🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45
asmr 音声 视频
**ब्रह्मपुत्रेच्या मोठ्या पुरांचा किनाऱ्यावर धोका
? ब्रह्मपुत्रा नदीमधील माजुली बेट नष्ट होण्याच्या मार्गावर असून, २०४० पर्यंत हे बेट पूर्णपणे नाहिसे होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
? नदीला अधिक मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे हा परिणाम होणार असून, नदीकिनारी राहणाऱ्यांनाही त्याचा धोका पोहोचणार आहे.
? ब्रह्मपुत्रा नदी हिमालयातून वाहत येते.
? या नदीचे पात्र सुमारे २९०० किमीचे असून, ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.
? या जलमार्गावर अनेक जण अवलंबून आहेत.
? मात्र, हवामान बदलामुळे मान्सूनच्या काळात नदीला पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा नदीकिनारी राहणाऱ्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे.
? माजुली बेटावर सुमारे १ लाख ७० हजार लोक राहतात.
? मानवी गैरव्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या समस्येचा परिणाम येथील रहिवाशांवर होण्याची भीती आहे.
? पुरामुळे या बेटाचा अधिकाधिक भाग दीर्घकाळ पाण्याखाली जात आहे.
? त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून, बेटावरील जमीन नापीक होत आहे.
? पाऊस आल्यावर बेटावर राहणारे मिशिंग आदिवासी लोक आपल्या जनावरांना घेऊन उंचावरील भागात स्थलांतरीत होतात.
? मात्र, येत्या काळात स्थलांतरीत होण्यासाठी त्यांना जागाच शिल्लक राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
? जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण झालेले प्रतिकूल हवामान, तसेच अपुऱ्या पर्यावरण नियोजनामुळे भारतात सर्वच भागांत पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका लाखो लोकांना बसत आहे.
? देशात दुष्काळ, अतिवृष्टी, समुद्र आणि नद्यांच्या पातळीत वाढ अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.
? 'देशाची लोकसंख्या २०५०पर्यंत १ अब्ज ६० कोटींपर्यंत जाणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे,' असे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले.
? माजुली बेटाचे क्षेत्रफळ ?
? १८९०मध्ये -- आता
१२५० चौ. किमी -- ५१५ चौ. किमी
१०,०००
कुटुंबांचे बेटावरून
१२ वर्षांत स्थलांतर
? येत्या १५-२० वर्षांत माजुली बेट पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता, माजुली बेट संरक्षण आणि विकास परिषदेने व्यक्त केली आहे.**
⛰ भूगोल : महाराष्ट्रातील डोंगर
? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.
? डोंगराचे नाव : जिल्हा
▪ सातमाळा : नाशिक
▪ वणी : नाशिक
▪ निर्मल : नांदेड
▪ चिकोडी : कोल्हापूर
▪ पन्हाळा : कोल्हापूर
▪ चांदूरगड : चंद्रपूर
▪ मांधरादेव : सातारा
▪ महादेव : सातारा
▪ मालिकार्जुन : सांगली
▪ अजिंठा: औरंगाबाद
▪ कळसूबाई : अहमदनगर
▪ भामरागड : गडचिरोली
▪ गाविलगड : बुलढाणा, अकोला
▪ बालाघाट : बीड
▪ तोरणमाळ : नंदुरबार
? Target Mpsc Combined ?
*♾*♾कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध.♾♾
?अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून नव्या प्रजातीच्या कोळ्याचा शोध लागला आहे.
?वन्यजीव संशोधक ध्रुव प्रजापती यांनी हा कोळी शोधला आहे. ‘विंग कमांडर अभिनंदन वर्धमान’ यांच्या नावे म्हणजेच ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ नावाने हा कोळी ओळखला जाणार आहे.
?तसेच फ्लेग्रा या कुळातील हा कोळी आहे.गांधीनगर स्थित गीर फाउंडेशन येथे वन्यजीव संशोधक धु्रव प्रजापती यांनी ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ या कोळ्याचा शोध लावण्यापूर्वी 10 कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे.
?तर नव्या प्रजातीच्या कोळ्याची शरीररचना ही तामिळनाडू येथे आढळणाऱ्या ‘फ्लेग्रा प्रसन्ना’या प्रजातीच्या कोळ्याशी मिळतीजुळती आहे. परंतु दोन्ही प्रजातींमधील प्रजनन प्रक्रियेमध्ये वेगळेपण दिसून येते. प्रजापती यांचे हे स्वतंत्र संशोधन आहे.**
*?*कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :
[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]
1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट**
? प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामेश्वरम् मंदिर ?
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
? भारतातील हिंदूंचं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व चारधामांपैकी दक्षिण धाम, हे बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असून तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम् जिल्ह्यातील रामेश्वरम् बेटावर, रामनाथपुरम् शहराच्या पूर्वेस सुमारे ५६ किमीवर वसले आहे. या ठिकाणाला ‘देवनगर’ असेही म्हणतात.
? रामेश्वरम् हे सुमारे २६ किमी लांबीचे व १.५ ते १४ किमी रुंदीचे प्रवाळ बेट असून पूर्वी ते ‘पांबन’ या नावाने ओळखले जात होते.
? प्रथम हे मुख्य भूमीशी जोडलेले होते, पण भूहालचालीमुळे ते पांबन सामुद्रधुनीने वेगळे झाले आहे.
? या बेटावर रामेश्वरम् व्यतिरिक्त इतर अनेक धार्मिक स्थळे असून धनुष्कोडी हे प्रसिद्ध ठिकाण बेटाच्या आग्नेय टोकाला आहे. १९६४च्या वादळात याचा बराच भाग वाहून गेला.
? रामेश्वरम् बेट मुख्य भूमीशी रस्त्याने व लोहमार्गाने जोडलेले असून येथून श्रीलंकेला जलमार्गाने वाहतूक चालते.
? बेटाच्या दक्षिण व ईशान्य भागात मोती गोळा करण्याचा उद्योग आणि मत्स्यव्यवसाय चालतो.
? या तीर्थक्षेत्राविषयी प्राचीन संस्कृत-प्राकृत वाङ्मयात अनेक उल्लेख आढळतात.
? श्रीरामाने येथे स्थापन केलेल्या शिवलिंगामुळे याला रामेश्वरम् हे नाव पडले अशी वदंता आहे.
? शिवलिंगाच्या स्थापनेविषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
? रावणवधानंतर ब्रह्महत्येच्या पापक्षालनार्थ श्रीरामाने अगस्त्य ऋषींच्या सल्ल्याने येथे शिवलिंग स्थापण्याचा संकल्प केला.
? त्याकरिता हनुमंताला कैलासावर पाठविण्यात आले, परंतु त्याला उशीर झाला, मुहूर्तघटिका साधण्यासाठी सीतेने बनविलेल्या वालुकालिंगाची स्थापना रामाने केली.
? तेव्हा हनुमान निराश झाला. त्यावेळी रामाने हनुमानाला त्याने आणलेले दिव्य लिंग त्या जवळच स्थापण्याची आज्ञा केली.
? दिव्य शिवलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय रामेश्वर दर्शनाचे यात्रेकरूंना फल मिळणार नाही, असे रामाने हनुमंताला आश्वासन दिल्याची एक कथा आहे.
? रामाने स्थापिलेले ते रामेश्वरम् अथवा रामनाथ व हनुमंत याने स्थापन केलेले ते काशी विश्वनाथ किंवा हनुमंदीश्वर या नावांनी ही शिवलिंगे ओळखली जातात.
? येथील मुख्य मंदिर रामलिंगस्वामी या नावाने प्रसिद्ध आहे.
? बेटाच्या पूर्व किना-यावर येथील प्रमुख व भव्य मंदिर बांधले आहे.
? हे मंदिर व त्याच्या परिसरातील लहान-मोठी मंदिरे द्राविड वास्तुशिल्पशैलीत, पूर्व-पश्चिम २५१.५ मी. लांब व दक्षिणोत्तर २०० मी. रुंद अशा सहा उंच प्राकारांत ग्रॅनाइट व वालुकाश्मात बांधली आहेत.
? यातील रामेश्वरम् (रामलिंगस्वामी) मंदिर हे भव्यता व विस्तार दृष्टींनी अद्वितीय आहे.
? मंदिराच्या चारी दिशांना भव्य व उंच गोपुरे पूर्णत: वालुकाश्मात बांधली असून त्यातील दोन ३८.४ मी. उंच व जास्तीत जास्त दहा मजल्यांची आहेत.
? गोपुरांवर मूर्तिकाम असून मुख्य मंदिर गर्भगृह, रंगमंडप व सभागृह अशा तीन स्वतंत्र दालनांत विभागले आहे.
? भिंतींना लागून शिल्पपट्ट आहेत. येथील मूर्तिकामात भव्यता असूनही वैविध्य नाही.
? पौराणिक प्रतिमांव्यतिरिक्त नृत्यांगना व प्राणी यांची शिल्पे आहेत. मात्र त्यात क्वचित एखादेच शिल्प लक्षणीय आढळते.
? उंच व एकसंध दगडी स्तंभावर छत असून रामेश्वरम् लिंगासमोर सुमारे ४ मी. उंचीची नंदीमूर्ती आहे.
? या मूर्तीजवळ सोन्याच्या पत्र्याच्या मढविलेला गरुडस्तंभ आहे.
? रामेश्वरम्व्यतिरिक्त येथे पार्वती, षडानन, गणपती व काशी विश्वेश्वर या देवतांची तसेच सप्तमातृका, नवग्रह, विशालाक्षी, अन्नपूर्णा, नंदिकेश्वर या उपदेवतांची मंदिरे आढळतात.
? येथील बहुसंख्य मंदिरे रामनाडच्या पाळेगार सेतुपती घराण्याने बांधली आहेत. त्यांची बांधणी पंधराव्या ते सतराव्या शतकांमध्ये प्रामुख्याने झाली.
? उदयन सेतुपतीने मूळ मंदिर परराज शेखर या लंकाधिपतीच्या साहाय्याने १४१४ मध्ये बांधले. पुढे याच घराण्यातील सेतुपतींनी त्यात भर घातली.
? देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी त्यांनी अग्रहार दिले असून पहिल्या पूजेचा मान या घराण्याकडे आहे. याविषयीचे अनेक शिलालेख मंदिरांत असून काही ताम्रपट उपलब्ध आहेत.
? येथील धार्मिक स्थळांशी हनुमंताचे लंकेला उड्डाण, सेतुबंधन, सीतेचे अग्निदिव्य इत्यादी रामायणातील कथांचा संबंध जोडला जातो.
? बेटावर सुमारे २२ तीर्थे असून त्यापैकी राम, लक्ष्मण, सीता, अग्नी, माधव, गंधमादन, नील तसेच जटा तीर्थ, विल्लूरणी तीर्थ, भैरव तीर्थ ही प्रमुख आहेत.
? याशिवाय रामझरोखा (टेकडीवरील मंदिर), साक्षी विनायक, एकांत राम मंदिर, नवनायकी अम्मन मंदिर, कोदंडरामस्वामी मंदिर इत्यादी ठिकाणांनाही धार्मिक महत्त्व आहे.
? येथे महाशिवरात्र, वैशाखी पौर्णिमा या दिवशी मोठे उत्सव होत असून वसंतोत्सव, नवरात्र व आषाढातील आदी अमावासई (अमावास्या) इत्यादी उत्सवही साजरे होतात.
? Join @SpardhaYashachi?
.
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45
asmr 音声 视频