1 week ago
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago